Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

23 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 23 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

प्रार्थना -

 असो तुला देवा माझा सदा नमस्कार.....


 श्लोक

  सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा । हम बुलबुलें हैं इसकी, वो गुलिस्ताँ हमारा || गुरबत में हो अगर हम, रहता है दिल वतन में । समझो वहीं हमें भी, दिल हो जहाँ हमारा ।। 

  - २३ जाना आमचा भारत देश साऱ्या जगात श्रेष्ठ आहे. तो आमचा बगीचा असून आम्ही त्या बगिच्यातील त्याची स्तुति स्त्रोत्रे मारे बु - महाकवी इक्वाल आहोत. आम्ही परदेशात गेलो तरी आमची अंतःकरणे आमच्या या मातृभूमितच राहतात आणि जिथे आमची अंत करने असतात, आम्ही सुध्दा तिथेच असतो.

चिंतन 

 खरा देव ओळखा व त्याचीच सेवा करा - भुकेल्यांना जेवण, तान्हेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब पलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध पंगू, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु-पक्षी मुक्या प्राण्यांना अभय विधवा - घटस्फोटीत आणि गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दुःखी व निराशांना हिंमत द्या. गोर-गरीब आदिवासी मुला-मुलींना शिक्षण हाच आजचा रोकडा धर्म आहे. हीच खरी भक्ती व देवपूजा आहे. बापहोऽऽआपल्या मुलाला शिक्षण द्या ! पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा, हतावर भाकरी खा, बायकोले लुगडं कमी भावाचे घ्या ।। पण मुलाले शाळेत घातल्याविना राहू नका... 

प्रार्थना

- असो तुला देवा माझा सदा नमस्कार.......


→ कथाकथन -

 'नेताजी सुभाषचंद्र बोस' नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे प्रख्यात वकील होते. सुभाषबाबू एक हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेले होते. कलकत्याला बी.ए. ची पदवी घेतल्या नंतर उडिलांच्या इच्छेनुसार ते आय.सी.एस. होण्यासाठी इंग्लंडला गेले. ही पदवी धारण केल्यानंतर सरकारी नोकरी करावी लागणार म्हणून ते सनद न देताच भारतात परतले. आणि राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. या चळवळीत त्यांना आठ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. सन १९३८ व १९३९ मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. परंतु महात्मा गांधीशी तात्विक मतभेद झाल्याने त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना केली. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात त्यांना इंग्रज सरकारने त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवले होते. परंतु देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास त्यांनी घेतलेला असल्याने ते गुप्तपणे तेथून निसटले व काबूलमार्गे जर्मनीला पोहोचले. इंग्रजांचा शत्रू हिटलर त्याचे म्हणावे असे सहाय्य न मिळाल्याने ते | पाणबुडीचा खडतर व धोकादायक प्रवास करून जपानला पोहोचले. जपान सरकारचे सहाय्य मिळवून त्यांनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी हंगामी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. जपानने युध्दबंदी केलेल्या ४० हजार भारतीय सैन्याची त्यांनी आझाद हिंद सेना उभारली व ब्रम्हदेशातील | आराकान टेकड्यांच्या मार्गाने या सेनेने आसामधील इम्फाळपर्यंत मजल मारली. तरीही ऑगस्ट १९४५ मध्ये जपानला दोस्त राष्ट्रांपुढे शरणागती पत्करावी लागली. जपान सरकारशी चर्चा करण्यासाठी सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमानाने निघाले असता फोर्मोसा बेटाजवळ त्यांच्या विमानाला अपघात झाला व त्यात त्यांचे निधन झाले. त्यांचे ब्रीदवाक्य 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा' हे होते. 

 

सुविचार -

 • कितीही संकटे आली तरी सन्मार्ग सोडीत नाही, तोच खरा पुरुष होय.


→ दिनविशेष

 राम गणेश गडकरी यांचा स्मृतिदिन १९१९. गडकरी यांचा जन्म गुजराथ राज्यातील नवसारी येथे इ.स. १८०० मध्ये झाला. गरिबी आणि संकटांचा सामना करीतच ते शिकले. मृत्यूच्या आधी रात्री दहा वाजता भावबंधन नाटकाचा शेवटचा प्रवेश लेखनिक पूर्ण केला. भावबंधन पूर्ण झाले आणि त्याच रात्री झोपेत त्यांना मृत्यू आला. गडकरी असामान्य प्रतिभेचे कलावंत होते. इंग्रजी, संस्कृत, मराठी ललित वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. काव्य, नाट्य, आणि विनोद या तीनही क्षेत्रात ते सारख्याच वैभवाने तळपले. राम गणेश गडकरी नावाने त्यांनी नाटके लिहिली. एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव, राजसंन्यास, प्रेमसन्यास ही त्यांची नाटके प्रसिध्द आहेत. 'बाळकराम रावाने त्यांनी कविता केल्या. त्यांचा काव्यसंग्रह 'वाग्ववेबंदी' या नावाने प्रसिध्द आहे. साहित्यक्षेत्रात अलौकिक कामगिरी करून त्याच्या वयाच्या चोतीसाव्या  वर्षी नागपूर जवळील सावनेर येथे त्यांची प्राणज्योत मालवली.

मूल्ये

 आदरभाव, श्रमनिष्ठा.

अन्य घटना 

• विजयनगरच्या साम्राज्याचा अंत - १५६५

.• शहाजीराजे भोसले यांचे निधन - १६६४

. • नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती - १८९७.

 → उपक्रम -

  • थोर महापुरुषांची चरित्रे वाचा. महापुरुष, संत, क्रांतिकारकांचे चित्रसंग्रह करा.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

 → समूहगान •-

  • राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम् ..... • नामवंत नाटककार - 


→ सामान्यज्ञान - 

• वसंत कानेटकर • पुरुषोत्तम दारव्हेकर • मामा वरेरकर • मराठी वाङ्मयाचे रचनाकार व त्यांच्या रचना. मोरेश्वर रामाजी पराडकर - आर्याभारत, मंत्ररामायण, केकावली, सीतागीते, मंत्र रुक्मिणीगीत, समश्लोकी गीता. • रघुनाथ पंडित - दमयंती स्वयंवर, गजेंद्रमोक्ष, रामदासवर्णन ही काव्ये. • मधुसूदन कालेलकर • खळो व्यास - - सह्याद्रिवर्णन • राजे दुसरे सरफोजी - गणेशलीलावर्णन, गणेशविजय, राधाकृष्णविलास, सुभद्रापरिणय, शिवरात्री उपाख्यान, ● राजे प्रतापसिंह - पार्वतीकल्याण, रुक्मिणीकल्याण, शाहीर रामजोशी रचना सुंदरा मनामधी भरली. • संत रामदास - • ग्रंथ रचना : दासबोध, 'सुंदरकांड' मनाचे श्लोक, करुणाष्टके, अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे इत्यादी स्कुटरचना. • वामनपंडित - यथार्थदीपिका, निगमसार, प्रियसुधा, द्वारकाविजय, सिद्धांतविजय, इ.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा