Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

23 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

   २३ मार्च दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

असो तुला देवा, माझा सदा नमस्कार... 


→ श्लोक 

(ग्रामगीता)- माऊलीचे स्वभाव कर्म । तोचि जगी म्हणविला मानव धर्म । माऊली स्वभाव कर्म । म्हणोनिच देव प्रिय लोकां ॥ 

- संत तुकडोजी आईचे सहज स्वभावातून जे कर्म होते त्यालाच जगात 'मानव धर्म' म्हटले आहे. आईचे अतिशय प्रेम सर्वांना परिचित आहे, म्हणूनच लोकांना देवावर प्रेम करावे वाटते. 


→ चिंतन 

- स्वराज्याचे सुराज्य - अनेक प्रसिध्द आणि अप्रसिध्द देशभक्तांच्या अपूर्व त्यागातूनच आपला देश स्वतंत्र झाला. देशाभिमान् दृढसंकल्प, कर्तव्यतत्परता, समर्पण वृत्ती या गुणांचा संचय प्रत्येक देशवासीयात होईल तरच मिळालेले स्वातंत्र्य टिकून राहील. स्वराज्याचे सुराज्य होण्याचे स्वप्न सत्यात उतरेल. स्वराज्याचे सुराज्य व्हावे। म्हणून सदैव प्रयत्नशील राहा.


कथाकथन 

हुतात्मा भगतसिंग' - भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हौताका सरदार भगतसिंगाचा जन्म २८११००जी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबातील भंग या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील किशनसिंग यांना क्रांतिकारी या मात केल्याबद्दल मंडालेच्या तुरुंगात सजा भोगावी लागली होती. भगतसिंग पाच-सहा वर्षांचा असताना खुला शेतावर गेला होता. चुलते होतात पेरणी करू लागले असता छोटा भगतसिंगही पेरू लागला. ते पाहून चुलत्यांनी विचारले, 'भगत, बाली पेरणी करतोस?' यावर तो म्हणाला. श्री बहुकीच्या बिया पेरीत आहे.' 'का?' असा प्रश्न काकांनी विचारला असता भगतसिंग म्हणाला, 'का म्हणजे काय?' या बंदुकीच्या बियांची झाडं झाली की त्यांच्यावर बंदुका येतील आणि मग त्या बंदुकातून गोळ्या झाडून मी इंग्रजांना मारीन व देश स्वतंत्र करीन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बंग येथे झाल्यावर भगतसिंग लाहोरच्या डी.ए. व्ही. व पुढे नॅशनल कॉलेजमध्ये जाऊन १९२३ साली बी.ए. झाले. कॉलेज शिक्षण चालू असतानाच त्यांनी आजन्म अविवाहित राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली. त्याप्रमाणे बी.ए. होताच त्यांनी क्रांतिकारकांच्या संघटनेत प्रवेश केला. पुढे सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास आदि कट्टर क्रांतिकारकांच्या सहाय्याने त्यांनी 'नवजवान भारत सभा' ही संघटना उभी केली. ९ फेब्रुवारी १९३५ च्या रात्री लखनीजवळच्या काकोरी स्टेशनातून सरकारी खजिना देऊन निघालेली एक आगगाडी वाटेत अडवून तिच्यातला सर्व खजिना त्या क्रांतिकारकांनी पिस्तुले खरीदण्यासाठी व बॉम्ब तयार करण्यासाठी बला. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी सायमन कमिशन लाहोर शहरात गेले असता तिथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन सुरू झाले. पोलिसांनी केलेल्या बेदम लाठीहल्ल्यात लालाजींना बराच मार बसला व आजारी पडून त्यातच त्यांचा अंत झाला. याचा सूड घेण्याचे भगतसिंग आदिनी ठरविले व लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या स्कॉटऐवजी गैरसमजूतीने साँडर्सला मारले व मारून पळून जात असता त्यांचा पाठलाग करणाऱ्या चननसिंग यालाही पिस्तुलाने टिपले. पुढे 'डिस्प्युट बिल' व 'पब्लिक सेफ्टीबिल' हे दोन अन्यायकारक कायदे ब्रिटिश सरकारने मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय विधानसभेपुढे आणले असता प्रेक्षा कमी शक्तिशाली बॉम्ब टाकून व ब्रिटिश सरकारच्या धिक्काराची पत्रके भिरकावून, भगतसिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारला हादरून सोडले पण ते पकडले जाऊन त्यांच्यावर खटले भरले गेले व न्यायालयाच्या निर्णयानुसार भगतसिंग, सुखदेव व राजगुरु या तिघांना लाहोरच्या मध्यवर्ती २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. 


→ सुविचार 

•जे देशासाठी झटले, ते अमर हुतात्मे झाले. '


दिनविशेष

 - शिवराम हरी राजगुरू स्मृतिदिन १९३१ | त्यांचा जन्म पुणे खेड (राजगुरुनगर) येथे १३ १९०८ रोजी झाला. १५ व्या वर्षी ते विद्याभ्यासाठी घरातून निघून बनारसला वझे शास्त्री यांच्याकडे गेले. संस्कृत अभ्यास करून ते तर्कतीर्थ झाले. त्यांना संस्कृत साठी बरोबर इंग्रजी, कन्नड, मल्याळम्, हिंदी व उर्दू या भाषा अवगत होत्या. ते उत्कृष्ट कविता करीत. शिवाजी महाराज व त्यांच्या गनिमी याबद्दल त्यांना अत्यंत कौतुक होते, शारीरिक बलोपासनेच्या आवडीने ते अमरावतीच्या व्यायाम प्रसारक मंडळाचे विशारद झाले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव यांच्याशी संबंध आल्यानंतर ते जहाल क्रांतिकारक झाले. सायमन कमिशन विरोधी निदर्शनात पोलिस हल्ल्यात लाला लजपतराय जबर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय पंजाबी क्रांतिनेत्यांनी घेतला. यासाठी चंद्रशेखर आझाद, शिवराम राजगुरु, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. ब्रिटिश पोलिस अधिकारी साँडर्स याच्यावर लाहोरला १९२८ मध्ये हल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. त्यानंतर राजगुरू भूमिगत होते. त्यांना १९२९ मध्ये पुण्यात अटक झाली. भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर त्यांना लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे राजगुरुनगर असे नामांतर करण्यात आले. 


मूल्ये -

 • देशप्रेम, निर्भयता, स्वतंत्रता.


 → अन्य घटना 

 • डॉ. राम मनोहर लोहिया जन्मदिन १९१०.

  • जागतिक हवामान दिन. 

  • थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राज - यांचा स्मृतिदिन. १९३१

   • रावसाहेब इंगोले जन्मदिन १९२३

    • ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळविणारा प्रकाश पदुकोण हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. १९८० 

    • आसामी कवयित्री नलिनी वालादेवी यांचा जन्मदिन. १८९८ 

    • अण्णासाहेब पाटील स्मृती १९८२ लता मंगेशकर व पंडित जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना 'पद्मश्री' पुरस्कार मिळाला. १९१९. - 


→ उपक्रम

 • भगतसिंगांबद्दलची कात्रणे गोळा करा

 . • राजगुरूबद्दल अधिक माहिती मिळवा.

  • अन्य क्रांतिकारकांची माहिती मिळवा. 

  

समूहगान 

• राष्ट्र की चेतना का गान वंदे मातरम्. 


→ सामान्यज्ञान 

• घोरपड झाडांच्या ढोलीत किंवा दगडगोट्यांतून राहत असते. पण, तिची वीण मात्र पावसाळ्यात एखाद्या वारुळात होते.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा