17 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ
* प्रार्थना-
* राम रहीम को भजनेवाले, तेरे है बंदे ख़ुदा या...
श्लोक
- दीन दुःखी के हीत जउ, वारे अपने प्रान । 'रविदास' उह नर सूर कौ, सांचा छत्री जान ॥ - रविदास दर्शन
- दीन -दुःखी लोकांचे दुःख नष्ट करण्यासाठी जे झटतात, चंदनासारखे झिजतात, आपल्या प्राणाचे बलिदान देतात तेच खरे शूरवीर आहेत, क्षत्रिय आहेत. इप-जिजाऊ
→ चिंतन
- शिकण्याची इच्छा आहे, ज्ञानलालसा आहे पण चित्त एका ठायी गुंतले नाही तर यश हुलकावणी देते. प्रयत्न विफल होतात. अर्जुनासारखी मनाची स्थिरता, एकाग्रता हवी. - मनाची एकाग्रता.
कथाकथन '
सयाजीराव गायकवाड' ज्यांचे यथार्थ वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले. त्या प्रजाहितदक्ष, ज्ञानोपासक व समाजसुधारक सयाजीराव गायकवाडांचा जन्म .: (जन्म १७ मार्च १८६३, मृत्यू फेब्रु. १९३९) हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा असं नाशिक जिल्हयातील कवळाणे गावी झाला. सयाजीरावांचे मूळ नाव गोपाळ. ते त्या गावच्या काशीराम गायकवाडांचे द्वितीय पुत्र. पण, बडोद्याचे दिवंगत राजे खंडेराव गायकवाड यांच्या पत्नी जमनाबाई यांनी घराण्यातल्या एखाद्या चांगल्याशा मुलाला दत्तक घ्यायचे ठरविले आणि अशा । काही मुलांना बडोद्यास आणवून त्यांना विचारले, 'तू इथे कशासाठी आला आहेस?' त्या त्यांच्या प्रश्नाला फक्त गोपाळनेच उत्तर दिले. 'बडोद्याचा राजा होण्यासाठी' या व इतर प्रश्नांना त्याने दिलेली समर्पक उत्तरे ऐकून जमनाबाई प्रभावित झाल्या आणि त्याची निवड होऊन दि. २७ मे १८७५ रोजी दत्तक समारंभ झाला व गोपाळ हा बडोदे संस्थानचा भावी राजा सयाजीराव खंडेराव गायकवाड बनला. बडोद्याचे दिवाण सर.टी. माधवराव यांनी सयाजीराव हे आदर्श राज्यकर्ते व्हावे या दृष्टीने योग्य शिक्षकांकरवी त्यांना आवश्यक ते सर्व शिक्षण दिले व मूळच्या बुध्दिवान असलेल्या सयाजीरावांनी ते भराभर ग्रहण केले. दरम्यान, त्यांचा विवाह चिमनबाईशी झाला. वयाच्या | अठराव्या वर्षी त्यांना राज्याभिषेक झाला व त्यांनी राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. राजपद स्वीकारताच त्यांनी उत्पन्नाची नवनवीन साधने शोधून काढून अवघ्या तीन-चार वर्षात राज्याला असलेले जुने कर्ज फेडले व सरकारी तिजोरीत दीड कोटी जमा केले. स्वतंत्र शिक्षण खाते, वैद्यकीय खाते, महाविद्यालय यांची स्थापना करून हरिजनांसाठी खास शाळा असतिगृह काढली. बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेचे ते संस्थापक आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. गरीब पण बुध्दिमान मुलांना शिष्यवृत्या दिल्या. प्रत्येक गावात ग्रंथालय काढले. प्राचीन उत्तमोत्तम ग्रंथांच्या प्रकाशनासाठी स्वतंत्र संस्था काढली. मिश्रविवाहाला मान्यता अटळ परिस्थितीत पटस्फोटाला मान्यता, कन्याविक्रय बंदी, स्त्रियांना वारसाहक्क, सुरखाबंदी, बालविवाह बंदी, अस्पृश्यता बंदी असे अनेक लोककल्याणकारी कायदे करून राज्ययंत्रणेत खालपासून वरपर्यंत शिस्त आणली. प्रगत अशा परदेशात प्रवास करून ज्या-ज्या देशात त्यांना विशेष चांगले असे दिसले, ते ते आपल्या राज्यात आणण्याची पराकाष्ठा केली. हिंदूंमधील विषमता दूर व्हावी म्हणून कुठल्याही जातीच्या माणसाला पौरोहित्य शिकण्याची व परीक्षा देऊन तो व्यवसाय करण्याकरिता सनद मिळविण्याची व्यवस्था केली. त्यांचे राष्ट्रीय नेत्यांशीच नव्हे, तर जगातील अनेक राष्ट्रांच्या नेत्यांशी स्नेहसंबंध होते. त्यांचा मुंबईत मृत्यू झाला.
→ सुविचार
• मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआप घडते. म. गांधी.
दिनविशेष
अतिविचारांची सवय लागली की उचित कृती आपोआप घडते. म. गांधी, चपळूणकर मृदन - १८८२", "विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जन्म पुणे येथे २० मे १८५० रोजी झाला. साहित्यातून विचारजागृती करण्यात आणि अध्ययन अध्यापन करण्यात त्यांनी आपली उभी हयात वेचली. विष्णुशास्त्रींच्या लेखणीत विलक्षण सामर्थ्य होते. युवा पिढीत स्वत्व, स्वाभिमान जागृत करण्याचे काम आपल्या लेखणीच्या सामथ्र्यनि त्यांनी केले. सरकारी नोकरीचा त्याग करून निबंधमालेच्या रूपाने सदविचार पेरण्याचे महान कार्य त्यांनी केले. आपल्या लेखणीच्या फटकाऱ्याने व प्रखर ज्वलंत विचारांनी साऱ्या समाजाला त्यांनी खडबडून जागे केले. इंग्रजांचे अंधानुकरण अणि दडपशाहीमुळे अंगी मुरलेली लाचारी यामुळे समाज पोखरला गेला होता. या समाजाला खडबडून जागे करण्याचे काम त्यांच्या निबंधमालेने केले. समाजाला बहुश्रुत करण्याचा, अनुभवसंपन्न करण्याचा प्रयत्न त्यांनी केसरी, मराठा आणि निबंधमालेच्याद्वारे केला. अवघ्या ३२ वर्षांच्या जीवनात त्यांनी मराठी साहित्यक्षेत्रात, समाजजीवनात मौलिक कामगिरी केली; १७ मार्च १८८२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
. मूल्ये -
• राष्ट्रप्रेम, समता, शुचिता
→ अन्य घटना -
• सत्येंद्रगडावर मच्छिद्रनाथांनी समाधी घेतली १२१०
• खंडेराव होळकर स्मृतीदिन १७५४ -
• सयाजीराव गायकवाड जन्मदिन - १८६३
• नरसिंहाचार्य पुरोहित तिरत्रारायण अय्यंगार यांचा जन्मदिन - १९०५
• आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पंडित रा. ना. दांडेकर यांचा जन्मदिन - १९०९
• आदिवासींच्या उन्नतीसाठी स्वतःला संपूर्णपणे वाहून घेणाऱ्या थोर कार्यकर्त्या अनुताई वाघ यांचा जन्म - १९१० दैनिक देशोन्नती वृत्तपत्राचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे जन्मदिन - १९५४
• चौथी लोकसभा अस्तित्वात आली - १९६७
→ उपक्रम -
• सर सयाजीराव गायकवाडांचे चरित्र वाचा.
• निबंध स्पर्धा आयोजन
• चिपळूणकरांच्या चरित्राचा परिचय व्याख्यान 1.
→ समूहगान
• हा देश माझा याचे भान, जरासे राहू दयारे....
→ सामान्यज्ञान
• विविध प्रकारची पाने, फुले, फळे आणि मध हे सर्व एकत्र चघळून, चावून त्याच्या मिश्रणाचे लाडू वानर तयार करतात आणि वाळवून झाडांच्या ढोलीत ठेवतात. अन्नटंचाईच्या काळात आपल्या पिलांसाठी वानर या लाडवांचा उपयोग करतात.
.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉सरळ सेवा भरती ।। General knowledge
👉 आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा