27 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
- मंगलनाम तुझे सतत गाऊ दे....
-
श्लोक
(ग्रामगीता)- नेहमी स्वच्छ धुतलेले नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे घालावे. एकावेळी एकच कपडा अंगावर घालावा. निसर्गाची हवा, सूर्यकिरण शरीराला लागावे.
→ चिंतन-
प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्याला जीवनात अशक्य असे काहीच नाही - परिश्रमाचा परीस लाभल्यावर असाध्य काही उरत नाही. संत तुकारामांनी सांगितलेलंच आहे. 'असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।' सातत्याने प्रयत्न करणाऱ्या लोकांबद्दल रामदासांनी म्हटलेलं आहे. 'यत्नांचा लोक भाग्याचा । यत्नेवीण दरिद्रता ।।
कथाकथन
मुलाकात करावी. बाजारातून सामान आणून द्यायची भाडी प्रवासी करनी- लहान-मोठी कामे करायची. घरात सर्वांनीच एकमेकांना मदत केली की कामे हाकी होत आराम. दहा रूपयांची नोट दिली व वाण्याकडून पाय लिटर तेल आणायला सांगितले रामपाल घराकडे निघाला. थोडासा धांदरट होता. भराभर चालत निघाला. रस्त्यात दगडाचा ठेचकाळता व पडला. सारेच तेल जमिनीवर सांडते *" बाटली फुटली. तो रडतच घरी आला. आई समजली, रामाच्या जीवनात वनवास आहे. म्हणून आनंदाला तिने दहा रूपयांची नोट दिली तेल आणायला सांगितले. तो दुकानात गेला. बाटलीत तेल भरून घेतले. रस्त्यातून सावधपणे चालू लागला. तरीही बाजारातील गल अनामिकाचा धक्का लागला, बाटली हातातून निसटण्यापूर्वीच तोल सावरला तरी वाटलीतले अर्धे तेल साइले पण बाटली बावली. अर्ध तेल राहिले, त्याने आईला वाटेत पडलेली हकीगत सांगितली व म्हणाला, "मी अर्ध तेल व संपूर्ण बाटली वाचविली आहे." आईला अर्थ ल होते. पुरे पाव लिटरच तेल हवे होते. आई समजली, हा संसारात सुख-दुःखे भोगेल पण समाधानात राहील. मनाला तिने बाजारात पाठविले. दहा रुपयांची नोट दिली. तिला पुरे पाव लिटरच तेल हवे हेते व त्याची कामाची पद्धतही पाहयची होती. सदानंद खरोखरच सदानंदी होता. पण त्याच्या बाबतीतही तोच प्रकार घडला. अर्धे तेल घेऊन आला. तोही आनंदाप्रमाणेच पडला होता पण निराश झाला नाही किंवा अर्धे तेल वाचविल्याचा आनंदही त्याने व्यक्त केला नाही. तो म्हणाला, "आई तुला पूर्ण बाटली पाव लिटर तेलाने हवी आहे ना? मी देतो. हे पैसे शिल्लक आहेत तेही तुझ्याकडेच ठेव." "मी बाजारात जातो. काही काम करून पैसे मिळवितो आणि तुला पूर्ण तेलच आणून देतो. थोडा वेळ थांबशील ना?" "सहनशीलता' हा गुण आईला कुणी शिकवावा लागत नाही. आई मनात म्हणाली, 'हा मुलगा निराशावादी नाही आणि आशावादीही नाही कर्मयोगी आहे. वास्तववादी आहे. सत्याचे भान याला आहे. जीवनातील वास्तवता - सत्यदर्शन ज्याला घडते, तो स्वतः तर सुखी राहतोच सुख पाहतो, "मेहनती माणसाला कधीच काही कमी पडत नाही." आई सदानंदाला म्हणाली, निसर्गानि सर्व मानवजात समानच निर्माण केली पण काहींना काही गुण अधिक दिले तर काहींना सारखे गुण पण कमी-जास्त प्रमाणात दिले इतर प्राण्यांपेक्षा मानवाला विवेकशीलता मात्र अधिक दिली. त्यामुळे श्रेष्ठकनिष्ठता गुणाप्रमाणे ठरू लागली. काही स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. काहींच्यावर लोकांकडून श्रेष्ठता लादली गेली काही निसर्गदत्त गुणांनीच श्रेष्ठ ठरले. ज्ञानेश्वर, भगवान येशू, संत तुकाराम, कबीर, शंकराचार्य, विवेकानंद अशी माणसे जन्मतःच निसर्गाची देणगी घेऊन आली. सिंकदर, सम्राट चंद्रगुम, फ्रेडरिक द ग्रेट सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण इ. नी आपल्या मेहनतीने, गुणसंपदेने, विवेकशीलतेने श्रेष्ठ संपादन केली. पण रावण, कंस, कुंभकर्ण, दुर्योधन, तैमूरलंग, नादीरशाह यासारखे स्वतःलाच श्रेष्ठ म्हणवून घेत असतात. कोणत्याही परिस्थितीत माणसाच्या मनाचा समतोल बिघडता कामा नये. म्हणून 'सदानंद, तू जीवनात सदासुखी राहणार आहेस. माझे तुला आशीर्वाद आहेत. आईने प्रेमाने सदानंदच्या पाठीवरून हात फिरविला व त्याला जवळ घेतले.
→ सुविचार
• आई म्हणजे चंदनाची शीतलता, आई म्हणजे आकाशाची विशालता, आई म्हणजे सागराची अथांग. गागरीन स्मतिदिन (१९६८) अंतरिक्षयानातून पृथ्वीभोवती पहिली फेरी मारणारे रशियन अंतराळवीर
दिनविशेष
● अंतराळवीर युरी गागारीन स्मृतिदिन (१९६८) अंतरिक्षयानातून पृथ्वीभोवती पहिली फेरी मारणारे रशियन अंतराळवीर म्हणून युरी गागारीन यांचे नाव इतिहासात सन्मानाने नोंदविले गेले. १२ एप्रिल १९६१ रोजी या साहसी वीराने आपले साहसी उड्डाण करून गाला थक्क करून सोडले. विज्ञानात रशिया जगात पुढे गेला तो गागारीन यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच. मार्च १९३४ मध्ये एका सामान्य । बात सुताराचा मुलगा म्हणून युरी जन्माला आला. औद्योगिक महाविद्यायातील शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर १९५७ मध्ये अरिन्वर्य येथील एव्हिएशन ॲकॅडमीत त्यांनी पदवी संपादली. त्यानंतर अंतरिक्ष यानातून जवळजवळ १०८ मिनिटे ते अंतराळसंचार करीत राहिले. सोव्हिएट वीर म्हणून सन्मानित झालेले हे युगप्रवर्तक ठरले. अंतराळयानाच्या चाचणीत निमग्न असलेल्या या निधड्या छातीच्या साहसी बीराचे २७ मार्च १९६८ रोजी अवघ्या ३४ व्या वर्षी अपघाती निधन झाले.
• मूल्ये
• • निर्भयता, कर्तव्यदक्षता, साहसीवृत्ती, चिकाटी.
→ अन्य घटना -
• जर्मन भौतिकीविज्ञ 'क्ष' किरण संशोधक राँटजेन विल्यम कॉनरॉड जन्मदिन. १८४५
. • विश्वविख्यात हॉकीपटू किशनलाल बाबू स्मृतिदिन. - १९७२.
• गोहाटी - भारत व बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण. - १९८४.
• शिवाजी महाराजांची साथ सोडून मोगलांना जाऊन मिळालेले नेताजी पालकर यांचे सक्तीने धर्मांतर केले गेले. १६६७.
• प्रसिध्द ज्येष्ठ गायक - अभिनेते भार्गवराम आचरेकर यांचे निधन.
→ उपक्रम
• रेडक्रॉस संस्थेची व तिच्या कार्याची माहिती मिळवा.
→ समूहगान 1
बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या.
सामान्यज्ञान
• आतापर्यंतच्या अंतराळ मोहिमांमध्ये रशियाने व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा आणि स्वेतलाना सावेत्स्काया या दोन महिलांनी पाठविले होते. त्या काही काळ अंतराळात राहिल्या होत्या. • परागकण धुळीच्या कणांसारखे सूक्ष्म आकारमानाचे असतात. त्यांच्यात बरीच विविधता असते. सूर्यफूलाचे परागकण वाटोळे, खजुराचे लंबगोल तर गुलाबाचे त्रिकोणी असतात. चौरसे, अर्धगोल आदि आकारांचे परागकणही आढळतात
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा