Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३१ मार्च, २०२४

30 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 30 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 अता वंदिता मी गुरु माऊलीला, अति आदरे मी नमि या पदाला.... 

 

→ श्लोक

 (ग्रामगीता)- जैसे आपण कोणाचे करावे । तैसेचि आपल्या वाट्यास यावे । ऐसेचि आहे स्वरुप बरवे । सहकार्याचे मानवांच्या || - संत तुकडोजी.

  जसे आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडावे तसे दुसराही आपल्या उपयोगी पडेल अशी जाणीव बाळगणे हेच मानवी सहकार्याचे चांगले स्वरूप 

  

→ चिंतन

- गती हाच नेत्रदीपक प्रगतीचा मूलमंत्र. गतीतून साधते प्रगती. गती म्हणजे वेग, नेत्रदीपक प्रगतीकडे वाटचाल, वाटचाल करताना अडचणी येणारच. कसोशीने जीवघेणे क्षण समोर ठाकणारच, सर्वस्व झोकून साधना करणे, हाच कानमंत्र ध्यानी ठेवून वागणे महत्त्वाचे, स्थिती नको. गती हवी.


कथाकथन

 रंगपंचमी फाल्गुन वद्य पंचमीला 'रंगपंचमी' म्हणतात. माद्य शुध्द पंचमी ते चैत्र शुध्द पंचमीपर्यंत वसंतोत्सव असतो. वृंदा | श्रीकृष्णाने गोप-गोपी यांच्या समवेत रंग खेळन रंगपंचमी साजरी केली. त्याची आठवण म्हणून आजही तरूण स्त्री-पुरूष एकमेकांच्या अंगावर उधळण करून, गुलाल फेकून हा सण साजरा करतात. असे आणखी किती तरी सण-उत्सव आपल्याकडे आहेत. इतर धर्म-पंथातही असे सण आहे हे सगळेच सण-उत्सव आपणास आनंद देणारे असतात हे खरेच, पण सण म्हणजे नुसती मौजमजा करणे, गोडधोड खाणे व सुट्टी असल्यास तो दिव कसा तरी चालविणे हे बरोबर नाही. आपण या सर्व सणांचा नीट अभ्यास केला पाहिजे. ऐक्याची, कौटुंबिक संस्कृतीची मूल्ये, तत्त्वे, पूर्वजांचा त्या पराक्रम, आपली श्रेष्ठ दैवते, थोर युगपुरूष, आपला प्राचीन इतिहास अशा अनेक गोष्टींचे ज्ञान आपणास या सणातून होत असते. हे सण-उत्स मनावर सुसंस्कार करतात, अशा दृष्टीने आपण या सणांकडे पाहिले पाहिजे. यातून आपण आनंद घेतला पाहिजे. इतरांना तो दिला पाहिजे. यासाठी हे सण आणि उत्सव असतात. 

 

-> सुविचार - -

- • हसा, खेळा पण शिस्त पाळा. 

• तुझी पिचकारी माझ्या अंगावरी, विसरू हेवे दावे सारी प्रेमाने जाऊ रंगून टाकू देह भिजवून, खेळखेळू मौजन


 → दिनविशेष - 

 • रघुवीर मुळगावकर यांचा स्मृतिदिन (१९७६): रंगसम्राट म्हणून मान्यता पावलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद | रघुवीर मुळगावकर हे मूळचे गोव्यातील त्यांचा जन्म १९२१ मध्ये झाला. त्यांचे वडील शंकरराव मुळगावकर हे गोव्याचे ख्यातनाम छायाचित्रकार होते. काळ्या रंगाच्या पावडरच्या साहाय्याने आपल्या कलेच्या किमयेने ते चित्रातील छायाप्रकाशाला पूर्णत्व आणत अ रघुवीर मुळगावकरांनी आपल्या वडिलांपाशी कलेचे पहिले धडे गिरविले. अथक परिश्रम, कलासाधना यांच्या बळावर अफाट त्यांनी मिळविली आणि व्यावसायिक चित्रकलेचे क्षेत्र पादाक्रांत केले. त्यांनी कित्येक हजार चित्रे लोकाग्रहास्तव रेखाटली. अठरा-अशा ते आपल्या कलासाधनेत रमत,रंगत असत. त्यांच्या कसबी कलानैपुण्यामुळेच श्रीनंद शंकराचार्यांनी त्यांना 'रंगसम्राट' ही पदवी बहाल के ३० मार्च १९७६ रोजी मुंबई येथे त्यांची प्राणज्योत मालवली.

 

→ मूल्ये निसर्गप्रेम, आदरभाव, शुचिता.


 → अन्य घटना 

 • वीर मुरारबाजी यांना पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढा देताना वीर मरण. १६६५. खालसा पंथाची स्थापना १६१९

  • शरीराचा थोडासा भाग बधीर करून शस्त्रक्रिया करण्याचा पहिला प्रयोग क्रॉफोर्ड लॉग या शास्त्रज्ञाने अमेरिकेमध्ये केला. १८४२. 

  - • झेलड ते भारत अशी विमानमार्गे साप्ताहिक टपालसेवा सुरू करण्यात आली. - १९२९. 


→ उपक्रम 

• रघुवीर मुळगावकरांच्या कलेविषयी माहिती मिळवा.

 • विख्यात चित्रकारांच्या माहितीची कात्रणे जमवा. 


→ समूहगान

 • हम भारत की नारी है, फूल नहीं चिनगारी 


सामान्यज्ञान 

• वनस्पतीपासून रंग मिळविण्याची कला फार प्राचीन आहे. हे रंग अतिशय पक्के असतात. हजारो वर्षे जसेच्या तसे वनस्पतीच्या मूळ, खोड, पाने, फुले, फळे, बिया या सर्वांपासून रंग काढून वेगवेगळ्या उपयोगासाठी वापरले जातात. 

• खनिज, रासायनिक शरीरात रासायनिक क्रिया घडून पेशींचा नाश होण्याची प्रक्रिया सुरू होते. सर्वात जहाल वीष सायनाईड. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे होऊन प्राणवायूचे वहन हे कार्यच थांबते, अर्थातच पेशींना होणारा प्राणवायू पुरवठा बंद होतो. त्यामुळे या प्रकारात तात्काळ तडकाफडकी मृत्युयेतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा