21 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
प्रार्थना देवा तुला, मिटू देरे वैर वासना
• श्लोक
• - वेदोंने जो तुमको गाया, बायबलने तुमको पाया । कुरान में भी तुम्हारी छाया, एक हो तुम एक मंदिरों में तुमको देखा, मस्जिदों में तुमको देखा । गिरिजों मे भी तुमको देखा, एक हो तुम एक हो ।।
जो न आपस में हैं लडते, सबको भाई जो हैं कहतें । वे ही सच्चे हैं तुम्हारे, एक हो तुम एक हो ।। महाकवी इकबाल वेदांनी तुझी स्तुति-स्तोत्रे गायिली आहेत. बायबलनेही तुझाच शोध घेतला आहे. कुराणातही तुझेच दर्शन घडते. सर्वत्र तू एकच आहे. आम्ही संदेशत तुला पाहिले, मशिदीतही तूच दिसलास. चर्चमध्ये सुध्दा तूच होतास. (सर्व धर्माच्या प्रार्थना गृहात तुझेच दर्शन घडते) सर्वत्र तू एकच आहेस. ई लोक आपसात भांडत नाहीत आणि सर्वांनाच आपले बंधू समजतात, तेच तुझे खरे अंश आहेत. सर्वत्र तू एकच आहेस.
चिंतन-
आली जरी कष्टदशा अपार न टाकिति धैर्य तथापि थोर । कितीही संकटे आली, त्यामुळे पुढचा मार्ग दिसेनासा झाला तरी थोर लोक घाबरून जात नाहीत. धैर्य सोडत नाहीत. मोठ्या लोकांच्या आयुष्यातही परीक्षा पाहणारा काळ येत असतो, पण आपण प्रयत्नाने या काळावर, संकटावर मात करणार आहोत याचा त्यांना आत्मविश्वास असतो. त्यामुळे ते आपले धैर्य गमावून बसत नाहीत.
कथाकथन
'स्वतःची उन्नती स्वतः साधणाऱ्यांनाच नशीब साथ देते. एका गावात एकदा नदीला मोठा पूर आला होता. सर्वजन गाव सोडून सुरक्षित जागी जात होते. याला अपवाद एक माणूस होता, तो म्हणाला, 'देव मला वाचवेल. माझा विश्वास आहे. पाण्याची पातळी वाढल्यावर एक माणूस जीप घेऊन त्याला वाचवायला आला. त्यानं नकार दिला आणि म्हणाला, 'देव मला वाचवेल. माझा विश्वास आहे.' पाण्याची पातळी अजून वाढली आणि तो माणूस दुसऱ्या मजल्यावर गेला. एक होडी त्याच्या मदतीसाठी आली. देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे असं म्हणत त्याने पुन्हा नकार दिला. पाण्याची पातळी वाढत राहिली आणि तो माणूस छतावर चढला. त्याला वाचवायला हेलिकॉप्टर आत परंतु तो माणूस म्हणाला, 'देव मला वाचवेल. माझा विश्वास आहे.' आणि शेवटी तो बुडाला. तो जेव्हा देवाघरी पोचला तेव्हा त्याने देवाला रागाने विचारले, 'माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. माझ्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करून तू मला का बुडू दिलस' देवाने इतर दिलं, 'तुझ्यासाठी जीप, होडी, हेलिकॉप्टर कोणी पाठवलं असं तुला वाटतंय?' (दैववादी मनोवृत्तीपासून दूर राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्यावरील जबाबदारीचा स्वीकार करणं आणि नशिबापेक्षा निसर्गाच्या कार्यकारण भावाच्या नियमावर विश्वास ठेवण. आयुष्यात काहीही साध्य करण्यासाठी वाट पाहणं, आशा किंवा इच्छा करणं यापेक्षा योग्य कृती तयारी आणि नियोजन याची आवश्यकता असते.)
सुविचार
• 'दैववादी न बनता प्रयत्नवादी बनावे तेव्हा नशीब हे आपोआपच प्रयत्नांच्या पाठोपाठ येत असते.
• भविष्य हे हाताच्या हस्तरेषेवर नसून ते हाताच्या मनगटात, कर्तव्यात आहे.
→ दिनविशेष
• क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा स्मृतिदिन: १९४५.
रासबिहारीच्या वडिलांचे नाव विनोदबिहारी असे होते. - लहाणपणी त्यांचे अभ्यासात लक्ष नव्हते. पण विद्यार्थी दशेतच चंद्रनगरच्या तरूण क्रांतीकारी गटाशी त्यांचा परिचय झाला होता. श्रीश घोष व अमरेंद्र चटजी यानी क्रांतीदीक्षा दिली होती. १९१२ साली त्यांनी अनेक तरूण क्रांतीकारक जमविले. २२ डिसेंबरला बसंतकुमारच्या मदतीने दिल्लीला हत्तीवरून दिमाखात जाणाऱ्या व्हाईसरायवर बॉम्ब टाकला. त्याचा अंगरक्षक ठार झाला. व्हाईसराय गंभीर जखमी झाला. पुढे दिल्ली कटाच्या | खटल्यात बसंतकुमारसह चौघाना फाशी झाली. रासबिहारी मात्र सापडले नाहीत. से बनारसला गेले. तेथील अनुशीलन गटाचे नेतृत्व त्यांचेकडे देण्यात आले. पुढे रासबिहारींनी पंजाबच्या गदर क्रांतीकारकांच्या उठावाची योजनाही पूर्ण केली होती. पण कोणीतरी बातमी फोडली आणि ती योजना अयशस्वी झाली. याही वेळी सरकारला ते सापडू शकले नाहीत. अनेक भाषांवर प्रभुत्व, गुप्ततेच्या नियमांची सखोल माहिती, चाणाक्षपणा, हजरजबाबीपणा आणि बेमालूम वेषांतर करण्याची हातोटी यामुळे सरकारला ते सापडू शकले नाहीत. १९१५ मध्ये ते जपानला गेले. तेथेही भारतीय स्वातंत्र्याकरिता त्यांनी कार्य केले. आझाद हिंद सेनेच्या उभारणीसाठीही त्यांनी हातभार लावला होता.
मूल्ये -
• स्वाधीनता, देशप्रेम
→ अन्यघटना
प्रसिध्द साहित्यिक वामन मल्हार जोशी यांचा जन्मदिन - १८८२
• पहिली गोलमेज परिषद मुंबई - १९३१
• आझाद हिंद सेनेची डेस्टन येथे स्थापना - १९४२: यांचा मुखदेव • कवि माधव ज्युलियन जन्मदिन - १८९४.
→ उपक्रम -
• स्वातंत्र्य लढ्यावरील स्फूर्तिगीते विद्यार्थ्यांना शिकवावीत. 'समूहगान -
•• कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा
→ सामान्यज्ञान
पुण्यातील एक अभ्यासू संशोधक श्री मधुकर नागेश सुखात्मे वनस्पितजन्य बिनविषारी कीटकनाशक तयार करण्यासाठी स्वतःचा वेळ, पैसा खर्च करून प्रयोग करीत होते. तब्बल सहा वर्षानी 'इंडियारा' हे बिनविषारी औषध शोधून काढले. अनेक परराष्ट्रांनी त्याला मान्यता व | पुरस्कार दिले. परदेशातून या औषधाला चांगली मागणी आहे. अरी म्हणजे शत्रू व इंडिया म्हणजे भारत म्हणून इंडियारा हे नाव त्यांनी औषधास दिले. या औषधाने कृषिक्षेत्रात क्रांती घडून येण्याचा तज्ज्ञांचा होरा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा