Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

16 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

१6 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

- ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान... 

• श्लोक 

• - प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् । उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ।।

 ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाले आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पाप पुण्यरहित व ब्रह्मस्वरूप झाला आहे अशा योग्याला श्रेष्ठ असे सुख प्राप्त होते. - सार्थ श्री ज्ञानेश्वरी. - जिजाऊ। 


चिंतन-

•  प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे । → यश हे एका रात्रीत जादूसारखे मिळत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे जिद्दीने, चिकाटीने, अविश्रांत धडपड करावी लागते. रोमसारखी प्राचीन शहरे, ताजमहालासारखे देखणे वास्तुशिल्प किंवा डोंगर कोरून तयार केलेली वेरूळसारखी लेणी म्हणजे माणसांच्या जिद्दीची, चिकाटीची, सततोद्योगाची चिरंतन प्रतीके व प्रेरक खुणाच आहेत. प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

कथाकथन

 चार वर्षाचा असतानाच त्याचे वडील मरण पावले. आता मेनसिसच्या आईला खूप कष्ट करावे लागत होते. मेनसिस हाच तिचा एक आधार • चीनमधील एका खेड्यात मेनसिस नावाचा मुलगा राहत होता. त्याचे आई वडील अगदी गरीब होते. जावा. खूप शिकावा, मोठा व्हावा, त्याने नाव काढावे असे तिला वाटत असे. यासाठीच ती धडपडत होती. मोलमजुरी आपला मुलगा शाळेत होती. मेनसिस आता शाळेत जाऊ लागला. पहिल्यांदा त्याला शाळा खूप आवडायची. अभ्यासाचीही गोडी वाटू लागली. हे पाहून त्याच्या खूप आनंद होत असे, पण नंतर हळूहळू त्याला शाळेचा कंटाळा येऊ लागला. अभ्यास नकोसा वाटू लागला, तो शाळा बुडवू लागला. म्हणून जायचा व बाहेर कुठेतरी भटकत असायचा. आई त्याला सक्तीने शाळेत पाठवायची पण तो पाटी-दसर शाळेतच टाकून घरी पळून या आईला काहीतरी खोटी खोटी कारणे सांगायचा. मेनसिसचे हे वागणे बघून त्याच्या आईला खूप वाईट वाटायचे. एक दिवस मेनसिस असाच कवून घरी आला. घरात त्याची आई एक रेशमी कपडा शिवत होती. ती विकून तिला बरेच पैसे मिळणार होते. मेनसिस शाळा बुडवून घरी ला होता, त्याच्या आईच्या लक्षात आले. पण ती मेनसिसला काहीच बोलली नाही. तिने मेनसिसकडे एकदा पाहिले व तो रेशमी कपडा तिने टराटरा धाडून टाकला. ती अतिशय निराश झाली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. हे पाहून मेनसिस चांगलाच पावरला. तो तिच्या अगदी जवळ आणि म्हणाला, 'आई, काय गं झाले? तू रडतेस का? हा कपड़ा का पाइलाम रहते असलेली मेनसिसची आई त्याला समजावीत म्हणाली, मेनसिस, तू असा का बरे वागतोस? तू शाळा चुकवितोस, अभ्यास करीत नाहीस, खोटे बोलतोस. यामुळे मला फार वाईट वाटते रे. तू शिकला तर उद्या तू मोठा झाल्यावर तुझे कसे होणार? मी तुला जन्मभर पुरणार आहे का? तू चांगले शिक्षण घेतले नाहीस, तर तुला दोन वेळच्या डोरासारखे राबावे लागेल. तुला जगात कुणी विचारणार नाही. कुत्र्याचे जिणे जगावे लागले. तू खूप शिकावास, तू मोठा व्हावास म्हणून मी किती कष्ट करते? त्याचे तुला काहीच वाटत नाही. मी राब राब राबते आणि तू मात्र शाळा चुकवतोस, मग मी तरी कशाला करू हे कष्ट ?' आईच्या या बोलण्याचा मेनसिसच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. त्याला आपली चूक समजली. त्याला आपल्या वागण्याचे फार वाईट पहले आईच्या पाया पडून त्याने तिची क्षमा मागितली. पुन्हा अशी चूक न करण्याची प्रतिज्ञा केली. त्या दिवसापासून त्याने कधीही शाळा चुकविली मन लावून त्याने अभ्यास केला. खूप शिकून मोठा झाला. पुढे तो चीनमधील एक थोर पुरुष म्हणून प्रसिद्ध झाला.


सुविचार

 • चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय कीर्तीचा सुगंध दरवळत नाही. मनाने विचाराने जिद्दीने जे मोठे तेच मोठे लोक होत. • उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजते. पं. नेहरू

 •   शील, करूणा, विद्या, मैत्री आणि प्रज्ञा या पंचतत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे डॉ. आंबेडकर 

 •   मनाची शुद्धता राखण्यासाठी मोह, राग व खोटी श्रद्धा करणे सोडले पाहिजे. - डॉ. आंबेडकर

 

दिनविशेष 

• दादासाहेब फाळके स्मृतिदिन १९४४ : दादासाहेबांचे पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके त्यांचा जन्म नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे झाला. आईचे नाव द्वारकाबाई, मैट्रिकनंतर १८८५ मध्ये मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ते दाखल झाले. १८९० मध्ये बच् भुवनमधून त्यांनी चित्रकला शिक्षणक्रम पूर्ण केला. वास्तुकला, साचेकाम, फोटोग्राची, तीनरंगी उसे बनविणे, प्रकाश शिलामुद्रण (लियो) इत्यादी अनेक क्षेत्रांचे त्यांनी ज्ञान मिळविले व यासंबंधीचे प्रयोग केले. १९०३ मध्ये पुराणवस्तु संशोधन खात्यात छायाचित्रकार म्हणून त्यांना नोकरी मिळाली. १९०६ मध्ये वंगभंग चळवळीच्या निमित्ताने नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. १९१० मध्ये त्यांनी सुवर्णमाला मासिक सुरू केले. १९९१ |ये स्वदेशी चित्रपट व्यवसाय उभा करण्याचे त्यांनी ठरविले व खूप अभ्यास केला. त्यासाठी ते इंग्लंडला गेले. येताना यंत्रसामुग्री घेऊन आले. जून १९१२ मध्ये 'रोपट्याची वाढ' हा एक मिनिटाचा लघुपट त्यांनी तयार केला. त्यानंतर चित्रपट तंत्राच्या सर्व भूमिका स्वतः वठवून भारतातील पहिला एक चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' ३ मे १९९३ रोजी प्रदर्शित केला. पुढे 'मोहिनी भस्मासुर', 'सत्यवान सावित्री', 'लंकादहन' आदी चित्रपट तयार केले. १९१८ मध्ये 'हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी' काढली व अनेक चित्रपट काढले. त्यांच्या स्मृतिनिमित्त दिला जाणारा 'दादासाहेब फाळके' पुरस्कार पार मानाचा मानला जातो.


 मूल्ये

  • श्रमनिष्ठा, विज्ञाननिष्ठा.


अन्य घटना 

• थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म १७४५

• तर परांजपे जन्मदिन १८७६

 • राजर्षी शाहू महाराजांच्या अक्षतेखाली 1 दिल्ली येथे तिसरी अ. भा. अस्पृश्य परिषद संपन्न. १९२२ भारतीय वैज्ञानिक मेघनाथ साहा यांचा मृत्यू १९५५ 

 

→ उपक्रम 

• सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक व फाळके पारितोषिक प्राप्त कलाकारांची नावे सांगणे. 

• बालचित्रवाणी कार्यक्रमांची मुलांना माहिती देणे.


 → समूहगान

  • आओ बच्चों तुम्ही दिखाएं झाकी हिंदुस्थान की...

  

 → सामान्यज्ञान

  • किताब व व्यक्ती : 

  • • बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस कुमार गंधर्व शिवपुत्र सिद्दरामय्या कोमकली. -

 • सवाई गंधर्व - रामभाऊ कुंदगोळकर 

 • छोटा गंधर्व - सौदागर गोरे. 



T

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा