1 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
तुही राम है, तू रहिम है, तू करीम कृष्ण ख़ुदा हुवा..... श्लोक - उत्तम व्यवहारे धन घ्यावे । उत्तम कार्यासाठी लावीत जावे ।।
• जय सावित्री जेणे परस्परांचे कल्याण व्हावे । तैसेची करावे व्यवहार ॥ उत्तम व्यवहाराने धन कमवावे व उत्तम कार्यासाठी खर्च करावे, परस्परांचे कल्याण होईल असाच व्यवहार करावा. |
→ चिंतन
- आपल्या ध्येयाविषयी तुमच्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे, ती क्षणिक असता कामा नये. आदर्श विषयीची निष्ठा सतत टिकणारी, सतत प्रयत्नशील व अचंचल अशी हवी. उठा ! जागे व्हा! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका स्वामी विवेकानंद
कथाकथन
'मानवी हक्क दिन (१० डिसेंबर)' एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करते. तेव्हा असंख्य निरपराध माणसांना आपले प्राण गमवावे || - पपहार || गत कलिंग युद्ध, युरोपातील धर्मयुध्दे, चेगीझखान, तिमूरलंग आणि अहमद अब्दालीच्या स्वाया, दोन्ही महायुध्दे, हरी कराल भारतात फाळणीच्या वेळी निरपराध माणसांची व बायकामुलाची १८५७ साली इंग्रजांनी केलेल्या करावी या बासकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. याप्रमाणेच काही माणसे दुसऱ्या माणसावर अत्याचार करतात व त्यांना गुलामीचे जिणे जगायला लावतात. अमेरिका व आफ्रिका खंडातील काळे व गोरे भेदभाव, भारतातील अस्पृश्यता ही यातीलच उदाहरणे होत. अशा माणुसकीशून्य घटना होऊ नयेत म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ गेली ५० वर्षे प्रयत्नशील आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दि. १० डिसेंबर १९४८ रोजी मानवी हक्क सनद संमत केली आणि जगातील सर्व राष्ट्रांनी या सनदेवी बूज राखली पाहिजे. असे जाहीर केले. संयुक्त राष्ट्र संघाने एकंदर तीस मानवी हक्क घोषित केलेले आहेत. त्यापैकी प्रमुख हक्क असे आहेत. सारे मानव समान आणि स्वतंत्र आहेत. प्रत्येक मानवाला जगण्याचा, वास्तव्य करण्याचा आणि प्रत्येक मानवाला काम करण्याचा व विश्रांती घेण्याचा हक्क आहे. वंश, वर्ण, किंग, भाषा, धर्म, कुल आणि मत यामुळे मानवी हक्कात फरक होणार नाही. इत्यादी हक्कांची घोषणा करताना संयुक्त राष्ट्रसंघाने जे निवेदन केलेले आहे। ते महत्त्वाचे आहे. त्यात म्हटले आहे की दुसऱ्याच्या हक्काचा आदर करण्यास आपण कितपत तयार आहोत. यावर आपला स्वतःचा मानवी हक्क अवलंबून आहे. हेच तत्व जर राष्ट्राराष्ट्रांमधील संबंधांना लागू केले तर शांततेला ते आधारभूत ठरेल. मानवी प्रतिष्ठेचा आदर करण्यास सर्वांनीच कटिबध्द असले पाहिजे. हक्क आणि आकांक्षा जसे आपणास पवित्र वाटतात. तसेच इतरांच्या बाबतीतही वाटले पाहिजे. या वृत्तीचा स्वीकार केल्यानेच आज आपणास भेडसावणारी असुरक्षितता व भीती दूर होईल. मानवी हक्कांची जपवणूक करण्यासंबंधी या दिवशी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्याचे प्रबोधन व्हावे, ही अपेक्षा या दिनाची आहे.
सुविचार
• खोट्या प्रतिष्ठा उराशी बाळगून श्रमप्रतिष्ठा विसरलेला माणूस परावलंबी बनतो आणि आपल्या जगण्याचा अधिकारच गमावतो. कारण परावलंबीपणा ही सर्वनाशाची पहिली पायरी आहे.
• समान न्याय, समान दर्जा, समान संधी, समान स्वातंत्र्य हे आपले हक्क असून राष्ट्रहित जोपासणे आपले मूलभूत कर्तव्य आहे.
• परोपकार हा धर्म, आणि परपीडन हे पाप अशी मानवी धर्माची व्याख्या बनली पाहिजे.
• माणसाने स्वतःवर विलक्षण प्रेम केले पाहिजे; म्हणजेच त्याला कर्तव्याची व हक्काची जाणीव होईल.
दिनविशेष
पाहिजे. मुलभूत कर्तव्य आहे.
• परोपकार हा धर्म, आणि परवीन है ना जान माणसाने स्वतःवर विलक्षण प्रेम केले पाहिजे म्हणने त्या कर्ताह
• मानवी हक्क दिन प्रारंभ १९४८ जन्मानेच माणूस काही पाहिल्यावर मानकरण्यात|| आंतरराष्ट्रीय संबंधात जरी प्रत्येक राष्ट्राचे सार्वभौमत्व मान्य करण्यात येते, तरीही मान्य आले आहे. दुसऱ्या महायुध्दानंतर विजेत्या राष्ट्रांनी जनते विशेष न्यायालय स्थापन केले. या न्यायालयाने ज्या तर्त्यांच्या आधारे आपले निर्णय दिले. ती तत्वे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने नंतर स्वीकारली. एक संयुक्त राष्ट्राच्या सनदेमध्येच मानवी हक्कांना प्राधान्य देण्यात आले आहे. राहणीमान वाढविणे, सर्वांना रोजगार मिळवून देणे, सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणणे ही उद्दिष्टे आहेत. त्यानुसार १० डिसेंबर १९४८ मध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा काढण्यात आला. प्रत्येक व्यक्तीला मानवी हल्क आहेत. आणि त्यांचा संकोच करण्याचा अधिकार सार्वभौम सत्तेलाही नाही, हा विचार या करारामुळे अतिरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावला. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये एकंदर ३० कलमे आहेत.
मूल्ये
समता
, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य
→ अन्य घटना
• चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा जन्मदिन - १८७८ • स्वीडीश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबलचे निधन -१८९६
→ उपक्रम
• डेहराडून येथे इंडियन मिलटरी अॅकॅडमी ही लष्करी प्रशिक्षण देणारी संस्था उघडण्यात आली -१९३२
• मराठी ग्रंथसूचिकार शंकर गणेश दाते यांचा स्मृतीदिन १९६४ दलाई लामा यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. १९८९
• मानवी हक्कांसाठी झगडणाऱ्या व्यक्तींची माहिती देणे, उदा. मार्टिन ल्युथर किंग, लो. टिळक, म. गांधी, पं. नेहरू, सावरकर, सुभाषचंद्र बोस, कर्मवीर भाऊराव पाटील, म. अण्णासाहेब कर्वे इ.
समूहगान
• हम होंगे कामयाब,हम होंगे कामयाब.....
→ सामान्यज्ञान
कर्मवीर भाऊराव पाटील, म. अण्णासाहेब कर्वे इ.
• हिंदी भाषिक एक पाहणी
• मॉरिशमधील ६५ टक्के लोक हिंदी बोलतात. गियानातील ४५ टक्के लोक हिंदी बोलतात.
• फिजी सुरीनाम, त्रिनिदाद ब्रम्हदेश, मलाया, सिंगापूर येथे हिंदी बोलणाऱ्यांची संख्या लाखांमध्ये आहे.
• नेपाळमधील २८ टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे
. • पाकिस्तानमधील एक लाख लोकांची मातृभाषा हिंदी आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा