२9 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
- मंगलमय चरणि तुझ्या विनंती हीच देवा
→ श्लोक -
जन्म जात मत पूछिओ, का जात अरू पातः । 'रविदास' पूत सभ प्रभु के, कोऊ नहीं जात कुजात ।
- - रविदास दर्शन जन्म, जात विचारू नका. जात किंवा वंशात काय आहे? सर्वजण त्या एकाच प्रभूची लेकरे आहेत. जातीचा किंवा परजातीचा कोणीच माणूस नाही. सगळी माणसे एकाच परमेश्वराची लेकरे असल्यामुळे ती सर्व समान आहेत. आपल्या चांगल्या-वाईट कर्मामुळेच आम्ही मोठे किंवा लहान बनत असतो. विशिष्ट जातीत किंवा कुटुंबात जन्म झाल्यामुळे मनुष्य उच्च किंवा नीच ठरत नसतो.
→ चिंतन
- नियमित सतत उद्योग करण्याला पर्याय नाही. कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वी, चंद्र व आकाशातील ग्रह-उपग्रह दिलेल्या मार्गाने सूर्याभोवती फिरत आहेत व ही सूर्यमालिका पण कोणत्यातरी केंद्राभोवती आपल्या गतीने फिरत आहे. सूर्य आपले उष्णता, प्रकाश देण्याचे काम अव्याहत करतो आहे. कोणी सुटी घेत नाही की बुट्टी मारत नाही. मग आपण आपले काम नियमितपणे वेळच्या वेळी करायला नको का ?
कथाकथन
सोनार सोने खाणारच :- एकदा बादशहाला सोन्याचा हत्ती करून घेण्याची लहर आली. सोनार सोने चोरतात म्हणून बिरबलाला सांगून सोनारांना राजवाड्यातच कामाला बोलाविले. ते दिवसभर राजवाड्यात काम करीत. त्यांना सोने बरोबर मोजून व कस लावून दिले जाई. अखेर हत्ती तयार झाला. त्याचे वजन केले गेले. ते अगदी बरोबर भरले. एक दिवस ते सर्व सोनार बादशहाकडे आले आणि म्हणाले, 'महारा आता आम्ही हा हत्ती नदीवर वाळूत नेऊन चांगला पॉलिश करून आणतो. 'बादशहाने बिरबलाकडे पाहिले. बिरबलानेही मान हलविली. पहारेकऱ्याच्य | पहाऱ्यात सोन्याचा हत्ती नदीकिनारी नेण्यात आला. बिरबलाला मात्र चैन पडत नव्हती. सोनार सोने चोरणार याची त्याला खात्री होती. पहारेक-यांच्य | वेषातच तो त्यांच्याबरोबर बाहेर पडला आणि गुपचूप त्यांच्यावर पहारा करू लागला. इतर पहारेकऱ्यांना त्या सोनारांची खाण्या-पिण्यात चांगलेच गुंतविले होते. ते बाजूला मजा मारीत होते. हळूच सोनारांनी वाळू अकली. त्यातून दुसरा हत्ती बाहेर काढला आणि त्या जागी सोन्याचा ही पु ठेवला. हत्ती घेऊन ते दरबारात हजर झाले. चकचकीत हत्ती पाहून बादशहा खूश झाला. बिरबलाला त्याने त्यांची मजुरी द्यायला सांगितली. बि हसत म्हणाला, 'सोनार सोने चोरणारच | आपण या कामातून किती सोने चोरलेत? सोनारांचा पुढारी म्हणाला, महाराज, हे कसं शक्य आहे. आपण आम्हाला सोनं मोजून दिलं. आम्ही तितक्याच वजनाचा हत्ती दिला.' बिरबल शांतपणे म्हणाला, 'महाराज, यांनी थोडं सोने चोरलेलं नाही.' संपूर्ण हनी चोरलाय, सोन्याचा हत्ती वाळूत दडवून हा पितळेचा हत्ती घेऊन ते इथं आलेत. हवं असल्यास महाराजांनी तज्ज्ञांकडून हत्तीची पारख करून घ्यावी सोनार घाबरले. त्यांनी गुन्हा कबूल केला. दिवसा राजवाड्यात काम केल्यानंतर रात्री सोनाराच्या घरी त्यांनी पितळी हत्ती बनविला होता. हुशार बिरबलामुळे चोरी पकडली गेली होती. बादशहाने बिरबलाला इनाम दिले. सोनारांना मात्र चांगली शिक्षा मिळाली.
→ सुविचार
• सूर्य हा विश्वदर्शन म्हणजे सर्व जगावर देखरेख करणारा आहे. तो मनुष्याची बरी-वाईट कृत्ये पाहतो. - तो सर्व चराचर सृष्टीचा आत्मा आहे. ऋग्वेद
→ दिनविशेष -
• लीप वर्ष किंवा प्लुतवर्ष दिन : इंग्रजी वर्ष ३६५ दिवसांचे मानले जाते. प्रत्यक्ष पृथ्वीला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासा ३६५ १/४ (३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे) दिवस लागतात. त्यामुळे प्रतिवर्षी १/४ दिवस जास्त पडतो. चार वर्षांनंतर तो कालावधी एक दिवस इतका होतो. त्याचे समायोजन करण्याकरिता हा एक दिवस फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी धरतात. त्यामुळे एरवी २८ दिवसांचा असणारा फेब्रुवार महिना त्यावर्षी (लीपवर्ष) मात्र २९ दिवसांचा असतो. ज्या इसवी सनाला ४ ने नि:शेष भाग जातो, ते वर्ष अर्थातच 'लीप इयर' मानले जाते. मात्र बाल एक अपवाद असा की जे इसवी सन पूर्ण शतक असेल त्याला सोबत ४०० नेही भाग गेला पाहिजे, तरच ते लीप वर्ष होते. ४ ने भाग जात असेल पर ४०० ने निःशेष भाग जात नसेल तर ते लीप वर्ष मानले जात नाही. उदा. इसवी सन १९०० ला ४ ने नि:शेष भाग जात नाही म्हणून इसवी सन १९०० हे लीप वर्ष नाही, २००० ला ४ ने, तसेच ४०० या दोन्ही संख्यांनी भाग जात असल्याने ते मात्र लीप वर्ष आहे.
→ मूल्ये
• विज्ञाननिष्ठा, नियमितपणा
→ अन्य घटना
• इंग्रज व मराठे यांच्यामध्ये पुरंदरचा तह १७७६.
• • भारतरत्न मोरारजीभाई देसाई यांचा जन्म -१८९६.
→ उपक्रम
• आपल्या गावचा सूर्योदय व सूर्यास्त कसा काढावा ते शिकविणे.
• आकाश निरीक्षण करण्यास सांगणे, ग्रहतारे यांची ओळख करून देणे.
• कालगणनेविषयीची अन्य माहिती देणे.
• भास्कराचार्य, आर्यभट्ट या भारतीय ज्योतिर्विदांची माहिती देणे.
→ समूहगान -
• पेड़ों को काटते हो, दो पेड लगाके देखो ना...
→ सामान्यज्ञान -
• भारतात चांद्रमास मानला जातो. चंद्र व सूर्य ज्या दिवशी एका नक्षत्रात असतात ती अमावस्या. तेथून १२ अंश पुढे जाण्यास जो कालावधी लागतो ती प्रतिपदा. पुढे प्रत्येकी १२ अंश पुढे जाण्यासाठीच्या कालावधीत त्या पुढील तिथी येतात. याप्रकारे चांद्रवर्ष ३५४ दिवस ८ तास ४८ मिनिटे २४ सेकंद इतके असते. त्यामुळे प्रतिवर्षी जी सुमारे ९ दिवसांची घट पडते ती दर तिसऱ्या वर्षी एक अधिक मास मानून दूर केली आहे.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
→ उपक्रम
• मुलांकडून वर्ग व परिसर सफाई करवून घेणे, कस्तुरबांचे चरित्र जाणून घेणे.
समूहगान -•
साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना....
सामान्यज्ञान
• जगातील काही नद्या व त्यांची लांबी.
• अॅमेझॉन - द. अमेरिका - ६७१२ कि. मी.
• कांगो - आफ्रिका - ४६४० कि. मी.
• मिसिसिपी - अमेरिका - ५९३६ कि. मी.
• गंगा भारत २६४० कि. मी.
.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा