१३ डिसेंबर
प्रार्थना
नमस्कार माझा ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा.... -
हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् । श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम्।।
→ श्लोक
दान करणे हा हाताचा, खरे बोलणे हा गळ्याचा अलंकार आहे. शास्त्रवचन ऐकणे हा कानाचा दागिना आहे. ही भूषणे अलंकाराची काय आवश्यकता? असताना
→ चिंतन -
एखादे ध्येय निश्चित ठरवून ध्येयपूर्तीसाठी सातत्याने अथक परिश्रम करणे यातच खरा पुरुषार्थ आहे. यश मिळो अथवा अपयश येवो त्याची काळजी करू नका, पुढचे पाऊल पुढेच टाका. त्यामुळे निराश न होता, हाती घ्याल ते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घणाचे घाव घाला. निढळाचा घाम गाळा, यशोदेवी तुझ्यासाठी करी
कथाकथन
महाराणीची कमाल' एक रजपूत राजा होता. तो आपल्या दरबारात बसला होता. तेवढ्यात एक जादूगार दरबारात आ दरबारात एक भली मोठी गाय उभी केली. आपल्या दोन्ही हातांनी ती उचलून दाखविली. राजा थक्क झाला व जादूगाराचे कौतुक करू लागला जवळ बसलेली राणी म्हणाली, 'त्यात काय विशेष, मी देखील उचलून दाखवेन अशी एखादी गाय!" राजा म्हणाला, “काय गंमत करतेस की कार्य | एक स्त्री गाईला उचलणार? अगं, जे मला शक्य नाही, एका पहेलवानाला जे जमणार नाही, ते तू कसे काय करणार?' राणी म्हणाली, 'बघा ! | करुन दाखवते की नाही, मात्र मला सहा महिन्यांची मुदत हवी. त्यानंतर पहा!' सहा महिने संपले, पुन्हा एकदा दरबार भरला आणि एका लठ्ठ घेऊन आला. जो-तो म्हणू लागला 'इतकी दांडगी गाय कशी उचलणार, "या राणीसाहेब?" पण खरोखरच राणीने आपल्या हातांनी त्यागाइल | घेतले. राजाला आश्चर्य वाटले. अचंबित झाला. त्याने राणीला विचारले, "कसे काय जमवलेस सारे?" राणी म्हणाली. “अगदी सोपे आहे ते. मी एकच केले. ही गाय वासरू असल्यापासून तिला वर उचलायला सुरुवात केली. वासरू लहान असताना सोपे गेले नंतर प्रत्येक दिवशी त्याचे वजन गेले. मी देखील त्याची सवय केली. बस्स... जमले... शेवटी. सरावाने सर्व काही साध्य होते.' चिंतनखारे निश्चित हरवूनसाठी सातत्याने अथक
→ सुविचार
कोणतेही ध्येय घेतले तरी ते साध्य होण्याकरिता उद्योग करावा लागतो. ध्येय आपणहून निरुद्योगी माणसाच्या हाती पडत नाही त्यासाठी अभ्यासूवृत्ती, चिकाटी व सरावाची गरज आहे.
• मन निश्चयी असेल तर हजारो संकटे आली तरी हाती घेतलेले: तडीस नेता येते.
• कोणतेही कार्य उद्योगाने व प्रयत्नानेच यशस्वी होते. चिकाटीने व सातत्याने काम करीत राहिले तर या मिळतेच.
• केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.
• वो कौनसा कठिण है जो स्पष्ट नहीं हो सकता । कोशिश करें इसार तो क्या नहीं हो सकता।
दिनविशेष
• कृष्णा प्रवासाची सांगता - १९७५. कृष्णा नदी आणि तिचा परिसर यांचा अभ्यास करण्याच्या हेतुने नदीच्या उगमापासून | सागरमुखापर्यंत नदीच्या पात्रामधून प्रवास करायचा अशी विलक्षण कल्पना घेऊन मिरजेचे विनायक तुकाराम शेलार आणि त्यांचे १२ सहकारी असे है १४ ऑक्टोबर१९७५ रोजी महाबळेश्वराच्या कृष्णा नदीच्या उगमस्थानापासून निघाले. काही काळ पायी व त्यानंतर होडीने त्यांनी प्रवास केल आजूबाजूच्या प्रदेशाची सर्वांगीण पाहणी, विविध प्रकारची माती, दगड, वनस्पती, प्राणी पशू, पक्षी, नागरसमाज अशी विविध प्रकारे अभ्यासपूर्ण प त्यांनी केली. हा प्रवास रात्रंदिवस सुरू होता. अखेर साठ दिवसांच्या अभूतपूर्व प्रवासाची सांगता १३ डिसेंबर १९७५ या दिवशी मच्छलीमट्टण या ठिक कृष्णा नदी सागराला मिळते, त्या ठिकाणी झाली. महाराष्ट्रातील १३ युवकांचा हा उपक्रम अभिनव तसाच अभूतपूर्व होता. इतकेच नव्हे तर पुढील अन मोहिमांना स्फूर्तीदायक ठरला
. → मूल्ये
• साहस, संशोधन
→अन्य घटना
• सागर संशोधन करणारे ब्रिटिश संशोधक अॅबेल टास्मान् यांनी न्यूझीलंड बेटे शोधून काढली - १६४२
• थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक शिरूभाऊ लिमये यांचे निधन - १९९६
• सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचे निधन - १
•
→ उपक्रम
• संशोधनासाठी केलेल्या विविध उपक्रमांची, प्रवासांची, साहसाची विद्यार्थ्यांना माहिती देणे.छोटया छोटया साहस सहली काढण्यास प्रवृत्त करणे.
→ समूहगान
या भूमीचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान.....
→ सामान्यज्ञान -
• गणित ऑलिंपियाड स्पर्धा नियंत्रण करण्यासाठी भारतातील मुख्य संस्था 'राष्ट्रीय उच्च गणित मंडळ' ही असून ती अणू क विभागाचे एक कक्ष म्हणून काम करते. ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी गणित प्रज्ञा शोध परीक्षा घेतली जाते. या मंडळाचे १६ प्रादेशिक विभाग असून महाराष्ट्र व गोवा विभागाचे कार्यालय भास्कराचार्य प्रतिष्ठान ५६/१४ एरंडवणा, दामले पथ, पुणे ४ येथे आहे भारतातील प्राचीन गणिती व त्यांचे ग्रंथ -
• पहिले भास्कराचार्य (७ वे शतक) - महाभास्करीय, लघुभास्करीय, आर्यभट्टीय भाष्य • दुसरे भास्कराचार्य (बारावे शतक) सिध्दांत शिरोमणी, करणकुतूहल
→ भारतातील काही मान्यवरांची स्मृतिस्थळे
१) महात्मा गांधी : राजघाट, दिल्ली.
२) जवाहरलाल नेहरू : शांतिवन, दिल्ली.
(३) लाल बहादूर शास्त्री : विजयघाट, दिल्ली
४) इंदिरा गांधी : शक्तिस्थल, दिल्ली
५) चरणसिंग : किसानघाट, दिल्ली
६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर : चैत्यभूमी, मुंबई
. ७) राजीव गांधी : बीरभूमी, दिल्ली
८) जगजीवनराम : समतास्थळ, दिल्ली
९) मोरारजी देसाई : अभयघाट, दिल्ली
१०) यशवंतराव चव्हाण : प्रीतिसंगमावरील (कृष्णा व कोयना यांचा संगम) समाधी/स्मारक, कराड (महाराष्ट्र)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा