Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

25 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 २५ डिसेंबर



प्रार्थना 

इतनी शक्ती हमें देना दाता.... 


 श्लोक 

 - सत्यादुत्पद्यते धर्मो, दयादानाद् विवर्धते । क्षमया तिष्ठते धर्मः, क्रोधाद्धर्मो विनश्यति ॥ सत्याने धर्म प्रगट होतो, दया व दानाने त्याची वृद्धी होते, क्षमेने त्याचे रक्षण होते आणि क्रोधाने तो नष्ट 

 


चिंतन

 आपणा सर्वात चांगले व वाईट आहे. कधी आपण मंगलावतार असतो, तर कधी आपण राक्षस बनतो. आपण इतरांचे चांगले पाह होतो. दया इतरांसाठी आहे. क्रोध स्वत:साठी आहे. इतरांचे दोष पाहून त्यांची करूणा करावी. स्वतःचे दोष असतील तर स्वतःस रागवाद, आत्मचिंतन करावे - आचार्य विनोबा भावे


कथाकथन 

- 'भगवान येशू ख्रिस्त' (निर्व्याज प्रेमाचा महासागर ) - येशू स्वतःस परमेश्वराचा पुत्र मानत होता. भक्ती, सेवा, आत्मचिंतन करावे- आचार्य विनोबा भावे सत्यादुत्पद्यते धर्मा दद्यादानादिवत ही त्याच्या जीवनाची त्रिसूत्री होती. ईश्वरी शक्तीवर त्याची नितांत श्रद्धा होती भगवान येशू म्हणजे प्रेमाचा अथांग सागर. मानव सर्वचा मूर्तिमत पुतळा. 'आम्हाला रोजची भाजी-भाकरी दे. आम्हाला मोहाला बळी पाडू नको. अमंगलापासून आम्हाला वाचव. एवढीच त्याची ईश्वरावर मागणी असे. या त्यागमय सेवा करण्याचा येशूचा उपदेश म्हणजे आत्मज्ञानाचा दाखला आहे. 'जो कोणी आई, बाप, बहीण, भाऊ यांच्य माझ्याहून अधिक प्रेम करतो, तो माझा म्हणवून घेण्यास योग्य नाही.' स्वामित्वाची, मालकी हक्काची भावना हा अहंकाराचा प्रभाव येशूने आपल्य | सदाचरणाने नष्ट केला. 'पापाचा द्वेष करा. पाप्याचा नको.' ही येशूची महान शिकवण आहे. 'श्रद्धा' हा येशूचा स्थायीभाव होता. मानवसेवा त्याचे कर्म होते. दीन-दलितांचा तो कैवारी होता. अंधश्रद्धा म्हणजे भक्ती नव्हे. जशी ज्याची कर्मे तसे त्याचे फळ, हा कर्मयोगाचा सिद्धांत तो सांगते त्याच्या बोलण्यात व कृतीत एकवाक्यता होती. परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती व या श्रद्धेमुळेच त्याचे क्रूसावरील बलिदान अमर झाले. पार भोंदू, विश्वासघातकी, लोभी, ढोंगी, अत्याचारी, अहंकारी लोकांची त्याला चांगली जाण होती. मानवी मनाची चंचलता व अशुद्धता त्याला ठाऊ होती. त्याबरोबर सद्गुणी आचरणाचा, निष्कलंक चारित्र्याचा तो भोक्ता होता. एका मेंढपाळाच्या झोपडीत तो जन्मला. आई-बाप, बहिण-भाऊ विसरुन तो शेजाऱ्यावरच प्रेम करा सांगतो. त्याच्या या शिकवणुकीने घाबरलेल्या व त्याच्या शिकवणुकीचा द्वेष करणाऱ्या लोकांनी त्याला कुमाव चढविले. हातापायांत खिळे ठोकले. छातीत लोखंडी खिळ्याने छेद पाडाला. अपार वेदना सहन करुन त्याने मृत्यूला कवटाळले. देह चैतन्य झाला, मान खाली झाली. तेव्हाही तो प्रेमाचा अथांग सागर परमेश्वराची प्रार्थना करतो. “परमेश्वरा, आपण काय करीत आहोत, हे या लोकान कळत नाहीये. त्यांना क्षमा करा. आजही चर्चेमध्ये सामुदायिक प्रार्थनेत तीच शिकवण दिली जाते. - “परमेश्वरा, त्यांना क्षमा कर." ईश्वर दया आहे. तो सर्वांना क्षमा करतो. 



 सुविचार 

 • सगळ्या जगावर तुम्ही प्रेम करा, देव तुमच्यावर प्रेम करील • देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. • प्रभू तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.


दिनविशेष -

 ● येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनानिमित्त ख्रिसमसचा सण. अवध्या जगताला वंदनीय पूजनीय असा येशू | जवळील बेथलहेम नावाच्या अगदी लहानशा गावात यहूदी कुटुंबात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. येशूची जन्मकथा मोठी नाट्यमय आहे गोठ्यात जन्मला. येशूच्या विरोधकांनी त्याला सुळावर चढविण्याची शिक्षा दिली. त्यावेळी येशूने छळ करणान्यांसाठी प्रार्थना केली. हे | क्षमा कर. कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही.' येशूचा जन्मदिन अवधे ख्रिस्ती बांधव मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा पंटानाद होतो. प्रार्थना केली जाते. 'नाताळबाबा' ही तर लहान मुलांसाठी आनंदाची पर्वणीच असते. 


मूल्ये 

• दया, क्षमा, शांती, प्रेम.


अन्य घटना

 •सर आयझॅक न्यूटन जन्मदिन- १६४२ • पं. मदनमोहन मालवीय जन्मदिन- १८६१० श्री. अटलबिहारी व जन्मदिन १९२६ • मनुस्मृती दहन दिवस- १९२७• श्री. म. माटे स्मृतिदिन १९५७ • चक्रवर्ती स्मृतिदिन - १९७२ • थोर अभिनेता चालीं चॅप्लिन याचे निधन - १९७७ 

 

उपक्रम •

 येशूच्या चरित्रातील प्रसंग, येशूची शिकवण मुलांना सांगावी. 

 

समूहगान 

• जहाँ डाल-डाल पर सोने की चिडियाँ करती हैं बसेरा.... 

 

 सामान्यज्ञान • आगगाड्यांच्या इंजिनांचे प्रकार - वाफेवर चालणारे, डिझेलवर चालणारे, विद्युत्वर चालणारे, 

 

आगगाड्यांच्या इंजिनांचा कारखाना चित्तरंजन येथे आहे. 


भारताचे पंतप्रधान - 

• जवाहरलाल नेहरू : १९४७ ६४ 

• गुलझारीलाल नंदा : १९६४ (कार्यवाह्)

 • इंदिरा गांधी : १९६४ - ६६ 

 • मोरारजी : १९७७ - ७९

  • चरणसिंग : १९७९-८० 

  • इंदिरा गांधी : १९८०-८४

   • राजीव गांधी : १९८४-८९ • व्ही. पी. सिंग : १९८१-२० • चंद्रशेखर १९९०-९१ • पी. व्ही. नरसिंहराव : १९९१-९६ • अटलबिहारी वाजपेयी : १९९६ (१३ दिवसांसाठी) • एच. देवेगौडा : : १९९६-९७ • आय. के. गुजराल १९९७-९८ • अटलबिहारी वाजपेयी १९९८-२००४ १५.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा