6 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता...
श्लोक
- योग्य अतिथींचा करावा आदर । त्यांसही द्यावी भाकरीत भाकर आपुल्या परीने करावा सत्कार । आलियाचा, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व्हावे । )
- त्याच्या आनंदी सुख मानावे, प्रसंगी आपणासी वगळता भावे । न्यायी बुध्दीने - ग्रामगीता योग्य अतिथींचा आदर करावा, आपल्या भाकरीतील भाकर द्यावी, आपल्या परीने, त्याचा योग्य तो आदर, सत्कार करावा. दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी व्हावे. दुसऱ्याच्या आनंदात सुख मानावे. प्रसंग पाहून आपणास वगळावे, अशी न्यायबुध्दी ठेवावी.
चिंतन
- समाज ही एक नौका आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्याने इतरांचे नुकसान करण्यासाठी एखादे छिद्र पाडले वा पडलेले पाहूनही बुजवले नाही तर सर्व बोटीबरोबर त्यालाही जलसमाधी घ्यावीच लागते. कोणत्याही देशातील लोकसंख्येचा एखादा भाग अवनत झाल्यावर त्याचा डाग राहिलेल्या भागास, पर्यायाने देशात पडल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत हा भाग हीनदीन पंगुवत पडला आहे. तोपर्यंत हा देश असाच हीनदीन राहणार यात शंका नाही.
कथाकथन
- भा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (जन्म - १४ एप्रिल १८९५ मृत्यू- ६ डिसेंबर १९५६ ) - महान दलित नेते, गाठे पंडित व भारतीय एक शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म महू येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण दापोलीच्या शाळेत झाले. वडील रामजी सकपाळ हे लष्करातील नोकरीमधून निवृत्त झाल्यावर त्यांना सामान्यास नोकरी मिळाल्याने किडे राहायला गेले व छोट्या भीमाचे नाव त्यांनी तिथल्या सरकारी शाळेत घातले. भीमाची आई तो सहा वर्षांचा असतानाच वारल्याने त्यांचे पालन वडिलांनी व आत्या मीराबाई यांनी केले. आपल्या मुलाला प्रखर बुद्धिमत्तेची देवी देणगी लाभली असल्याचे ओळखून रामजीनी त्याला माध्यमिक किणासाठी मुंबईस पाठविले. हिंदू समाजातील एका अडाणी व क्रूर रुखीमुळे त्या काळी अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या जातीत जन्मल्यामुळे भीमाचा एल्फिन्स्टन कृतमध्ये शिक्षण घेताना काहीजणांकडून अपमान होऊ लागला. पण स्वातही त्याच्यावर प्रेम करणाऱ्या केळुसकर गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे मार्गदर्शनामुळे भीम उत्तम तऱ्हेने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला व बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून एल्फिन्स्टन कॉलेजात गेला. तिथून पदवी संपादन केल्यावर बडोदे सरकारच्या मदतीने भीमराव तथा बाबासाहेब अमेरिकेस अर्थशास्त्रात एम.ए. व पीएच.डी. पदव्या प्राप्त करून भारतात परत आले बडोदे सरकारने दिलेल्या नोकरीवर रुजू झाले. पण अस्पृश्य म्हणून तिथेही काही लोक त्यांचा आपमान करु लागल्याने ती नोकरी सोडून ते मुंबईस डनहॅम कॉलजात प्राध्यापकाची नोकरी करू लागले. नोकरी करीत असतानाच आपल्या अस्पृश्य समजण्यात येणाऱ्या बांधवांना त्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी, त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या हेतूने त्यांनी 'मूकनायक' हे मराठी पाक्षिक सुरू केले. पुढे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची मदत घेऊन ते इंग्लंडला गेले आणि अर्थशास्त्रातली डी.एस.सी. ही सर्वोच्च पदवी त्याचप्रमाणे बॅरिस्टर ही पदवी संपादन करून ते मुंबईच्या सरकारी महाविद्यालयात आधी प्राध्यापकाची व मग प्राचार्य म्हणून नोकरी करू लागले. महाडचे चवदार तळे व नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केले. गोलमेज परिषदेला लंडनला जाऊन त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. पण, अस्पृश्य समाज हिंदू समाजातून अलग पडू नये म्हणून गांधीजींनी पुण्यास आमरण उपोषण सुरु केले तेव्हा त्यांनी त्यांच्याशी तडजोड केली. १९४२ साली ब्रिटिश हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री असताना त्यांनी अस्पृश्यांसाठी मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालय तर औरंगाबादेस मिलिंद महाविद्यालय कावले. १९४६ साली त्यांना घटना समितीत घेण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात कायदामंत्रीपद देण्यात आले. पं. नेहरूंशी मतभेद होऊन त्यांनी ते पद सोडले. १९५६ मध्ये आपल्या एक लाख अनुयायांसह त्यांनी नागपूरला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी "कोण होते? पाकिस्तानवर विचार' असे अनेक इंग्रजी ग्रंथ लिहिले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मरणोत्तर त्यांना 'भारतरत्न' हा किताब भारत सरकारने बहाल केला. सुविचार तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. परप्रकाशित राहू नका. स्वतःच्या बुध्दीवर विश्वास ठेवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा
सुविचार • तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. परप्रकाशित राहू नका. स्वतःच्या बुध्दीवर विश्वास ठेवा. • शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा व्हा त्यानी त्यांच्याशी तडजोड केली. १९४२ साली ब्रिटिश गुलामाला त्याच्या गुलामगीरीची जाणीव करून द्या; म्हणजे तो आपोआपच बंड करील - डॉ. बाबासाहेब आंबेडकर • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन १९५६. बाबासाहेबांनी सारी हयात अस्पृश्यांच्या उध्दारासाठी वेचली. बालवयापासून → दिनविशेष अस्पृश्यतेमुळे त्यांना अपमान सहन करावा लागला. त्यांनी पद्दलितांची दुःखे जगासमोर मांडली. दलित समाज आपल्या पायावर उभा रहावा, स्वाभिमानी बनावा, अशी त्यांची इच्छा होती. लोकशाहीवर त्यांची अढळ श्रध्दा होती. लोकसत्ताक स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा त्यांनी पाया घातला. भारतीयांवर त्यांचे अतिशय प्रेम होते. डॉ. आंबेडकर हे ज्ञानोपासक होते. मुंबईमधील त्यांचे 'राजगृह' हे वसतिस्थान म्हणजे विविध ग्रंथांचा प्रचंड खजिना होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाहीच्या तत्वांच्या शिकवणुकीसाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. 'मूकनायक' नावचे वृत्तपत्र सुरु केले. शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्थांच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे एक धीरादात, कर्तबगार व मानवतेथे उपासक असे व्यक्तिमत्व होते. आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर येथे त्यांनी बुध्दधर्माची दीक्षा घेतली. १४ एप्रिल १८९१ हा त्यांचा जन्मदिवस. मोठ्या श्रध्देने हजारो लोक बाबासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी अभिवादन करतात.
→ मूल्ये
स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुता, त्याग,
→ अन्य घटना
• नारायण वामन टिळक रेव्हरंड या कवीचा जन्म १८६१
• क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन - १९७६
उपक्रम
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देण्यासाठी चित्रप्रदर्शन मांडणे.
• अस्पृश्योध्दारासाठी समाजसेवकांनी केलेल्या कार्यासंबंधी माहिती देणे.
• भारतीय राज्यघटनेची थोडक्यात ओळख करून देणे.
• → समूहगान
इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके
→ सामान्यज्ञान
• पुण्यामधील केंद्रीय मधमाशा संशोधन संस्थेने मधमाशांव्दारा परागीकरण होण्यावर सखोल संशोधन केले आहे. मधमाशांमुळे ४०० ते ६५० टक्क्यांनी बीजधारणा अधिक होते. बीजाची गुणवत्ता वाढते. टाकाऊ बियांचे प्रमाण केवळ ५ ते ६ टक्के असते. या परागीकरणाचा खर्च उत्पन्नाच्या मानाने नगण्य असतो.
• मशीनगन (यांत्रिक बंदूक) सातत्याने जलद गोळीबार करू शकणारे स्वयंचलित, अवजड शस्त्र. एकदाच दाप दाबून सातत्याने दमदार गोळीबार करणे हे मशीनगनचे वैशिष्टे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा