28 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
सुखी ठेवी सर्वास देवराया...
→ श्लोक -
अमर रहे गणतंत्र हमारा । भारत बने महान हमारा जिसमें भरा त्याग बलिदान । जो भारत माँ का अभिमान बलियोंसे यह गौरव - अन्वित । अपना है गणतंत्र हमारा प्राणोंसे हमको यह प्यारा । अमर रहे गणतंत्र हमारा.
आमचे प्रजासत्ताक राज्य अमर होवो आणि भारत देश महान बनो, हे प्रजासत्ताक भारत मातेला अभिमान वाटतो अशा असं देशभक्तांच्या त्यागातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून जन्मला आहे. असे हे महान प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आम्हाला हे आमच्या प्राणापेक्षा प्रिय आहे. हे प्रजासत्ताक अमर होवो.
→ चिंतन
सत्य झाकले जाईल पण मालवले कधीच जाणार नाही. सत्य हे सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी असते. प्रखर असते. इतरांनी सत्य नाहीसे करण्याचा प्रयत्न केला तरी ते नाहीसे होत नाही. फार क काही काळ लपविले जाते, पण एक ना एक दिवस ते समाजासमोर येतेच. निखाऱ्यावर राख साठली, तो राखेखाली झाकला गेला म्ह मालवला गेला असे नाही. फुंकरीने राखड इडताच त्याची दाहकता जाणवू लागते. तसेच सूर्य ढगाखाली म्हणजे तो मावळला असे होत नाही. ढग बाजूला होताच तो तेजाने तळपू लागतो. सत्याचेही तसेच आहे..
कथाकथन
'लाला लजपतराय (जन्म २८ जाने. १८६५, मृत्यू १७ नोव्हेंबर १९२८) पंजाबाचा सिंह म्हणून ओळखले जाणारे स्व नेते लाला यांचा जन्म पंजाबमधील जगराण (जिल्हा लुधियाना) या गावी लाला राधाकिशन व गुलाबदेवी या दापत्यांच्या प विशया आतच कायद्याची परीक्षा उत्तीर्ण करून ते लाहोरला वकिली करू लागले. स्वामी दयानंदाचे ते निष्ठावंत अनुयायी असल्यामुळे उभारावयाच्या दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजासाठी त्यांनी त्या काळी ५ लाख रूपये जमवून त्या कॉलेजचे काम पूर्ण केले. आर्य समाजाचे म्हणून ते अनाथ मुले, विधवा, भूकंपग्रस्त व दुष्काळग्रस्त लोकांच्या सहाय्याला धावून जात. १९०५ साली काँग्रेसने त्यांना इंग्लडमधील भ भारतीयांच्या न्याय्य मागण्यांची व ब्रिटिश सरकारने भारतात चालविलेल्या अत्याचारांची माहिती देण्यासाठी इंग्लंडला पाठविले. त्या वेळी खर्चासाठी दिलेले ३००० रुपये त्यांनी आर्य समाजाला देणगी म्हणून दिले व ते स्वतःच्या खर्चाने इंग्लंडला गेले. तिकडून परत आल्यावर पंज शेतकयांना सरकारविरुध्द इठवल्याच्या आरोपावरून त्यांना कारावासाच्या शिक्षेसाठी मंडालेस पाठविण्यात आले. सहा महिन्यांनी त्यांना | मुक्त केल्यावर ते परत लाहोरला आले पण त्यांच्या पाठीशी लागलेल्या सरकारी हेरांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते अमेरिकेस गेले व तिथे भारतीयामध्ये स्वदेशाच्या स्वातंत्र्याची लालसा निर्माण करण्यासाठी त्यांनी 'यंग इंडिया' हे वृत्तपत्र काढले. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी कमिशन' लाहोरला भेट द्यायला गेले असता त्याच्या निषेधार्थ हाती काळे झेंडे घेतलेल्या लोकांचा जो मोर्चा निघाला त्याचे नेतृत्व लालाजींनी के त्यात भयंकर लाठीमार बसल्याने लालाजी आजारी पडले व त्यातच त्यांचे निधन झाले. मॅझिनी, गॅरीबाल्डी, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज स्फूर्तीदायी चरित्रे जशी पंजाबी भाषेत लिहिली तशीच 'अॅनहॅपी इंडिया' 'ग इंडिया' वगैरेसारखी इंग्रजी पुस्तकेही त्यांनी लिहिली.. •
सुविचार -
• ज्ञानाचे श्रेष्ठत्व व मनाचे कर्तृत्व कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक असते. • थोर लोक नेहमी आपल्या बुध्दिचातुर्याचा → 1 फायदा लोकांना कसा देता येईल. याकडे लक्ष पुरवीत असतात. हेच त्यांचे थोरपण होय. • देशसेवेसाठी चंदनाप्रमाणे झिजणारा कीर्ती रुपाने अमर होतो.
→ दिनविशेष
पिखार ऑगस्टी जन्मदिन १८८४ - पिखार ऑगस्टी हा स्विस पदार्थविज्ञानबलूनमध्ये बसून उंच अंतराळात जाऊन वातावरणाच्या स्तरांचा अभ्यास याने केला. १९३१ मध्ये हा १५.७८१ मीटर्स उंचीपर्यंत गेला. १९ | १६.९४० मीटर्सची उंची गाठली. त्यानंतर १९४८ मध्ये बॉथिस्फिअर नावाच्या साधनाच्या मदतीने त्याने सागरतळाचा शोध घेतला. १९५४ स्ट्रीस्टी या नावाचे एक नवे बॅथिस्केप तयार केले. ते अमेरिकेच्या नौदलाने विकत घेतले. १९६० मध्ये पॅसिफिकमधील सर्वात खोल स्थान स्ट्रीस्टीच्या साहाय्याने हा समुद्रात सहा साडेसहा मैल खोलीपर्यंत जात असे, या संशोधनास त्याला जुळा भाऊ व मुलगा या दोघांची मदत होई. अ व सागराच्या पोटात शिरून उच्चांक स्थापणाऱ्या या शास्त्रज्ञाचे नाव मानवी इतिहासात प्रसिध्द आहे.
→ मूल्ये -
• राष्ट्रप्रेम, शुचिता, आदरभाव
→ अन्य घटना
• पंजाबसिंह लाला लजपतराय जन्मदिन - १८६५. भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल मेजर करिअप्पा यांचा जन्म १९००
• भारतीय शास्त्रज्ञ राजा रामण्णा जन्मदिन - १९२५
• संगीत नाटक अकादमीची स्थापना - १९५३.
• बंगलोर येथे एचएमटी घड्याळाचा कारखाना उघडला - १९६१.
→ उपक्रम
• सैन्य रचनेची माहिती सांगावी
. • पंजाबने देशाने दिलेले थोर क्रांतीकारक सांगावेत.
• समुद्रातील प्राणी, वनस्पती यांच्याबद्दल माहिती गोळा करावी. १-
समूहगान
• आम्ही बालक या देशाचे, शिकू धडे सारे विज्ञानाचे...
→ सामान्यज्ञान
• पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हवा भूपृष्ठाजवळच्या भागात जास्त प्रमाणात एकवटलेली असते. वातावरणातील एकूण सुमारे ९९ टक्के हवा भूपृष्ठापासून ३० किलोमीटर उंचीच्या भागात एकत्र झालेली असते
. • जगातला उत्तम कागद सूचीपर्णी जंगलातील झाडे व बांबू यापासून बनविण्याची पध्दत आहे. गुळगुळीत, सुंदर आकर्षक कागद हा यांपासून यासारखी खास बने जोपासून त्यांची योग्य छाटणी करणे व पुन्हा लागवडे करणे हा प्रकार अवलंबिला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा