13 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना -
नमस्कार माझा ज्ञानमंदिरा, सत्यम् शिवम् सुंदरा...
-श्लोक
- प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी । कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अपवि ॥
- जगातील सर्व लोक परमेश्वराची लेकरे आहेत. परमेश्वर सर्व लोकांवर सारखेच प्रेम करतो. आपण कुणाचाही तिरस्कार करू नये. सर्व जगावर प्रेम करावे. - साने गुरूजी
→ चिंतन -
दलाई लामाचे पत्र - आपल्या काळात इमारतीची उच्ची वाढली पण माणुसकी कमी झाली. रस्ते रुंद झाले पण दृष्टी अरूंद झाली. खर्च ला आणि शिल्लक कमी झाली, घरे वाढली पण कुटुंबे छोटी झाली, सुखसोई पुष्कळ, पण वेळ दुर्मिळ झाला, पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले. तज्ज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या. औषध भरपूर, पण आरोग्य कमी झाले. मालकीची वाढली, मूल्यांची कमी, आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो... आणि तिरस्कार सहज करतो. राहणीमान उचावलं, पण जगणं दळभद्री डाल. आपल्या जगण्यात वर्षाची भर पडली. पण आपल्या वर्षामध्ये जगण्याची नाही. आपण भले चंद्रावर गेलो... आलो, पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणे होत नाही. बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत, पण आतल्या हरण्याचं काय? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा, पण आतल्या गुदमरण्याचं काय? आपली आवक वाढली, पण नियत कमी झाली, संख्या वाढली पण गुणवत्ता घसरली. हा काळ इंच माणसाचा, पण खुज व्यक्तिमत्वाचा, उदंड फायद्याचा पण उथळ नात्याचा... जागतिक शांतीच्या गप्पा, पण घरातल्या युद्धाचा. मोकळा वेळ हाताशी, पण त्यातही गंम दिलेली विविध खाद्यप्रकार पण त्यात सत्त्व काही नाही. दोन मिळवती माणसं पण त्यांचे घटस्फोट वाढले, घरं नटली पण घरकुलं दुभंगली देखाव्या खिडकीत खूप काही मांडलेलं. पण कोठीची खोली रिकामीच हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवणार तंत्रज्ञान आज आहे आणि आज आहे तुमचं स्वातं या पत्राकडे लक्ष देण्याचं किंवा न देण्याचं यातलं काही वाटलं तर बदला किंवा... विसरून जा. - दलाई लामा.
कथाकथन
• साने गुरुजी (आईचे उपकार) - आई देह देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. आई माझा गुरु, आई कल्पतरु, तिचे उपकार मेथी जिस ? माझ्यात जे काही चांगले आहे. प्रेमळपणे वागायला, बोलायला, चंगले विचार करायला तिनेच मला शिकवले. माझ्यातली सेवावृत्ती. निरंहकारिता, करुणा, हे सरे आईचे देणे. कोड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्यत्व, तत्त्व न गमावता कसे वागावे हेही तिनेच मला घटना प्रसंगातून, आवरणातून आईची स्मृती आळवून तिचे गुणगान करुन हे ओठ पवित्र करीन" - साने गुरुजी.
संस्कार :
श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवा सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून, ww राष्ट्रीय एकात्मतेचा ध्यास लागलेल्या सानेगुरुजींनी मुलांवर विलक्षण प्रेम केले. कारण त्यांना एक खात्री होती की, मुलेच हे विश्व सुंदर बनवतील, - श्यमची आपण मुलाना प्रेम दिले तर हे विश्व सर्वच मुले प्रेमाने भारून टाकतील. असा गुरुजींचा विश्वास होता. आईवर विलक्षण प्रेम करणाऱ्या साने गुरुजींनी आपल्या आईविषयी असे उद्गार काढले होते की, “आई माझा गुरु, आई कल्पतरु ." "श्यामची आई' या आपल्या पुस्तकात गुरुजींनी आईविषयक मन लिहिले आहे. त्यांच्या आईने श्यामवर म्हणजे सने गुरुजींवर असे प्रेम केले की ते आईचे वात्सल्य गुरुर्जीमध्ये सहजपणे उत्तरले. साने गुरुजी अवडनेरच्या शाळेत नजरेने ते सर्व मुलांकडे पाहत. ते नेहमी मुलांना म्हणत, “मुलांनो, तुम्ही फुलांसारखे आहात. फूल जसे स्वतः आनंदी राहून सर्व ला आनंदी करतेतसे तुम्ही स्वतः आनंदी रहा आणि संपूर्ण विश्वाला आनंदी करा.. ' साने गुरुजी मुलांना नेहमी सुंदर सुंदर गोष्टी सांगत. त्यांचे नोरजन करीत. त्यांनी मुलांना स्वावलंबनाचा धडा दिला. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. ते मुलांना नेहमी एक गोष्ट सांगत की, "आपल्याला देवाने दोन दिले आहेत ते सदैव सेवेसाठी राबायला हवेत. आपल्याला देवाने वाणी दिली आहे. त्या वाणीच्या माध्यमातून आपण सुंदर आणि केवळ सत्यच बोलायला हवे आणि आपल्या हृदयात सर्वांविषयी प्रेमच उचंबळून यायला हवे. मुलांनो ही त्रिसूत्री तुम्ही प्रामाणिकपणे पाळा. तुमचे आयुष्य आनंदाने भरन जाईल. मुलांनो हे सारे का सांगितले तर साने गुरुजींनी मुलांवर आणि समाजावर आईसारखे प्रेम केले. जसे संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो साने गुरुजी माऊली स्वतः होते हे प्रथम जाणून घ्या. त्यासाठी त्यांचे चरित्र वाचा, खरे सांगू का ? अलीकडच्या काळातला हा संत पुरुष होता. सच्चा निष्काम कर्मयोगी पुरुष होता....
सुविचार
जीवन म्हणजे प्रेम, ज्ञान आणि शक्ती यांचा योग. • करी मनोरंजन जो मुलांचे। जडेल नाते प्रभुशी तयाचे ।
→ दिनविशेष
• प्रख्यात हिंदुस्थानी तबला वादक तिरखवाँ अहमदखान यांचा स्मृतिदिन - १९७६ तिरखाँ यांचा जन्म मुरादाबाद येथे झाला. ते तबल्यावर 'धिरक.... थिरक' असे बोल अत्यंत द्रुतलयीत स्वच्छ रीतीने वाजवीत असल्याने इस्ताद कालेखाँ यांनी त्यांना धिरकवों (तिरखवाँ) राव दिले. संगीतातील प्रारंभीचे धडे त्यांनी आपले वडील व प्रसिद्ध सारंगीवादक उस्ताद हुसेनबल यांच्याकडे घेतले. पुढे उस्ताद मुनीरखांच्या खाली सुमारे २५ वर्षे तबलावादनाचे विविध बारकावे, विविध शैली आत्मसात केल्या. भास्करबुवा बखल्यांनी १९२८ च्या सुमारास त्यांना महाराष्ट्रात आणले. त्यानंतर सुमारे दहा वर्षे ते गंधर्व नाटक मंडळीत होते. बालगंधर्वांचा सुरेल, सुरेख आवाज नि तिरखवांची भावानुकूल, सुसंवादी यामुळे नाटकातील पदे रंगून जात. बालगंधर्वांनी त्यांना महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवून दिली. लखनौच्या भातखंडे संगीत विद्यालयात ते कलावादनाचे प्राध्यापक होते. १९७१ नंतर त्यांनी मुंबईला 'नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस्' येथे तबल्याच्या प्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी तबल्याला मैफलीत गवयाप्रमाणे मध्यवर्ती स्थान प्राप्त करुन दिले आणि तबलावादनाच्या स्वतंत्र मैफली करुन तबला या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून | दिली. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना भारत सरकारने 'पद्मभूषण' हा किताबही १९७० साली दिला.
→मूल्ये
• निसर्गप्रेम, सौंदर्यास्वाद, निरीक्षणशक्ती.
→ अन्य घटना
• वडगाव येथे इंग्रज व मराठे यांच्यामध्ये घनघोर युद्ध होऊन इंग्रजांनी मराठ्यांपुढे शरणागती पत्करली. - १७९९
• 'शारदा' नाटकाचा पहिला प्रयोग १८९९.
•संतुरवादक शिवकुमार शर्मा यांचा जन्मदिन - १९३८
• भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्मदिन - १९४९
• 'हिराकुड ' धरणाचे पं. नेहरु यांच्या हस्ते उद्घाटन - १९५७. '
एडमंड हिलरी' स्मृतिदिन - २००८.
→ उपक्रम
• संगीतातील वाद्यांची माहिती मिळवावी.
•वहीत वाद्यांची चित्रे काढावीत
. → समूहगान
-• ह्या भूमिचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान...
→ सामान्यज्ञान
• शिंदी वृक्षाच्या ताज्या निरेपासून निघणारी गुळीसाखर सारखी गोड असून उसापासून बनविलेल्या साखरेपेक्षा स्वादिष्ट नि पौष्टिक असते. शिंदीच्या एका झाडापासून नोव्हेंबर ते मार्च या हंगामाच्या काळात सुमारे ३० किलो गुळीसाखर मिळू शकते. ही प्रक्रिया सुमारे ३० वर्षे तरी चालत राहते. ही साखर बनविण्याची पद्धती सोपी असून प्रत्येक खेड्यात एक कुटिरउद्योग म्हणून अंमलात आणता येण्यासारखी आहे. भारतात खेडोपाडी आढळणारी शिंदीची झाडे अंदाजे ३ कोटी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा