५ फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु, गुरूदेवो महेश्वरः....
श्लोक
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी । भेटतु भूता ।। - ज्ञानेश्वरी पसायदान
आणि सर्व मांगल्याचा वर्षाव करणारे जे सेतसज्जनांचे समुदाय, त्यांची भेट या भूतलावर सर्व भूतमात्राला अखंड होवो.
चिंतन
- मन माणसाला कसे वागावे हे शिकवीत असते
लोकवर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अर्थात लोकोपयोगी सदाचारांचा आधार शुध्द मन हेच असते. मन शुध्द करणे म्हणजे त्यास स्वार्थापासून दूर नेणे, त्याला स्वार्थापासून असेल तर चांगल्या विचारावर मन एकाग्र करण्याची मनाला सवय लावावयास हवी. निष्ठेने मन एकाग्र केले पाहिजे. भक्ती हीच सदाचा आहे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर नाम मुखात अखंड राहू दे.
बोधकथा
कान "
श्रेष्ठ मूर्ती' एकदा इराणच्या बादशहाने एका आकाराच्या, एका वजनाच्या व एकसारख्या दिसणाऱ्या एकाच धातु मा बादशहाकडे पाठविल्या व सोबत पत्र दिले. या तीन भूतत श्रेष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ असा क्रम लावून मूर्त्या आमच्याकडे पाठवा, जा कम देऊ शकला नाहीत तर शरणागती पत्करल्याचे पत्र सोबत पाठवा म्हणजे आपल्या दरबारातील हुशारी संपली आहे असे आम्ही स पत्र वाचले. तिन्ही मूर्ती न्याहाळल्या. बराच वेळ त्यांचे निरीक्षण केले, परंतु बादशहाला त्या मूर्तीत कोणताही फरक आढळत नव्हता. शेवटी मूर्तीविताला दाखविल्या. बिरबलाने त्या आपल्या घरी नेऊन त्यांचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले. दुसऱ्या दिवशी तिन्ही मूर्ती त्यांना क्रम देऊन बिरबल दरबारात हजर झाला. बादशहाने आश्चर्याने विचारले, "बिरबल, तू कसा क्रम लावलास ? मला तर यात काही आढळत नाही. बिरबल म्हणाला, 'महाराज ज्या अर्थी या तीन मूर्ती क्रम लावण्यासाठी आपल्या दरबारात आल्या आहेत. त्याअर्थी निश्चितच फरक असणार, हे मी ओळखले. शोधता शोधता मला प्रत्येक मूर्तीच्या कानात आतील एक छिद्र दिसले. मी त्या छिद्रातून एक पातली', "अरे बापरे ! मग काय झालं ?" बादशहाने उत्सुकतेने विचारले, “महाराज, ती तार एका मूर्तीच्या एका कानातून सरळ पोटात तिला मी श्रेष्ठ म्हणून निवडले. कारण ही मूर्ती कानाने सर्व ऐकून पोटात ठेवते. ती सर्वांना सांगत सुटत नाही. त्याची बडबड करीत न कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करीत नाही अशा माणसांचे नेतृत्व करते. अशी माणसे श्रेष्ठ म्हणून ओळखली जातात म्हणून ही मूर्ती श्रेष्ठ || बहोत खूब! आता दुसऱ्या मूर्तीबद्दल सांग." बिरबल म्हणाला, "ही मध्यम क्रमांकाची मूर्ती. हिच्या कानातून घातलेली तार दुसऱ्या बाहेर पडली. ही एका कानाने ऐकलेले दुसऱ्या कानाने सोडून देणान्या माणसांचे प्रतिनिधित्व करते. ही माणसे जे कानाने ऐकतात. त्याचा उपयोग नाहीत. परंतु कुणाचेही नुकसान करीत नाहीत. म्हणून ती मध्यम प्रतीची असतात.' ""अच्छा! आता कनिष्ठ मूर्तीबद्दल सांग." बादशहा उत् म्हणाला, ही तिसरी मूर्ती कनिष्ठ, कारण हिच्या कानातून घातलेली तार तोंडातून बाहेर पडली. म्हणजे ही कानाने ऐकलेले सर्व लोकांना सुटणान्या माणसांचे प्रतिनिधित्व करते, ही माणसे कानाने ऐकलेले गुप्त ठेवीत नाहीत. सर्वांना सांगत सुटतात. बडबड करतात. त्यामुळे कनिष्ठ प्रतीची ठरतात. म्हणून ही मूर्ती कनिष्ठ ! " बिरबलाने दिलेला निकाल ऐकून बादशहा खूष झाला. त्याने त्या तिन्ही मूर्ती त्यांच्या मध्यम, कनिष्ठ अशा चिठ्ठया अडकवून इराणच्या बादशहाकडे पाठवून दिल्या. इराणचा बादशहा खूप झाला. थोड्याच दिवसांत त्याचे स्तुतिमत्र आले. अकबर बादशहाने बिरबलाला बरेच मोठे इनाम देऊन त्याचा गौरव केला.
सुविचार
तुमच्य क. तुमच्या कामावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटतो. म्हणून आपली कृती श्रेष्ठ दर्जाची, बिनचूक, परिपूर्ण, सुंदर आर राहील अशी करा.
• सन्मान, प्रेम, माणुसकी पैशाने विकत घेता येत नाही. त्यासाठी नितळ हृदयाची किंमत मोजावी लागते.
• कामावर तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटतो. म्हणून आपली कृती श्रेष्ठ दर्जाची, बिनचूक, परिपूर्ण, सुंदर अशी राहील अशी करा.
• जेव्हा काय बोलावं असा प्रश्न पडतो तेव्हा सत्यच बोलावं किंवा मौन पाळावे - मार्क ट्वेन बोलून विचारात पाडण्यापेक्षा विचार करून बोलावं.
दिनविशेष
- विष्णुबुवा जोग स्मृतिदिन - १९२० : महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पध्दतशीरपणे पुढे नेण्याचे करणारे संत पु म्हणजे विष्णुबुवा जोग. त्यांचा जन्म पुण्यात १८६४ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नरसिंह व आईचे नाव सरस्वती. दोघेही नावाप्रमाणेच गुण होती. त्यांचे गुण विष्णुबुवांमध्ये उतरलेले. संत वाङ्मयाचा त्यांनी खूप अभ्यास केला. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकारामगाथा आदि ग्रंथावर त्या चांगलेच प्रभुत्व होते. ते अत्यंत निःस्पृह व निर्भीड होते. कोणाकडे काहीही मागायचे नाही व दिले तरी घ्यायचे नाही हा त्यांचा बाणा होता. ते आम ब्रम्हाचारी राहिले. ते बलोपासना करीत असत. वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते तयार करण्यासाठी त्यांनी १९१७ मध्ये आळंदीला वारकरी शिक्षणसंस्था स्थापन केली. त्यांनी सार्थ ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गाथा, हरिपाठ, वेदांतविचार इत्यादि ग्रंथ लिहिले. त्यां चा मृत्यू त्यांना कळला होता. आळंदी येऊन त्यांनी ५ फेब्रुवारी १९२० रोजी देह ठेवला.
-
मूल्ये
• शुचिता, सर्वधर्मसमभाव, भूतदया, समता, निर्भयता.
→ अन्य घटना
• शीख गुरू हरराय यांचा जन्म -
• हिंदू कोडबील सादर - १६३०
• बाबामहाराज सातारकर ऊर्फ नीळकंठ थानेश्वर गोरे यांचा जन्म - १९२६
→ उपक्रम -
• संतांची चरित्रे, त्यातील कथा सांगाव्यात.
• संतांच्या वचनांचा संग्रह करणे. १९५१
• बंगाली कवी करूणानिधान बंदोपाध्याय यांचे शांतीपूर येथे निधन-१९५५.
→ समूहगान
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे....
→ सामान्यज्ञान -
• महाराष्ट्रातील संत व त्यांच्या नावाशी संबंधित असणारी तीर्थक्षेत्रे.
• ज्ञानेश्वर -आळंदी
● सोपानदेव - सासवड
• एकनाथ - पैठण
• गजानन महाराज - शेगाव
• तुकाराम - देहू
• साईबाबा - शिर्डी.
• रामदास - सज्जनगड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा