Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

14 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

         १4 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो


→ श्लोक

 - सुहन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ।। 

 - हितचिंतक, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, अप्रिय, नातलग तसेच सज्जन, पापी या सर्वांना समान मानणारा सर्वांत श्रेष्ठ योगी होय - श्रीमद्भगवद्गीता



. → चिंत

- आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे. आत्मविश्वास हा व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य देतो. सर्व अडचणीतून मार्ग काढायला शिकवितो. ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी जी साधने लागतात ती प्राप्त करण्याचे सामर्थ्य देतो. शास्त्रज्ञांच्या संशोधनात, चित्रकारांच्या रंगांच्या फटकान्यात, साहित्यकांच्या लेखणीत असा आत्मविश्वास असतो म्हणून त्यांच्या हातून अलौकिक असे काही घडू शकते.

कथाकथन -

 ‘निश्चयाचे बळ ': छत्रपती शिवाजी राजांना लहानपणी माता जिजाऊंनी रामायणातील, महाभारतातील कथा सांगितल्या. शूरवीर, धर्मसंस्थापक, स्वराज्य संस्थापक महापुरूष व्हावे ही इच्छा त्यांच्या मनात लहानपणीच रूजली. त्या वेळेचे शूर मराठे वीर हे सर्व मुसलमानी किंवा मोगली बादशहांकडे सरदार बनून गुलामगिरीचे जीवन स्वतः जगून लोकांनाही तसेच गुलामगिरीत ठेवण्याचे कार्य करीत असलेले त्यांनी पाहिले. प्रत्यक्ष आपले वडील शहाजीराजे, आपले मातामह (आजे) लखुजी जाधव मुस्लिम सुलतानांची गुलामगिरी करण्यात धन्यता मानत होते. ते पाहून शिवाजींचे मन अत्यंत व्यथित झाले. त्यांनी बालपणीच हिंदवी स्वराज्य स्थापण्याचा निश्चय केला. तो दृढ संकल्प होता, तो सत्यसंकल्प होता. स्वराज्य संस्थापनेचा दृढ निश्चय, सत्य संकल्प पूर्ण व्हावा म्हणून महान् खटाटोप केला. शेतकरी मावळ्यांच्या मुलांना लष्करी शिक्षण देऊन त्यांचं सैन्य उभं केलं. त्यांच्या मनात हे स्वराज्य स्थापण्यासाठी प्राणार्पण करण्याची तीव्र इच्छा निर्माण केली. आपला निश्चय, संकल्प आपल्या रक्ताच्या अभिषेकाने मावळ्या मित्रांसह केला आणि एक एक किल्ला गड घेत प्रथम छोटं राज्य, स्वराज्य स्थापलं. मग मुसलमानी राजांशी, मोगली बादशहाशी मुकाबला करीत महाराष्ट्राचे स्वतंत्र्य राज्य निर्माण केलं आणि स्वतःला स्वतंत्र राजा म्हणून उद्घोषित करण्यासाठी राज्यभिषेक करवून घेतला. निश्चय पक्का आणि पवित्र असेल तर तो पूर्ण करण्याची पराकाष्ठा करावी लागते, संकटे व अडथळ्यांशी लढून त्यावर मात करावी लागते. हे प्रयत्न अखंडित, मित्र सवंगड्यांचे साह्य घेऊन, शत्रूंना पराभूत तो निश्चय प्रत्यक्षात आणावा लागतो. हे बळ हे सामर्थ्य त्या दृढ निश्चयातच असते. हेच शिवाजी महाराजांचे चरित्र आपणास सांगते.


सुविचार -

 ● उठा, जागे व्हा, ज्ञान प्राप्त करा, असे समजू नका की तुम्ही दुर्बल आहात. - स्वामी विवेकानंद. • आत्मविश्वास व निश्चय हे वीरत्वाचे सार आहे. 

 

• दिनविशेष - - 

• बुक्कराव स्मृतिदिन १३७८ : भारतातील समृध्द, सुखी व बलाढ्य राज्यांपैकी एक म्हणजे विजयनगर, साहित्य, कला, विद्या आदिंचा विकास या राज्यात झाला. कारण शूर, रसिक, ज्ञानी, कर्तबगार व प्रजाहितदक्ष राजांनी या विकासाला हातभार लावला. त्यांच्यापैकी एक नाव बुक्क. संगम राजाला पाच मुले होती. पैकी मोठा हरिहर राजा असताना बुक्क हा गुत्तीचा किल्लेदार होता. त्याने होयसळांचे राज्य जिंकले व तो राज्यपाल झाला. हरिहर निपुत्रिक वारल्यावर बुक्क राजा झाला. त्याने स्वकीयांचा विरोध व बंडाळी मुत्सद्दीपणाने व पराक्रमाने मोडून काढली व राज्यविस्तार केला. त्याचे राज्य दक्षिणेत मदुरेपासून उत्तरेत तुंगभद्रपर्यंत पसरले होते. त्याने राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. तो वैदिक असला तरी त्याच्या राज्यात सर्व पंथांना समान न्याय होता. प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे भाग करून त्याने राज्यपाल नेमले. तेलगू साहित्याला राजाश्रय देऊन त्यांची भरभराट घडवून आणली. त्याने सायनाचार्यांकडून वेदांवर भाष्य लिहवून घेतले. 

मूल्ये - 

• कर्तव्यदक्षता, निर्भयता, राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव,


→ अन्य घटना

भारतातील मुघल सत्तेचा प्रमुख संस्थापक बाबर यांचा जन्म - १४८३. 

• पद्मश्री भीमसेन जोशी यांचा जन्म १९२२. - 


→ उपक्रम 

प्राचीन मंदिरे व वास्तुशिल्पे यांच्या चित्रांचा व माहितीचा संग्रह करावा.

 • विजयनगरच्या साम्राज्याबद्दल माहिती मिळवावी. - 


→ समूहगान 

• देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल.... 


→ सामान्यज्ञान - • खेळ आणि प्रसिध्द भारतीय खेळाडू.

 • बॅडमिंटन - प्रकाश पदुकोण 

• हॉकी - ध्यानचंद 

• • क्रिकेट - सुनील गावस्कर, कपिल देव 

• नदी नसणारा देश - सौदी अरब

 • साप न मिळणारा देश - आयर्लंड 

 • सांडाशी खेळणाऱ्या लोकांचा देश स्पेन. - (२७५) ८०१. 

• लॉन टेनिस - विजय अमृतराज, लिएंडर पेस • कुस्ती खाशाबा जाधव, सतपालसिंग

 • पोहणे - बुला चौधरी 

 • बुध्दिबळ - विश्वनाथन् आनंद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा