8 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना -
सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा...
→ श्लोक
शब्दात नको समसमान ! लावावे प्रत्यक्ष कृतीने फूट पाडिती ते द्यावेत हाकोन । गावचे भेदी
नसतील ऐकत जे जे कोणी । त्यांना कायद्याने घ्यावे आखोनि मग रचना करावी समानगुणी । इमान जागी ठेवोनिया ।
- ग्रामगीता केवळ समता ही शब्दात नको, प्रत्यक्षात धन, मान, शिक्षणात पाहिजे. जे माणसा-माणसात फूट पाडणारे गावभेदी आहेत त्यांना गावातून हाकलून द्यावे. जे कोणी ऐकणार नाहीत त्यांना कायद्याचा बडगा दाखवून वठणीवर आणावेत, प्रामाणिकपणा कायम ठेवून गावात समानगुणी रचना करावी.
→ चिंतन
सत्य, सदगुण, पावित्र्य ही आत्म्याप्रमाणेच अच्छेद्य आणि अभेद्य आहेत. खऱ्या अंतःकरणाने काम करणारा एक मनुष्यही खोगीरभरतीने काम A करणाऱ्या हजारो माणसांपेक्षा महत्त्वाचा असतो. आपल्या कर्तव्याला पक्के चिकटून राहा. परमेश्वर पाठीराखा असताना मनुष्यांच्या मदतीची अपेक्षा करू नये. जोपर्यंत अंतःकरणात आत्मविश्वास पक्का आहे व परमेश्वरावर भरवसा पक्का आहे, तोपर्यंत मार्ग सरळच आहे. तुमचे नुकसान करण्यास कोणीही समर्थ नाही.
कथाकथन - फळ हाती आल्यावाचून बोभाटा करू नये! एका गावात एक कोळी राहत होता. तो गावाजवळून वाहणाऱ्या नदीत गळ टाकून मासे पकडीत असे व त्यावर आपला निर्वाह करीत असे. एक दिवस तो आपल्या मुलाला घेऊन नदीवर मासे पकडण्यासाठी गेला. त्याने पाण्यात गळ टाकल्याबरोबर तो कशालातरी अडकून बसला. कोळ्याला वाटलं जाळ्यांत मोठा मासा गवसलाय. त्यांन ही बातमी बायकोला सांगण्यासाठी आपल्या मुलाला घरी पिटाळलं. मुलानं आणलेली बातमी एकून कोळ्याच्या बायकोला खूप आनंद झाला. एवढा मोठा मासा पाहून त्यातला वाटा शेजारी मागतील असे वाटून कोळ्याच्या बायकोनं शेजारणीशी भांडण करायचं ठरवलं, तिने आपल्या साडीभोवती ताडपत्री गुंडाळली, एका डोळ्यात काजळ घातलं नि कुत्र्याला कडेवर घेऊन ही अंगणात हिंडू कागली. तिचा तो अवतार पाहून शेजारणीनं म्हटलं, का ग बाई, आज का तुला दारिद्रय आठवलं ? तुला वेड तर नाही लागलं ना ?' झालं! कोळ्याच्या बायकोला एवढं पुरलं. तिन शेजारणीला भरपूर शिव्या दिल्या नि म्हटलं, 'थांब, मला वेडी म्हटल्याबदल फिर्याद लावते तुझ्यावर.' तिच्या ओरडण्यानं गावातल्या बायका तिच्या भोवती जमल्या त्यांनीही तिला वेडी म्हटलं. मग कोळ्याची बायको चांगलीच बिथरली. तिनं गावाच्या सरपंचाकडे फिर्याद नेली. इकडे जाळं काही वर बेईना. कोळ्यान आपलं धोतर नदीकिनाऱ्यावर ठेवून केवळ लंगोटीवर नदीत उडी घेतली. पोहत तो तळाला गेला. त्यानं मासा सूटू नये, म्हणून जोरात जाळ्याला मिठी मारली, तर जिथे जाळे ज्या बुंध्यात अडकले होते त्याची मुळी कोळ्याच्या डोळ्यात गेली नि त्याचा डोळा फुटला. एक हात डोळ्यावर ठेवून वेदना सहन करीत तो किनाऱ्यावर आला. पाहतो तर धोतरही कोणी चोरट्यानं पळवून नेल होतं. तो तसाच घराकडे निघाला. घरी जातो तो बायकोही घरात नाही. त्यानं मुलाला विचारलं असता त्याला कळलं की, बायको शेजाऱ्यावर फिर्याद करण्यासाठी सरपंचाकडे गेली आहे. मग एक जुनं धोतर नेसून तो सरपंचाच्या कचेरीत गेला. खटल्याचा निकाल देऊन त्याच्या बायकोलाच दोषी ठरविलं गेलं. दंड झाला दंडाची रक्कम भरेपर्यंत तिला चौकीवर थांबविण्यात आलं. कोळ्याला अतिशय पश्चाताप झाला. तेव्हा जवळच्याच झाडावर वृक्षदेवता होऊन राहणारा बोधिसत्व त्याला म्हणाला,' बाबारे, वस्तू हाती आल्याशिवाय त्याचा गाजावाजा करु नये, त्याचं हे फळ आहे. तुझ्या पाण्यातील प्रयत्न फसला. एक डोळा मात्र तू विनाकारण गमावून बसलास. इकडे तुझ्या बायकोनेही केवढा गोंधळ माजविला तो पहा. पुन्हा अशी चूक करु नकोस !
→ सुविचार
• फळ हाती आल्यावाचून बोभाटा करू नये!
• वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखिल्याशिवाय खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये, एकाएकी
दिनविशेष
- • दासबोध ग्रंथाचा संकल्प - १६५४, महाराष्ट्राला योग्य प्रसंगी जागृती देऊन कार्यप्रवृत्त करणारी ही एक अलौकिक विभूती होऊन → गेली. रामदासांनी सर्व भरतखंडात यात्रा केली. देशस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि शके १५७६ च्या मार्गशीर्ष वद्य पंचमी रोजी श्री समर्थ रामदासस्वामी यांनी शिवथरच्या घळीत बसून दासबोध ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला. भोरहून महाडला जाताना दारमंडप लागतो. तेथून खालीच कोकणच्या खोऱ्यात शिवथर गाव आहे. अतिशय निसर्गरम्य असे स्थान आहे. डोंगराच्या तळाशी एक मोठी घळ निर्माण झाली आहे. याच एकान्तवासात सबंध राष्ट्राला जागविणारा दासबोध ग्रंथ निर्माण झाला. परमार्थ, राजकारण आणि समाजकारण यांचा सुंदर मिलाप या ग्रंथात पाहावयास मिळतो. 'ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद, भक्तिमार्ग, नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म किपण, विरोविले' असे या ग्रंथाचे स्वरूप समर्थांनी स्वतःच सांगितले आहे. प्रयत्न, प्रबोध, प्रचिती यांचा मंत्र दासबोधातून समयांनी दिला आहे. हा क्यि ग्रंथ म्हणजे समर्थांची वाङ्मयीन मूर्तीच.
मूल्ये -
• राष्ट्रभक्ती, सेवा, त्याग, निष्ठा
→ अन्य घटना
• बालकृष्ण शर्मा प्रसिध्द हिंदी कवीचा जन्मदिन -१८८७
• जागतिक कीतीचे भारतीय नृत्यकार उदय शंकर जन्मदिन - १९००
→ उपक्रम
• रामदासांचे विविध साहित्य मनाचे श्लोक, करुणाष्टके वाचण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे. • रामदासांचे चरित्र मुलांना कथन करणे.
→ समूहगान -
• हम युवकों का ऽऽऽ नारा है, हैड, हैड.......
→ सामान्यज्ञान -
• चांद्रभूमीवर दैनंदिन जीवनातील व विज्ञानातील कितीतरी उत्पादने एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात होण्याची खात्री वैज्ञानिकांनी दिली आहे. • रातकिडा - या कीटकांचे नर 'किर्र' असा नाट्यमय आवाज करतात. पुढचे पंख ताठर व चिवट असतात. एका पुढील पंखाच्या कडेवरील खरड यंत्रणा दुसऱ्या पुढील पंखाच्या खालच्या बाजूस असलेल्या ५० ते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा