५ मार्च
प्रार्थना -
गुरुबह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः....
→श्लोक
(दोहे)- पराधीनता पाप है, जान लेहु रे मीत ।'रविदास' दास प्राधीन सों, कौन करे हे प्रीत ।। - रविदास दर्शन
पारतंत्र्य हे फार मोठे पाप आहे. एक मोठा अभिशाप आहे. ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या. जी व्यक्ती पराधीन, कोणाची तरी गुलाम आहे. त्याच्याबरोबर कोणी प्रेम करीत नाही. त्याचा सर्वजण तिरस्कार - अपमान करतात आणि त्याला ठोकरतात." म्हणून गुलामी, मंचीय जीवनाचा त्याग करा आणि स्वतंत्र राहून जीवन जगा. गुलामी नष्ट करण्यासाठी संघर्ष करा.
→ चिंतन-
धन, ऐश्वर्य, सुख या गोष्टी कधीच पुरेशा मिळन नसतात। कितीही मिळाल्या तरी आणखी जास्त हव्याच असतात. तसेच प्रसिध्दीचेही आहे. प्रसिध्दीचीही कुठलीही एखादी कमाल मर्यादा सांगता येणार नाही. की जी मिळाल्यावर मनुष्याला आणखी जास्त प्रसिध्द होण्याची इच्छा उरणार नाही. पण, मनुष्याला अनंत प्रसिध्दी हवी असली तरी ती जास्तीत जास्त किती मिळू शकते याला मात्र मर्यादा आहे. विश्वाच्या तुलनेत किंवा अनंत काळच्या तुलनेत कोणाचीही प्रसिध्दी किती अमर्याद असू शकेल ?
कथाकथन
'हंस कोणाचा :'
एकदा छोटा सिध्दार्थ आपल्या मित्रासह राजोद्यानात बोलत बसला असता बाण लागल्यामुळे बाळ झालेला एक हंस कसाबसा उडत त्याच्या पुढ्यात येऊन पडला. सिध्दार्थानि त्याला उचलले, जवळच्या पुष्करणीकाशी नेऊन पाणी पाजलं आणि थोडा वेळ प्रेमानं कुरवाळलं. नंतर त्यानं त्याची जखम धुवून तिच्यावर कसली तरी औषधी वनस्पती लावली. एवढं झाल्यावर त्या हंसाला थोड बर वाटू लागलं. तेवढ्यात सिध्दार्थाचा अंदाजे त्याच्याच वयाचा चुलतभाऊ देवदत्त तिथे आला व म्हणाला, 'सिध्दार्थी, या हंसाला बाण मारून श्री पायाळ केला असल्याने हा माझा आहे, तेव्हा त्याला माझ्या स्वाधीन कर.' सिध्दार्थ म्हणाला 'देवदत्ता, एखाद्याच्या जीवावर उठलेल्या माणसांपेक्षा, त्याच्या जीवाचं रक्षण करणाऱ्याचाच त्याच्यावर खरा अधिकार असतो. तू या हंसाच्या जीवावर उठला होतास, पण मी याला वाचवला, जेव्हा हा हंस आता माझाच आहे. अखेर देवदत्त हा सिध्दार्थाच्या वडिलांकडे गेला व त्याने त्यांच्याकडे सिध्दार्थाविरुध्द तक्रार केली. महाराजांनी सिध्दार्थाला बोलावून घेतलं व त्याचं म्हणणंही ऐकून घेतल. त्यानंतर ते सिध्दार्थास म्हणाले, 'बाळ! एकूण धर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार करता, या हंसाचं रक्षण तू केलंस म्हणून हा हंस तुझा हे खरं असलं तरी क्षात्रधर्माचा विचार करता, एखाद्या क्षत्रियानं एखाद्या प्राण्याची शिकार केली, की तो प्राणी पूर्ण मेलेला असो वा अर्धवट मेलेला असो, त्या क्षत्रियाच्याच मालकीचा होतो. या हंसाला देवदत्तानं पायाळ केलं असल्याने हा त्याचाच ठरतो. यावर तीक्ष्ण बुध्दीचा सिध्दार्थ वडिलांना म्हणाला, 'महाराज ! क्षात्रधर्माच्या दृष्टीनं विचार केला, तरी हा हंस माझ्याजवळच राहू देणे इष्ट ठरते. देवदत्तानं या हंसाला बाणाने अर्धवट मारला असता ज्या अर्थी हा माझ्या पायाशी येऊन पडला त्या अर्थी या शरणागताला अभय देऊन याचं रक्षण करणं हे क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्य नाही काय ?' बाल सिध्दार्थाच्या या असामान्य बुध्दितेजानं थक्क झालेले त्याचे वडील म्हणाले, 'खरं सांगायचं, तर हा हंस नक्कीच कुणाचा, हे मला कळेनासं झालं आहे. तेव्हा आपण हे प्रकरण आपल्या राज्याच्या न्यायमुर्तीकडे नेऊ. न्यायमुर्तीकडे हे प्रकरण जाताच त्यांनी त्या हंसाला एका सेवकाच्या हाती दिले आणि तेथून परस्परविरूध्द दिशांना समान अंतरावर देवदत्त व सिध्दार्थ यांना बसायला सांगून त्या दोघांनाही त्या हंसाला आपल्याकडे बोलवायला सांगितले. प्रथम देवदत्ताने टाळी वाजवून 'येथे' म्हणत हात हालवून त्या हंसाला आपल्याकडे बोलावलं पण, त्या हंसाने त्याच्याकडे ढुंकूनही बघितल नाही. त्यानंतर सिध्दार्थानं त्या हंसाला एकदाच 'वे' म्हणताच तो जखमी हंस मोठ्या कष्टानं उडत उडत त्याच्याकडे गेला व त्याला बिलगून बसला. तो प्रकार पाहून न्यायमूर्ती म्हणाले, 'हंस कुणाचा या प्रश्नाच उत्तर आता प्रत्यक्ष या हंसानंच दिलं असल्यानं, मी वेगळा निर्णय देण्याचा प्रश्नच उरत नाही.' लामाष्टकासाठी साय
सुविचार
• हात उगारण्यासाठी नसून उभारण्यासाठी असतात. बाबा आमटे
दिनविशेष
• मर्केटर गेरहार्ट यांचा जन्मदिन - १५१२ : सुप्रसिध्द भूगोलवेत्ता, गणिती व महान चित्रकार. १५३० मध्ये तो तुन्हों विद्यापिठात दाखल झाला आणि त्याने १५३२ मध्ये एम.ए. पदवी संपादन केली. लूव्हा येथे गेमा फिरिसियस या सुप्रसिध्द सैध्दांतिक | गणितवेत्त्याच्या हाताखाली मर्केटरचे शिक्षण झाले व तेथेच त्याने भूगोल, नकाशाशास्त्र, गणित आणि विज्ञान या विषयात पारंगतता मिळविली. टॉलेमीच्या जगाच्या नकाशावर आधारित असा नकाशा त्याने १५३८ मध्ये तयार केला. १५४१ मध्ये १.३० मीटर परीघ असलेला पृथ्वीचा गोल त्याने बनविला. ही त्याची अतिशय गाजलेली व त्या काळी अगदी नवीन असलेली कलाकृती होय. १५५१ मध्ये त्याने याच धर्तीवर तारामंडळाचा गोल तयार केला. दुसऱ्या शतकातील टॉलेमीच्या युरोपच्या नकाशावरून नवीन माहितीच्या आधारे त्याने आधुनिक युरोपचा नकाशा बनविला. ग्रहणे आणि इतर खगोलशास्त्रीय घटनांच्या आधारे जगाच्या उत्पत्तीपासूनचा इतिहास मर्केटरने लिहावयास घेतला. त्याने त्याला 'अॅटलास' असे नाव दिले. पुढे नकाशासंग्रहालाच 'अॅटलास' अशी संज्ञा रूढ झाली. जगातील जलमार्ग व हवाई मार्ग दाखविणाऱ्या नकाशाकरिता वापरले जाणारे 'मर्केटर प्रक्षेपण' ही मर्केटरची भूगोलशास्त्राला मिळालेली मोठी देणगी होय. २ डिसेंबर १५९४ मध्ये त्याचे निधन झाले.
→ मूल्ये -
• आत्मविश्वास, निर्भीडपणा, संशोधकवृत्ती.
अन्य घटना
• शिवरायांचे आम्ग्रास प्रयाण - १६६६
• गांधी आयर्विन करार - १९३१.
• विसाव्या शतकाच्या पहिल्या पूर्वार्धातील सर्वांत यशस्वी राजनेता जोसेफ स्टालीन स्मृतिदिन - १९५३.
• मराठी संशोधक नारायण गोविंद चापेकर यांचा मृत्यू - १९६८.
• मराठीतील प्रसिध्द | साहित्यिक पु. ग. सहस्त्रबुध्दे यांचे निधन - १९८५. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीतील जेष्ठ नेते भाई बागल यांचे निधन - १९८६,
→ उपक्रम -
• शिवाजी महाराजांनी आग्रा येथून केलेल्या प्रयाणाची गोष्ट सांगा. • छत्रपती शिवराय व औरंगजेब भेटीचे नाट्यीकरण करणे.
→ समूहगान -
• हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
→ सामान्यज्ञान
• झुरळाचे मूलस्थान आफ्रिका आहे. झुरळ हा पंख असलेल्या सर्वात आदिम कीटकांपैकी असून त्याची उत्पत्ती सुमारे २५ कोटी वर्षापूर्वी झाली. हा इतका पुरातन कीटक असूनही त्याच्या मूळ स्वरूपात आजही विशेष फरक पडलेला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा