21 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा
👉आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा
प्रार्थना
प्रार्थना देवा तुला, मिटू देरे वैर वासना...
श्लोक
(ग्रामगीता)- आपण झिजोनि अंगे स्वता । जीवजंतूसि द्यावी प्रसन्नता । सुखी करावी गावाची जनता । हीच सेवा पुण्यकर ।। शरीराने कष्टून प्राणीमात्रांना सुखी करण्यानेच सेवेचे महापुण्य लाभते. - संत तुकडोजी.
जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल तेव्हा हे करा ।। motivational speech
→ चिंतन
- सुख पाहता जवाएवढे दुःख पर्वताएवढे - हे अनुभवी बोल ऐकूनही आपण सुखासाठी आयुष्यभर भटकतो, जीवनात छोट्या मोठ्या सुखांचा हव्यास धरतो. सुख फुलपाखरासारखे आहे. पाठलाग केला तर हुलकावणी देते. हाती गवसत नाही, पण हव्यास धरला नाही तर सहजपणे हाती
कथाकथन
सर्व श्रेष्ठ ? एकदा प्राण, वाणी, नेत्र, कर्ण, मन आणि अन्य सर्व इंद्रिये वादविवाद करू लागली. 'अहं श्रवान अहं बेयान' 'मी देह आहे. मी श्रेष्ठ आहे.' असे म्हणून भांडू लागली. भांडण विकोपाला जाईल असे वाटल्याने ती सारी प्रजापती कडे आली व निर्णय मागण्याच्या - हेतूने म्हणाली. 'भगवंत आमच्यात श्रेष्ठ कोण आहे?' प्रजापती म्हणाले 'ज्याच्या निर्गमनामुळे शरीराचे शव होते. तो तुमच्यात श्रेष्ठ होय.' सर्व प्रथम वाणी मोठ्या तोऱ्यात बाहेर पडली. एक वर्षांने परत आली व अन्य इंद्रियांना म्हणाली 'माझ्या शिवाय तुमचा निर्वाह कसा झाला?' सर्व म्हणाले 'मुका ज्याप्रमाणे प्राणाकडून श्वास घेतो. डोळ्यांनी पहातो. कानांनी ऐकतो व मनाने मनन करतो तसेच आम्ही राहिलो.' वाणीला आपल्या दधार्थ शक्तीची जाणीव झाली व ती शरीरात दाखल झाली. नंतर डोळे मोठ्या गर्वात बाहेर पडले. एका वर्षाने तेही परत आले व त्याने अन्य सर्व इंद्रियांना विचारले 'माझ्या वाचून तुम्ही कसे जीवित राहिलात? सर्वजण उत्तरले 'ज्याप्रमाणे आंधळा माणूस डोळे नसतांनाही प्राणामार्फत प्राण घेतो, बागी मार्फत बोलतो, कानानी ऐकतो आणि मनाने मनन करतो, त्याच प्रमाणे आम्ही जिवंत राहिलो.' नेत्राला आपली योग्यता कळून आली व डोळे शरीरात दाखल झाले. नंतर कान मोठ्या अभिमानाने बाहेर पडले. एका वर्षानंतर परत आल्यावर इतर इंद्रियांना विचारले, 'माझ्या वाचून तुम्ही कसे राहिलात? त्यावेळी सारी इंद्रिये म्हणाली 'एखादा बहिरा ज्याप्रमाणे श्रवणशक्ती नसताना प्राणाने श्वास घेतो, डोळ्यांनी पहातो, मनाने मनन करतो व आनंदाने जीवन जगतो त्याप्रमाणे आम्हीही जगलो.' कानाला आपले सामर्थ्य समजले व ते शरीरात दाखल झाले. त्यानंतर अहंकारी मन शरीराबाहेर पडले. एक वर्षाने परत येऊन त्याने सर्व इंद्रियांना विचारले. 'सर्वांनी उत्तर दिले, एखादे लहान मूल मना वाचून प्राण घेते, डोळ्यांनी पहाते, वाणीने बोलते, कानानी ऐकते व मजेत जीवन जगते.' मनाचा अंहकार गळून पडला व पुनः शरीरात प्रविष्ट झाले.' सर्वांच्या नंतर प्राण बाहेर पडायला तयार झाला. एखादा शक्तीशाली घोडा खूटा उपटून फेकतो त्या प्रमाणे प्राण शरीराला सोडून जातांना अन्य सर्व इंद्रियांची वाईट स्थिती झाली. सारी इंद्रिये व्याकूळ झाली. प्राण निघून जाण्याच्या तयारीत होता. तत्क्षणी इंद्रिये अतिशय विचलीत झाली, निस्तेज व शक्तिहीन झाली म्हणून सारी इंद्रिये प्राणाला म्हणाली 'भगवंत, आपणच सर्वश्रेष्ठ आहात.'
→ सुविचार
• 'ऐक्य हेच वळ' हे सुभाषित नाही तर जीवनाचा सिध्दांत आहे. - म. गांधी.
दिनविशेष
- • प्रख्यात सनई वादक उस्ताद बिस्मिल्लाखाँ यांचा जन्मदिन १९१६ : राष्ट्रीय कीर्तीचे महान कलाकार आणि भारताची साच्या जगात पसरविण्यासाठी अहर्निश कलासाधना करणारे विख्यात सनईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म २१ मार्च १९९६ साली झाला. त्यांनी आपल्या जादूई कलेने सनईत जणू प्राण ओतला आणि या क्षेत्रात आपला वेगळेपणा सिध्द केला. मन आणि बिस्मिल्ला खाँ यांच्यात एक अतूट बहते आहे. अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांनी पहिल्यांदाच जीव ओतून सनईवादन केले आणि रसिकांची मने कायमची जिंकली. नंतर १९३७ मध्ये त्यांच्या वादनकौशल्याबद्दल त्यांना सुवर्ण पदके मिळाली. आपल्या असामान्य कलागुणांमुळे १९५५ साली 'अखिल भारतीय शहनाई चक्रवर्ती' हा किताब प्राप्त केला. सन १९६१ मध्ये पद्मश्री व १९८० मध्ये पद्मभूषण हे किताब त्यांना देण्यात आले. उस्ताद बिस्मिल्लाखाँ यांनी सनईवादनाला बैठकीत स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 'गूंज उठी शहनाई' या चित्रपटातील त्यांचे सनईवादनही फार लोकप्रिय ठरले.
मूल्ये
• आदरभाव, शुचिता.
→ अन्य घटना -
• कलकत्ता येथे पहिले सार्वजनिक ग्रंथालय सुरू झाले. १८३६
• जागतिक वन दिन.
• मुंबई राज्यात हिवताप प्रतिबंधक योजना सुरू करण्यात आली १९५३ मानवेंद्रनाथ रॉय जयंती- १८८७
• दिवस-रात्र समान २१ मार्च
• डॉ. केशव बळीराम हेडगेवार -
→ उपक्रम
• विविध कलांबद्दल माहिती गोळा करणे.
• सनई या वाद्याबद्दल माहिती देणारी कात्रणे जमविणे. -
→ समूहगान
• कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाये जा... -
→ सामान्यज्ञान
• जंगलातील अंतस्थ भागातील शांत ठिकाणी मोरांचा कळप अंदाजे ५०/५५ मीटर व्यासाच्या वर्तुळाकार भागातील गवत - आणि पालापाचोळा खुडून इतका स्वच्छ करतो की, जणू कोणीतरी मुद्दाम झाडून ठेवली असावी. तेथे बरेच मोर पिसारा फुलवून नाचत बागडत असतात. आदिवासी लोक अशा ठिकाणांना मोरनाची म्हणतात. उभ्या उभ्या एकेक पाय उचलून विश्रांती घेता येईल अशी सोय निसर्गानेच घोड्याच्या बाबतीत केलेली आहे. घोड्यांच्या शर्यतीसाठी आठ वर्ष वयापर्यंतचे घोडे वापरले जातात. सेनादलात अजूनही घोड्यावरच्या रपेटीला महत्वाचे स्थान आहे. क्रीडा स्पर्धेतही घोड्यावरच्या कसरतींना महत्त्वाचे स्थान आहे.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉सरळ सेवा भरती ।। General knowledge
👉 आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा
👉आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा