12 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
→ प्रार्थना
- या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे....
श्लोक
- उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे राष्ट्रविप्लवे । राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बांधवः ।। आनंदोत्सव, संकट, दुष्काळ, राष्ट्रांवर आपत्ती, राजाकडे जाण्याचा प्रसंग व शेवटी स्मशान अशा सर्वच बऱ्यावाईट प्रसंगी जो आपल्यामागे भक्कमपणे
→ चिंतन
-जो संकटात उभा राहतो, त्यालाच आप्त वा मित्र म्हटले जाते. २१ व्या शतकात पदार्पण करणाऱ्या जगाला 'टीन बर्जेन' या शिक्षणतज्ञाने इशारा दिला आहे की,
"शिक्षणात मागे राहिलेला समाज आधुनिक जगात पुढे आलेला नाही.' "
कथाकथन
परिवर्तनशील जिजाऊ
निजामशहाचे पहिल्या दर्जाचे सरदार असलेले लाखुजीराजे जाधव सिंद्खेडला राहत होते.त्यांची लहानगी व लाडकी लेक जिजा ही मधूनच केव्हा तरी दरबारात जाई व पित्याच्या मांडीवर बसून त्याला नाना प्रश्न विचारीत राही. एकदा असा प्रकार परकर पोलक्यातली चार-पाच वर्षांची जिजा आपल्या वडिलांसंगे रंगपंचमीनिमित भरलेल्या दरबाराला गेली होती. एक सेनाधिकारी मालोजी भोसले हाही मर्दानी पोषाखातील आपल्या आठ-नऊ शहाजीला घेऊन वाहनग्या मुलामुलीची दृष्टिभेट होताच, ती दोघे एकमेकाच्या अंगावर गुलाल उधळू लागली. ते दृश्य पाहून लखुजी जाधव दरबारी म्हणाले, "कसा छान जोडा शोभून दिसतो आहे नाही?" लखुजी हे वाक्य सहज बोलून गेले, पण त्यांचे ते वाक्य पटकन पकडू दरबारातल्या मानकऱ्याना उद्देशून म्हणाले, "ऐकलेत ना मानकऱ्यानो, लखुजीरावांनी तुम्हा सर्वांसमक्ष माझे व्याही होण्याचा मला शब्द दिला आहे .
दरबारात पडलेली ही गोष्ट जिजाची आई म्हाळसाबाई हिच्या कानी जाताच ती पतीवर कडाडली, "आपण अगदीच 'हे' कसे? मालोजी भोसले है। राजस्थानातल्या सुप्रसिद्ध शिसोदिया घराण्यातले असले, तरी काही झाले तरी ते आपल्या हाताखालचे नोकर आहेत ना? मग आपली सोन्यासा जिजा त्यांच्या मुलाला देण्याची भर दरबारात घोषणा करायची? शिर्के, निंबाळकर, महाडिक यांच्यासारख्या आपल्या तोडीस तोड असलेल्या एखाद्या सरदाराचा मुलगा पाहायचा सोडून, हाताखालच्या नोकराच्या मुलाला मुलगी देण्याची एवढी घाई आपल्याला का झाली?" पत्नीचे हे लखुजीरावांनाही पटले व ते घडल्या 'प्रमादा' वर पडदा पाडायला पाहू लागले पण मालोजी इरेस पेटले. त्यांनी स्वतःच्या पराक्रमावर "पंचहजारी पटकावून पुणे, सुपे, इंदापूर, चाकण या गावांची जहागिरी मिळविली व 'राजा' हा किताबही मिळविला. ते गड शिवनेरीवर अनेक देवळे, तलाव स्वखर्चाने बांधून त्यांनी नावही कमाविले. त्यानंतर निजामशहाकडून लखुजीवर वजन आणून त्यांनी आपला पुत्र शहाजीचा लखुजींच्या जिजाशी विवाह घडवून आणला व आपला हेतू तडीस नेला.
जिजा माहेरी असतानाच घोड्यावर बसणे, अचूक नेमबाजी करणे, लिहि वाचणे इत्यादीत तरबेज झालेली असल्याने, तसेच अत्यंत बुद्धिमान असूनही सुस्वभावी असल्याने तो मालोजींची आवडती सून होती. पुढे इ.स. १६२० मध्ये निजामाच्या बाजूने शत्रूशी लढत असता मालोजी कामी आले. त्याच्यानंतर निजामशाहीत विजयी जागा शहाजीराजांनी मिळविली. निजामाच्चा दरबारी ते दिवसेंदिवस वर वर येऊ लागले व त्यांचे वर्चस्व वाटू लागले. त्यांच्यात व सासरे लखुजी जाधव यांच्यात स्पर्धा सुरु झाली. अखेर जाधव हे निजामाला सोडून मोगलांना जाऊन मिळाले. सासरा व जावई यांच्यात लढाया झाल्या, पण प्रत्येक वेळी शहाजीराजांनी निजामाची बाजू सावरली. पण एकदा लखुजी जाधव मोगलांचे सरदार म्हणून निजामशाही मुलखावर चालून आले. शहाजीराजांनी पराक्रमाची शर्थ केली, पण मोगलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपला टिकाव लागेल असे वाटेनासे होताच त्यांनी शत्रुसैन्याची फळी फोडून सहकुटुंब पळ काढला.
जिजा गरोदर असल्याने आपल्या बरोबरीने धावपळ करायला लावणे धोक्याचे आहे व तिला पित्याकडून धोका होणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन शहाजीराजांनी शिवनेरीवर पाठविले व स्वतः दूरवर निघून गेले. जिजाला शिवनेरीवर पोहोचते केले गेल्याची बातमी लागताच लखुजी जाधव तिकडे गेलेले कळवळून म्हणाले, "बेटी' अग, तू सध्या दोन जिवाची आहेस. अशा स्थितीत व त्यातून पतीजवळ नसताना तू या गडावर एकटी राहू नकोस. माझ्या माहेरी चल." यावर बाणेदार जिजा म्हणाली, माझे पती माझे रक्षण करु शकले नाहीत तर मी इथे एकाकी मरेन, पण तुमच्या आश्रयाला येणार नाही." संकटात सापडली असतानाही दाने प्रत्यक्ष पित्याला असे बाणेदार उत्तर देऊन परत पाठविले आणि थोड्याच दिवसांनी या महाराष्ट्रमातेच्या उदरी राष्ट्रपुरुष शिवप्रभु जन्माला आले. हीच जिजाऊ प्रखर परिवर्तनशील होऊन राष्ट्रमाता झाली.
→ सुविचार
• हिच जिजाऊच्या प्रेरणे, उजळे स्वराज्य ज्योती । हिच जिजाऊ जिणे, पडविले राजा शिवछत्रपती ||
→ दिनविशेष -
• स्वामी विवेकानंद जयंती - १८६३.
विश्वनाथवान आणि माता भवनेश्वरी अशा मातापित्यांच्या पोटी क सिलिया गावी १२ जानेवारी १८९३ मध्ये विवेकानंदांचा जन्म झाला. आईने 'वारेश्वर नाव ठेवले, तरी पुढे 'नरेंद्र' हे नाव रूढ झाले. बालपणी हट्टी व खोडकर असला तरी साधुसंताविषयी प्रेम, अलौकिक बुद्धिमत्ता, खेळाडूपणा, तेजस्विता, मधुर आवाज हे गुण बालपणापासून दिसत प्रारंभीच्या काळात ते पाश्चात्यांच्या भौतिक विचारसरणीने भारावून गेले होते. पण १८८२ साली स्वामी रामकृष्णांची भेट झाल्यावर त्यांच्या ५ विचारात आमूलाग्र बदल झाला. धर्माबरोबरच दीन-दु:खितांची सेवा करण्याचे मानवतावादी कार्य ईश्वरसेवा म्हणून केले. सहा वर्षे भारत केले. कन्याकुमारीच्या शिळेवर चिंतन करीत असताना त्यांना विश्वशांतीसाठी जगभर प्रसार करण्याची प्रेरणा मिळाली. अमेरिकेत शिकागो भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेमध्ये त्यांनी 'बंधूंनो आणि भगिनींनो' असे शब्द व्याख्यानाच्या आरंभी उच्चारून अमेरिकेतल्या जनतेला बंधु जिंकले. अमेरिकेतील अनेक व्याख्यानांतून भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे ते थोर तत्त्वज्ञानी व उत्तम वक्ते होते. दिनांक ४ जुलै १९०२ विवेकानंदांचा स्मृतिदिन होय. जे लोक आपले अंतिम ध्येय गाठतात ते युगप्रवर्तक ठरतात.
→ मूल्ये
• सर्वधर्मसमभाव, शुचिता, समता, भूतदया, राष्ट्रप्रेम छत्रपती शाहूमहाराजांचा राज्यभिषेक सोहळा संपन्न
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
अन्य घटना
• राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिन - १७०८
• सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी ठरविण्यात आली. १५१८
• सोलापूरच्या क्रांतिवीरांना (किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, मलप्पा धनशेट्टी, कुरबान हुसेन) फाशी १९३१
• 'शिवधर्म' प्रकटन दिन - २००५ 1
→ उपक्रम
• कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे चित्र रेखाटा.
• मदन पाटील लिखित जिजाऊ साहेब कादंबरीचे वाचन करा,
→ समूहगान
• देश हमारा, निर्मल सुंद उज्वल गगन का तारा... सामान्यज्ञानविवेकानंदांचे ग्रंथ स्वामी विवेकानंद
• भारतीय व्याख्याने
• आधुनिक भारत भारतीय नारी
• भारताचा भावी काळ
• तरुणांना आवाहन
• नवा भारत घडवा
• पूर्व आणि पश्चिम
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा