Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १८ मार्च, २०२४

आठवी इतिहास 4.1857 चा स्वातंत्र्यलढा

   4.1857 चा स्वातंत्र्यलढा


स्वाध्याय

प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :

1.------- यांनी रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले.

(1) बक्षी जगनबंधू विद्याधर


(2) उमाजी नाईक


(3) मंगल पांडे


(4) नानासाहेब पेशवे


उत्तर-उमाजी नाईक

_______________

2. ------मधील संथाळांनी इंग्रज राजवटीविरोधात सशस्त्र उठाव केला.


(1) महाराष्ट्र


(2) तमिळनाडू


(3) बिहार


(4) राजस्थान


उत्तर-बिहार

____________

3. पाइकांच्या उठावाचे नेतृत्व करणारे-------


(1) बक्षी जगनबंधू विदयाधर


(2) मंगल पांडे


(3) उमाजी नाईक


(4) नानासाहेब पेशवे


उत्तर-बक्षी जगनबंधू विदयाधर

_______________________

4. रामोशी बांधवांना संघटित करून बंड घडवून आणणाऱ्या उमाजी नाईक यांना -----मध्ये फाशी देण्यात आली.


(1) 1806


(2) 1832


(3) 1856


(4) 1857


उत्तर-1832

__________

5. पुढीलपैकी चुकीची जोडी निवडा :


(1) कोलामांचा उठाव - छोटा नागपूर


(2) गोंडांचा उठाव - गुजरात


(3) संथाळांचा उठाव - बिहार


(4) संन्याशांचा उठाव बंगाल


उत्तर-गोंडांचा उठाव - गुजरात

______________________

6. बेल्लोर येथील----- उठाव केला. ब्रिटिश राजवटीविरुद्ध 1806 मध्ये


(1) शेतकऱ्यांनी


(2) आदिवासींनी


(3) इंग्रजांच्या लष्करातील हिंदी सैनिकांनी


(4) कामगारांनी

उत्तर-इंग्रजांच्या लष्करातील हिंदी सैनिकांनी

____________________

7. 1824 मध्ये------  येथील छावणीतील हिंदी सैनिकांनी बंड केले.


(1) बराकपूर


(2) मिरज


(3) मेरठ


(4) बरेली


उत्तर-बराकपूर

__________

8. उमाजी नाईक यांनी लोकांना कोणते आवाहन केले ?


(1) इंग्रजांना सहकार्य करण्याचे


(2) इंग्रजांविरुद्ध उठावात सामील न होण्याचे


(3) 1857 च्या उठावास भारतीय सैनिकांना मदत करण्याचे


(4) इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व त्यांची सत्ता झुगारून देण्याचे


उत्तर-इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व त्यांची सत्ता झुगारून देण्याचे

______________________

9. लॉर्ड डलहौसीने अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले; कारण-----


(1) नवाबाने इंग्रजांविरुद्ध केलेले बंड


(2) नवाबाच्या राज्यातील तथाकथित गैरकारभार


(3) संस्थान विलीन करण्यास नवाबाचा नकार


(4) नवाबाचा इंग्रजांना खंडणी देण्यास विरोध


उत्तर-नवाबाच्या राज्यातील तथाकथित गैरकारभार

________________

10. दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी व नागपूर ही राज्ये कोणी खालसा केली ?


(1) लॉर्ड डलहोसी


(2) लॉर्ड कॅनिंग


(3) लॉर्ड कॉर्नवॉलिस


(4) लॉर्ड रिपन 

उत्तर-लॉर्ड डलहोसी

_______________

11. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव का केला?


(1) इंग्रजांनी आदिवासींवर अत्याचार केले होते.


(2) इंग्रजांनी केलेल्या जंगलविषयक कायदयांमुळे त्यांच्या उदरनिर्वाह करण्याच्या हक्कांवर गदा आली होती.


(3) आदिवासींना इंग्रजांची सत्ता नष्ट करायची होती.


(4) इंग्रजांनी त्यांच्या या नेत्यास फाशी दिले.


उत्तर-इंग्रजांनी केलेल्या जंगलविषयक कायदयांमुळे त्यांच्या उदरनिर्वाह करण्याच्या हक्कांवर गदा आली होती.

__________________

12. 1857 मध्ये ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील राष्ट्रीय उठावातील पहिला उद्रेक----- येथील लष्करी छावणीत घडून आला.


(1) कानपूर


(2) दिल्ली


(3) बराकपूर


(4) मेरठ


उत्तर-बराकपूर

___________

13. 10 मे 1857 रोजी------येथील सैनिकांनी इंग्रज राजवटी- विरुद्ध उठाव केला. 


(1) बराकपूर


(2) झाशी


(3) दिल्ली


(4) मेरठ


उत्तर-मेरठ

_________

14. एन्फील्ड बंदुकांच्या काडतूस प्रकरणाच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ------याने इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली.


(1) उमाजी नाईक


(2) बक्षी जगनबंधू विद्याधर


(3) मंगल पांडे


(4) कजारसिंग 


उत्तर-मंगल पांडे

_____________

15. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी 'भारताचा सम्राट' म्हणून कोणाला घोषित केले ?


(1) कुंवरसिंह


(2) कजारसिंग


(3) बहादूरशाह


(4) बख्तखान

उत्तर-बहादूरशाह

_____________

16. 1857 च्या उठावात खानदेशातील उठावाचे वैशिष्ट्य-----


(1) आदिवासींचा मोठा सहभाग


(2) दीर्घकाळ चाललेला उठाव


(3) सुमारे 400 भिल्ल स्त्रियांचा उठावातील सहभाग


(4) उठाव काळातील जनतेचे ऐक्य


उत्तर-सुमारे 400 भिल्ल स्त्रियांचा उठावातील सहभाग

_________________________

17.------ हे 1857 च्या राष्ट्रीय उठावाचे वैशिष्ट्य होते.


(1) मराठे - राजपूत ऐक्य


(2) इंग्रज - मुसलमान ऐक्य


(3) उत्तर भारत - दक्षिण भारत ऐक्य


(4) हिंदू-मुसलमान ऐक्य


उत्तर-हिंदू-मुसलमान ऐक्य

___________________

18. 1857 च्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तींची नावे दिली आहेत; यांपैकी चुकीची जोडी ओळखा :


(1) कोल्हापूर - चिमासाहेब


(2) नरगुंद - बाबासाहेब भावे


(3) संगमनेर (अहमदनगर) - भागोजी नाईक


(4) सातपुडा परिसर - रंगो बापूजी


उत्तर-सातपुडा परिसर - रंगो बापूजी

_____________________

19. सातपुडा परिसरात लढ्याचे नेतृत्व करणारे---------


(1) शंकरशाह


(2) चिमासाहेब


(3) भागोजी नाईक


(4) बाबासाहेब भावे 


उत्तर-शंकरशाह

_____________

20. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला?


(1) उमाजी नाईक


(2) भागोजी नाईक


(3) बाबासाहेब भावे


(4) कजारसिंग 


उत्तर-कजारसिंग 

_____________

21. 1857 च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या बहादूरशाहांना इंग्रजांनी------ येथे कारावासात ठेवले.


(1) नेपाळ


(2) रंगून


(3) श्रीलंका


(4) अंदमान


उत्तर-रंगून

________

22. 1857 च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या बाबतीत उठावात झालेला शेवट यांची अयोग्य जोडी कोणती?


(1) बेगम हजरत महल - नेपाळमध्ये आश्रयाला गेली.


(2) बहादूरशाहा - रंगून येथे बंदिवासात ठेवले.


(3) तात्या टोपे - दीर्घकाळ लढत राहिले; फाशी दिले.


(4) राणी लक्ष्मीबाई - फाशी दिले.


उत्तर-राणी लक्ष्मीबाई - फाशी दिले.

_____________________

23. स्वातंत्र्यलढा अयशस्वी होण्याची कारणे : संबंधित नसलेला पर्याय ओळखा व निवडा :


(1) अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले.


(2) लढ्यात एकसूत्रीपणा व एकमुखी नेतृत्वाचा अभाव होता.


(3) राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले.


(4) संपूर्ण भारतभर एकाच वेळी लढा झाला नाही.


उत्तर-राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले.

__________________

24. इ. स. 1858 च्या कायदयानुसार झालेले बदल पुढे दिले आहेत. त्यामध्ये चुकीच्या विधानाचा पर्याय ओळखून लिहा : 


(1) ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली.


(2) व्हॉइसरॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण झाले.


(3) भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण केले.


(4) गव्हर्नर जनरलऐवजी व्हाइसरॉय हे पद निर्माण केले.


उत्तर-व्हॉइसरॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण झाले.

_____________________

25. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा : 

भारतातील शेवटचे पुढीलपैकी कोण ? गव्हर्नर जनरल व पहिला व्हाइसरॉय


(1) लॉर्ड रिपन


(2) लॉर्ड डलहौसी


(3) लॉर्ड कॅनिंग


(4) लॉर्ड बेंटिंक


उत्तर-लॉर्ड कॅनिंग

______________

26. 1858 च्या जाहीरनाम्यात राणी व्हिक्टोरियाने दिलेले आश्वासन पुढील पर्यायांतून निवडा :


(1) सरकार भारतीयांच्या चालीरिती, परंपरा, श्रद्धा

यांच्यात हस्तक्षेप करणार नाही.


(2) इंग्रज सरकार थोड्याच कालावधीत भारतीयांना स्वातंत्र्य देईल.


(3) इंग्रजी सैन्यातील तोफखान्यात वरिष्ठ अधिकारपदांवर भारतीयांच्या नेमणुका केल्या जातील.


(4) भारतात प्रातिनिधिक लोकशाही शासनाची स्थापना करण्यात येईल.


उत्तर-सरकार भारतीयांच्या चालीरिती, परंपरा, श्रद्धा

यांच्यात हस्तक्षेप करणार नाही.

________________________

27. राणी व्हिक्टोरियाने 1857 चा उठाव मोडून काढल्यावर भारतीयांना उद्देशून जाहीरनामा प्रसिद्ध केला; कारण------


(1) तिला भारतीयांचे आभार मानायचे होते.


(2) भारतीयांना स्वातंत्र्याबाबत आश्वासन दयायचे होते.


 (3) इंग्रज शासन व भारतीय जनता यांच्यात निर्माण झालेली दरी इंग्रजी राजवटीच्या हिताची नाही, ही जाणीव तिला झाली होती. 

(4) इंग्रज राजवटीचा पाया मजबूत करायचा होता.


उत्तर-इंग्रज शासन व भारतीय जनता यांच्यात निर्माण झालेली दरी इंग्रजी राजवटीच्या हिताची नाही, ही जाणीव तिला झाली होती. 

_______________________

28. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता आली


(1) 1856


(2) 1857


(3) 1845


(4) 1858


उत्तर-1858

__________

29. ब्रिटिशांनी भारतातील संस्थाने खालसा न करण्याचे आश्वासन देशी संस्थानिकांना दिले.


(1) 1853 च्या कायदद्यान्वये


(2) 1858 च्या कायद्यान्वये


(3) 1861 च्या कायदद्यान्वये


(4) 1858 च्या 'राणीच्या जाहीरनाम्या 'न्वये 

उत्तर-1858 च्या 'राणीच्या जाहीरनाम्या 'न्वये 

____________________

30•1857 च्या लक्ष्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.


(1) गव्हर्नर


(2) व्हाइसरॉय


(3) भारतमंत्री


(4) ब्रिटिशमंत्री


उत्तर-व्हाइसरॉय

_____________


31. 1857 च्या उठावानंतर इंग्रजांनी केलेल्या धोरणात्मक बदला- संबंधी नसलेली बाब कोणती?


(1) भारतीय समाज हा सामाजिक दृष्टीने एकसंध न होण्याची खबरदारी घेण्यास सुरुवात


(2) 'फोडा आणि राज्य करा' ही नीती वापरून इंग्रजांनी सत्ता दृढ करण्यावर भर दिला


(3) सर्व भारतीय आमचे प्रजानन आहेत


(4) सामाजिक व धार्मिक बाबतींत हस्तक्षेप करायचा नाही.


उत्तर-सर्व भारतीय आमचे प्रजानन आहेत

_____________________

32. चित्रातील व्यक्ती कोण आहे ?


(1) तात्या टोपे


(2) नानासाहेब पेशवे


(3) माधवराव पेशवे


(4) कुंवरसिंह


उत्तर-नानासाहेब पेशवे

__________________

33. चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या लढ्याशी संबंधित आहे?


(1) 1857 चा स्वातंत्र्यलढा


(2) असहकार चळवळ


(3) सविनय कायदेभंग


(4) भारतीय स्वातंत्र्यलढा


उत्तर-1857 चा स्वातंत्र्यलढा

______________________

34. चित्रामध्ये दाखवलेल्या व्यक्तीने कोणत्या उठावाचे नेतृत्व केले आहे?


(1) संथाळांचा उठाव


(2) संन्याशांचा उठाव


(3) कोलामांचा उठाव


(4) रामोश्यांचा उठाव


उत्तर-रामोश्यांचा उठाव

_________________

35. चित्रातील व्यक्ती कोणत्या छावणीत हिंदी सैनिक म्हणून तैनात होती ?


(1) मेरठ


(2) बराकपूर


(3) झाशी


(4) बनारस


उत्तर-बराकपूर

____________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा