15 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
प्रार्थना
- सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना...
श्लोक
असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे । परार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ - साने गुरुजी
सर्वांना समान लेखून सर्वांवर प्रेम करणे, हेच सर्व धर्माचे सार आहे. धर्मातील सत्य हेच आहे. तेव्हा इतरेजनांना सुखी भरण्यासाठी प्रसंग पडला तर आपल्या प्राणांचेही बलिदान करावे. साऱ्या जगावर प्रेम करावे
. चिंतन
- सत्याशिवाय दुसरा धर्म नाही अशी धर्माची एक म्हण आहे.. - - महात्मा गांधी दुसरी म्हण धर्म म्हणजेच प्रेम आणि ज्या अर्थी धर्म एकच असू शकतो, त्या अर्थी सत्य हे प्रेम आहे आणि प्रेम हे सत्य आहे. अधिक विचार करताना आपल्याला असे दिसून येईल की सत्यावर आधारलेला कोणताही व्यवहार हा प्रेमाशिवाय शक्य नाही. म्हणूनच सत्यशक्ती म्हणजे प्रेमशक्ती आहे.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
→ कथाकथन
- ताराबाई शिंदे जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका : बुद्धिमान, कर्तृत्ववान स्त्रिया सर्व काळात सर्व संस्कृतीत दिसून येतात; परंतु तरीही सामान्य स्त्रीचे स्थान पुरुषांच्या तुलनेत सर्वत्र दुय्यम मानले गेले. आधुनिक विज्ञान व यंत्रयुगाचा इदय (औद्योगिक क्रांती) यांमुळे उत्तरोत्तर स्त्री-स्वातंत्र्याला अनुकूल असा काळ येऊ लागला. २० व्या शतकाच्या इत्तरार्धात 'माहिती तंत्रज्ञाना'च्या क्रांतीमुळे ज्ञानबुद्धिमत्ता या बाबींना असाधारण महत्त्व आले आहे. शरीरसामर्थ्यात स्त्री-पुरुषांत फरक असला, तरी बुद्धिमत्तेच्या बाबतीत स्त्रिया पुरुषापेक्षा प्रचंड बुद्धिमान असल्याचे आढळले. त्यामुळे २१ व्या शतकात स्त्री-मुक्ती, स्त्री-पुरुष समानता ही ध्येये गाठणे अधिक सोपे जाणार आहे. या निमित्ताने थोडे पाहू
जगातील स्त्री-मुक्तीची वाटचाल
: फ्रेंच राज्यक्रांतीच्या पूर्वसंध्येस मार्क्टिस डी' कॉण्डरिसेट या फ्रेंच तत्त्वज्ञाने स्त्रियांच्या मतदान हक्काचा इस्कार केला, मेरी बॉलस्टोन क्राफ्ट या ब्रिटिश लेखिकेने आपल्या 'एव्डिंडिकेशन ऑफ द राइटस ऑफ वुमन' (१७९२) या पुस्तकात स्त्री-पुरुष तेचा विचार मांडला. १८७० मध्ये इंग्लंडमध्ये स्त्रियांना विद्यापीठात प्रवेश मिळू लागला. १९ व्या शतकात इंग्लंड व अमेरिकेत स्त्रियांना संपत्तीविषयक अधिकार मिळाले. एलिझाबेथ स्टॅण्टन व सुसान बी. अॅन्थनी या दोघांनी अमेरिकेत स्त्रियांच्या मतदान हक्काचा पुरस्कार केला. त्या १९२० मध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला. इंग्लंडमध्ये एमेलिन पॅनखस्टं आणि तिच्या ख्रिस्ताबेल व सिल्व्हिया या दोन मुली यांनी त्रियांच्या मतदान हक्कासाठी आपल्या 'विमेन्स सोशनल अॅण्ड पोटिकल युनियन' या संघटनेतर्फे लढाऊ आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर १९१८ मध्ये प्रथम ३० वर्षांच्या ब्रिटिश स्त्रियांना मताधिकार मिळाला व नंतर १९२८ मध्ये पुरुषांच्या बरोबरीने त्यांना मतदानाचा हक्क मिळाला. फ्रान्स व इटलीत अनुक्रमे १९४७ व १९४८ मध्ये आणि १९७१ सालात स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला. डॉ. अॅनी बेझंट (१९ वे शतक) व पुढे मेरी स्टोप्स (२० वे शतक) यांनी इंग्लंडमध्ये संततिनियमनाचा पुरस्कार केला. मादाम सिमॉन डी 'ब्रूव्हा' या फ्रेंच लेखिकेने आपल्या 'ट सेकंड सेक्स' (१९४९) या ग्रंथाद्वारे स्त्री-मुक्तीचा विचार नव्या जोमाने जगापुढे मांडला. १९७५ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला वर्ष' म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर भारतासह सर्व देशांत स्त्रियांच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळू लागला आहे. १९९८ मध्ये बीजिंग (चीन) येथील आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्त्रीविषयक प्रश्नांचा सर्वांगीण विचार करण्यात आला आणि यावेळी सर्वत्र चर्चिले गेले, भारतातील ताराबाई शिंदे यांचे नाव. तेव्हा भारतही खडबडून जागा झाला आणि ताराबाई शिंदे यांचा शोध घेऊ लागला. ताराबाई शिंदे यांचे जगातील नामवंत स्त्रियांमध्ये पहिली स्त्रीवादी लेखिका (स्त्री-पुरुष तुलनाकार) म्हणून अग्रक्रमाने नाव घेतले जाते. ताराबाई शिंदे या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील. त्यांचा जन्म जानेवारी १८५०ला झाला, तर मृत्यू १९१० मध्ये झाला. त्यांच्यावर महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. १८८२ मध्ये त्यांनी 'स्त्री पुरुष तुलना' हा ५० पानांचा निबंध लिहिला आहे. आजही एम. ए. च्या अभ्यासक्रमात तो समाविष्ट आहे. या निबंधात त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचे अत्यंत प्रभावी प्रतिपादन केले आहे. समता, बुद्धिनिष्ठा, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण यांचा पुरस्कार केला तर बालविवाह, केशवपन, जातिप्रथा, अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद, अनिष्ठ रूढी-परंपरा, जाचक चालीरीती यांसारख्या प्रथांना विरोध केला असून, स्त्री-अस्तित्व स्त्री-स्वातंत्र्यावर त्यांनी भर दिला आहे.
→ सुविचार
• विवेकाने केलेली एक गोष्ट, धर्म भावनेने केलेली एक कृती, ज्ञानाने भरलेला एक शब्द, आत्मचिंतन करून केलेली कृती, ही अज्ञानमूलक अशा शेकडो गोष्टींपेक्षा महत्त्वाची असते.
दिनविशेष
• विवेकाने केलेली एक गोष्ट, धर्मभावनेने केलेली एक -• ख्यातनाम नेता मार्टिन ल्यूथर किंग यांचा जन्मदिन - १९२९ म अमेरिकेतील अटलांटा येथे झाला. महात्मा गांधीजींच्या जीवन व तत्त्वज्ञानाचा मार्टिन ल्यूथर किंगबर १९५५ मीट विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेटची पदवी दिली. मंगमरी खेड्यात धर्मोपदेशकाचे कार्य करीत असतानाच १९५५ जनाल वाहतूक कंपनीच्या नियोना वाहनामध्ये गोन्या लोकांच्या शेजारी बसू न देणान्या वर्गव ळीचे नेतृत्व त्यांनी केले. चळवळ यशस्वी झाली. पुढं वर्णविरोधी चळवळीत अनेकदा कारावास फार मोठा बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या महान कार्याबद्दल त्यांना वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथही लिहिले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन, अहिंसा व निःशस्त्र प्रतिकार यावर श्रद्धा असलेल्या, नागरिक हक समानतेच्या कट्टर पुरस्कर्त्याला एका श्वेतवर्णीयाने ४ एप्रिल १९६८ रोजी गोळी घालून मारले.
→ मूल्ये -
• समानता, बंधुता
→ अन्य घटना
• खगोल शास्त्रज्ञ गॅलिलीओ यांचा जन्म - खोरे जिंकले. १६५६ एशियाटिक सोसायटीची कलकत्ता येथे स्थापना करण्यात आली. - १७८४ ख्यातनाम कुस्तीगीर ऑलिंपिक विजेता • • १५६४ • शिवाजी महाराजांनी जावळीचे खाशाबा माधव जन्मदिन १९२४• भारतात होमगार्ड संघटनेची स्थापना - १९६३ • बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष क्रांतिकारी पहिल - सुश्री बहेन मायावतीजी यांचा जन्मदिन १९५६ • महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दामोदर दलाल यांचा स्मृतिदिन - १९७९
→ उपक्रम
मार्टिन ल्यूथर किंग यांच्या जीवनकार्याविषयी माहिती मिळवावी. समूहगान झेंडा अमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान
→ सामान्यज्ञान
• विश्वामध्ये पृथ्वीशिवाय इतरत्रही सजीव सृष्टी असण्याची शास्त्रज्ञांना शक्यता वाटते. त्यावर अनेक वर्षे अथक प्रयत्न सुरु आहेत - पग्रहांवर किंवा इतरत्र जीवसृष्टी असल्यास तिचा शोध लागावा व प्रतिसाद मिळावा म्हणून चाललेल्या प्रयत्नांमध्ये अलिकडचा म्हणजे अवकाशयान, या यानात पृथ्वीवरील जीवनाची ध्वनिचित्रफीत ठेवलेली आहे. त्यात पृथ्वीवरील जीवनाची १८३ चित्रे, पृथ्वीवरचे संगीत पृथ्वीवांचे विविध भाषांमधील संदेश आहेत. या यानातील संगीतात बाख, विथोव्हन, मोसाईच्या सिंफनीज, विविध प्रदेशांचे लोकसंगीत याबरोबरच सूरश्री केसरबाई केरकरांचा शास्त्रीय संगीतातील राग मारुबिहागसुद्धा आहे. सूर अवकाशात विहरतात हे केसरबाईच्या स्वराबाबत शब्दशः खरे ठरले आहे.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 शेती तंत्रज्ञान
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा