८ नोव्हेंबर
→ प्रार्थना
- सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा... जय जिजाऊ
→ श्लोक
- धैर्य यस्य पिता, क्षमाच जननी, शान्तिः चिरं गेहिनी, सत्यं सूनुः अयं, दया च भगिनी, भ्राता मनःसंयमः शय्या भूमितलं, दिशोऽपि वसनं,ज्ञानामृतं भोजनम् एते यस्य कुटुम्बिनः, वद सखे, कस्माद भयं योगिनः ।।
- वार: धैर्य हा पिता, क्षमा ही माता, सदैव शान्तवृत्ती ही गृहिणी, सत्य हा पुत्र, दया ही बहीण आणि मनःसंयम हा भाऊ आहे; तसेच पृथ्वीतल ही शय्या, दिशा हे वस्त्र आणि ज्ञानामृत हे भोजन. हे सर्व ज्याच्या कुटुंबात (म्हणजे घरात) आहेत, अशा योग्याला, हे सखे (मित्रा), कशापासूनच भय नाही.
→ चिंतन- दुःख आणि अडचणींवर मात करण्यासाठी विनोदबुध्दीसारखे प्रभावी औषध नाही. अब्राहम लिंकन 'हसा आणि लठ्ठ व्हा' असा एक संदेश आहे. दिलखुलास हसल्याने मन मोकळे होते. मन मोकळे असेल तर ते प्रसन्न, आनंदी असू शकते. त्यामुळे शरीराचे आरोग्यही उत्तम राहते. जीवनातील विसंगती, विकृती यांच्याकडे दयाबुध्दीने पाहायला हवे. अपेक्षाभंग झाला तरी त्यातूनही गंमत निर्माण होते. पानभर मजकूर लिहून वाचून जो परिणाम साधत नाही. तो एखाद्या व्यंगचित्राने किंवा विनोदी चुटक्याने साधतो. विनोद हसत खेळत दोष दाखवितो. दुःख-दैन्याने भरलेल्या जीवनात विनोद आनंद निर्माण करतो. शिव्या ही वाङ्मयातील हिंसा आहे, तर विनोद ही वाङ्मयातील अहिंसा आहे.
→ कथाकथन
- श्रेष्ठ धर्म - गांधीजी चंपारण्य जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ज्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता तेथे त्यांच्या कानी ढोलक्यांचा आवाज आणि माणसांनी दिलेल्या काही घोषणा ऐक आल्या त्यांना भेटायला आलेल्या एका स्थानिक कार्यकर्त्याला गांधीजीनी विचारले, 'हा आवाज कसला आहे?' 'मिरवणूक निघाली आहे. 'कसली मिरवणूक ?" "एक बकरी वाजत-गाजत लोक देवीच्या देवळाकडे नेत आहेत.' 'ते कशासाठी ?' गांधीजींनी गंभीर होऊन विचारले, 'आज देवीला अजवळी द्यावयाचा आहे. गांधीजीनी आपली चर्चा तिथेच थांबविली. त्या कार्यका | बरोबर घेऊन ते त्या मिरवणूकीत सामील झाले. मिरवणूक देवीच्या मंदिराजवळ आली, तेव्हा गुलालाने माखलेल्या त्या बकरीजवळ गांधीजी उभे होते. मंदिराच्या मंडपात मिरवणूक आली तेव्हा मिरवणूकीच्या म्होरक्याला गांधीजी म्हणाले, 'या बकरीला उगीच का मारता?' 'देवी प्रसन्न करण्याकरिता आम्ही धर्मकृत्य आचरणात आणीत आहोत.' गांधीजीच्या कपाळाला आठ्या पडल्या. ते म्हणाले, 'मनुष्यप्राणी श्रेष्ठ दर्जाचा आहे. बकरी बळी जाण्यानं देवी जेवढी प्रसन्न होईल त्याच्यापेक्षा मनुष्यप्राण्याच्या बलिदानानं ती अधिक प्रसन्न झाली पाहिजे. मग बोला ! तुमच्यापैकी कुणी बळी जाण्यास तयार आहे काय ? 'सर्वांच्या चेहऱ्याकडे गांधीजींनी सूक्ष्म दृष्टीने पाहिले. जो तो बुचकळ्यात पडला होता. उत्तर देण्यास कोणीच तयार नव्हते. भक्तजणांची अगतिक स्थिती पाहून गांधीजी म्हणाले, 'मी स्वतः बळी जायला तयार आहे. आणि जर तुम्ही मला बळी देणार नसाल तर या मूक बिचाऱ्या बकरीला ताबडतोब सोडून द्या. त्या मूक बिचाऱ्या प्राण्याला काही कळत नाही किंवा काही सांगता येत नाही. म्हणून तिला मारणं हा धर्म नव्हे. पुण्य तर नव्हेच, ते पाप आहे, शुध्द महापाप आहे.' लोकांनी बकरीला सोडून दिले. सारेजण गांधीजींच्या वरणाला लागले. मिरवणुकीच्या गर्दीचे रूपांतर सभेत झाले. पुढारी गांधीजींना म्हणाला, 'बापूजी, आम्ही चुकीच्या मार्गावरून जात होतो. कृपा करून आम्हाला सत्यधर्म समजावून सांगा.' लोकांचे परिवर्तन झालेले पाहून प्रसन्न मनाने गांधीजी सांगू लागले. 'परमेश्वर सर्वांच्या ठिकाणी आहे. तो मुक्या प्राण्यातही आहे. मग मुक्या | प्राण्याची हत्या परमेश्वराला कशी आवडेल?' मुक्या प्राण्यावर दया केलेलीच त्याला आवडेल. बाबांनो, अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. परमेश्वर आपण डोळ्यांनी पाहिलेला नाही, तो दिसत नाही तो जाणवतो. ज्याचे आचरण शुध्द आहे त्यालाच आपल्या हृदयात बसत असलेला परमेश्वर ओळखता येतो आणि लक्षात ठेवा की, सत्य ही शुध्द आचरणाची गुरुकिल्ली आहे. म्हणून मी सत्याला परमेश्वर आणि अहिंसेला श्रेष्ठ धर्म मानतो.
सुविचार
'सत्य, अहिंसा, प्रेम हेच माझे ईश्वर आहे.'
देव ना स्वर्गात आहे ना पाताळात आहे, तर प्रत्येकात देव आहे हे मला माहित आहे - म. गांधी. -
→ दिनविशेष
'पु.ल.देशपांडे' या नावाने प्रसिध्द आहेत. महाराष्ट्राचे लाडके
व्यक्तिमत्व असे त्यांच्याविषयी कौतुकाने म्हटले जाते. विनोदी लेखक, नाटककार, सिनेनाट्यदिग्दर्शक, संगीतकार, उत्तम नट, गायक, हार्मोनियमपटू, प्रभावी वक्ते आणि प्राध्यापक असे हे अष्टपैलू साहित्यिक आहेत. 'एकपात्री नाट्यप्रयोग' ही. पु.लं.ची. खास निर्मिती. बटाट्याची चाळ, खोगीरभरती, असा मी असा मी, पूर्वरंग, अपूर्वाई ही त्यांची पुस्तके फार गाजली. 'व्यक्ति आणि वल्ली' पुस्तकातील अंतू बर्वा, चितळे मास्तर, ना परीट आदि व्यक्तिरेखा 'हसू आणि आसू' आणणाऱ्या आहेत. 'तुझे आहे तुजपाशी' व 'ती फुलराणी' ही त्यांची नाटके व 'गुळाचा गणपती' हा (सब कुछ पु. ल. देशपांडे असलेला) मराठी चित्रपट अवस्मिरणीयच. 'पद्मश्री' देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
मूल्ये -
• साहित्यप्रेम, कलाप्रेम, विश्वबंधुत्व
. → अन्य घटना
• इंग्रज महाकवी जॉन मिल्टन यांचे निधन - १६७४
• मदर तेरेसा यांना 'नोबेल पारितोषिक' मिळाले. - १९९२.
→ उपक्रम -
• पु.ल.देशपांडे यांच्या कथा कथनाची ध्वनिफीत ऐका. • पुं.ल.च्या नाटकातील प्रवेशाचे प्रकटवाचन करा.
→ समूहगान
-• हम युवकों का ऽ ऽ ऽ नारा है, है, हैऽ हैऽ है ....
→ सामान्यज्ञान -
• प्रमुख शोध•
•
टेलिव्हिजन
रेडिओ
शिवणमशिन
त्यांचे संशोधक
जॉन एल.बेयर्ड, इंग्लड - १९२५
जी.मार्कोनी, इटली - १८९५
इलिआस होन, अमेरिका - १८४६
याच्या ठिकाणी आहे. तो प्राण्यातही आहे. मग मुक्या करा. • जॉन मिल्टन हा कवी वयाच्या ४३ व्या वर्षी पूर्णपणे अंध झाला. जगातील श्रेष्ठ महाकाव्यात 'पॅराडाईज लॉस्ट' या त्याच्यामहाकाव्याची गणना होते. या महाकाव्याच्या रचनेनंतर मिल्टनची कीर्ती वाढतच गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा