४ फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
- देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना...
• श्लोक
• - दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥
। पापाचा अंधार नष्ट होवो; आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशाने सर्व विश्व उजळो, मग जो जो प्राणी जे जे इच्छिल, ते ते त्याला लाभो
. • चिंतन
- देश हा देव असे माझा । ज्ञानेश्वरी पसायदान. 1- जिजाऊ (• जय-क जसा व्यक्तीचा भाव तसा त्याचा देव असे म्हणतात. त्यामुळे नाना धर्मांचे, पंथाच लाक त्याच्या सामाजिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक परंपरा व अनुभव यांमधून परमेश्वराचे रूप पाहतात. कुणाचा परमेश्वर सगुण साकार, निर्गुण निराकार, तर कुणाचा परमेश्वर माणूस किंवा निसर्गामधील जीवसृष्टीच्या रूपात साकार झालेला. राष्ट्रभक्ताचा व देशप्रेमी लोकांचा देश हाच देव असती. तो स्वतंत्र, समृध्द असावा. त्या देशामध्ये वास्तव्य करणारे लोक सुख समाधानी असावेत. त्यांची सर्व प्रकारे प्रगती व्हावी यासाठी देशावर मनापासून प्रेम करणारी माणसे अहोरात्र झटत असतात. प्रसंगी देशासाठी प्राणार्पणही करतात.
कथाकाथन '
आधी लगीन कोंढाण्याचं' र म्हणाल्या, "शिवबा ! इथून अवघ्या सहा कोसांवर असलेला कोंढाणा मोगलांच्या हाती असणं ही गोष्ट स्वराज्याला घातक नाही का?" • राजगडावरील आपल्या वाड्याच्या सदरेवर बसलेल्या माँसाहेब एकदा कोंढाणा गडाकडे बोट म्हणाले "माँसाहेब! तुमचे म्हणणे मलाही पटते, परंतु त्या गडाची तटबंदी अतिशय भक्कम असून त्याचा पराक्रमी किल्लेदार हा आपल्यात अडीच-तीन हजार सैनिकांनिशी गडाचे रक्षण डोळ्यात तेल घालून करीत असतो. अर्थात तो गड जिंकणे तेवडेसे सोपे नसले, तरी चार-पाच दिवसांत हाजीची भेट घेऊन तुमची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करतो."तानाजी मालुसरेचे नाव घ्यायला आणि ते तिथे यायला एक गाठ पडताच माँसाहेब म्हणाल्या, "तानाजी ! तुला शंभर वर्षे आयुष्य आहे. शिवबानं तुझं नाव काढताच तू पुढे हजर ! " मुजरा करून तानाजी म्हणाला, 'बाँसाहेब' नुसत्या लांबलचक आयुष्यात मला खरोखरीच गोडी नाही. तसे कावळे व कासवंसुध्दा म्हणे शेकडो वर्षांचं आयुष्य जगतात. आपल्याला विजेसारखं क्षणभर झळाळून, पण घनदाट अंधकार उजळून नाहीसं व्हावंसं वाटतं. पण माँसाहेब, आपल्याला माझी आठवण कशाच्या संबंधात आली शिवप्रभू म्हणाले, "तानाजी ! गड कोंढाणा मोगलांच्या हाती असणं स्वराज्याला धोक्याचं असल्यानं, तो लवकरात लवकर आपल्याकडे अशी माँसाहेबांची इच्छा आहे. पण अगोदर तू मध्येच इकडे का आलास ते सांगातीतल्या मोत्यांच्या अक्षता आपल्या बाराबंदीच्या टाकीतानाजी म्हणाले, "राजे ! परवाच्या मुहूर्तावर माझा मुलगा रायबा याचे लग्न करायचं ठरवलं होतं, पण दुसरं महत्वाचं लक्ष्म अगोदर करायचं ठाल्यामुळं से लग्न पुढे ढकललं. " शिवप्रभू व मांसाहेबांना तानाजीच्या या बोलण्याचा अर्थ समजताच, रायबाचं लग्न अगोदर उरकावं हे त्यांना याचा बराच प्रयत्न केला, पण तानाजी म्हणाले, "आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, " तानाजी मालुसज्यांनी मुलाचे लग्न पुढे ढकलल्याचे घरी कळविले. शेलारमामा व धाकटा भाऊ सूर्याजी यांना ताबडतोब राजगडावर निघून येण्यास स्वतंते याच्या वेषात कोंढाण्यावर जाऊन, तिथल्या सुरक्षाव्यवस्थेतील कच्चे दुवे टेहेळून परत राजगडी आले. मग एका मध्यरात्री निवडक मावळ्यांसह नरवीर तानाजी कलावंतिणीचा बुरूज व हनुमान बुरूज यांमधील गनिमांचा पहारा नसलेल्या - कड्यावरून दोरखंडाच्या - साहाय्याने कोंढाण्यावर चढले व त्यांनी तिथल्या मोगल सैनिकांचे शिरकाण सुरू केले. या हातघाईच्या लढाईत तानाजी विजयी झाले पण उदयभानूच्या तलवारीला बळी पडले. शेलारमामांनी उदयभानूलाही ठार केले व कोंढाण्यावर भगवे निशाण फडकावले. गडावर शेलारमामांनी गवताची पेटवून गड सर केल्याचे महाराजांना कळविले. पण जेव्हा महाराज कोंढाण्यावर आले व त्यांना तानाजी कामी आल्याचे कळले, तेव्हा ते दुःखद स्वरात म्हणाले, "मामा ! गड आला, पण माझा सिंह गेला ! -
सुविचार
खरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी
देशाच्या सख्यत्वासाठी, पडाल्या जीवलगासी तुटी सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही बेचावा
. • युद्धात निर्धार, औदार्य व शांततेत सदिच्छ
• कर्तव्यपूर्ती म्हणजेच मोक्ष - भगवद्गीता. • आपले जीवन हे एक आपणास मिळालेले दान आहे. त्याचे दान करीत राहिल्यानेच त्याचे मोल वाढते. -
दिनविशेष
• तानाजी मालुसरे स्मृतिदिन - १६७० : तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक शूर सरदार, मोगलांच्या यातील कोंढाणा किल्ला घेण्यासाठी तानाजीने स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवले. 'आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाच' असे म्हणून या वीरश्रीने किल्ला घेण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. 'गड आला पण सिंह गेला' असे म्हणत तानाजीची आठवण म्हणून शिवाजी महाराजांनी कोंढाण्या सिंहगड नाव दिले, तानाजीचा स्मृतिदिन म्हणजेच 'सिंहगड' चा जणू जन्मदिनच पुण्याजवळचा गड आजही महाराष्ट्रीयांना तानाजीची आठवण जागी करून देतो.
मुल्ये
देशप्रेम, निष्ठा, शौर्य, त्याग,
→ अन्य घटना
• चिंतामण गणेश व बडोदा येथे जन्म. - १८९३. • कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जन्मदिन - १९०३ • बनारस येथे हिंदु विश्व विद्यालय या संस्थेची स्थापना झाली १९१६. • पदार्थविज्ञानाचे थोर शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा मृत्यू - १९७४. +
•
उपक्रम
गड आला पण सिंह गेला या कथेचे नाटयीकरण करून मुलांकडून ते सादर करून घेणे. • महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या प्रतिकृती / चित्रे | मुलांकडून तयार करून घेणे. • शिवाजी महाराजांच्या जीवनामधील प्रसंगावर आधारित पोवाडे विद्यार्थ्याकडून म्हणवून घेणे.
→समूहगान
• हिंद देश के निवासी अभी जन एक है.....
→ सामान्यज्ञान
महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे •
• कळसूबाई - अहमदनगर १६४६ मीटर उंच साल्हेर नाशिक १५६७ मीटर उंच
• प्रतापगड सातारा १४३८ मीटर उंच - हरिश्चंद्रगड - अहमदनगर १४२४ मीटर उंच तोरणा पुणे १४०४ मीटर उंच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा