१८ मार्च
→ प्रार्थना
प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पाये सुख लाये...
→ श्लोक
(दोहे) अब हम खूब चलन घर पाया । ऊंचा खेर सदा मन भायी वेगमपुर सहर को नाऊँ, दुःख अंदोह नहीं तेहि ठाँऊ 11 - संत गुरू रविदास
वाणी शहरात कोणताही शोक नाही, दुःख नाही, जातीभेद नाही, शंका नाही, शोषण नाही, चिंता नाही अशा प्रकारचा देश मला हवा आहे.
→ चिंतन
स्त्री म्हणजे शक्ती पण तो अनेक कारणांनी दडपली गेली. या शक्तीला संधी मिळणे आवश्यक आहे. मुळात स्त्रीलाच आपल्या शक्तीची जाणीव होणं गरजेचं आहे. म्हणजे ती या शक्तीचा विधायक उपयोग करून समाज घडवेल. या शक्तीची जाणीव तिला शिक्षणातून हो गरज आहे.
→ कथाकथन
'कोणी श्रीमंत तर कोणी गरीब का ?' : एक दिवस बादशहाने विचारले की, 'या जगात कोणी श्रीमंत आहे तर कोणी गरीब | असं का? सगळे लोक म्हणतात की, ईश्वर सर्व जगात श्रेष्ठ आहे. या जगातील सर्वजण त्याची लेकरे आहेत. पण वडील जशी आपल्या मुलाची काळजी घेतात तसा ईश्वर आपल्या लेकरांची का काळजी घेत नाही. कुणाजवळ पुष्कळ पैसा असतो; तर कुणाकडे रोजची पोट भरायची भ्रांत असते यावर बिरबल म्हणाला, 'सरकार, असं जर ईश्वराने नाही केलं तर चालणार नाही. आता बघा, तुम्ही राजे आहात. एका दृष्टीने तुम्हीही प्रजेचे ि आहात. तर आपण सगळ्यांकडून खूप काम करवून घेऊन कुणाला हजार, कुणाला पाचशे, कुणाला पन्नास, तर कुणाला फक्त पाच सात मोहान महिन्याला देता. मग असे का? सगळ्यांना का नाही सारखे देत?" बादशहा यावर काहीच उत्तर देऊ शकला नाही. उलट विचार करू लागला. तेव्हा बिरबलच त्यांना म्हणाला, 'जो जसं काम करतो तशीच मजुरी त्याला मिळते. आणि याच न्यायावर दुनियेचा व्यवहार चालतो. जर असं झालं नाही तर सृष्टी चालणारच नाही आणि अगदी असाच न्याय ईश्वजी करतो. या जगातले लोक दुःखी व्हावेत असं त्याला कधीच वाटत नाही. मनुष्याचे दुःखापासून रक्षण करतो. परंतु जर कोणी सृष्टीचे नियम मोडले त्या गुन्हयाची त्याला शिक्षा होतेच. हा न्याय आहे ईश्वराचा ! बाकी सर्व खोटं आहे. कुणाला जास्त पैसा मिळतो, कुणाला कमी मिळतो. हे त्याचा कष्टावर अवलंबून आहे. जो प्रामाणिकपणे जास्तीतजास्त कष्ट करेल त्याला खूप पैसा मिळेल. तो श्रीमंत होईल. जो कष्ट करणार नाही तो दरिद्री होईल किंवा राहील.' बादशहा या विश्लेषणावर खूप संतुष्ट झाला.
• सुविचार
• प्रबोधन, परिश्रम, संघटन आणि संघर्ष ही परिवर्तनाची वाट आहे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अन्य घटना
• घोर शिक्षणतज्ञ व राजनीती कुंजीलाल दुबे यांचा जन्म १८१६
• इंग्लिश गणितज्ज्ञ ऑगस्टस द मॉर्गन यांचे निधन
• रौलेट अॅक्ट पास झाला - १९९९
• आझाद हिंद सेनेने टिडिडम हे गाव ताब्यात घेऊन भारतभूमीचा तिरंगा फडकवला
उपक्रम
• लेखन पाटील, 'जिजाऊ साहेब' या ग्रंथातून शहाजीराजांविषयी अधिक माहिती मिळवा.
• स्वराज्य संस्थापक ऐतिहासिक व्यक्तींची माहिती मिळवा.
समूहगान
• नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ...
→ सामान्यज्ञान
याची नेहमीच्या वापरातील धातूत सोने जास्त जड आहे. पायात ते तरंगते. घर बांधण्यासाठी वापरल्या जाणान्या ि आकाराएवढी सोन्याची वीट बनविली तर ती सुमारे ३२ किलो वजनाची भरले.
• पनामा कालवा
• - अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा व मध्य अमेरिकेच्या पनामा संयोगभूमीवर बांधलेला हा कालवा १५ १९९४ रोजी जहाज वाहतुकीस खुला करण्यात आला. या कालव्यामुळे अमेरिकेच्या पूर्व किनान्याकडून पश्चिम किनान्यास जाण्यासाठी सुमारे १४,५०० किलोमीटरचा वळसा वाचला.
विषय-विज्ञान
१. खगोलशाखाचा अभ्यास -ॲस्ट्रॉनॉमी
२. ध्वनी लहरींचा अभ्यास -अॅकॉस्टीक्स
३. उड्डाणाचा अभ्यास -एरोनॉटीक्स
४. कीटकांचा अभ्यास- एन्टामॉलॉजी
५. हवामानाचा अभ्यास -मेटरलॉजी
६. आजार / विकार - पॅथॉलॉजी
७. पक्षीजीवनाचा अभ्यास -ऑर्निथॉलॉजी
८. जीव रसायन शास्त्र - बायोकेमिस्ट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा