19 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
प्रार्थना
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो....
* श्लोक
* - सृष्टिकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो । रुप रखकर भी अनेकों, एक हो तुम एक हो ।।
वार तुम हो अल्ला, तुम हो ईसा, बुध्द, अहुरा हो तुम्ही । तुम्हीं हो शंकर, तुम हो विष्णु, राम कृष्ण हो तुम्हीं । हे प्रिय परमेश्वरा, तू या सृष्टीचा जन्मदाता आहेस. सर्वत्र तू एकच दिसतोस. तुझी अनेक रुपे असली, तरी तू एकच आहेस. हे ईश्वरा, अल्ला आहेस, येशू ख्रिस्त आहेस, गौतम बुध्द आणि अहुरमज्दाही तूच आहेस, तूच शंकर, तूच विष्णू, तूच राम आणि कृष्णही तूच आहेस. सर्वत्र तू एकच आहेस.
→ चिंतन
जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले । तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ॥ तुकाराम महाराजांनी संत कोणाला म्हणायचे, देव कोठे असतो याचे गमक (खूण) सांगितले आहे. दीनदलित, रंजले गांजले, दुःखी असे जे लोक असतील त्यांना जे लोक आपले मानतात, त्यांचे दुःख कमी करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर प्रेम करतात तेच खरे संत. त्यांच्या हृदयीच देवाची वसती असते. संत एकनाथांनी जनता जनार्दनाला आपले मानले, त्याची सेवा केली. महात्मा फुले, आंबेडकर, आगरकर आदि समाजसेवांनी हाच आदर्श घालून दिला, ठक्करबाप्पाही याच परंपरेतले होते.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
→ कथाकथन
थोर अश्रू' '
लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरुवात केली. 'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे.
आई मंगळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पध्दत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झाली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो.
एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व थोडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी घोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलींच्या वेलास जात होते. संध्याकाळची आंघोळ, तिला फारसे पाणी लागत नसे, आईने खसखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो.
पाणी संपले व मी हाका मारु लागलो. 'आई अंग पुस माझे आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, 'देवाची फुले काढ' भी म्हटले, 'माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पूस' आई तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन, पाय टिपून घेईन व मग उडी मारीन. आई म्हणाली, हट्टी आहेस हो शाम अगदी. आईने आपले ओचे धोंडीवर पसरले.
मी माझे पाय त्यावर ठेविले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच ते त्या वेळेस बदलता येणार होते? परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले.
ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही? मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो, आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, 'श्याम ! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस !' तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो.
देवाला सांग शुध्द बुध्दी दे म्हणून. गड्यानों ! किती गोड शब्द ! आपले शरीर आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ रहावे म्हणून बुटपुश्ये आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत. शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत, परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो? देवळाला रंग देतो, परंतु देवाची वास्तुपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी ? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान निराळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाही.
→ सुविचार
• 'हात हरकामी, बुध्दी सर्वगामी व हृदय सर्वप्रेमी असावे
.'• आत्म्याला प्रार्थनेची, शरीराला अन्नाची, मनाला सुविचारांची - गरज असते
. • जो सहजासहजी वाहवत नाही, जो शांत प्रकृतीचा असतो, सर्व बाजूंनी सारासार विचार करून कार्य करण्याचा ज्याचा स्वभाव | आहे, ज्याचे ज्ञानतंतू सहजासहजी इत्तेजीत होत नसतात अणि जो निरतिशय प्रेम नि सहानुभूतीसंपन्न असतो, फक्त तोच मनुष्य या जगात महान कार्य करून तद्द्द्वारा स्वतःचेही कल्याण साधू शकत असतो.
→ दिनविशेष
- • समाजसेवक ठक्करबाप्पा यांचा स्मृतिदिन -
१९५१ ठक्करबाप्पांचा जन्म २७ नोव्हेंबर १८६९ रोजी काठेवाडाकाठेवाडा येथील भावनगर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलदास लालजी होते. ठक्करबाप्पांचे खरे नावे अमृतलाल ठक्कर असे होते. पण, त्यांच्या समाजसेवेमुळे लोकांना ते पित्यासमान वाटत त्यामुळे लोक त्यांना ठक्करबाप्पा म्हणू लागले.
वडिलांच्या सेवाभावी वृत्तीचे संस्कार लहानपणापासून त्यांच्यावर होत होते. साधी राहणी, कष्ट करण्याची तयारी, नम्रता हे गुण त्यांनी वडिलांकडून घेतले. लहानपणीच अस्पृशांबद्दल निर्माण झालेले प्रेम आणि सहानुभूती यातूनच हे हरिजनसेवक बनले. त्यांनी तेवीस वर्षे नोकरी केली. त्यावेळी त्यांना जी प्राप्ती होत असे त्यातील अर्धा भाग ते सार्वजनिक संस्थांना दान देत असत. वयाचे पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांनी दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी नोकरी सोडली.
भारत सेवक समाज संघटनेचे अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले यांच्या समक्ष समाजसेवेची दीक्षा घेतली. ती अखेरपर्यंत पाळली. १९२२ ते ३३ हा अकरा वर्षांचा काळ त्यांनी भिल्लांच्या सेवेत घालविला. त्या समाजातील अज्ञान, दारिद्र्य, गरिबी, अंधश्रध्दा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १९३१ साली अस्पृश्योध्दारासाठी गांधीजींनी 'हरिजन सेवक संघाची' स्थापना केली. त्यातही त्यांनी मोलाचे कार्य केले. इ.स. १९५१ मध्ये त्यांचे निधन झाले.
→ मूल्ये
• श्रमनिष्ठा, समता, आदरभाव,
→ अन्य घटना
• राणा प्रतापसिंह स्मृतिदिन १५९७ • जेम्स वॅटचा जन्म १७३६
• • विनोदी साहित्यिक चि.वि.जोशी यांचा जन्मदिन १८९२.
→ उपक्रम
• ठक्करबाप्पांचे चरित्र व कार्य याबद्दल अधिक माहिती मिळवून सांगावी, राणा प्रतापाच्या कथा सांगाव्यात.
→ समूहगान -
• चला जाऊ या दर्शन करू या अपुल्या भारतमातेचे..
→ सामान्यज्ञान
आधुनिक काळातील समाजसुधारक :
• डॉ. मोदी - नेत्रशिबिरे व आरोग्य सेवा
• शिवाजीराव पटवर्धन बाबा आमटे कुष्ठरोगी सेवा
• अण्णा हजारे - ग्रामोध्दार
• मणिभाई देसाई- ग्रामोध्दार व निसर्गोपचार
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा