२९ डिसेंबर
प्रार्थना
मंगलमय चरणी तुझ्या विनंति हीच देवा....
श्लोक
न कदा याचना कार्या विषवत् या विद्यातिनी स्मर्तव्यं तद् ध्रुवं सत्यम् अमृतं स्याद् अयाचितम् : (हात पसरून भीक मागणे म्हणजेच) याचना कधीही करु नका. ती तर विषासारखी घातकच. ध्रुवासारखे अढळ सत्य नेहमी आठवावे. तेच अमृत, जे न मागता मिळते.
चिंतन-
अमन्त्रम् अक्षरो नासी, नासी मूलम् अनौषधम् । अयोग्यः पुरुषो नासी, योजकः तत्र दुर्लभः ॥ ज्याचा मंत्र होत नाही असे अक्षर नाही, औषधी नाही असे झाडाचे मूळ नाही. अयोग्य असा माणूस नाही, ह्या सर्वांचा योग्य उपयोग करणारा योजक हा मात्र दुर्लभ असतो. जगात निरुपयोगी अशी वस्तू किंवा मनुष्य नसतो. प्रत्येकाचा काही ना काही उपयोग असतोच पण त्या वस्तूचा किंवा त्या व्यक्तीचा कसा उपयोग करावयाचा, त्याच्यातील कोणते गुण वापरायचे, कोणते दोष वगळावयाचे याची जाणीव मात्र हवी. अशी गुणग्राहक माणसे समाजात दुर्मिळ असतात. ती जर अधिक प्रमाणात निर्माण झाली तर प्रत्येक व्यक्तीचा आणि वस्तूचा निश्चितपणे योग्य तो उपयोग केला जाईल.
कथाकथन
'अन् सदूला बक्षीस मिळाले' - सातव्या वर्गात शिकणाऱ्या सदूने कशीतरी सातवीची परीक्षा पास केली. घरची परिस्ि जेमतेम असल्यामुळे पुढच्या शिक्षणाची सोय होणार नव्हती. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण म्हणजे कुन्हाडीचा दांडा गोतास काळ, बा आता झाला होता. सदूला शिक्षण घेण्याची इच्छा असून काही करता येत नव्हते. बा पाटीलाकडील गुरे राखत असे. बाने मुलास शिकविण्याची इच्छा करताच पाटलाने वाला कामावरुन कमी करण्याची धमकी दिली. तसेच उद्यापासून सद्याला गुरे राखण्यासाठी पाठवून दे म्हटले. सदूला मात्र पार्टीका पाठ फिरवून पोटासाठी गुरे राखण्याची पाळी नशिबी आली. संदू रोज गुरे राखण्यासाठी ऊन, पावसात जात असे. एक दिवस मात्र गुरे घेऊन जंगल गेला. तलावाच्या बाजूला गुरे रानात चरत होती. सदू झाडाखाली बसून होता. चटणी व भाकर खाऊन सदूला सुस्ती आल्यामुळे सदू झाडाखा पेंगुळला होता. तेवढ्यात अचानक कुठंतरी जवळ बॉम्बस्फोट झाल्याचा आवाज आला. सदू एकदम घाबरला. बॉम्बस्फोटामुळे रानातील शांतता झाली होती. जनावरे सैरावरा पळत होती. तेवढ्यात एक गाय रेल्वे रुळाजवळ तडफडत होती. तिचा जबडा फाटलेला होता. तोंडातून रक्तस्त्राव हो होता. जवळ जाऊन बघतो तर रेल्वे रुळावर अनेक बॉम्बसदृश्य वस्तू पडून होत्या. तेव्हा यामुळेच स्फोट झाला असावा असा त्याने अंदाज काढला दक्षिण हावडा एक्सप्रेस येण्याची वेळ झाली होती. रेल्वे रुळावर असलेल्या बॉम्बमुळे रेल्वेगाडीला अपघात होणार, घातपात घडवून आणण्यासाठी बॉम्ब ठेवले असावे, असे वाटले. इकडे गाडी येण्याची वेळ झाली. लांबून गाडीची शिटी येत होती. काय करावं, काही सुचत नव्हतं, शेवटी अंगातील | सदरा काढून गाडीकडे धावू लागला. रेल्वे चालकाचे लक्ष सदूकडे गेले. रेल्वेचा वेग कमी केला. सदू धापा टाकता... टाकता कोसळला व तोड बा... बा... आवाज काढीत होता. रेल्वे चालक व गार्ड यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबविली. रुळावरुन पुढे जाताच रुळावरच गाय मरणा अवस्थेत दिसली, तसेच बॉम्ब दिसले, बॉम्बला जोडून केबल वायर होती. रेल्वे पोलिसांनी बॉम्ब निकामी केले. सदूच्या प्रसंगावधानतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. रेल्वे पोलिसांनी सदूला दवाखान्यात नेले. नंतर जे. के. शर्मा यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. सदूला रेल्वेमंत्र्या रेल्वे खात्यात चौकीदाराची नोकरी देऊन त्याच्या कार्याचे कौतुक केले. सदूच्या हुशारीमुळे आईवडिलांचे पारणे फिटले.
सुविचार -•
कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद असतो. [] मणभर उपदेशापेक्षा कणभर आचरणच श्रेष्ठ असते. 10
दिनविशेष -
• कर्तव्य करीत रहा, आनंद आपोआप मिळेल. • शरीर, मन आणि बुद्धी यांचा विकास करते, तेच खरे शिक्षण • हकीम अजमल खाँ स्मृतिदिन - १९२७. 'युनानी' चिकित्सा पद्धतीला प्रतिष्ठा आणि मान्यता मिळवून देणारे हकी अजमल खाँ यांचा जन्म १८६४ मध्ये झाला. युनानी आणि आयुर्वेद उपचार पद्धती जतन करणाऱ्या शरीफखानी या दिल्लीमधील प्रसिद्ध घराण् अजमलखाँ यांचा जन्म झाला. ते केवळ हकीमच नव्हते तर एक सच्चे देशभक्त, उत्तम साहित्यिक, अनुभवी राजनीतीज्ञ आणि मानवतावादी गृहम होते. १९०५ मध्ये युनानी आणि आयुर्वेदिक औषधे बनविणारा हिंदुस्थानी दवाखाना त्यांनी सुरू केला. केवळ स्त्रियांसाठी युनानी चिकित्सा विद्या सुरु केले. आणि त्यानंतर १३ फेब्रुवारी १९२१ मध्ये आयुर्वेदिक आणि युनानी कॉलेजची स्थापना केली. स्वातंत्र्याच्या चळवळीत अजमल खाँ यां सक्रीय सहभाग घेतला होता. इंग्रज सरकारने १९०८ मध्ये त्यांच्या वैद्यक शास्त्रातील कार्याचा गौरव म्हणून 'हाजिक-उल-मुल्क' हा किताब आणि 'केसरी-ए-हिंदी' हे सुवर्णपदक बहाल केले. परंतु स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्यानंतर अजमल खाँ यांनी या दोन्ही गोष्टी इंग | सरकारला परत केल्या. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
अन्य घटना
• दीनानाथ मंगेशकर यांचा जन्मदिन १९००
उपक्रम
• विविध वैद्यकीय शाखांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणारे समाजसेवक, डॉक्टर, परिचारक यांची विद्यार्थ्यांना माहिती करून देणे.
समूहगान
-• पेडों को क्यों कांटते हो, दो पेड लगाके देखो ना...
सामान्यज्ञान
• मराठीतील विज्ञान मासिके -
• विज्ञानयुग - पुणे ४११०३०
• प्रगतविज्ञान - अमरावती ४४४६०१
• विज्ञानपत्रिका - मुंबई ४०००२२
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा