17 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
प्रार्थना
राम रहीम को भजनेवाले, तेरे ह बंदे खुदा या
श्लोक
- राजविद्याराजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखां कर्तुमव्यत्तम् 11
- ज्ञान हे सर्व विद्यांचा राजा, सर्व गुहयांचा स्वामी, पवित्र, उत्कृष्ट व अनुभवास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, सहजपणे आचरणत येण्यासारखे आणि क्षयरहित आहे. - सार्थ श्रीज्ञानेश्वरी.
→ चिंतन
सत्याप्रमाणेच परमेश्वर हा एक आहे. भक्त आपापल्या आवडीप्रमाणे त्याला निरनिराळ्या रूपात बघतात, नावे देतात व त्याची पूजा करतात. घरातल्या लहानग्या बाळाला वडीलधाऱ्या मंडळींनी आपापल्या आवडीप्रमाणे नावे ठेवावीत, नटवावे, समजावे व त्यामुळे आपण आनंदित व्हावे, तसाच प्रकार भक्त बाळाप्रमाणेच परमेश्वरही सदैव आनंदरूप असतो. त्याला बाह्योपचारात काही रस नसतो. 'देव भक्तीचा भुकेला' या वचनानुसार परमेश्वरक ठेवणाऱ्यांच्या पाठीशी तो सदैव उभा राहतो.
कथाकथन
- 'साधूचा संन्यास': -
स्वामी रामतीर्थ एक दिवस गंगेच्या किनाऱ्याने फिरायला गेले होते. सहज फिरता फिरता त्याचे लक्ष प साधूकडे गेला, तो नदीकाठच्या एका झाडाखाली झकास विश्रांती घेत पहुडला होता. स्वामीजी त्याच्याजवळ गेले. त्याला आदराने प्रणाम के त्याच्याजवळ, त्याच्या पायाशी जाऊन बसले. तो साधू मात्र तसाच ऐटीत लोळत पडला होता.स्वामींनी त्याला विचारले - 'बाबा'! संन्यास येऊन किती दिवस झाले आपणांस?' 'दिवस ? अरे, दिवस काय विचारतोस, किती वर्षे झाली हे विचार' तोऱ्यानेच तो साधू म्हणाला. 'बरं बरं! चुकल महाराज किती वर्षे झाली असतील?' नम्रतेने स्वामीजींनी विचारले. 'तब्बल तीस वर्षे झाली बेटा! समजलास?' साधूने उत्तर दिले. 'अरे व्वा! मग तीस वर्षात आपण खूपच साधना केली असेल. बरीच सिध्दी प्राप्त झाली असेल आपणांस.' 'होय तर! उगाच नाही केले एवढे खडतर तप एवढी क तपश्चर्या!' अहंभावाने साधू म्हणाले. 'कोणकोणत्या सिध्दी प्राप्त झाल्या महाराज आपणाला?' स्वामीजींनी पुन्हा अत्यंत नम्रपणे प्रश्न केला, समोर बघ. काय दिसतेय तुला?' समोर गंगेचा विशाल खोल संथ प्रवाह वाहत होता. 'गंगामाई!' स्वामीजी उत्तरले. 'हां, तर ही गंगामय्या आहेर तिच्या या विशाल खोल जलप्रवाहावरून अगदी सहजपणे लीलया त्या किनाऱ्यापर्यंत चालत जाऊ शकतो,' गर्वाने तो साधू म्हणाला. 'आणखी महाराज' 'आणखी तसाच परत त्या पलीकडल्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यापर्यंत चालत येऊ शकतो.' साधू अधिकच गर्वाने म्हणाल 'व्वा! व्वा! याच्याशिवाय आणखी काही?' 'बेटा! याला तू सामान्य काम समजतोस ? तब्बल तीस वर्षे त्यासाठी मी तपस्या केली, तेव्हा कुठे शक्य झालं मला समजलास?' जरा रागावूनच साधू महाराज बोलले. 'महाराज! माफ करा. पण या एवढ्याशा सोप्या कामासाठी तुम्ही तुमची साधनेव बहुमोल तीस वर्षे 'पाण्यात' घालविली असेच मला वाटते. अहो, या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाण्यासाठी साधी नौका चालते. तीत ब केवळ दोन आणे नावाड्याला दिले तर आपण इकडूनतिकडे किंवा तिकडून इकडे सहज ही गंगामय्या पार करू शकतो. आपण या तीस वर्षांत क | मिळवलेत? एक सामान्य माणूस चार-दोन आण्यात जे करू शकतो ते? आपण तपस्या जरूर केलीत ज्ञानाच्या समुद्रात बुडी मारून त्यातले हस्तगत करायच्या ऐवजी केवळ एखादा मोठा दगड घेऊन आपण वर आलात, असे नाही वाटत आपल्याला? त्या दगडाचा सामान्य माणसांच उद्धारासाठी काय उपयोग? सामान्यांचे जीवन सुधारण्यासाठी आपली तपश्चर्या निरुपयोगीच ठरली नाही का?' तो साधू निरुत्तर झाला. त्याचा अहंभाव क्षणात माळवला. ताड्कन उठून स्वामीजींच्या समोर नतमस्तक होऊन त्याने त्यांच्या पायावर डोके ठेक तो त्यांचा एकनिष्ठ सेवक बनला व सामान्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारे कार्य स्वामीजींच्या बरोबर करू लागला.
→ सुविचार
• ज्ञान वा भक्तीत आपल्याला रुचेल, पचेल ते घ्यावे.
दिनविशेष -
• स्वामी रामकृष्ण परमहंस यांची जयंती - १८३६ : बंगालमधील हुगळी जिल्हयात कामारपुकुर (गावी चट्टोपाध्य सुविराम आणि चंद्रादेवी यांना झालेला पुत्र म्हणजे रामकृष्ण. त्यांचे मूळ नाव गदाधर, ते अत्यंत बुद्धिमान, निर्भय व एकपाठी होते. वयाच्या वर्षीच त्यांचे वडील वारले. नवव्या वर्षी नाटकात शिवाची भूमिका करतांनाच त्यांची समाधी लागली. ते पुढे मोठा भाऊ रामकुमार याच्या कलकत्याला दक्षिणेश्वरी राणी रासमणीच्या कालीमंदिरात पुजारी म्हणून काम करू लागले. त्यांचे बंधूही लवकरच वारले. त्यामुळे ते अधिका | झाले. दिवसाचा सारा वेळ ते साधनेत घालवत. लग्न करून दिले तर सुधारेल, म्हणून आईने त्यांचे लग्न करून दिले. ते पत्नीची देवी म्हणून पूजा त्यांनी तांत्रिक साधना तर केलीच; पण राम, कृष्ण यांच्या उपासनेसोबत हठायोग, इस्लाम, ख्रिस्ती, जैन, बौद्ध व शीख धर्मातील तत्वांच केली. जी अवस्था प्राप्त करायला इतर उपासकांना वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागत, ती त्यांना तीन दिवसांत जमत असे. त्यांचा शिष्यपरिका बाढला. ते निरहंकारी, निरिच्छ व निस्पृह होते. संपत्तीचा स्पर्शही त्यांना सहन होत नसे. त्यांचे चरित्र चमत्कारांनी भरलेले व भव्योदान आहे. समाधीनंतर विवेकानंदांनी 'रामकृष्ण संघ' स्थापन केला.
→ मूल्ये
-• सर्वधर्म समभाव, भूतदया, शुचिता
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
→ अन्य घटना
• वीर उस्ताद लहुजी साळवे स्मृतीदिन १८८१ - -
• आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे एडनच्या तुरुंगात आत्मार्पण- १८८३. ० जे. कृष्णमूर्ती यांचा स्मृतिदिन १९०
→ उपक्रम
• रामकृष्णांच्या कथा सांगाव्यात
• अनेक पंथांतील संतमहात्म्यांच्या वचनांचा संग्रह करणे.
→ समूहगान
• हा देश माझा याचे भान, जरासे राहू दयारे...
• जयोस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती, त्वामहं यशोयुतां वंदे...
• कोणापासून काय शिकावे.
→ सामान्यज्ञान
• दूध स्नेह • झाड - परोपकार
••मुंगी शिस्त व एकी
• पाणी समता
• सूर्य चंद्र - नियमितपणा
• कुत्रा - स्वामिनिष्ठा
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा