१3 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना -
नमस्कार माझा ज्ञानमंदिरा, सत्यम् शिवम् सुंदरा....
श्लोक -
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः । शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः ।।
ज्याने आपले मन जिंकले आहे, जो अत्यंत शांत आहे तोच जीव परमात्मारूप बनतो, शीत-उष्ण, सुख-दुःख, मान-अपमान प्राप्त झाल्यावर जो निश्चल असतो तोच परमात्मरूपी.
→ चिंतन- स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. श्री मद्भगवद्गीता. स्वतंत्रता ही व्यक्ती, समाज, देश या साऱ्यांच्या विकासासाठी अनिवार्य आहे. स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी प्राणाची आहुती लागते हे आपल्या देशास स्वंतत्र्य मिळाल्यानंतर देशावर आलेल्या परकीय आक्रमणाचे वेळी भारतीय सैन्यदलाने आपल्या अतुलनीय पराक्रमाने हजारो जवानांच्या बलिदानाने दाखवून दिले आहे. व्यक्तीला आपले विचार मुक्तपणे प्रकट करण्याचे व आपले अधिकार आणि हक्क उपभोगाय पूर्ण स्वातंत्र्य लोकशाहीत आहे. मात्र स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्यात हक्काच्या जाणिवेबरोबरच स्वतःवरील जबाबदारीची जा असणे आवश्यक आहे.
कथाकथन
संतांचा उपदेश': एका चोराचा मृत्यूकाळ जवळ आला. त्याने आपल्या मुलाला चोरी कशी करायची याची | शिकविली. जाता जाता त्याने मुलाला सांगितले की, 'तू चुकूनही कोणत्या संताचा उपदेश ऐकू नको. जर अशी वेळ आलीच तर दोन्ही - | आपली बोटे टाकशील, त्यानंतर चोरानेत्यानंतर चोराने आपले शरीर सोडले. चोराचा मुलगा चोरी करण्याची कला अंमलात आणू लागला. मोठ्या मोठ्या करण्यात तो वाकबगार झाला. एकदा रस्त्याने जात असता एका झाडाखाली एक संत लोकांना उपदेश देत असताना दिसला. त्याला पाहून चोर कानात बोटे घालून पळू ला अचानक ठोकर लागून तो खाली पडला. त्याची हाताची बोटे कानातून निघाली. कान मोकळे झालेत. तेव्हा संताचे वाक्य त्याला ऐकू आले 'मनुष्यांच्या शरीराची सावली पडते, परंतु देवतांच्या शरीराची सावली कधी पडत नाही.' काही दिवसानंतर त्याने एक मोठी चोरी केली. पोलिसाला त्याच्यावर शंका आली. चोर चोरी कबूल करणार नाही म्हणून पोलिस देवतांचा ड्रेस घालून चोराच्या घरी गेला. त्याला बोलावून म 'तू इतकी मोठी चोरी केली, परंतु मला भेट चढविली नाहीस.' चोर देवतांच्या पाया पडला. तेव्हा त्याची नजर त्याच्या सावलीवर गेली. त्याला उपदेश आठवला की, देवतांची सावली कधी पडत नाही ! त्याने मनातल्या मनात विचार केला की हा काही खरा देव नाही दुसराच कोणीतरी त्याने उभे होऊन म्हटले. 'कोणती चोरी? कोणती भेट? मी कोणती चोरी केलेली नाही.' तेव्हा देवता स्वरूप धारण केलेला पोलीस बुचकाळ्य पडला. तो चुपचाप तेथून निघून गेला. त्यानंतर चोराने संताच्या उपदेशाच्या एका वावराने माझं इतकं भले झाले तर मी त्यांचा पूर्ण उपदेशच ऐक | असता तर माझं जीवनच बदलून गेलं असतं. तो चोर संताजवळ जावून विनंती करू लागला की, मला आपले उर्वरित आयुष्य चोरीचा धंदा स आपल्या सेवेत घालवायचे आहे. मला तशी संधी द्या. आपल्या सेवेने मी माझ्या पापाचे प्रायश्चित करू शकेन. संताने त्याच्या विनंतीला स्वीक त्याला दीक्षा देण्याचे मान्य केले.
सुविचार
• उत्तम सौंदर्य म्हणजे मनाचे पावित्र्यसबके होठों पर यही पैगाम आना चाहिये। आदमी को आदमी के काम आना चाहिये
दिनविशेष
सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन १८७९ : सरोजिनी नायडू हया भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रभावी कार्यकर्त्यां | वक्त्या व कवयित्री होत्या. वडील अधोरनाथ चट्टोपाध्याय एक शिक्षणतज्ज्ञ होते. वयाच्या बाराव्या वर्षी सरोजिनी मद्रास इलाख्यात मंदि पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर निजामाची छात्रवृत्ती घेऊन उच्च शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभूमीकडे परतावे लागले. त्या लहानपणापासूनच कविता करीत असत. इंग्लडमध्ये एडमंड गॉस या साहित्यिकाच्या प्रेरणेने त्यांच्या इंग्रजी कवि संग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या सुंदर कवितांमुळे त्यांना प्रसिध्दी मिळाली. लोक त्यांना 'भारतीय कोकिळा' म्हणू लागले. श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंञ्य बाद यांच्या त्या जहाल पुरस्कर्त्या होत्या. काँग्रेसच्या व गांधींच्या प्रत्येक चळवळीत त्यांचा सहभाग असे. हिंदू-मुसलमान ऐक्य, स्त्रियांना बो हक्क व स्वातंत्र्य हे त्यांचे जीवितकार्य झाले. त्या उत्तरप्रदेशच्या पहिल्या राज्यपाल होत्या.
मूल्ये -
• श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रप्रेम, स्वाधीनता, कर्तव्यदक्षता
→ अन्य घटना -
• बा. सी. बेंद्रे यांचा जन्मदिन - १८९४
• मराठी रंगभूमीवरील श्रेष्ठ गायक व नट भाऊराव कोल्हटकर यांचा मृत्यू - १९०१ प्रख्यात शरीरशास्त्रज्ञ जसवंतसिंग यांचे निधन - १९७७. इतिहासकार बा. सी. बेंद्रे यांचा जन्म - १८९४.
→ उपक्रम -
देशभक्तीपूर्ण गीत म्हणवून घेणे.
• सरोजिनी नायडू यांच्या कविता मिळवून तिचे मराठीमधून रसग्रहण मुलांना ऐकविणे.
→ समूहगान
• ह्या भूमीचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान...
→ सामान्यज्ञान
• भारतातील प्रसिध्द लेखिका व त्यांची प्रसिध्द पुस्तके
• अमृता प्रीतम - कागजके कानवास
• महादेवी वर्मा - यम • इरावती कर्वे - युगान्त
सरोजिनी नायडू - ब्रोकन विंग्ज
• दुर्गा भागवत - ऋतुचक्र
• लक्ष्मीबाई टिळक - स्मृतिचित्रे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा