3 जानेवारी-दैनंदिन शालेय परिपाठ
बालिकादिन-सावित्रीबाई फुले जयंती
प्रार्थना
- ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय...
-
• श्लोक
• - जग बैरी कोई नहिं, जो मन शीतल होय । यह आपा तो डाल दे, दया करे सब कोय ।। - मान स्वच्छ असेल तर या जगात तुम्हाला शत्रू भेटणार नाही, प्रथम तुम्ही अहंकार सोडा. सर्वांवर दया करा, हाच खरा मानव धर्म आहे. संत कबीर
चिंतन
- विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून. तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन - सावित्रीबाई फुले विद्या किंवा ज्ञान हे सर्व धनामध्ये श्रेष्ठ असे धन आहे. आपल्याजवळचे इतर धन नष्ट होण्याची भीती असते, पण विद्याधन कधीच नाहीसे होत नाही. उलट इतरांना दिल्याने ते वाढते. व्यास, वाल्मिकींना आजही गौरविले जाते ते त्यांच्या ज्ञानसाधनेमुळे, विद्वतेमुळे, ज्ञानानेच स्वतःची, समाजाची आणि देशाची प्रगती होते. प्राचीन भारत हा ज्ञानोपासनेमुळे वैभवशाली होता.
देशाची प्रगती होते. प्राचीन भारत हा ज्ञानोपासनेमुळे वैभवशाली होता..
बालिकादिन-सावित्रीबाई फुले जयंती
कथाकथन
- 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' (जन्म ३ जाने. १८३१, मृत्यू १० मार्च १८९७) : महाराष्ट्रातील महान समाजसुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणांच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण व दलितोद्धाराचे कार्य सणान्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले ह्या सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या. लग्न झाले तेव्हा त्या पूर्ण निरक्षर होत्या. पण लग्न झाल्यावर त्यांनी ज्योतिबांकडून आवश्यक ते शिक्षण घेतले. सन १८४८ साली ज्योतिबांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलींना शिकवायचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना. तेव्हा | सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या. बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समजत असत, सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल वगैरे फेकीत, पण सावित्रीबाईंनी या सर्व छळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले.
ज्योतिबांचे जुन्या विचारांचे वडील - कर्मठ लोकांनी त्यांचे कान फुंकल्यामुळे बिथरले आणि त्यांनी ज्योतिबांना घराबाहेर घालवून दिले. त्या प्रसंगीही पतीच्या मागे त्या खंबीरपणे इभ्या राहिल्या व त्यांच्याबरोबर त्याही घराबाहेर पडल्या. पुढे त्या काळी 'अस्पृश्य' मानण्यात येणाऱ्या जातीतील मुलांसाठीही ज्योतिबांनी शाळा काढली आणि त्यांनाही शिकवण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी जीव ओतून पार पाडली. पुढे फसलेल्या विधवांना आत्महत्येपासून किंवा अपत्यहत्येपासून वाचविण्यासाठी ज्योतिबांनी आपल्या घरात 'बालहत्या प्रतिबंधगृह' काढले. तेव्हा अशा तीस-पस्तीस स्त्रियांना आईची माया देऊन त्यांची बाळंतपणे सुद्धा त्या माऊलीने केली. इतर जातीच्या लोकांची गोष्ट तर सोडूनच द्या.
पण ज्या माळी जातीत ज्योतिबा व सावित्रीबाई यांचा जन्म झाला होता. ते लोकही त्या दोघांचा 'धर्म बुडवे' म्हणून इल्लेख करु लागले. तरीही सावित्रीबाईंचे मन कधी विचलित झाले नाही. भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. पण, हे सर्व त्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या, तर त्या कार्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. म्हणून पतिनिधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे 'समता आंदोलन' पुढे चालू ठेवले. त्या कविताही करीत. १८५४ साली त्यांचा 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. 'मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी' नावाचे पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. १८९२ मध्ये 'बावनकशी सुबोध रत्नाकर' व ज्योतिबांची भाषणे या पुस्तकांचेही त्यांनी संपादन केले.
→ सुविचार
• स्त्री पुरुषांमध्ये निवड नसावी । गुणे आदरावी सर्वकाळ • माता ही प्रथम स्त्री आहे. आणि एक स्त्री म्हणून तिचा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे. • मुलांच्या शिक्षणापेक्षा मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या. कारण एक मुलगी शिकली तर तिच्याद्वारा एक कुटुंब सुशिक्षित होते. कमी वेळात व कमी खर्चात राष्ट्र शिक्षित करण्याचा हा खात्रीलायक इपाय आहे. - नेपोलियन बोनापार्ट
• स्त्रियांमध्ये स्वत्वजाणीव, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास जागविण्यासाठी शिक्षण हाच पर्याय आहे. • देशाची प्रगती, विकास हे सारं करायचं असेल तर स्त्रियांना शिक्षण मिळायलाच हवं, अन्यायाविरूद्ध
बालिकादिन-सावित्रीबाई फुले जयंती
दिनविशेष -
बालिकादिन :
सावित्रीबाई फुले जन्मदिन - १८३१ : शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी घराचा उंबरठा ओलांडणारी महाराष्ट्रातील पहिली स्त्री सावित्रीबाई फुले. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३२ त्यांचा विवाह जोतीराव फुल्यांशी झाला. फुल्यांना शिक्षणाची आवड होती. विवाहानंतर जोतीरावांनी त्यांना शिकविले. प्रारंभीचे धडे त्यांनी आपल्या मळ्यात धूळपाटीवर गिरविले, त्यांनी काही कविताही केल्या होत्या. १८४८ साली पुण्यात जोतीरावांनी दलितांसाठीही शाळा काढल्यात्यात सावित्रीबाईंचा मोठा वाटा होता. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना जननिंदा सोसावी लागली. त्याकडे दुर्लक्ष करून अता नाहीशी करण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. त्यांच्या घरी जातिभेद पाळीत नसत. अनौरस व टाकून दिलेल्या अनाथ मुलांना सांभाळण्यात जोतीबा फुल्यांना त्यांची मोलाची मदत झाली. १८७६-७७ साली महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळात जोतीरावांच्या बरोबरीने त्यांनी काम केले होते. १८९७ साली पुण्यात प्लेगची साथ होती. त्यात लोकसेवा करता करताच त्यांनाही प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ रोजी त्यांचा देहान्त झाला ३ जानेवारी १९९५ | पासून
→ मूल्ये
समता, श्रमनिष्ठा, भूतदया -
→ अन्य घटना
म. गांधीजींनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गोलमेज परिषदेत केली १९३१. इद्घाटन १९५०
• भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या- १९५२. • पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोग
• सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले १९५८.
• मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्थेचे प्रमुख संस्थापक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन - १९९४
• बालिका दिन व अँक्युप्रेशर थेरपी दिन
→ उपक्रम -
• स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईनी केलेल्या संघर्षावर कथाकथन करा.
• सावित्रीबाई फुल्यांना मुलींची शाळा चालविताना आलेले अनुभव सांगा.
→ समूहगान
• बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो
→ सामान्यज्ञान
• सावित्रीबाई फुले यांची लेखन संपत्ती - काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह. याशिवाय भाषणे, निबंध | आणि गाणी. जोतीराव फुल्यांच्या भाषणांचे संपादन. • ताऱ्यांपासून जो प्रकाश येतो तो हवेच्या निरनिराळ्या थरातून येतो. हे हवेचे थर स्थिर नसतात. त्यामुळे तारे चमकताना दिसतात.
****************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा