12 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना -
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे....
श्लोक
अरे! उठा उठा श्रीमतांनो ! अधिकाऱ्यांनो ! पंडितांनो! सुशिक्षितांनो! साधुजनांनो! हाक आली क्रांतीची । गावागावासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा । उजळा ग्रामोन्नतीचा दिवा | तुकड्या म्हणे - ग्रामगीता
उठा उठा श्रीमतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, सुशिक्षितांनो, साधुजनांनो! क्रांतीची हाक आली आहे. गावाची जागृती करा. भेदभाव समूळ मिटवून टाका. गावाच्या उन्नतीचा दिवा प्रकाशमान करा. असे तुकडोजी महाराज म्हणतात. जिजाऊ • दैनंदिन शालेय परिपाठ
→ चिंतन -
सत्याग्रहाने हक्क प्राप्त होतात पण हा सत्याग्रहाचा हेतू नाही. हक्क प्राप्त होतात हा परिणाम आहे. पण सत्याग्रह हा परिणामांवर दृष्ट न ठेवता करता येतो. सत्याग्रहात यश येवो न येवो याची पर्वा नसते. अपयश आले तरी निराशा होत नाही. सत्यग्रह हे खरे शिक्षण
'
कथाकथन
बाबू गेनू वाघ म्हणून जगला' - पुण्यापासून चाळीस-पन्नास मैलावरील एका पर्वताच्या कुशीत वसलेल्या 'महालुंग पडवळ'
गावाचे फारसे कुणाला ठाऊक नसलेले गाव तिथे १९०८ साली जन्मास आलेल्या बाबू गेनू सैद या प्रखर देशभक्तामुळे एकदम प्रकाशात आले. बाबू बुध्दीने अत्यंत तल्लख असूनसुद्धा घरच्या गरिबी जेमतेम शिक्षण घेऊ शकला नाही. एकदा तो मित्रांबरोबर कळंब गावाहून मंचर गावी चालला असता, रस्त्याने लष्करीगाड्या वेगाने चाललेल्या त्याने पाहिल्या. गोऱ्या गाडीवाहकांनी त्या गाड्या वेगाने चालवता चालवता, रस्त्याने जाणाऱ्या पाच-सहा पादचाऱ्यांना उडवून दिले. त्यातल्या काहीचे हात मोडले. तर काहींचे पाय मोडले. पण त्यांची पर्वा न करता ते गोरे गाडीवाहक तसेच निघून गेले. या प्रकाराने संतप्त झालेल्या बाबूने त्या मोटारगाड्यांवर दगड फेकले, पण दरम्यान त्या गाड्या दूर गेल्याने ते भिरकावलेले दगड फुकट पुढे घरची परिस्थीती सुधारता यावी यासाठी बाबूचा मोठा भाऊ आईसह मुंबईस आला. दोघेही कुठल्यातरी गिरणीत मोलमजुरीची कामे करीत व घरी पैसे पाठवीत. दोन-चार वर्षांनंतर मोठ्या मुलाच्या रुग्नानिमित्त बाबूची आई गायी गेली, ती आजारी पडून तिथेच निवर्तली. आईच्या मृत्यूपूर्वीच बाबू मुंबईस आला होता व एका दुकानात नोकर म्हणून काम करीत होता. पण केवळ पोट भरण्यात आयुष्य घालविणे त्याला पसंत पडत नव्हते. तो काळबादेवी काँग्रेस कमिटीच्या कचेरीत जाऊन सभासद झाला व स्वयंसेवक म्हणून काँग्रेसचे काम करू लागला. त्याने वडाळा येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला आणि तो स्वदेशीच्या प्रचाराचे कामही करू लागता. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी दिल्लीच्या असेंब्ली हॉलमध्ये बॉम्ब टाकला. | पुढे त्यांच्या मागच्या कारवाया उघडकीस येऊन त्या तिघांना फाशीची शिक्षा फर्मावली गेली. ते ऐकून बाबू आपल्या मित्रांना म्हणाला, "शेळी म्हणून बीस वर्ष जगण्यापेक्षा बाघ म्हणून दोन वर्ष जगणे श्रेयस्कर. भगतसिंग, राजगुरूप्रमाणे मला जर संधी मिळाली तर मीही ती सोडणार नाही," आणि बाबूची ती इच्छा पूर्ण झाली. १२ डिसेंबर १९३० रोजी, बाबू गेनूच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांच्या एका तुकडीने काळबादेवी रस्त्यावरील विदेशी कापड विकणाऱ्या दुकानांवर निरोधन करून, ते कापड घ्यायला आलेल्या गिन्हाईकांना परत फिरविले. दुसऱ्या दिवशी एक मालट्रक मुळजी जेण मार्केटमधले परदेशी मँचेस्टर गिरणीचे कापड घेऊन, फोर्टमार्केटकडे जाण्यास निघाला होता. बाबू गेनू उजव्या हाती तिरंगा घेऊन वाटेत उभा राहिला. मॅचेस्टर गिरणीच्या युरोपियन प्रतिनिधीने प्रिन्सेस स्ट्रीट पोलीसठाण्याला ही गोष्ट कळविताच पाच सहा पोलिसांसह एक युरोपियन पोलिस इन्पेक्टर तिथे आला व त्या ट्रकच्या चालकाला तो ट्रक बाबूच्या अंगावरून न्यायला सांगू लागला. ट्रकचालकाने त्या गोष्टीस नकार देताच, त्या क्रूर इन्स्पेक्टरने बाबूला लाथेने आडवे पाडले व स्वतः त्या ट्रक मध्ये चढून, ते अवजड वाहन त्याच्या अंगावरून नेले! 'भारत माता की जय! वंदेमातरम्' असे शेवटचे शब्द कानी पडले आणि क्षणार्धात बाबूच्या अंगातून रक्ताचे कारंजे उडू लागले. शुद्धबुध्द हरपलेल्या बाबूला इस्पितळात नेता नेताच वीरमरण आले. जे हजारो लोक त्याच्या अंतयात्रेत सामील झाले होते, त्यात जमनादास, मेहरअल्ली, नरीमन व कन्हैय्यालाल मुन्शी हेही होते.
सुविचा
संघर्ष जितका विकट, तितकेच यश उज्जवल
• स्वतः धैर्य धरल्याशिवाय संकटातून पार पडता येत नाही
. • कितीही संकटे आली, तरी सन्मार्ग सोडीत नाही, तोच खरा पुरुष होय. माणसाला जगण्यास लायक बनवित
परदेशी मालाच्या बहिष्कारासाठी बाबू गेनूचे बलिदान - १९३०. १९३० साली चालू असलेल्या राज्याच्या लढ्यामधे मिठाचा
→ दिनविशेष
सत्याग्रह, जंगल सत्याग्रह आणि परदेशी मालावर बहिष्कार ही तीन प्रमुख सूत्रे होती. ठिकठिकाणी परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी सत्याग्रह सुख होता. मुंबईमध्ये जॉर्ज फ्रेझर या व्यापारी कंपनीला आपल्या वखारीमधून ब्रिटिश कापडाचे गठ्ठे फोर्टमधील दुकानात न्यायचे होते. सत्याग्रह सुरूच होता. त्यांनी पोलिसांची मदत मागविली. सत्याग्रहींच्या विनंतीला न जुमानता कापडाचे ट्रक पुढे निघाले. सहा सत्याग्रही ट्रकपुढे आडवे पडले. पोलिसांनी त्यांना बाजूला केले. इतक्यात बाबू गेनू हा कामगार सत्याग्रही धावत्या ट्रकच्या पुढे आला. त्याने ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला पण क्षणार्थात बाबू गेनू चिरडला गेला आणि गतप्राण झाला. बाबू गेनूची प्रचंड अन्त्ययात्रा निघाली. मोठमोठ्या पुढाऱ्यांनी त्याला आदरांजली अर्पण केली. बाबू गेनूच्या या बलिदानाने स्वदेशी व बहिष्कार चळवळीला वेगळीच गती मिळाली. स्वातंत्र्य समरातील तरुणांना आदर्श मिळाला.
→ मूल्ये -
• राष्ट्रभक्ती, त्याग, बलिदान.
•
→ अन्य घटना
मार्कोनी अॅटलांटिक महासागरापलीकडील पहिला बिनतारी संदेश घेतला-१९०१
• कोलकताऐवजी नवी दिल्ली ही भारताची राजधानी झाली. १९१२
• पं. मदनमोहन मालविय यांचे निधन - १९४६
• पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन - १९९२
→ उपक्रम
स्वातंत्र्य समराचा इतिहास, देशभक्तांच्या कथा विद्यार्थ्यांना कथन करणे, त्यांना कथा सांगण्यास प्रवृत करावे. →
समूहगान -
• देश हमारा, निर्मल सुंदर, उज्ज्वल गगन का तारा....
→ सामान्यज्ञान -
• गणित ऑलिंपियाड ही (आय.एम.ओ.) आंतराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी एक चुरशीची स्पर्धा. हंगेरीत ही स्पर्धा १८८४ पासून | घेत असत. तर बरेच देश आपापल्या देशात राष्ट्रीय स्तरावर घेत. परंतु १९५९ पासून ही स्पर्धा सर्व राष्ट्रांना खुली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा