2 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
प्रार्थना -
आई माझा गुरू, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी ....
• श्लोक
• → - आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हैं ।। ज्ञानेश्वरी पसायदान आता सर्व विश्वाचा आत्मा जो परमेश्वर त्याने या वाङ्मययज्ञाने संतुष्ट होऊन मला इतके पसायदान द्यावे
. चिंतन -
शरीर, मन, बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण. -> आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगाने विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणूस म्हणजे केवळ शरीर नव्हे. शरीर, मन, बुद्धी यांचा मेळ म्हणजे माणूस म्हणून या सर्वांचा योग्य दिशेने व पद्धतीने विकास होईल, अशी योजना हवी. त्यासाठी चांगल्या सवयी जरी वरवर क्षुल्लक वाटल्या, कटाक्षाने अंगी बाणविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणसाच्या सर्वांगीण विकासाचे शिक्षण हे प्रभावी साधन आहे.
कथाकथन
'नरहरी सोनार' (जन्म-२ फेब्रु. १३१४ - शके १२३५)
नरहरी सोनार या नावाचा एक भक्त पंढरपुरास होऊन गेला. तो मोठा → शिवभक्त होता. त्याने शिवशंकराची आराधना, उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतले होते. तो पंढरपुरात राहात असूनदेखील कधीही विठोबाच्या गेला नाही. त्याची भक्ती श्रध्दा शिवशंकरावर होती. शिवाचून दुसऱ्या कोणत्याही देव-देवाची त्याने पूजा केलेली नव्हती. एका सावकाराने पढरपुरात येऊन विठोबास नवस केला की, "जर मला पुत्र झाला तर मी तुला सोन्याचा करगोटा घालीन." पुढे त्या सावकाराला पुत्र झाला, म्हणून तो नवस फेडण्यासाठी पंढरपुरात आला. सुवर्णाचा करगोटा करून त्यावर हिर-माणके जडवील असा एखादा कुशल सोनार पंढरपुरात आहे का, याबद्दल सावकाराने याकडे चौकशी केली. तेव्हा पुजाऱ्याने त्याला नरहरी सोनाराचे नाव सांगितले. सावकार नरहरी सोनाराकडे गेला आणि त्याला हिरेजडित सोन्याचा करगोटा करण्यास सांगितले, तेव्हा नरहरी सोनार सावकाराला म्हणाला, "तुम्ही कमरेचे मोजमाप घेऊन या म्हणजे मी करगोटा तयार करून देतो." त्याप्रमाणे सावकाराने विठोबाच्या कमरेचे मोजमाप आणून दिले. करगोटा तयार झाल्यावर सावकाराने विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा केली व करगोटा कमरेस बांधू लागला; पण तो | अपुरा पडला. म्हणून सावकाराने पुन्हा नरहरी सोनाराकडे जाऊन तो वाढवून आणला, तेव्हा तो ढिला होऊ लागला. करगोटा विठोबाच्या कमरेस ठीक बसत नव्हता. सावकार खंती झाला. अखेर सावकार नरहरी सोनाराकडे गेला व म्हणाला, “तुम्ही देवळात येऊन करगोटा देवाच्या कमरेस नीट बसवून द्यावा. " करगोटा बरोबर व्हावा म्हणून सावकाराने नरहरी सोनाराची खूप विनवणी केली, तेव्हा नरहरी सोनार म्हणाला, "मी शिवशंकरावाचून दुसरे दैवत पाहात नाही. तसा माझा निश्चय आहे." सावकाराने खूप आग्रह केला तेव्हा नरहरी सोनार डोळे झाकून विठ्ठल मंदिरात गेला. ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो लोक लांबलांबून पंढरपुरास येतात, त्या विठ्ठलाचे दर्शन टाळण्यासाठी पंढरपुरच्याच या रहिवाशाने वस्त्राचा बुरखा क्षेत्रवासी लोक आश्चर्य करू लागले. सावकाराने नरहरी सोनाराला हात धरून मंदिरात नेलेले पाहून लोकांनी त्याची हेटाळणी केली. घेतलेला | पाहून नरहरी सोनार मंदिरात गेल्यानंतर विठ्ठलमूर्तीस हातांनी चाचपू लागला तेव्हा विठ्ठलाचे सर्व ध्यान त्याला शिवशंकराचे असल्याचे भासू लागले. भुजा, मुख, गळ्यात सर्पाचा अलंकार, मस्तकावर जटा असा जो निळकंठ, तोच साक्षात विटेवर उभा असल्याचे त्याला वाटले. "हे तर माझेच आराध्यदैवत!" असे सहरी सोनाराने उद्गार काढले आणि डोळ्यावरील बुरखा काढला. डोळे उघडून पाहिले तेव्हा विठ्ठलाची मूर्ती विटेवर दिसली. नरहरी सोनाराने पुन्हा डोळे झाकले, तेव्हा त्याला शंकराचे ध्यान हातास लागले. पुन्हा डोळे उघडून बघितले तर विठ्ठलाची मूर्ती पुन्हा नेत्र बांधून घेणार तोच त्या ठिकाणी त्याला शिवशंकर दिसू लागले. नरहरी सोनाराने विठ्ठलाला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याने प्रार्थना केली की, "हे पंढरीनाथा, विठ्ठला, मी मनात द्वैतभाव धरला होता, तो तुझ्या कृपेने आता दूर झाला. मी तुला शरण आलो आहे. माझ्यावर तुझी कृपा असू दे." यावर विठोबा म्हणाले, "नरहरी, तू मला फार म्हणून मी हे कृत्य केले. मी आणि शिवशंकर एकच आहोत. तू तसा भेद मानू नकोस !” "मी व्यर्थ नेत्र बांधून घेतले. देवा, मला क्षमा कर." नरहरीला त्याने मग तो करगोटा विठ्ठलाच्या कमरेला बांधला. तो अगदी बरोबर झाला. सावकाराला आनंद झाला.
• सुविचार -
• • भगवंतावर निर्व्याज प्रेम म्हणजे भक्ती होय. • संतानी निर्गुणाला सगुणात आणले. • संतसंगतीने नकळत संतांचे गुण सहवास अधिक शीतल असतो जशीअक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर । भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर, करून दावी ।।
दिनविशेष -
• महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचा स्मृतिदिन - १९१७ : जनसेवेसाठीच आपले आयुष्य वेचणारे आधुनिक महाराष्ट्रातील → साधुवृत्तीचे पुरुष म्हणजे अण्णासाहेब पटवर्धन. त्यांचे पूर्ण नाव विनायक रामचंद्र पटवर्धन असे होते. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता होती. एकाच वेळी मेडिकल व लॉ कॉलेजमध्ये अभ्यास सुरू केला. परंतु विद्यापीठाच्या नियमामुळे एलएलबी ची परीक्षा दिली; परंतु शिकलेल्या वैद्यकीचा समाजाला विनामूल्य उपयोग करून दिला. काच कारखान्याच्या उद्योगातही त्यांनी लक्ष घातले. 'इंदुप्रकाश' या वृत्तपत्राचे ते बातमीदारही होते. त्यांची बुद्धिमत्ता अशी सर्वगामी होती. ते प्रखर देशभक्त होते. लोकमान्य टिळकांचे ते जिवलग मित्र होते. निजामाच्या सहकार्याने वऱ्हाड प्रांत विकत घेण्याची धाडसी योजना त्यांनी आखली, पण सर सालारजंग यांच्या मृत्यूमुळे ती फसली. ते नंतर अध्यात्माकडे वळले व आळंदीच्या नरसिंह सरस्वतीचे शिष्य झाले. कुष्ठरोगाचे पुनर्वसन करण्याचे फार मोठे काम अण्णासाहेबांनी केले आहे. कायदेशीर सल्ले, अचूक रोगनिदान व औषधोपचार अशी अनेक कामे त्यांनी जनसेवा म्हणून केली
. मूल्ये -
• स्वाधीनता, निर्भयता, राष्ट्रप्रेम,
→अन्य घटना
• सुप्रसिद्ध भगवद्भक्त नरहरी सोनार यांनी समाधी घेतली - १३१४. • ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म - १८८४. • प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना - १९४९.० थुंबा रॉकेट प्रक्षेपण केंद्र राष्ट्रास अर्पण - १९६८ -
→ उपक्रम
• कुष्ठरोगाचे पुनर्वसन करणारे बाबा आमटे, • इन्दुताई पटवर्धन अशा व्यक्तींच्या कार्याची माहिती संकलित करा. -
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
→ समूहगान
• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा...
गुलाब लागवड कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती
सामान्यज्ञान
कुष्ठरोगाची लक्षणे - शरीराच्या कोणत्याही भागावरील त्वचेवर लालसर वा फिकटसे चट्टे दिसू लागतात. या चट्ट्यांव केस गळून पडतात. तेथे स्पर्श जाणवत नाही. हातापायाच्या बोटात अशक्तपणा वा बधिरपणा येतो. चेहऱ्यावरील त्वचा गुळगुळीत, तेलक चकाकणारी दिसू लागते. भुवया विरळ होतात. अशी लक्षणे दिसू लागताच रोगनिदान करून घ्यावे. कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. त् मातत्याने सलग औषधोपचार करावे लागतात.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा