Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

9 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

9 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ




*👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

प्रार्थना 

- खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.... 

→ श्लोक

 - सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजती सकल । तयां जाऊनि हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ।। - साने गुरूजी 

 - जे लोक सतत दुःखी असतात, दीन-दुबळे असतात; ज्यांना समाजातील लोक त्रास देत असतात, ते लोक प्रसन्न राहतील, अशी वागणूक त्यांना द्यावी. हाच खरा धर्म आहे. 

• चिंतन 

• यत्न तो देव जाणावा. एखादे कार्य उत्तम होण्यासाठी योग्य रीतीने, सातत्याने दीर्घ प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे चांगल्या गोष्टी साध्य करता येतात. शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयत्नांनी मानवी जीवनात कितीतरी सुख निर्माण केले आहे. फार पूर्वी माणसाला कोणतीही गोष्ट करताना त्रास व्हायचा, यातना सोसाव्या लागायच्या. अनेक शास्त्रीय शोधांनी माणसाच्या जीवनाचे नंदनवन बनविले आहे.

कथाकथन

 - 'करुणासागर हवा आहे' - भारतात अनेक प्रकारे देवाची उपासना केली जात असे. कोणी भगवान सूर्यनारायणाची उपासना करी. देव प्रसन्न होत व वरदान देत. कोणी वरुणाचा इपासक, कोणी अग्रीचा इपासक, कोणी इंद्राचा तर कोणी चंद्राचा. अशा रीतीने उपासना करून स्वर्गप्राप्ती होई. स्वर्गात देव राहतात. अप्सरांचा नाच पाहतात. सोमरस अमृतासारखी पेये पितात. कामधेनू आहे. कल्पवृक्ष आहे. स्वर्गात सुख, अमन, र आहे. स्वर्गाविषयी लोकांच्या अशा अनेक कल्पना, कोणी ज्ञानमार्ग ही उपासना सांगतो. कोणी कर्मयोग्याची शिकवण देतो. कोणी भक्तीमार्ग दुखवितो. स्वर्गाचे प्रलोभन हे सर्वांनाच मोठे आकर्षण वाटते. असाच एक संत स्वर्गात गेला. देवदूतांनी त्याचे स्वागत केले. दुसरे अनेक संत तिथे होते. त्यांच्या डोक्यावर मुकुट शोभत होते. कुणाच्या डोक्यावर हिरे-माणकांचा, कुणाच्या डोक्यावर नीलमणी. फिरोजा. कुणाच्या डोक्यावर युरेनियमचा या या संताला फक्त सोन्याचा मुकुट देवदूताने दिला. संताने देवदूताला विचारले, "अरे हे काय? इथंही पक्षपात? अन्याय? आश्चर्य आहे!” तो म्हणाला. देवदूत म्हणाला, "कोणता अन्याय?" इथ काहीजणांना हिरे-माणकांचे, काही जणांना पाचू, नीलमणी, फिरोजा अशा मूल्यवान रत्नाचे स्कूट. पण मला मात्र फक्त सोन्याचा मुकुट?" "महाराज! हे पृथ्वीवरील अश्रू आहेत. स्वर्गात अश्रूंचे मोती मिळतात. 'दया' धर्म का मूल है । गरीबांच्या झोपडीत राहून ज्यांनी त्यांची सेवा केली. भुकेल्या प्राण्यांना स्वतः इपाशी राहून खायला दिले. कोडी-अपंग माणसांच्या जखमा धुतल्या. बृद्ध माता-पित्यांची निरपेक्ष भावनेने सेवा केली. जखमी माणसांच्या जखमा धूवून औषध लावले. कुत्री, मांजरे, गाय, बैल. यासारख्या मूक जनावरांना खाऊ घातले, पाणी दिले, दुःखी प्राण्यांचे दुःख पाहून ज्यांच्या डोळ्यात अश्रू इभे राहिले. अनाथ पोरक्या मुलांना पोटाशी धरून कुरवाळले. दासांना आणि पुत्रांना समान वागणूक दिली. रंजल्या गांजल्या माणसांना प्रेमाने पोटाशी धरले. अशा प्रकाराने ज्यांनी मानवाची व प्राणीमात्रांची सेवा केली अशा दयाळू माणसांना स्वर्गात स्थान मिळते. तिथे धरतीवरील अशा दया भावनेने जे अश्रू ओघळतात त्यांना स्वर्गात रत्नांचे रुप मिळते व ते अश्रूच त्यांना रत्नरुपाने परत मिळतात. पोप पॉल सहावे यांनी मदर तेरेसाला बोलावले व तिला आणि तिच्या मदतगार सेविकांना म्हणाले, "रोममधील झोपडपट्टीत जाऊन तुम्ही त्या स्वच्छ करण्याचे काम करा" इथं आम्ही अनेकजणी अशाच कामाशिवाय आहोत त्याच काय?" असे असेल तर काम कुठे कुठे करायचे ते मी दाखविते. मदर तेरेसा म्हणाली खरं म्हणजे भारतात सेवेच एवढ प्रचंड काम पडलं की इथे 'बेरोजगारी' हा शब्द निरर्थक ठरतो. नोकरी नाही म्हणून वणवण हिंडत बसू नका. सेवेच्या वाटांवर तुमची वाट पाहणारे अनेक धनिक उभे आहेत. त्यांना नोकर नको आहेत. सेवक हवे आहेत. डोळे दिले आहेत. दयाई दृष्टीने पहा. हात दिले आहेत, काम करा. कान दिले आहेत, संतांच्या कथा ऐका. तोंड दिले आहे, मधुर बोला.

. सुविचार

• प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री असेल तरच विद्येचा इपयोग आहे.' • जे प्राप्त झाल्यावर मनुष्य विनम्र, परोपकारी, सेवाभावी आणि कार्यतत्पर होतो, तेच खरे इच्च शिक्षण.

 → दिनविशेष

  • हात हरकामी, बुद्धी सर्वगामी व हृदय सर्वप्रेमी असावे. • माझ्या माणसांना मासे नको, जाळे द्या - डॉ. आंबेडकर • हरगोविंद खुराना यांचा जन्मदिन - १९२२. हरगोविंद खुराना हे मूळचे भारतीय. त्यांचा जन्म रायपूर (पाकिस्तान) येथे दि. ९ जानेवारी १९२२ रोजी झाला. १९४५ साली रसायनशास्त्र हा विषय घेऊन ते पंजाब विद्यापीठातून एम.एस्सी. झाले. १९४८ साली लहरपुर (इंग्लंड) येथे संशोधन करुन त्यांनी पीएच. डी. ही पदवी संपादन केली. त्यांनी अनेक विद्यापीठातून रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. १९६६ साली त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले. रेण्वीय जीवशास्त्रात केलेल्या त्यांच्या संशोधनामुळे आनुवंशिकतेतील रहस्यांवर खूपच प्रकाश पडला आहे. शरीरक्रिया विज्ञान व मानवी वैद्यक या विषयांचे १९६८ सालचे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले. भारत सरकारनेही त्यांना १९६३ साली 'पदमभूषण' हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. खुराना यांना १९६९ च्या जून महिन्यात निर्जीव रसायनापासून प्रयोगशाळेत जनुक बनविण्यात यश मिळाले. जनुकातील महत्त्वाचा भाग म्हणजे डी.एन.ए. होय. त्यांच्या संशोधनकार्याचा उपयोग शरीरातून आनुवंशिक रोगांचे उच्चाटन होण्यास होऊ शकेल. 

→ मूल्ये

 विज्ञाननिष्ठा, श्रमनिष्ठा. 

→ अन्य घटना

 • क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांस जन्मठेपेची शिक्षा १८८०. • म. गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत - आले - १९१५० सत्येंद्रनाथ टागोर स्मृतीदिन - १९२३.० प्रसिद्ध इद्योगपती रामकृष्ण रामनारायण रुईया यांचा जन्म - १९१६ गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलन डॉ आंबेडकरांची नेमणूक - १९४२. गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलवर डॉ. आंबेडकरांची नेमणूक १९४

 → उपक्रम 

 - • विज्ञानाशी संबंधित अशा प्रदर्शनाला, संग्रहालयाला, विज्ञान केंद्रांना भेटी द्याव्यात, त्यांची माहिती गोळा करावी. • वैज्ञानिक व त्यांनी लावलेले शोध यांची यादी करावी. • 

→ समूहगान 

• जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता

 सामान्यज्ञान

भारतातील नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक

• डॉ. हरगोविंद खुराना औषधविज्ञान - १९६८ 

• डॉ. चंद्रशेखर सुब्रह्मण्यम् पदार्थविज्ञान १९८३ - यांच्या

 • सर चंद्रशेखर व्यंकट रामण पदार्थविज्ञान 

**************************************

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा