१५ मार्च
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉सरळ सेवा भरती ।। General knowledge
👉 आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
• प्रार्थना
• - सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना...
→ श्लोक
(दोहे) - रविदास सत्त करि आसरे, सदा सत्त सुख पाय । सत्त इमान नहिं छोडिए, जग जाय जऊ जाय ।। - रविदास दर्शन
सत्याने, प्रामाणिकपणे वागणारा मनुष्यच खरा सुख उपभोगू शकतो. यासाठी सत्याचा' - प्रामाणिकपणाचा मार्ग कधीही सोडू नये. जग कितीही बिघडलेलं असेल, कोणत्याही मार्गाने जात असेल परंतु आपला सत्याचा, प्रामाणिकपणाचा मार्गं मनुष्याने सोडू नये.
→ चिंतन-
खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख कूपातिल मी मंच मंडूक - केशवसुत माणसाने कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. थोड्याफार यशाने हुरळून न जाता अतृप्त मनाने प्रगतीचा ध्यास घेतला पाहिजे. तरच यश पदरी येते. म्हणूनच अशी माणसे जगात नावलौकिक संपादन करून अमर होऊन राहतात.
कथाकथन
- 'आपले राष्ट्रीय पंचांग' : आपल्या देशाच्या निरनिराळ्या भागात निरनिराळ्या कालगणना प्रचलित होत्या. घेतला पंचांगे वापरात होती व आहेत. त्या जुन्या गणितावर आधारलेल्या असल्याने ऋतूचक्राशी, सौरवर्षमानाशी मेळ असणारे एकही पंचांग नव्हते. भारतात त्यानुसार अनेक सर्वत्र एकच शास्त्रशुध्द पंचांग असावे या हेतूने केंद्र सरकारने नोव्हेंबर १९५२ मध्ये डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक पंचांग सुधारणा समिती स्थापन केली होती. त्या समितीने चांद्रमास, सौरमास आणि प्रत्यक्ष आकाशातील ग्रहांची स्थिती यांचा शास्त्रशुध्द मेळ घालून आदर्श अशा कालगणनेचे पंचांग सुचविले. ते केंद्र सरकारने मान्य करून २२ मार्च १९५७ पासून भारतीय सौर पंचांग सुरू केले. ही सौर वर्षगणना अशी आहे. (१) सूर्य वसंत संपातावर ज्या दिवशी येतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन वर्षाचा आरंभ धरावा. २) प्रचलित शालिवाहन वर्षगणना या सौर पंगासाठी स्विकारावी. ३) चैत्र वैशाखादी भारतीय महिन्यांची नावे या वर्ष गणनेसाठी द्यावी. फक्त भाद्रपदा ऐवजी 'भाइ' आणि मार्गशीर्ष ऐवजी 'अग्रहायण' अशी नवी दोन नावे असावी. ४) चैत्र या वर्षारंभाच्या महिन्याचा प्रथम दिन २२ मार्च रोजी दरवर्षी असतो. प्लुत (लीप वर्षी तो २१ मार्च रोजी असतो. ५) प्रत्येक वर्ष ३६५ दिवसांचे असेल. त्यात वैशाख ते भाद्र हे ५ महिने ३१-३१ दिवसांचे आणि चैत्र आणि कार्तिक ते फाल्गुन है ३ महिने ३०-३० दिवसांचे असतील. प्लुत वर्षी चैत्र महिन्याचे ३१ दिवस असतील व ते वर्ष ३६६ दिवसांचे असेल. ६) शालिवाहन शकाच्या वर्षगणनेच्या संख्येत ७८ मिळवून त्या संख्येला ४ ने नि:शेष भाग जात असेल तर ते प्लुत वर्ष धरले जाईल. तसेच ज्या पूर्ण शतक संख्येत ४०० ने निःशेष भाग जाईल तेच पूर्ण शतक संख्येचे वर्ष प्लुत वर्ष धरण्यात येईल. पूर्ण शतक संख्येला ४०० ने निःशेष भाग जात नसल्यास ते प्लुत वर्ष नसेल. (७) दिवसाचा प्रारंभ मध्यरात्रीपासून मानला जाईल. धार्मिक कार्यात तो सूर्योदयापासून मानावा. ८) उज्जयिनी येथील मध्यरात्रीची वेळ भारतभर प्रमाण वेळ मानण्यात येईल. ९) धार्मिक कार्यासाठी चांद्रमास घ्यावे. ज्या सौरमासात शुक्ल प्रतिपदा येईल. त्या सौरमासाचे नाव त्या चांद्रमासाला द्यावे. सौरमासात दोन शुक्ल प्रतिपदा आल्यास पहिलीचा चांद्रमास हा अधिक मास व दुसरीचा चांद्रमास निजमास धरण्यास येईल. केंद्रसरकारच्या प्रकाशन विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय पंचांग केले जाते. परंतु जगात सर्वत्र ख्रिस्ती कालगणनाच मानली जात असल्याने केंद्र सरकारही अजून त्याच कालगणनेचा अवलंब करीत आहे. जेव्हा शासकीय स्तरावर भारतीय सौर कालगणनेचा अवलंब केला जाईल | तेव्हाच जनतेतही ते प्रचलित होईल.
→ सुविचार
प्रतिकूल परिस्थितीबद्दल तक्रार न करता तिच्यावर मात करण्यासाठी झटत राहा.
→ दिनविशेष
- क्रांतिकारी युगप्रवर्तक कांशीरामजी जयंती - १९३४ : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तनांच्या जाणिवेशी ज्यांची नाळ जुळली गेली ते म्हणजे ब. स. पा. चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष कांशीरामजी होत अत्यंत कर्तव्यकठोर शील स्वभावाचे तसेच आपत्तीजनक स्थितीतून लोकशाहीला सलामत ठेवणारा वळण बिंदू म्हणजेच कांशिरामजी 'समाजाचे मी काही देगे। लागतो' ही अहंतारहिर सक्षम जाणीव प्रथमच त्यांनी 'पे बँक टु दि सोसायटी' या निर्मितीक्षम सुत्राने बामसेफच्या माध्यमातून करून दिली; आणि बुद्धिजीवींना आपल्या नैतिक जबाबदारीसाठी कार्यप्रवण केले. 'जाती तोडो-समाज जोडो' हा त्यांचा नुसता नारा नसून लढा होता. त्यांनी सम्राट अशोक व बाबसाहेबांच्या समता संगरात स्वतःला जीवंत गाडून घेऊन सर्व संघपरित्याग केला. बहुजनांसाठी संघर्ष करणारे कांशीरामजी दि. ९ ऑक्टो. २००६ रोजी अनंतात विलिन होऊन जगभर अजरामर झाले. त्यांच्यानंतर चळवळीची (ब. स. पा)ची धुरा उत्तराधिकारी सुश्री बहेन मायावती यांनी सांभाळली.
→ अन्य घटना -
• रशियाच्या झारने राज्यत्याग केला. थोर क्रांतीकारी युगप्रवर्तक कांशीरामजी यांचा जन्मदिन मान्य केला. - १९४६ • आंतरराष्ट्रीय ग्राहकदिन, - १९१७
• बसपाचे माजी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे - १९३४
• ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमन्ट अँटली यांनी भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा हक
→ मूल्ये
• स्वाधीनता, कर्तव्यनिष्ठा 1 पवतराग रॉकी कॉकेशस आल्प्स ऑस्ट्रेलियन आल्प्स
→ उपक्रम
• पंचांगाची माहिती मिळवा. विविध दिनदर्शिकांची कात्रणे जमवा.
→ समूहगान
• झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान....
→ सामान्यज्ञान
• गॅलिलिओने १६१० मध्ये मंगळ या ग्रहाचा शोध लावला. सूर्यापासून आरंभ केल्यास याचा चौथा क्रमांक लागतो. सूर्याची प्रदक्षिणा तो अंडाकृती मार्गाने चालतो. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मंगळास (पृथ्वीवरील) ६८६ दिवस २३.५ तास लागतात. त्याला फोबस व डायमॉस नावाचे दोन चंद्र आहेत. मंगळावरील आवरण लोखंडाच्या ऑक्साईडचे असल्याने लाल दिसतो.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉सरळ सेवा भरती ।। General knowledge
👉 आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा