7 जानेवारी--दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो....
श्लोक -
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे । जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित । तया जाऊनि इठवावे, जगाला प्रेम अर्पावे ।। - साने गुरुजी
जगातील सर्व लोकांवर प्रेम करणे, हाच खरा धर्म होय. समाजाने ज्या लोकांना कमी प्रतीचे लेखले आहे, जे लोक गरीब आहेत, ज्या लोकांना समाजाने तुडविलेले आहे, त्या लोकांना दिलासा द्यावा व साह्य करावे.
→ चिंतन
- जगात सज्जन आणि दुर्जन दोन्ही प्रकारचे लोक असतात. दोघंही जगतात, परंतु दोघांत फरक फक्त इतकाच की सज्जन दुसऱ्यांना हसवून आणि दुर्जन दुसऱ्यांना रडवून जगतो. दोघंही जेव्हा हे जग सोडून जातात, तेव्हा सज्जन हे लोकांना रडवून आणि दुर्जन हे हसवून जातात. असे जीवन जगा की, जेव्हा तुम्ही हे जग सोडून जाल, तेव्हा लोक रडतील. तुमची आठवण ठेवतील, असं जीवन जगू नका की लोक म्हणतील, 'बरं झालं एक पाप कमी झालं!' हे जग सोडताना लोकांच्या मनात मधुर स्मृती आणि डोळ्यात प्रेमाचे अश्रू ठेवून जा..
कथाकथन
- ''मरणाची भिती' -
धनपती सावकार म्हणजे पृथ्वीमघा कुमेर । त्याने परदेशांशी व्यापार करून अगणित संपती मिळविली राज यासारखा भव्य महाल बांधला. दरवाजावर गजान्त लक्ष्मी डोलू लागली. वैभव आणि आपल्या परिवारात त्याचे जीवन सुखात जाऊ लागले आणि एक दिवस शेजारच्या गावातून त्याचा पाहुणा आला. त्याच्याशी गप्पा गोष्टी सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात पाहुना मलाला की त्यांच्या गावातील मरसेट नुकताच मरण पावला. कोट्यावधी रूपयाची त्याची संपत्ती मागे राहिली आहे. आता त्याचा काही योग नाही. सह हे बोलून गेला. पण धनपतीला तो मोठाच धक्का बसला. त्या नगरसेठाप्रमाणे "आपणही एक दिवस मरणार आहोत", या विचारानेच हो पाता त्याला सतत आपल्या मरणाचे भय वाटू लागले. आपल्या मरणानंतर हे सारे इथेच राहणार आहे. त्याला खाणे-पिणे सुचेना. रात्री सुखाची ना या मरणाच्या चितेने तो मनात शुरू लागला, तसं पाहिलं तर त्याला जीवनात काहीच कमी नव्हते. पण मनातील हे दुःख तो कोणाला सांगूही शकत नव्हता अखेर तो आजारी पडला, अनेक वैद्य, हकीम, धन्वंतरी झाले. पण त्याचा रोग कमी होण्याऐवजी बळावतच चालला. एक दिवस एक साधु त्याच्या घरी आला. धनपतीने त्याच्या पायावर लोटांगणच घातले. त्याच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या साधुने त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. धनपतीने त्याला आपल्या मनातील दुःख सांगितले. ते ऐकून साधू मनापासून हसला व म्हणाला, "या दुःखद रोगावर अतिशय साधा इसचार आहे. तू एकच गोष्ट कर. " साधू म्हणाला, "काय करू?" धनपतीने मोठ्या उत्सुकतेने विचारले. "फार सोपा उपाय आहे. "तो कोणता?" साधु म्हणाला, 'हे पहा! जेव्हा जेव्हा मनात मरणाचा विचार येईल तेव्हा मोठ्याने म्हण की जोपर्यंत मरण येणार नाही तोपर्यंत मी जिवंत राहणार आहे. "या मंत्राचा सतत सात दिवस जप कर. ही तुझी तपस्या आहे. मी सात दिवसांनी परत तुला भेटायला येईन." सात दिवसांनी साधु त्याला भेटायला आला. तेव्हा त्यांचा रोग पार पळून गेला होता. तो ठणठणीत बरा झाला होता. तो म्हणाला, "महाराज! तुम्ही मला मृत्यूच्या मुखातून वाचविलेत. आपल्या मंत्राने जादूसारखा चमत्कार केला. मी मनात पक्के समजून चुकलो की जेव्हा मरण येईल तेव्हाच मी मरणार. त्याच्या अगोदर मी मरणार नाही. मग काळजी कशाला?" साधु म्हणाला, "या जगात सर्वांनाच मोठे भय वाटते ते मरणाचे. ज्याला जन्म आहे त्याचे मरण निश्चित ठरलेले आहे. त्या क्षणापर्यंत तो जगणारच असतो. पण मरणाच्या भीतीनेच आपले जीवन दुःखी करतात, असे लोक अगोदरच भीतीने मरतात. " मिल्टन हा थोर कवी म्हणतो, मरण ही एक सोन्याची चावी आहे. भावी सुखी, समाधानी व शांत जीवनाची खोली फक्त याच चावीने उघडता येते. व अपरिहार्य आहे, अटळ आहे ते चुकविण्यात काही अर्थ नसतो. ते घडणारच, तसेच मरणाचेही असते. ते कुणालाच चुकणार नाही. येशूने स्वतःच मरण्याचा आदर्श निर्माण केला. त्याने मरणाचा सूळ आपल्या खांद्यावरून वाहिला व साऱ्या ख्रिस्ती अनुयायांचे मरणाचे भयच त्याने दूर केले.
सुविचार
• मृत्यू हा अटळ आहे. कोणीही अमृत पिऊन आलेले नाही, फरक एवढाच की कोणी लवकर मरते कोणी उशीरा. • कोण किती वर्षे जगला त्यापेक्षा तो कसा जगला, हे महत्वाचे आहे.
दिनविशेष
• गॅलिलिओने 'गुरू' या ग्रहाचा शोध लावला. - १६१०. प्रायोगिक विज्ञानाचा पाया घालणान्या गॅलिलिओ या शास्त्रज्ञाचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ मध्ये इटली या देशातील 'पिसा' या शहरी झाला. लहानपणीच हा कसली ना कसली उपकरणे बनवायचा, लहान लहान खुबीदार खेळणी तयार करायचा. त्याने 'लंबकाच्या साहाय्याने काळाची मोजणी करता येते' हा पहिला शोध लावला. पूर्वी पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्याभोवती फिरतो अशी कल्पना होती. परंतु कोपर्निकस या शास्त्रज्ञाने पृथ्वीच सूर्याभोवती फिरत असली पाहिजे, अशी शंका व्यक्त केली होती. गॅलिलिओची याबाबत खात्री झाली. त्याने तसे पुरावे गोळा करून पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे ठासून सांगितले. त्याचा परिणाम, त्याला विद्यापीठातून काढून टाकले आणि वाळीत टाकले. त्याच्या पुस्तकावर बंदी घातली. इ.स. १६०९ मध्ये त्याने स्वतः काचा तयार करून दुर्बीण बनविली. त्याने 'गुरू' ग्रहाचा शोध ७ जानेवारी, १६१० रोजी लावला. चंद्राचा पृष्ठभाग गुळगुळीत नाही; त्यावर पर्वत, दन्या, खोरी आहेत हा शोध त्यानेच लावला. गॅलिलिओचा मृत्यू ८ जानेवारी १६४८ रोजी झाला.
मूल्ये -
• विज्ञाननिष्ठा, श्रमनिष्ठा
→ अन्य घटना
• महंमद गझनीची सोरटी सोमनाथवर स्वारी १०२४ • संत बंका महारांचे निधन - १३१९ - • डॉ. सरोजिनी देवी बाबर याचा जन्म १९२२ • भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना काँग्रेस डिक्टेटर म्हणून कैद करण्यात आली. १९३२. • विश्वनाथ आनंद यास बुद्धीबळ चैंपियनशिपचा 'ग्रैंड मास्टर' हा दर्जा सन १९९२ मध्ये मिळाला. -
→ उपक्रम
• रात्री आकाशदर्शनाच्या कार्यक्रमातून ग्रह-ताऱ्यांची माहिती द्यावी.
समूहगान -
• धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं...
→ सामान्यज्ञान -
• भारतातील वेधशाळा : • पुणे • अलीपूर • कलकत्ता • आग्रा कुलाबा • मुंबई • कोडाईकॅनाल • मद्रास • जयपुर • उज्जैन • औरंगाबाद • राजकोट.
● गुरु हा सूर्यकुलातील सूर्यापासून क्रमाने पाचवा पण सर्वात मोठा ग्रह आहे. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्याला ११ वर्षे ३१५ दिवस म्हणजे सुमारे १२ वर्षे लागतात.
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा