20 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
प्रार्थना
- लावियेला दीप प्रेमे, तेवता ठेवू चला...
→ श्लोक
यःकुलाभिजनाचारैर तिशुध्दः प्रतापवान् । धार्मिको नीतिकुशलः स स्वामी युज्येत भुवि ।।
जय- जो कुळ, जन्म व चारित्र्य या दृष्टींनी शुध्द, त्याचप्रमाणे शूर, धार्मिक व राजनीतीप्रवीण असतो, तोच या पृथ्वीवर राजा व्हायला योग्य अध्य
→ चिंतन
- केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही तरी आपला पराजय नक्कीच होत नाही. - कालिदास.
ध्येयप्राप्तीसाठी आपण प्रयत्न करीत असतो. कष्ट सोसत असतो. परंतु काही वेळा यश येत नाही. याचा अर्थ आपले प्रयत्न वाया गेले. यात पराजय झाला असा होत नाही. अनेक क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. ते फाशी गेले, पण त्यांचा पराजय झाला असे | म्हणणार ? त्यांच्या प्रयत्नांनी परकीय राजसत्ता खिळखिळी झाली, स्वातंत्र्य प्राप्तीची वेळ जवळ आली. मग तो त्यांचा पराजय कसा?
कथाकथन '
खरे बोलणारा मोहन' संध्याकाळची वेळ होती. मोहन घरात शिरला. हातपाय धुतले आणि स्वयंपाक घरात गेला.! खिचडीच्या भांड्यावर झाकण ठेवत होत्या. मोहनला पाहताच त्या म्हणाल्या, 'मोहन ! काल दुपारी वैष्णव मंदिरात गेला होतास ना?" "होर मोहनने एकाच शब्दत उत्तर दिले. 'तुझ्याबरोबर कोण होते? 'मित्र होते माझे...' 'देवळाच्या मागच्या पडवीत तुम्ही किती वेळ होता?' 'बोडा बोलत बसलो होतो. बा...' 'आणि बोलतांना काय चाललं होत?...' मोहन गप्प बसला. पुतळीबेन पुन्हा कडक शब्दात ओरडल्या... सांग खर लपविण्याचा प्रयत्न करून नकोस....' 'काही काही बा... काही नाही...! 'उसनी हिंमत आणून मोहन बोलला. पण, तो घाबरला होता. पु | दरडावून बोलत होत्या. त्या म्हणाल्या... 'मोहन तू आणि तुझ्या बरोबरच्या पोरांनी तिथे बिड्या ओढल्या...! रिकाम्या गप्पा चालल्या | तुमच्या...खरं आहे ना? मोहन आणखी घाबरला... आईला तो घाबरत होता. त्यापेक्षाही अधिक भीती त्याला बाप्पांची वाटत होती. बाप्पा मायाळू होते. मोहनचे लाड करीत असत, परंतु ते रागीट स्वभावचेही होते. - चूक झाल्यावर ते लाड बाजूला सोडतील आणि मारतील हे मोहन ओळखून होता. त्याने पुन्हा एकदा हे खोटे आहे असे पटविण्याचा प्र | पाहिला. परंतु लगेच पुतळीबेन ओरडल्या... 'मावजीभाईंनी तुम्हा पोरांना हटकले. काय करता रे म्हणून विचारले... तेव्हा तोंडातला धूर | सोडून तू बिडी पायाखाली दाबलीस. खरय् ना? मोहनला गुन्हा कबूल करणे भागच होते. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो आईच्या ग पडला... रडत रडतच तो म्हणाला... 'बा चुकलो मी... पुन्हा कधी कधीसुध्दा बिड्या ओढणार नाही. बाप्पांना सांगू नकोस...! तुला मी वचन देतो | हुंदका देऊन मोहन पुढे बोलला. 'खोटे बोलून मी तुला फसविणार होतो. परंतु खोटे लपत नसते. खऱ्याचा पुरावा समोर येतोच. मी आता वाईट वाग नाही. अन् खोटेही बोलणार नाही.' पुतळीबेन गहिवरल्या. त्यांनी मोहनला पोटाशी धरले. डोक्यावरून, गालावरून हात फिरविला. त्याला म्हणाल्या, 'बेटा... आपल्या घराण्यात कोणी वाईट वागले नाही... सत्य सोडले नाही. मोठ्या माणसांचे ऐकून सगळी कामे व्यवस्थित करणारी | नेहमी आई-वडिलांना आवडतात. तू नीट वागशील ना?' मोहनने मान हलविली. त्याचे डोळे पाणावले. त्याने मनात पक्के ठसविले. यापुढे कधी खोटे बोलायचे नाही. खरे असेल तेच बोलायचे. "
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
→ सुविचार -
• अहिंसा, सत्य बोलणे, सर्वांशी सरळपणाची वागणूक असणे, क्षमाशीलता व सावधानपणा हे गुण ज्याच्यापाशी अ तो सुखी होईल - अप्पासाहेब पटवर्धन
. • सत्य व प्रेम हेच ईश्वर आहे
. • सत्याच्या पुजाऱ्याने जमिनीवरील धुळीइतके विनम्र पाहिजे. सत्याचाराने त्याची विनम्रता वाढत जाते.
• सत्य आणि अहिंसा या दोहोंच्या मिलाफाने संपूर्ण जगाला तुम्ही तुमच्यासमोर नतमा करू शकता.
• • सत्य आणि सदाचार याहून अधिक श्रेष्ठ धर्म दुसरा नाही.
→ दिनविशेष -
• क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त यांचा स्मृतिदिन - १९३० : काकोरी कटानंतर स्वस्थ बसलेल्या बटुकेश्वर द | असेंब्लीत बॉम्ब टाकणार असल्याची योजना कळली. त्यांनी हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी या आपल्या क्रांतिकारक संघटनेच्या समित कळविले की, मला या कामगिरीत स्थान द्या. विचार विनिमयानंतर भगतसिंग व दत्त यांनी हे काम करावे असे ठरले. ८ एप्रिल १९२९ रोजी त्यांनी असे प्रवेश मिळविला. अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल सर जॉन शूस्टरच्या सांगण्याला उत्तर द्यायला इभे राहिल्यावर भगतसिंगांनी शूस्टर यांच्या मागच्या मित | बॉम्ब टाकला. बटुकेश्वरांनी दुसरा बॉम्ब टाकला. एकच गोंधळ उडाला. पळून जाण्याची संधी असतानाही ते पळून गेले नाहीत. खटला सुरु झाल्यावर क्रांतिकारकांना राष्ट्रीय कैदी म्हणून ओळखले जावे व विशेष श्रेणी मिळावी यासाठी त्या खटल्यातील बंद्यांनी इपोषण १४ जून १९२९ पासून उपोषण केले बात भगतसिंग, दत्त यांनी ७८ दिवस उपवास केला. या खटल्यात दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली. सॅढर्स्ट वधाच्या प्रकरणी भगतसिंगाला फाशी दत्त शिक्षा भोगून दिल्लीस आले. अखरेच्या काळात हॉस्पिटलमध्ये असतांना लालबहादूर शास्त्रींनी त्यांना दोन हजारांची मदत पाठविली.
→ मूल्ये
●राष्ट्रप्रेम, निग्रह
→ अन्य घटना
• विद्युत कंपनीचे उपकरण 'अॅमिटर' चे संशोधक आद्रेमारी यांचा जन्मदिन - १७७५, सर रतनजी जमदेशजी टाटा यांच जन्मदिन -१८७९.
• सरहद्द गांधी स्मृतीदिन १९८८
• तेजबहादूर सप्रू यांचे निधन - १९४९.
उपक्रम -
• मृत्युंजयाचा आत्मयज्ञ हे पुस्तक मुलांना वाचावयास सांगावे व क्रांतिकारकांच्या कथा मुलांना सांगाव्या.
→ समूहगान
-• मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला....
→ सामान्यज्ञान
• फासावर चढलेले क्रांतिकारक
• खुदीराम बोस
• मदनलाल धिंग्रा भगतसिंग
• शिवराम राजगुरु
• सुखदेव चंद्रशेखर आझाद
• अनंत कान्हेरे
• वासुदेव बळवंत फडके
• चाफेकर बंधू
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा