२७ डिसेंबर
प्रार्थना
मंगलनाम तुझे सतत गाऊ दे...
श्लोक
- न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा, वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम् । धर्मः स नो यत्र न सत्यमस्ति, सत्यं न तद्यच्छलमभ्युपैति ॥
- जिथे अनुभवी असे वृद्ध नसतात ती सभा नव्हे, धर्माला अनुसरुन काय आहे हे जे सांगत नाहीत ते वृद्ध नव्हेत, ज्यात सत्य नसते तो धर्म नव्हे आणि ज्यात लबाडी असते ते सत्य नव्हे.
→ चिंतन
- एकविसाव्या शतकात नीट जडणघडण केलेली युवाशक्ती हीच खरी राष्ट्रभक्ती बनेल. लहान वयात योग्य शिक्षण ही या जडणघडणीतील पहिली पायरी असते. सर्जनशीलतेचे तंत्रज्ञान विकसित आणि ग्रहण करू शकणारा समाज सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक चौकटीला भारतीय आधार देऊ शकेल. शाळेमध्ये विज्ञान कशा प्रकारे शिकविले जाते, यावर हे अवलंबून आहे. मुलांमध्ये विज्ञानाविषयी अनास्था असणे, नंतर तिचे निष्क्रियेत रूपांतर होणे आणि प्रत्यक्ष विज्ञान शिक्षण या आपल्या समोरच्या समस्या आहेत. 'शोधातून शिका' स्वतः करा आणि त्यातून शिका अशी विज्ञान शिक्षणाची पत आपण निर्माण करायला हवी. हे साध्य करण्यासाठी स्थानिक फळे, फुले, प्राणी, माती तसेच आर्थिक-सामाजिक विषय, स्थानिक वारसा यांचा वापर करायला हवा - डॉ. रघुनाथ माशेलकर
कथाकथन
'लुई पाश्चर' पाश्चराईज्ड् दुधाचा निर्माता (जन्म २७ डिसेंबर १८२२ - मृत्यू २८ सप्टेंबर १८९५) - ११ - शतकाच्या प्रारंभापर्यंत माणसाला कुत्रा चावला तर त्यावरचा डॉक्टर होता, गावचा लोहार. तो चाव्याची लस जखम चोळून काढायचा आणि शेकडो लोक दगावत. 'छोटा लुई पाश्चर' हे पाहत असे, ५० वर्षांनी त्यानेच श्वानदंशावरचा - रेबीज - उपचार शोधून काढला. त्याचा क फ्रान्समधील डोल या गावी १८२२ साली झाला. त्याचा बाप नेपोलियनच्या सेन्यात शिपाई होता. नेपोलियन सत्ताभ्रष्ट झाल्यावर त्याने गावातच कातडी कमावण्याचा धंदा काढला. त्यात त्याला बरे दिवस आले. आपला मुलगा कोणी मोठा पुरुष व्हावा, असे त्या अर्धशिक्षित बाय वाटत असे. त्याने नामांकित शिक्षक व्हावे, असे त्या पाश्चरला वाटत असे. त्या दृष्टीने त्याने लुईचे शिक्षण सुरु केले. परंतु लुईच्या हेडमास्तरन त्याच्यातले गुण ओळखून त्याला पॅरिसच्या एकोल नॉर्मल सुपीरियर या संस्थेत विज्ञानाचे शिक्षण घेण्यास पाठविले. त्याचा श्वानदंशावरील लमीच शोध फारच गाजला, म्हणून सर्वांच्या लक्षात राहिला. कारण त्याचा मनुष्यजातीच्या जीवनमरणाशी संबंध होता. जेन्नरच्या 'इनॉक्युलेशन' च तत्त्वावरच त्याने ही लस बनवली. आजतागायत श्वानदंशावर तोच प्रभावी उपाय आहे. पाश्चर १८९५ साली मरण पावला. परंतु श्वानदंशावरील म हेच काही त्याची महत्वाचे संशोधन नव्हे, त्याने स्फटिकावर मोलाचे संशोधन केले. त्याने याच संशोधनातून टार्टरिक अॅसिडच्या बाबतीत मोलाचा शोध लावला. साखरेच्या द्रावणातून स्फटिकाद्वारे पोलराइझ केलेले किरण घालवताना मिट्डार्लिय याला टार्टरिक अॅसिडचे दोन प्रकार आढळले होते. | एक शुद्ध टार्टरिक अॅसिड व दुसरे पॅराटार्टोरिक अॅसिड. पाश्चरने शोधून काढले की, पॅराटार्टरिक अॅसिड हे दोन प्रकारच्या स्फटिकांनी बनवलेले असते. त्याने पदार्थ का आंबतात, याचाही शोध लावला, द्राक्षे त्यामधील व्हिनेगारचे अॅसिटिक अॅसिडमध्ये रुपांतर झाल्याने आंबतात. तर दूध त्यातल्या लॅक्टिक आम्लात रुपांतर झाल्याने आंबते - नासते, हे त्याने सिद्ध केले. हे रुपांतर एक प्रकारच्या सूक्ष्म जंतूमुळे होते व या जंतूंवर उष्णतेच्या सहाय्याने नियंत्रण मिळवता येते, हे सिद्ध केले व दारु तयार करण्याच्या धंद्यात क्रांती घडवून आणली. त्याने रेशमी धंद्यावरही प्रचंड उपकार केले. रोगट | रेशीम किड्यांमुळे फ्रान्सच्या रेशीम धंद्यावर गंडांतर आले होते. त्याने रेशीम किड्यांच्या अंड्यातून नेमकी निरोगी अंडी शोधून काढण्याची पद्धत तयार करुन फ्रेंच रेशीम उद्योगाला नाशापासून वाचविले. पाश्चर हा जंतुशास्त्राचाही जनक होय. आपल्या
D सुविचार
• विज्ञानाची वाटचाल ही माणुसकीच्या वाटचालीसाठीच आहे. • प्रयोगशाळेला शरण जा. हे युग विज्ञानाचे
दिनविशेष
• पैसा फंडाची कल्पना आकारास आली १९०४ 'पैसा फंड' या संस्थेने महाराष्ट्रातील औद्योगिक परिवर्तन घडवून आणलेले आहे. या कल्पनेचे जनक अंताजी दामोदर काळे हे एक प्राथमिक शाळेतील शिक्षक होते. स्वदेशी असेल तर 'थेंबे थेबे तळे साचे' या न्यायाने प्रत्येकाने एक पैशाची मदत, तीही त्याला शक्य होईल तेव्हा असा विचार त्यानी मांडला जमू लागली. या कार्यास पूर्ण वेळ मिळावा. म्हणून त्यांनी नोकरी सोडली. लखनौमधील काँग्रेसच्या अधिवेशनात सद्यःस्थितीचे वाटून आपल्या कार्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी त्यांना पाठिबा मिळाला नाही, पण लोकमान्य टिळकानी 'केसरी' मधून जनतेसमोर मांडली. 'पैसा फंड उत्तेजक मंडळ' स्थापन झाले. सुरुवात लोकमान्यांनी आपला एक पैसा देऊन केली. २७ डि रोजी मुंबईत आर्य समाज मंदिरात अधिकृत समिती स्थापन झाली. समर्थ विद्यालयाच्या गुरुवयं विजापूरकरांनी ४ एकर जा महाराष्ट्रातील पहिला काच कारखाना ईश्वरदास वार्ष्णेय यांच्या देखरेखीखाली सुरु झाला. दि. ५/८/१९०५ रोजी या कारखान पहिली स्वदेशी काच निर्माण झाली.
D मूल्ये
• देशभक्ती, श्रमनिष्ठा, कर्तव्यदक्षता.
D अन्य घटना
• प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब यांचा जन्म १७९७ • थोर शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्मदिन १८२२ [D] • भूतपूर्व कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्मदिन - १८९८
उपक्रम
•महाराष्ट्रातील/भारतातील विविध उद्योग, उद्योगपतींच्या विषयी, सहकारी उद्योगधंदा, ग्रामोद्योग, कुटिरोद्योग या विषय
D समूहगान
- • बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या....
सामान्यज्ञान
भाजून इजा झालेल्या व्यक्तींच्या जखमांवर नारळाचे थंड पाणी ओतत रहावे. त्या व्यक्तीभोवती लपेटून बो [D] दूध व दही द्यावे. • []कॉफी विशिष्ट चव आणि स्वाद असलेले आणि जगभर भरपूर खप असलेले कॉफी हे तरतरी आणणारे मे आहे. त्यातील कॅफीन तरतरी येते. कॉफीच्या भाजलेल्या बियांपासून कॉफी तयार होते. जंगली अवस्थेतील कॉफी हो क प्रथम आफ्रिकेत आढळल्याने तिचे मूलस्थान आफ्रिका मानतात. भारतात कॉफी १६०० च्या सुमारास आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा