7 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
प्रार्थना
- देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो....
श्लोक चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । → ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।। - ज्ञानेश्वरी पसायदान कलंकह न असा जो चंद्र किंवा तापहीन असा जो सूर्य, तसे हे साधुसज्जन सर्वांचे सततचे सोयरे आहेत.
→ चिंतन
जे जे भेटें भूत । ते ते मानिजे भगवंत ।। सर्व जीवसृष्टी एकाच परमेश्वराने निर्माण केली आहे. पशुपक्षी, जीवजंतू व माणसे साऱ्यांच्याच ठायी चैतन्य आहे. एकाच कुटुंबात एका मातेच्या पोटी जन्म घेतलेल्या भावंडानी परस्परांशी प्रेमाने, सहकार्याने व सहानुभूतीने वागावे, अशी अपेक्षा असते. या जगात सजीव परस्परावलंबी असतात. वृक्ष पशु-पक्ष्यांना व माणसांना छाया देतात, फळे-फुले देतात, पक्षी गोड गाऊन सर्वांचे मन रिझवतात, प्राणी व जीवजंतू परस्परांवर पोषणासाठी व संवर्धनासाठी अवलंबून असतात. माणसाने जीवसृष्टीविषयी अपार करुणा व दया बाळगावी. हिंसा त्याज्य असावी.
कथाकथन
- 'वांगचे चातुर्य ': ही गोष्ट आहे चीन देशातील एका मुलाची. त्या मुलाचे नाव होते श्वांग चू. एक दिवस श्वांग चू आपल्या | धाकट्या बरणीला शाळेत पोचवावयास निघाला होता. रस्त्याने जात असताना त्याला कुणाचा तरी मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. 'अरे मुला, पळ, ळ लवकर ! पिसाळलेला कुत्रा येत आहे. पळ लवकर, नाही तर कुत्रा चावेल !' श्वांगने इकडे तिकडे पाहिले. एक भला मोठा काळा कुत्रा त्याच्याकडे धावत येत होता, श्वांगला संकटाची कल्पना आली. आता काय करावे? त्याला समजेना. बहिणीला घेऊन पळणे अवघड होते. आपण एकटेच पळ लो तर कुत्र्याच्या तावडीत बहीण सापडेल. येथेच थांबलो तर कुत्रा आपल्या दोघांनाही चावेल. आता काय करावे ? याच क्षणी श्वांगला युक्ती सुचला. त्याने झटकन आपला कोट काढला व तो आपल्या उजव्या हाताला गुंडाळला. त्याने आपल्या बहिणीला आपल्या पाठीमागे घेतले व डाव्या हाताने तिला घट्ट पकडून ठेवले. इतक्यात तो पिसाळलेला भयंकर कुत्रा श्वांगवर चाल करून आला. त्याने आपले पुढचे दोन पाय श्वांगच्या छातीवर ठेवले व त्याला चावण्याचा तो प्रयत्न करू लागला परंतु श्वांगने कोट गुंडाळलेला हात पुढे करून त्या कुत्र्याला जोरात प्रतिकार केला. कुत्रा भयंकर क्रूर बाला होता. श्वांगच्या पाठीमागे असलेली त्याची बहीण अगदी भेदरली होती. श्वांग आणि कुत्रा यांची झटापट चालू होती. इतक्यात काही | लोक धावत आले. त्यांनी त्या पिसाळलेल्या कुत्र्याला लाठ्या काठ्यांनी बदडून काढले व त्याला ठार मारले. श्वांगची व त्याच्या बहिणीची मोठ्याच संकटातून सुटका झाली. तिथे जर लेते लोक श्वांगला म्हणाले, "अरे, हा पिसाळलेला कुत्रा धावत येत होता हे तुला दिसत होते. मग तू पळाला का नाहीस? एखाद्या घरात तरी शिरायस." श्वांग म्हणाला, "मी कसा पळणार? एकटा असतो तर पळालो असतो. पण माझ्याबरोबर असलेली माझी ही धाकटी बहीण पळू शकली नसती. मी वाचलो असतो पण माझी बहीण कुत्र्याच्या तावडीत सापडली असती. कुत्रा तिला चावला असता म्हणून मी तिला माझ्या पाठीमागे धरून ठेवलं व उजव्या हातावर कोट गुंडाळून कुत्र्याला प्रतिकार केला." श्वांगाने आपल्या हातावर कोट गुंडाळला होता. त्यामुळे त्या कुत्र्याचा एकही। दात त्याला नागला नव्हता. श्वागाने मोठ्या चातुर्याने, धाडसाने आपले व आपल्या बहीणीचे रक्षण केले. लोकांनी त्याचे खूप खूप कौतुक केले.. कोणतेही सट असता गोंधळून न जाता संकटाला धैर्याला तोंड दिले पाहिजे. श्वांगने प्रसंगावधान दाखविले नसते तर त्याचे आणि त्याच्या बहिणीचे प्राग वाचले नसते.
→ सुविचार
• एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ । 'प्रामाणिकपणे जगण्याचे सर्वांनी ठरविले, तर समाजाची दुःखे व पातके नाहीशी होतील. • निःस्वार्थी, निर्वेर व निर्मत्सर मनुष्य सर्वांना आवडतो.'
→ दिनविशेष
• चक्रधर स्वामी स्मृतिदिन - १२७४: गुजरातमधील भडोच येथील राजाचा विशालदेव हा प्रधान होता. त्याचा मुलगा हरिपाळदेव. पुढे पत्नीने जगारासाठी दागिने देण्याचे नाकारले म्हणून त्याला विरक्ती आली. रामटेक यात्रेचे निमित्त करून तो ऋध्दपूर (जि. अमरावती) येथे आला. तेथील विरक्त पुरुष व ईश्वरावतार गोविंद प्रभू यांची व त्याची भेट झाली व तो गोविंद प्रभूंचा शिष्य बनला. गोविंद प्रभूंनीच त्यांचे नाव 'चक्रधर' केले. मोर्शीजवळ सालबर्डीच्या डोंगरावर त्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली. विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा या प्रदेशात चक्रधरस्वामी सतर फिरत अस त्यांना गुजराथी, संस्कृत व मराठी भाषा उत्तम येत. त्यांनी शिष्यांना मराठीत ग्रंथरचना करण्याची प्रेरणा दिली. सत्य, समता व अहिंसा या तीन तांचा प्रचार व प्रसार त्यांनी केला. ते कोणताही भेद मानत नसत. त्यांनी स्थापन केलेल्या पंथाला 'महानुभाव पंथ' म्हणतात.
→ मूल्ये
• भूतदया, शुचिता, समता.
→ अन्य घटना
• रसायन शास्त्रातील सुप्रसिध्द आवर्त सारणी (पिरिऑडिक बल) चा संशोधक मेंडेलेव्ह दमित्री यांचा जन्म १८३४. -
• सुप्रसिध्द तेलगू कवी व संशोधक वेटुरी प्रभाकर शास्त्री यांचा जन्म १८८८
• फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू - १९६५. चक्रधर स्वामींच्या कथा सांगणे.
• • मुलांना त्यांनी प्राणिमात्राप्रति दाखविलेल्या भूतदयेच्या अनुभवांचे लिखाण करण्यास सांगणे.
→ उपक्रम
चक्रधर स्वामींच्या कथा सांगणे. • मुलांना त्यांनी
प्राणिमात्राप्रति दाखविलेल्या भूतदयेच्या अनुभवांचे लिखाण करण्यास
.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
→ समूहगान
• धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं......
→ सामान्यज्ञान
महानुभाव पंथीय लेखक त्यांचे ग्रंथ
• म्हाईंभट लीळाचरित्र, ऋध्दिपूरचरित्र
• केसोबास रत्नमालास्तोत्र.
• केशीराज दृष्टान्तपाठ, सिध्दान्तसूत्रपाठ महादाइसा धवळे, मातृकी रूक्मिणी स्वयंवर
..
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा