20 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
- लावियेला दीप प्रेमे, तेवता ठेवू चला....
• श्लोक -
• द्वाविमौ पुरुषी लोके क्षरश्वाक्षर एव च । क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ -
• उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः । ये लोकत्रयमाविश्य विभर्त्यव्यय ईश्वरः ॥ जगतामध्ये क्षर व अक्षर असे दोन पुरुष आहेत, सर्व भूते हा क्षर पुरूष व कूटस्थ (मायाविशिष्ट चैतन्य) हा अक्षर पुरुष असे म्हणत असतात. या दोन पुरूषांहून अन्य उत्तम पुरूषाला परमात्मा असे म्हणतात; तो अविनाशी ईश्वर तिन्ही लोकांत प्रवेश करून त्यांना धारण करतो. - सार्थ श्रीज्ञानेश्वरी. चिंतन- स्वातंत्र्य मिळविणे आणि टिकविणे ही अवघड गोष्ट आहे.
→ असंख्य देशभक्तांनी स्वातंत्र्याकरिता नाना प्रकारच्या हालअपेष्टा भोगल्या. असंख्य स्वातंत्र्यवीरांनी आक्रमकांशी प्राणपणाने लढून आपल्या आहुती दिली. त्या माहात्म्यांच्या बलिदानावर स्वातंत्र्याची इमारत उभी आहे. या थोर स्वातंत्र्ययोद्ध्यांची आठवण सतत मनात बाळगणे व मोठ्या प्रयासाने आपणास मिळवून दिलेले स्वातंत्र्य जतन करणे, हेच आपले कर्तव्य आहे.
कथाकथन
- 'मोहरम' :- महंमद पैगंबराला हिरा पर्वतावर साक्षात्कार झाला, तो काळ फारच संकटाचा होता. सामान्य जनता सत्ताधाऱ्यांच्या जुलमामुळे हैराण झाली होती. हैराण झालेले लोक मनातून देवाचा धावा करीत होते. न्याय व नीतिमत्ता यांना दुष्ट लोकांचे ग्रहण लागले. तेव्हा चालून अन्यान्य जनांची सुटका करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो, अशी भावना होती. महमद पैगंबराला साक्षात्कार झाला, परंतु तो स्वतः ला परमेश्वराचा अवतार समजत नव्हता, तर प्रोषित समजत होता. त्याने ईश्वरावादाचा प्रचार केला. हळूहळू हा प्रचार वाढत गेला. विस्कळीत झालेला समाज एकत्र येऊ लागला. महंमद पैगंबराला फातमा नावाची मुलगी होती. तिला हसन आणि हुसेन अशी दोन मुले होती. आपआपसातील वैराने प्रगती खुंटते हा विचार यतौज घराण्यातील लोकांना व हसन-हुसेन यांना पटत होता. म्हणून यतीज घराण्याने आपल्याला बोलावले आहे, असे समजून हसन हुसेन - कुफ नावाच्या गावी गेले. यतीज घराणे आपल्यात येत आहे, याचा आनंद दोघांच्या चेहन्यांवर होता. परंतु यतीज घराण्याचा हेतू चांगला नव्हता. त्यांना दगाबाजी करून त्या दोघांना मारावयाचे होते. त्यामुळे सात दिवस लढण्यात, मारामारी करण्यात गेले. ही लढाई बगदादमधील करबला मैदानावर झाली. यतीज घराणे मोठे पडल्यामुळे त्यांनी दोघांना पकडून ठेवले व काहीही खायलाप्यायला दिले नाही. आठवा दिवस तसाच गेला. नवव्या दिवशी हसन हुसेन नमाज पढण्यासाठी वाकले. त्यांचा फायदा घेऊन, त्यांची हत्या केली. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात नवव्या व दहाव्या दिवशी उपवास केला जातो. तेव्हा पाण्याचा थेंबही प्यायचा नसतो. हा उपवास सकाळी पाच वाजता सुरू होऊन संध्याकाळी सात वाजता संपतो. दहाव्या दिवशी हसन व हुसेन यांची प्रतिकृती बनवून संपतो. दहाव्या दिवशी हसन व हुसेन याची प्रतिकृती बनवून त्यांचे दफन केले जाते. (म्हणजे तलावात या प्रतिकृतीचे विसर्जन केले जाते) नंतर आंघोळ वगैरे केली जाते. सात दिवस बालणान्या लढाईत हया दोघांना पाणी व जेवणसुध्दा दिले नाही, म्हणून त्या दिवशी सर्वांना सरबत वाटले जाते. गोर-गरिबांना अवदान केले जाते. यासंबंधी दंतकथा अशी सांगितली जाते, की हसन हुसेन आपण शत्रूंना दिसू नये म्हणून खात लपत का विगीत. जेणेकरून हे दोघे शत्रूंच्या नजरेस पडणार नाहीत, परंतु सरडा हा प्राणी मात्र आपली मान सेउत्तर प्रदेशात प्रतिकृती म्हणून 'ताजिया' बनविण्यात येतो. शिया लोक 'मातम' करतात. कारण या दोघांना मारण्यात आमचा हात नाही, आम्हाला माफ करा, असे म्हणून स्वतःच्या शरीरावर इजा करून घेतात. या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक सामील होतात. बंधुभाव वाढवितात.
*सुविचार -
*-. हिंदू, मुस्लीम, शिख ईसाई, हम सब है भाई-भाई । -
दिनविशेष
-• बापू गोखले स्मृतिदिन १८१८ : बापू गोखले हे मराठी राज्यसत्तेचे शेवटचे सेनापती. ते अत्यंत शूर, धाडसी व स्वामिनिष्ठ होते. त्यांचे पूर्ण नाव नरहर गणेश गोखले. मूळ गाव कोकणातील तळेखाजण. आपले चुलते सरदार धोंडोपंत गोखले यांच्यासोबत अनेक लढायांमध्ये त्यांनी पराक्रम गाजविला. त्यामुळे धोंडोपंताच्या मृत्यूनंतर त्यांना सरदारकी मिळाली. टिपू सुलतान विरुद्धच्या एका लढाईत त्यांनी तलवार गाजविल्याने पेशव्यांनी धारवाड प्रांतात त्यांची नेमणूक केली. त्यांनी वाघ, पटवर्धन, चतुरसिंग, ताई तेलीण आदी अनेकांची बंडे आपल्या शौर्याने मोडून काढली. बाजीराव पेशव्यांच्या बाजूने ते भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळे प्रसन्न होऊन १८९२ मध्ये त्यांना पेशव्यांनी 'सेनापती' पद दिले. इंग्रज व पेशवे यांच्यात जेव्हा वितुष्ट आले, तेव्हा इंग्रजांविरुद्ध ते अनेक लढाया लढले व इंग्रजांचा त्यांनी पराभव केला. मात्र अष्टीच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करीत हा वीरपुरुष धारातीर्थी पडला.
→ मूल्ये
• निर्भयता, राष्ट्रप्रेम,
→ अन्य घटना
• मोगल सम्राट औरंगजेब याचा मृत्यू - १७०७
• सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू शरदच्चंद्र बोस यांचे निधन - १९५०
→ उपक्रम
• देशासाठी बलिदान करणाऱ्या वीरांच्या कथा सांगणे, पराक्रमी वीरांची माहिती गोळा करण्यास सांगणे.
→ समूहगान
• मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला....
→ सामान्यज्ञान
• भिन्न भिन्न जातींच्या वनस्पतींमध्येही एकमेकांबद्दल माणसांप्रमाणे शत्रुत्व किंवा मित्रत्वाच्या भावना असतात. याचे गूढ़ काही दशकांपासून शास्त्रज्ञांना उलगडू लागले आहे. आक्रोडाजवळ फुलझाडे जगत नाहीत, तर लिंबाच्या झाडाच्या जवळची बाभूळ वाढू लागते. निलगिरी चिंच यांच्याजवळ दुसरी झाडे वाढत नाहीत. पहिल्यांदा अंबाडीचे पीक घेतलेल्या शेतात गहू रुजत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा