Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, १४ जानेवारी, २०२४

18 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 

18 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना

 प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पाये सुख - लाये... 


→ श्लोक 

- माता भूमि पुत्रो अहं पृथिव्या । भूमे मातः निधेहि मा भद्रया सुप्रतिष्ठितम् । सा नो भूमि विसृजतां माता पुत्राय मे पयः । मातरं भूमि धर्मणा धृताम् ।। 

- - अथर्ववेद माझी माता भूमी व मी त्या मातृभूमीचा पूत्र आहे. हे मातृभूमी । मला उत्तम रीतीने सुरक्षित आणि कल्याणकारक परिस्थितीत ठेव. ती मातृभूमी मला पुत्राला दूध आदि पेये देवो. आमच्या मातृभूमीचे धारण धर्माने होते.

 → चिंतन 

 - धरणीमाता म्हणजे मोठी माता - माता आपल्याला जन्म देते, पालनपोषण करते, भूमाता आपल्यासारख्या अनेक बदल प्राण्यांचे, वृक्षवेलीचे पालनपोषण करते. त्यांना अंगाखांद्यावर खेळविते, आपल्या लेकरांना ती आपल्या जवळचे सर्वस्व अनंत हस्ताने असते. पसाभर धान्य पेरले तर पोतेभर परत देते. म्हणून माती म्हणजे मोठी माता. माजी पंतप्रधान शास्त्रीजींनी यासाठीच 'जय जवान' या 'जय किसान' असा मंत्र दिलेला आहे.

कथाकथन

 'रामू शेतकरी' एका खेड्यात रामू नावाचा शेतकरी राहत होता. तो भरपूर कष्ट करीत असल्यामुळे त्याच्या शेतात असे माध्यामध्ये हिरवागार भाजीपाला, फळझाडे, फुलझाडेही होती. इत्तम प्रकारचे बी-बियाणे वापरून योग्य मशागत केल्यामुळे त्याच होते.इत्यादी परिसरात ख्याती होती. त्याच गावातील मंबाजी नावाचा आळशी माणून मूक आणि प्रसिद्ध खूपच जायचा. रामूने नुकसान व्हावे, त्याची फजिती करावी अशी काही योजना आखण्यात तो सतत दंग असे. एक दिवस चकचकीत बिया आणल्या आणि रामूला म्हणाला, 'रामू. हे बीज तुझ्या शेतात पेरून त्याचे पीक काढून दाखव, तरच तू खरा शेतकरी हे मी मान्य करीन' चाणाक्ष रामूच्या हे सहज लक्षात आले की, मबाजी आपली खोडी काढण्यासाठी काहीतरी बनवाबनवी करीत आहे. त्याने सूक्ष्म निरीक्षण केले तेव्हा त्याच्या लक्षात आले की, ह्या कसल्याही बिया नसून बी च्या आकाराचे प्लॅस्टिकचे लहान-लहान तुकडे केलेले बाला चांगली अलवा या हेतूने त्यानेही मंबाजी समोरच त्या बियांची पेरणी केली. पंधरा-वीस दिवसानंतर मंबाजीने चौकशी केली राम काय म्हणतंय पीकपाणी? मी दिलेल्या बियांची छान झाडे आले असतीलना? 'हो तर, चला ना? दाखवतो तुम्हाला शेतात रामूचा इत्साह बाजीला आश्चर्य वाटते. आपण साधे प्लॅस्टिकचे तुकडे रामूला दिले. त्याचे कसले पीक येणार? पण प्रत्यक्षात शेतात गेल्यावर मिरचीसा छोटी आणि त्या प्रत्येक झाडावर प्लॅस्टीकचे रंगीबेरंगी चनये, वाटया, पेले, छोटया ताटल्या पाहून तो कच झाला. आत रामू हा हाडाचा शेतकरी आहे हे मान्य करणे भागच पडले. विचार करता-करता मंबाजीचा लोभ जागा झाला. रामू सारखेच आठ-पंधरा प्लॅस्टीकचे उत्पादन घ्यावे म्हणून त्याने स्वतःच्या शेतात पेरलेला भूईमूग, कापूस, ज्वारी, तूर अशी पिके इपटून टाकली. आणि भरपू बिया त्या शेतातल्या त्यांना रोज पाणी घालू लागला. आठ-पंधरा दिवसातच काय पण दोन-तीन महिने झाले तरी एकही न तोकडे आला व त्याला म्हणाला, 'काय रे रामू मीच दिलेल्या बियांचे तुझ्या शेतात चांगले प्लॅस्टीकचे इत्पन्न निघाले हवले नाही. प्लॅस्टीकच्या बियांमुळे माझी जमीन मात्र बंजर झाली गड्या, हे कसे झाले?" मंबाजी, तुम्ही माझी फजिती मला प्लॅस्टीकच्या बिया दिल्या होत्या. त्याच वेळी तुमचा बेत माझ्या लक्षात आला. अहो प्लॅस्टीकला कधी अंकुर फुटतो का? तुमची ही तुमच्याच उलटावी म्हणून मी प्लॅस्टीकच्या वाट्या, पेले, चमचे, ताटल्या आणून झाडांवर अडकवल्या, तुम्हाला ते खरेच पीक वाटले याच्या नादात तुम्हीच फसला. आतातरी आळशीपणा सोडा, कट करा आणि बघा तुम्हालाही माझ्यापेक्षा जास्त उत्पादन काढता खजील झाला. त्याला स्वतःची चूक कळली. त्याने रामूची क्षमा मागितली व त्याच्या सल्ल्याप्रमाणे शेतीत राबणे सुरू केले. दोघे जीव मात्र प्लॅस्टीकच्या शेतीची आठवण करून आजही सारा गाव मंबाजीला 

→ सुविचार 

 • परिश्रम करण्याची तयारी असलेली व्यक्ती जीवनात यशस्वी होते.

  • आळस, अज्ञान व अंधश्रद्धा ह्या तीन ब | माणसाच्या शत्रू आहे.

   • आळस, निरूत्साह, स्वार्थ या दुर्गुणांमुळे राष्ट्रेही नष्ट होतात. 

→ दिनविशेष - 

• क्रांतिकारक कृषीतज्ज्ञ डॉ. पांडूरंग सदाशिव खानखोजे यांचा स्मृतिदिन - १९६७, १८८५ मध्ये खानखोजे यांचा क | झाला. १९०६ साली त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली. भारतात क्रांती करण्यासाठी लष्करी शिक्षण घेणे आवश्यक आहे हे त्यांना जागर त्यांनी अमेरिकेतील एका लष्करी विद्यालयात प्रवेश घेतला आणि जिवापाड परिश्रम करुन डिप्लोमा मिळविला. १९०८ साली तेथेच आपल्या मित्र सहकार्याने 'गदर' ही गुप्त क्रांतीकारक संघटना इभी केली. या संघटनेचे कार्य भारतात खुपच वाढल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना भारतात येण्यास | कायमची मनाई केली. भारताबाहेर राहून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप कष्ट केले. 'गदर' चे काम करता करताच त्यांनी अमेरिकेतील ऑि | विद्यापीठात शेतीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. 'शेती' या विषयात डॉक्टरेट ही पदवी घेतली. गहू आणि भारता संबंधी त्यांनी मौलिक संशोध केले. पुण्याच्या 'चित्रमय जगत' या मासिकात अनेक लेख लिहिले. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी त्यांना सन्मानाने भारतात बोलविले. कृषीसत्तामा म्हणून त्यांची नेमणूक केली. अनेक विद्यापीठांना त्यांनी शेतीच्या कामात मार्गदर्शन केले. अखेर १९६७ मध्ये नागपूर 

→ मूल्ये 

 • श्रमनिष्ठा, देशभक्ती, कर्तव्यदक्षता, विज्ञाननिष्ठा. येथे त्यांचे निधन झाले. 

→ अन्य घटना

 - न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्मदिन - १८४२.

  • छत्रपती प्रतापसिंह महाराज (सातारा) जन्म दिन १८१६ e • सर्व जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी पॅरिस येथे शांतता परिषदेला सुरूवात झाली -१९१९.

   • शहिद शंकरराव महाले जन्मदिन - १९२५ 

• बॅ. नाथ पै यांचा स्मृतिदिन -१९७१.

 → उपक्रम 

 • आपल्या परिसरातील हंगामानुसार पिकांची वैशिष्टे लिहा.

  • वनशेती, फुलशेती, मत्स्यशेती, फलोद्यान याबद्दल माहिती मिळवा 

→ समूहगान

 • नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ.... 

→ सामान्यज्ञान - 

अनंतराव देवकुळे या आधुनिक कृषी वैज्ञानिकाचे ८२व्या वर्षी दि. १९ फेब्रुवारी १९९६ ला निधन झाले. त्यांनी शेतीला पुरु जोडधंद्याबद्दल माहिती जमवून सोप्या भाषेत छोट्या-छोट्या पुस्तिका काढल्या 'आपली शेती' हे मासिक एकट्याने २० वर्षे चालविले. संशोधन करून विविध दैनिक मासिकातून ४०० च्या वर लेख लिहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Opt-in Icon
We want to notify you about latest updates.
You can unsubscribe anytime later.