11 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम.....
→ श्लोक -
गुणैः गौरवमायति नोच्चैरासनमास्थितः । प्रासादशिखरस्थोऽपि काको न गरुडायते ॥
मनुष्याला मोठेपणा गुणांमुळे प्राप्त होतो. उंच आसनावर बसल्याने नाही. जसे राजवाड्याच्या शिखरावर असलेला कावळा गरूड होत नाही
→ चिंतन
आपली दानत हेच आपले सर्वस्व. हेच आपले धन आणि आपल्या सामर्थ्याचेही रहस्य तेच. दानत बिघडली की सामर्थ्याने राम म्हटला तुमची दानत चांगली नसली तर साऱ्या जगाच्या मदतीचा कवडीभरही उपयोग तुम्हाला होणार नाही. पण
कथाकथन
'गीताजयंती (मार्गशीर्ष शु. ११) गीता जयंतीचा उत्सव संस्कार केंद्रात आगळ्या वेगळ्या रीतीने साजरा व्हायचा. गुरुजी || सर्वांना गीतेचा अध्याय १२ या १५ वा आधी संघा देऊन पाठ करायला सांगितला. हा अध्याय 'भक्तियोग' नावाचा आहे. तो आम्ही गीता - ||दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शु. ११ छा सगळ्या मुलामुलींनी मिळून सामुदायिक रीतीने तोंडपाठ करून एका सुरात म्हटला. समोर भगवान श्रीकृष्ण यस्यावरील भिंतीवरील अर्जुनाच्या रथावर सारथी श्रीकृष्ण वा उपदेश करीत असलेले रंगीत चित्र होते. त्या मूर्तीचे व त्या चित्रातील कृष्ण पूजन गुरुजींनी केले. नंतर त्या भक्तीयोगाचा थोडक्यात अर्थ गुरुजींनी आम्हाला असा सांगितला. श्रीकृष्णाने ईश्वराची भक्ती कशी करावी याचे चार पर्याय सांगितले. १) माणसाने आपले मन व बुध्दी ईश्वरात विलीन करावी | भावना व बुध्दीतील विचार ईश्वररुपी शुद्ध, सत्य चिन्मय आनंदमय करावेत, म्हणजे यातून उत्पन्न होणारा विचार, उच्चार व आचार ईश्वररुपी स्याला ईश्वरप्राप्ती होते. २) जर आपले चंचल चित्त ईश्वर रूपी आचार विचारात स्थिर होणार नसेल तसा सराव (अभ्यास) सतत करावा म्हणजे | ईश्वरी कर्मे करण्याची शक्ती वाढवून विचार, उच्चार, कार्य करण्याचा प्रयत्न करीत राहावा. ३) जर असा अभ्यास योग शक्य होत नसेल तर माण ईश्वररुपी कर्म करीत रहावे. आसुरी कर्मे करु नये. सत् चित आनंदरुपी कार्यच करीत राहावे म्हणजे भक्ती केल्यासारखे होईल. ४) हेही शक्य होत तर आपण जे जे कर्म करू नये त्याचे फळ ईश्वराला अर्पण करणे. मिळणारे यश, अपयश, मिश्रस्वरुपी फळ आपले नाही असे समजून ईश्वराला करावे. म्हणजे भक्ती केले असे होते. असे सत्कर्म करून त्याचे फळ ईश्वराला अर्पण केल्याने अहंवृती हळूहळू नष्ट होऊन मन ईश्वरात एकरूप होत जाते. ही समाधी अवस्था प्राप्त म्हणजे शांती प्राप्त होऊन ईश्वरदर्शन, ईश्वररूपत्व प्राप्त होते. म्हणून आज आपण ईश्वररूपी सत्कर्म करून त्याचं फळ कृष्णार्पण करणार आहे. | आम्हाला गुरुजींनी अंधशाळेत नेले. आम्ही त्यांचे आवार, वसतिगृहातील त्यांच्या खोल्या साफ केल्या, त्यांच्या आवारातील वसतिगृह ते पाण्याचा | टाकीपर्यंतचा रस्ता मुरूम टाकून दुरुस्त केला आणि तेथील प्रत्येक अंध विद्यार्थ्याला एकेके केळ व एकेक पेढा गीताजयंतीचा प्रसाद म्हणून दिला. त्या ते अंधविद्यार्थी संतुष्ट झाले आणि त्यांनी आमचे आभार मानले. तेव्हा गुरुजी म्हणाले, "हे बाह्यदृष्टी नसलेल्या परंतु अंतदृष्टी असलेल्या मित्रांनो, | हे काम केले ते ईश्वरी संकेताने, तुम्ही आमचे मानलेले आभार आम्ही कृष्णाच्या चरणी वाहून देत आहोत. हे त्यांचंच काम व त्यांचच फळ
सुविचार
- सांस्कृतिक मूल्ये आपल्या आवरणात आणणं म्हणजे सणवार खऱ्या अर्थाने साजरे करणे होय.' • खरी कला ही ईश्वराचे भक्तिपूर्ण पूजन करीत आते
- दिनविशेष -
- * युनिसेफ स्थापना १९४६ - ही संघटना मुलांच्या जीवनाची सुरक्षा आणि त्यांची प्रगती या हेतूने प्रेरित होऊन स्थापना करण्यात संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या पहिल्या अधिवेशनातच 'युनिसेफची' निर्मिती झाली. जागतिक महायुध्दानंतर आपत्तीत सापडलेला युरोप आणि चीन इ. | मुलांसाठी सुविधा निर्माण करण्याचा प्रथम हेतु लेता. पुढे त्या कामाची व्याप्ती वाढविण्यात आली आणि इतर प्रगतीशील देशातील मुलांनाही याचा होऊ लागला. युनिसेफला या कार्याबद्दल १८६५ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला. या संघटनेत जगातील ११८ देश सहभागी आहेत. भारत हा एक देश आहे. राष्ट्रव्यापी रोगांना थोपविणे आणि मुलांचे, मातांचे सर्वतोपरी संरक्षण- संगोपन करणे अशी विविध कामे या संस्थेमार्फत केली ज पाणी, पर्यावरण, स्वच्छता, सामुदायिक शिक्षण, स्त्रियांसाठी विशेष शिक्षण हा संस्थेच्या कार्याचा भाग आहे. तिचे कार्य पूर्णपणे ऐच्छिक देणग्यांवर
मूल्ये
त्याग, सेवा, कर्तव्यबुध्दी.
→अन्य घटना
• रघुनाथ पेशवे स्मृतिदिन १७७३
• आचार्य रजनीश ओशो' यांचा जन्मदिन - १९३१
• राष्ट्रकवि मैथिलीशरण गुप्त स्मृतिदिन १९६४ कोयना भूकंप स्मृतिदिन १९६७
• महाराष्ट्राचे राज्यपाल अलियावर जंग निधन - १९७६
• कवी रामचंद्र त्रिवेदी उर्फ कवी प्रदीप यांचे निधन - १९९८
→ उपक्रम
• 'युनिसेफ'च्या कार्याची अधिक माहिती घेणे, गरजू विद्यार्थी, बालमजूर यांच्या समस्या समजावून घेणे. आरोग्य, शिक्षण यांचे महत पटवून देणे.
→ समूहगान -
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !...
→ सामान्यज्ञान
• एकोणीसाव्या शतकात दौत टाकाची जागा फाऊंटने पेनने घेतली. तर १९५० च्या दशकात बॉलपेनचा वापर सुरू झाला. फाऊंटनपेन व बॉलपेनच्या निब, टोक, वजन, आकार, सुबकपणा यात दिवसेंदिवस बदल होत जाताना दिसतात. • लेखणीचा वापर नेमका कधी सुरू झाला हे सांगता येणार नाही, परंतु लेखणीचा वापर करता येणे हे मानवी मेंदूच्या उ एक अत्यंत प्रगत लक्षण असल्याचे मानले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा