१७ डिसेंबर
प्रार्थना
राम रहीम को भजनेवाले, तेरे ह बंदे खुदा या....
श्लोक
- गते शोको न कर्तव्यो भविष्य नैव चिन्तयेत् । वर्तमानेषु कार्येषु प्रवर्तन्ते विचक्षणाः। भूतकाळाचा अथवा घडलेल्या गोष्टींचा शोक करू नये आणि भविष्याचीही चिंता करू नये. बुद्धिमान मनुष्य सदैव वर्तमानकालीन कार्या संलग्न असतात (जो आपला वर्तमानकाळ सावरतो तो आपले तिन्ही काळ सावरून घेतो)
→चिंतन
- रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले : मोठे धाडस, अथांग धैर्य, प्रचंड कार्यकारी शक्ती आणि त्याहून विशेषतः अधिक महत्वाचा गुण म्हणत आज्ञाधारकपणा या गुणांच्या जोरावर व्यक्तीचे वा राष्ट्राचे भाग्य उदयाला येते. प्रत्येक जण धनी; हुकूम करील पण पाळणार नाही. असे काम कधीच शेवटास जात नाही. जो आज्ञा पाळतो तोच धनी होतो. संघटितपणाचे यश आज्ञापालनातच आहे. स्वामी विवेकानंद
→कथाकथन
राजगुरू अग्निदिव्य' भगतसिंग व देव यांच्याबरोबर फाशी जाऊन अपर झालेल्या हुतात्मा शिवराम राजगुरू | लोखंडी सळईने ते एखाद्या सराईत स्वयंपाक्यासारखे पोळ्या उलट्या पालट्या करून भाजत होते व त्या तयार होताच बाहेरच्या परातीत टाकत हो एक असामान्य घटना. एकदा आपल्या क्रांतिकारी मित्रांसाठी पोळ्या भाजण्याचा त्यांच्यावर प्रसंग आला. भट्टीतल्या धगधगत्या निखाऱ्यांवर, | अगदी सहजतेने चाललेले काम पाहून एक क्रांतिकारक आपल्याजवळ बसलेल्या मित्राला म्हणाला, 'जरा राजगुरूकडे बघ. भट्टीतल्या फुललेल्या भयानक धग लागत असतानाही, बेटा अगदी शांतपणे पोळ्या भाजण्याचे काम करीत आहे.' यावर तो दुसरा मित्र मुद्दाम म्हणाला, “यात कौतू करण्यासारखे काय आहे? जर एखाद्या गोऱ्याचा खून करून हा राजगुरू पोलिस कोठडीत गेला आणि त्या खुनाच्या कटाचे धागेदोरे शोधून काढण्यास | पोलिसांकडून होणारा भयंकर छळ जर याने खंबीर मनाने कुणा साथी दाराचे नाव न सांगता सहन केला, तरच मला त्याचे कौतुक वाटेल.' 'आपला | एका सहकाऱ्याने आपल्या सहनशीलतेबद्दल अशी शंका घ्यावी. ही गोष्ट न आवडून राजगुरूने पोळ्या उलथण्याची लोखंडी सळई निखाऱ्यात पु ती लालबुंद होताच बाहेर काढून आपल्या छातीला चरचरून टेकविली ! त्याचबरोबर छातीवर टरटरून फोड येऊन व फुटून त्यातून धूर येऊ लागला | राजगुरू आपले हसत राहिले. ते दृश्य पाहून भगतसिंगाने विचारले, 'राजगुरू ! हे रे काय चालविलं आहेस?' पण भगतसिंगाच्या प्रश्नाला काही एक उत्त न देता, राजगुरूने ती सळई पुन्हा त्या भट्टीतल्या निखाऱ्यात घुसविली व ती लालबुंद होताच, हसत हसत ती पुन्हा आपल्या छातीवर दुसऱ्या ठिकाणी टेकविली ! आता मात्र भगतसिंगाने ती सळई हिसकावून स्वतःच्या हाती घेतली. एवढे झाल्यावर राजगुरू त्या खवचट मित्राला म्हणाले 'दोस्त कोठडीत गेल्यावर, ते मला यापेक्षा तर अधिक क्रूर शिक्षा देणार नाहीत ना? ज्या अर्थी मी हसत हसत दोन अग्निदिव्ये सहन केली, त्यांनी केलेला छ सहन करू शकेन की नाही?" तो संशयी मित्र शरमिंदा होऊन म्हणाला, 'राजगुरू क्षमा कर मला. तुझी खरी ओळख मला आता झाली.'
→ सुविचार
उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून आजच्या कर्मातून निर्माण करावा लागतो.
• संकटांना घाबरतो तो अपयशी ठरलो धैर्याने तोंड देणारा यशस्वी होतो. पावित्र्य, धीर आणि चिकाटी हे गुण अडथळे जिंकण्यास समर्थ आहेत. महत्कार्य तात केव्हाही होत नाहीत. त्याचे पाऊल पुढे पडावयाचे. स्वामी विवेकानंद
→ दिनविशेष
● चिमाजी आप्पा यांचा स्मृतिदिन - १७४०. पहिले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा, असाधारण शीर्ष | पराक्रम या आपल्या गुणांनी त्यांनी पेशवाईतील लढाया गाजविल्या. पोर्तुगीज व मराठे यांच्यातील वसई संग्राममुळे चिमाजी अप्पांचे नाव मराठी इति अजरामर झाले. वसईवर विजय मिळत नाही हे पाहून मोठ्या वीरश्रीने चिमाजी अप्पांनी सैनिकांना चेतविले, 'वसई ताब्यात येत नाही. माझा हेतु स ती घ्यावी असे आहे. तरी तोफा डागून माझे मेलेले शरीर तरी वसईच्या किल्ल्यात पडेल असे करा.' या चेतावणीने सैन्यास वीरश्री चढून निक | लढ्यात मराठ्यांनी वसईचा किल्ला सर केला. युध्दातील पराक्रमाबरोबरच धोरणी, मनमिळाऊपणा यामुळे चिमाजी अप्पांनी पेशव्यांच्या दरबारा महत्त्वाची कामे सांभाळली.
मूल्ये
शीयं, जिद्द, नेतृत्व, स्वातंत्र्यप्रेम
अन्य घटना
• सुरक्षा दीप शोधक सर हफ्रे डेव्ही यांचा जन्म १७७८
. • प्रसाद मासिकाचे संपादक य. गो. जोशी यांचा जन्म - १९०१ -
→ उपक्रम
भगतसिंग व राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस अधिकारी सेंटर्स्ट याचा वध केला १९२९.
• स्वातंत्र्ययोद्ध्यांचा परिचय करून देणे. शेजारी राष्ट्रांच्या वैशिष्ट्याबद्दल माहिती करून घ्यावी.
समूहगान
• हा देश माझा याचे भान, जरासे राहू यारे.....
सामान्यज्ञानभारताच्या दक्षिण टोकाजवळ 'थुंबा' हे छोटेसे गाव समुद्र किनाऱ्यावर केरळ राज्यात वसले आहे. पृथ्वीचे भौगोलिक विषुववृत गावाच्या दक्षिणेला ८ अंश अक्षांशापेक्षा थोड्या जास्त अंतरावर आहे पृथ्वीचे चुंबकीय विषुववृत मात्र 'थुंबा' या गावावरून जाते. त्यामुळे वातावरणातील चुंबकीय क्षेत्राचा व विद्युतभारित सौरप्रारणांचा अभ्यास करण्यास उपयुक्त ठरते. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्र १९६१ साली थुंबा येथे उभारण्यात आले
. • रली व रेस यामध्ये फरक आहे. रॅलीची सुरुवात गाड्या एक एक मिनिटाचा फरक ठेवून केली जाते. रेसची सुरुवात सर्व एकत्रितपणे एकाच वेळी सोडून केली जातेड रेसमध्ये चालकाला जास्त वेगाने गाडी चालवून पहिले यावे ते मात्र च वेळ यांचा योग्य मेळ घालावा लागतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा