Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

6 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 ६ नोव्हेंबर



 प्रार्थना

  अजाण आम्ही तुझी लेकरे, ना पिता... 

  

→ श्लोक

 - गुणेदोषी बुधो गृहणन् इन्दुश्वेडो हव ईश्वरः । शिरसा श्लाघते पूर्व परं कंठे नियच्छति ।। बुध्दिमानं म्हणजे समंजस मनुष्य, गुणदोष दोन्ही समजून घेतो म्हणजे जाणतो, पण ज्याप्रमाणे शंकर चंद्राला डोक्यावर घेतो व विष कंठात ठेवतो, त्याप्रमाणे वा गुणांना शिरसावंद्य मानतो व दोष कंठातच म्हणजे मनात ठेवतो. सज्जन इतरांच्या गुणांची प्रशंसा करतो पण दोष बोलून दाखवीत नाही.

 

 

 → चिंतन

 - शब्दाचे सामर्थ्य फार मोठे आहे. शब्दात अस्त्रांचे सामर्थ्य आहे; तसेच प्रकाशाचे तेज आहे - यशवंतराव चव्हाण. 'शब्द' हे शस्त्र आहे. जपून वापरा. असा इशारा नेहमी आढळतो. तो वाचून गंमत वाटते. तीही त्या शब्दांचीच थोरवी. तुकाराम महाराजांनी शब्दांना 'रत्न' असे म्हटले आहे. कवी, लेखक याचे शब्द हे धनद नको का? आपण धो-धो शब्द बोलतो. पण मुक्या माणसाला बोलता येत नाही. त्याची त्याला खत वाटते. लहान मूल 'आई-बाबा' असे शब्द बोलू लागते तेव्हा सर्वांना आनंद होतो. मनातील विचार शब्दांतून व्यक्त होतो. गोड शब्दांनी माणसे जोडता येतात. कडू शब्दांनी माणसे तोडली जातात. म्हणून शब्द जपून वापरणे ठीक

  

. → कथाकथन

 'ससा आणि त्याचे मित्र' - एक ससा होता. त्याला अनेक जिवलग मित्र होते. तो आपल्या मित्रांना नेहमी भेटायचा. त्यांच्याशी गप्पा मारायचा. शक्य होईल तितकी त्यांना मदत करायचा. एके दिवशी ससा संकटात सापडला. पाच-सहा शिकारी कुत्री त्याचा पाठलाग करू लागली. ससा सुसाट धावत सुटला. धावून धावून ससा खूप दमला. पण शिकारी कुत्री त्याचा पाठलाग सोडत नव्हते. धावत धावत ससा झाडीत | शिरला आणि लपून बसला. त्याला भिती वाटत होती. शिकारी कुत्रा त्याचा वास घेतील आणि त्याला शोधून काढतील, त्याच्या मनात आले की, जर आपला कुणी मित्र तेथे आला, तर तो आपल्याला नक्की मदत करील इतक्या त्याला त्याचा मित्र थोडा दिसला. तो रस्त्यावरून दौडत चालला होता. सशाने घोडयाला विनंती केली की, घोडेदादा "शिकारी कुत्रे माझा पाठलाग करत आहेत. मला तुझ्या पाठीवर बसवून दूर घेऊन जा. नाहीतर ते शिकारी कुत्रे मला ठार मारतील. "घोडा म्हणाला, "ससोबा, मी तुला नक्कीच मदत केली असती, पण मी आता खूप घाईत आहे. तो बघ, "तुझा मित्र बैलोबा इकडेच येतोय. तो तुला नक्कीच मदत करेल. "असे म्हणून घोडा निघून गेला. मग सशाने बैलाला विनंती केली, “बैलोबा शिकारी कुत्रे माझ्या मागे लागले आहेत. मला तुझ्या पाठीवर दूर घेऊन जा. नाहीतर ते शिकारी कुत्रे मला ठार मारतील. 'बैल हणाला, "ससुल्या' मी तुला नक्कीच मदत केली असती, पण माझा मित्र माझी कुरणात वाट बठपतोय, तेव्हा मला गेलचं पाहिजे. ती बघ तुझी मैत्रिण बकरी इकेडच येतेय. "ती तुला नक्कीच मदत करील. "असे म्हणून बैल निघून गेला. "मग सशाने बकरीला विनंती केली. "बकरीताई, "शिकारी कुत्रे माझा पाठलाग करत आहेत. मला तुझ्या पाठीवर बसवून दूर घेऊन जा. नाहीतर से शिकारी कुत्रे मला ठार मारतील. "बकरी म्हणाली, मी तुला नक्कीच मदत केली असती, पण माझे अंग खरखरीत आहे. त्यामुळे तुझ्या अंगाला इजा होईल. ती बघ, मेंढी इकडेच येत आहे. तिला सांग ती तुला मदत करील. " असे म्हणून बकरी निघून गेली. अशा प्रकारे सशाचे सर्व मित्र रस्त्यावरून गेले. त्याने प्रत्येकाला मदतीसाठी विनंती केली. पण बिच्चारा ससा, "प्रत्येक जण त्याला काही न काही कारण सांगून टाळून गेला. ससा मनात म्हणाला, "माझे चांगले दिवस होते तेव्हा मला पुष्कळ मित्र होते, पण आता संकटकाळी कुणीही मित्र नाहीत. माझे सगळे मित्र फक्त माझ्या चांगल्या दिवसांचेच सोबती होते. "थोड्याच वेळात शिकारी कुत्री तेथे आली. "त्यांनी त्या गरीब सशाला ठार मारले. इतके मित्र असूनही सशाला नाहक मरावे लागले, हे किती वाईट !

 

 → सविचार

  खरी मैत्री मोकळ्या हृदयाने बोलते, न्याय सल्ला देते, केव्हाही मदत करण्यासाठी तयार होते. धैर्याने मार्ग शोधते, धीटपणानेबाजू घेते आणि मित्रत्त्वाचे नाते कायम ठेवते. • संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र. ● मैत्री नको फुलासारखी क्षणभर सुगंध देणारी, नको सूर्यासारखी सतत तापलेली, नको चंद्रासारखी साथ न देणारी, -

  

  

 → दिनविशेष

  नको सावलीसारखी, कायम पाठलाग करणारी. मैत्री हवी अश्रूसारखी सुख-दुःखात समान साथ देणारी. - • संत बसवेश्वर स्मृतिदिन - बसवेश्वराच्या जन्मगावाच्या बाबतीत एकमत नसले तरी त्याचा जन्म अक्षयतृतीयेला झाल्याचे मानले जाते. कुंडलसंगम (कर्नाटक) येथे त्यांचे अध्ययन झाले. अनेक वर्षे ते बिज्जल राजाच्या पदरी होते. पण या राजकीय आयुष्याचा त्यांना कंटाळा आला व हे परत कुंडलसंगम येथे गेले आणि शिवापासनेत आयुष्य घालवू लागले. त्यांनी ज्ञान, कर्म, शक्ती यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. 'ओम नमः शिवाय' हा मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. त्यांच्या मते वर्णजातीमुळे उच्चनीचता व विषमता अयोग्य असून सर्व माणसे समान आहेत, त्यांनी | बालविवाहालाही विरोध केला. तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. सर्व मानव समान आहेत याचा अर्थ स्त्री-पुरुष हेही समान आहेत. त्यांनी शिवानुभव मंडप नावाचे एक विद्यापीठ स्थापन केले होते. त्यांच्या पुरुष भक्तांप्रमाणेच स्त्री भक्तांनीही साहित्य निर्माण केले आहे. 

  

→ मूल्ये

 • देशप्रेम, निर्भयता 

 • 

→ अन्य घटना

 • पहिली गोलमेज परिषद - १९३०

  

 → उपक्रम

  • संत बसवेश्वरांची माहिती मिळवा

  . • यशवंतराव चव्हाणांनी आपली माता 'विठाई' यांचे शब्दचित्र लिहिले आहे ते ग्रंथालयातून मिळवून वाचा. 

  

→ समूहगान 

इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके...

  

 → सामान्यज्ञान

  • इ.स. १८५८ मध्ये जन्मलेला एलझेआर बुफिये हा प्रयन्समधील एक छोटा शेतकरी, कसलाही नावलौकिक, धनसंपत्ती यांची अपेक्षा न करता अबोल, एकांडेपणाने केवळ आपले शरीर आणि मानसिक सामर्थ्य घेऊन एका लोखंडी कांबेच्या साहाय्याने लाखो झाडे लावत जगवत | १९४७ साली निसर्गात विलीन झाला

  . • भारतातील उन्हाळी किंवा गरम पाण्याचे झरे

   (१) तत्तपानी (सिमल्याजवळ, हिमाचल प्रदेश)

    (२) मुंगेर जिल्ह्यातील खडगपूर टेकतील | उन्हाळयांची मालिका, राजगीर (बिहार)

     (३) मानभूम (पश्चिम बंगाल)

      (४) हजारीबाग (झारखंड)

       (५) सहस्रधारा (उत्तरांचल) देहरादूनजवळ

        (६) धर्ममान जिल्ह्यात बक्रेश्वर (पं. बंगाल) 

        (७) संगमेश्वर, वज्रेश्वरी, उनपदेव (कोकण, महाराष्ट्र).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा