7असहकार चळवळ
स्वाध्याय
प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्जासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
1. इ. स. 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड -' ------या नावाने ओळखला जातो.
(1) मवाळयुग
(2) जहालयुग
(3) क्रांतिकारीयुग
(4) गांधीयुग
उत्तर-गांधीयुग
_____________
2. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ------. या देशातूनकेली.
(1) भारत
(2) इंग्लंड
(3) दक्षिण आफ्रिका
(4) म्यानमार
उत्तर-दक्षिण आफ्रिका
_________________
3. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे ----यांच्याकडे आली.
(1) दादाभाई नौरोजी
(2) सुभाषचंद्र बोस
(3) महात्मा गांधी
(4) पंडित जवाहरलाल नेहरू
उत्तर-महात्मा गांधी
_______________
4. 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेल्या गांधीजींना ------यांनी देशदौरा करण्याचा सल्ला दिला.
(1) नामदार गोपाळ कृष्ण गोखले
(2) लोकमान्य टिळक
(3) दादाभाई नौरोजी
(4) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
उत्तर-नामदार गोपाळ कृष्ण गोखले
___________________
5. गांधीजींनी राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारल्यानंतर कोठे राहू लागले ?
(1) अहमदाबाद - साबरमती
(2) पुणे - आगाखान पॅलेस
(3) मुंबई - मणिभवन
(4) वर्धा - सेवाग्राम आश्रम
उत्तर-अहमदाबाद - साबरमती
_____________________
6. महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह मार्गाचा प्रभाव भारताबाहेरील कोणत्या नेत्यांवर पडला?
(1) नेल्सन मंडेला व अॅनी बेझंट
(2) मार्टिन ल्यूथर किंवा व नेल्सन मंडेला
(3) मार्टिन ल्यूथर किंग व अॅलन हयूम
(4) नेल्सन मंडेला व सर विल्यम वेडरबर्न
उत्तर-मार्टिन ल्यूथर किंवा व नेल्सन मंडेला
______________________
7. चंपारण्य जिल्ह्यातील सत्याग्रह करून गांधीजींनी कोणाला न्याय मिळवून दिला ?
(1) गुजरातमधील शेतकरी
(2) गिरणी कामगार
(3) नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना
(4) कामगारवर्ग व सामान्य जनता
उत्तर-नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना
___________________
8.शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्हयात साराबंदीची चळवळ सुरू केली?
(1) गोरखपूर
- (2) खेडा
(3) सोलापूर
(4) अमरावती
उत्तर-खेडा
________
9. गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहमदाबाद येथील कामगारांनी केव्हा लढा दिला?
(1) 1917
(2) 1918
(3) 1919
(4) 1920
उत्तर-1918
__________
10. राष्ट्रीय आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने---- हा कायदा संमत केला.
(1) रौलट कायदा
(2) माँटफर्ड कायदा
(3) मोर्ले-मिंटो कायदा
(4) 1935 चा कायदा
उत्तर-रौलट कायदा
________________
11. 'रौलट कायदा' हा काळा कायदा म्हणून ओळखला गेला; कारण------
(1) या कायदयान्वये स्वातंत्र्य चळवळ बंद पाडण्यात आली.
(2) या कायदयान्वये संशयित व्यक्तीला विनावॉरंट व विना चौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला प्राप्त झाला.
(3) या कायद्यान्वये शेतकऱ्यांवर अन्याय्य शेतसारा आकारण्यात आला.
(4) या कायदयान्वये गिरणी कामगारांवर अनेक बंधने लादण्यात आली.
उत्तर-या कायदयान्वये संशयित व्यक्तीला विनावॉरंट व विना चौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला प्राप्त झाला.
________________________
12. अमृतसरमधील जालियनवाला बाग सभेतील निःशस्त्र लोकांवर -----याने गोळीबार करण्याचा आदेश दिला.
(1) जनरल लेक
(2) जनरल नील
(3) जनरल डायर
(4) जनरल किचनेर
उत्तर-जनरल डायर
________________
13. अमृतसर येथील हरताळप्रकरणी कोणाला अटक करण्यात आली ?
(1) डॉ. सत्यपाल व सैफुद्दीन किचलू
(2) डॉ. सत्यपाल व महात्मा गांधी
(3) महात्मा गांधी व सैफुद्दीन किचलू
(4) सैफुद्दीन किचलू व रवींद्रनाथ टागोर
उत्तर-डॉ. सत्यपाल व सैफुद्दीन किचलू
_________________________
14. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या ' -------या किताबाचा त्याग केला.
(1) लॉर्ड
(2) सर
(3) रावबहादूर
(4) रावसाहेब
उत्तर-सर
________
15. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणत्या कमिशनची नियुक्ती केली?
(1) इंटर
(2) सायमन
(3) रौलट
(4) ओडवायर
उत्तर-इंटर
________
16. भारतीय मुस्लिमांनी कोणाला पाठिंबा देण्याकरिता खिलाफत चळवळ सुरू केली?
(1) इराणचा सुलतान
(2) तुर्कस्तानचा सुलतान
(3) अरबस्तानचा सुलतान
(4) उझबेकिस्तानचा सुलतान
उत्तर-तुर्कस्तानचा सुलतान
___________________
17.------ चळवळीमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले.
(1) खिलाफत चळवळ
(2) असहकार चळवळ
(3) चले जाव चळवळ
(4) सविनय कायदेभंग चळवळ
उत्तर-खिलाफत चळवळ
___________________
18. 1920 मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील ठरावानुसार खालील बाबींवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यातील चुकीचा पर्याय कोणता ?
(1) शासकीय कार्यालये
(2) न्यायालये
(3) स्वदेशी वस्तू
(4) सरकारी शाळा व महाविदयालय
उत्तर-स्वदेशी वस्तू
______________
19. 1920 च्या ------अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकार चळवळीच्या ठरावाला मंजुरी दिली.
(1) कलकत्ता
(2) मद्रास
(3) नागपूर
(4) अलाहाबाद
उत्तर-नागपूर
___________
20. नागपूरच्या अधिवेशनात---- मांडला, यांनी असहकाराचा ठराव
(1) महात्मा गांधी
(2) चित्तरंजन दास
(3) पंडित जवाहरलाल नेहरू
(4) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
उत्तर-चित्तरंजन दास
________________
21. कोणत्या घटनेमुळे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली ? पुढील पर्यायांतून निवडा :
(1) चौरीचौरा येथील पोलीस चौकीला जमावाने आग लावली.
(2) गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली.
(3) जालियनवाला बाग हत्याकांड लॉर्ड कर्झनने घडवून आणले.
(4) रौलट कायदा अमलात आला.
उत्तर-चौरीचौरा येथील पोलीस चौकीला जमावाने आग लावली.
________________________
22. 'यंग इंडिया' या वृत्तपत्रातील लेख राष्ट्रद्रोही आहेत, असा कोणावर आरोप ठेवण्यात आला ?
(1) पंडित जवाहरलाल नेहरू
(2) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
(3) महात्मा गांधी
(4) चित्तरंजन दास
उत्तर-महात्मा गांधी
________________
23. असहकार कार्यक्रमाबरोबरच गांधीजींनी विधायक कार्यक्रमही दिला. त्या विधायक कार्यक्रमात समाविष्ट नसलेली बाब कोणती ?
(1) मद्यपान बंदी
(2) खादीचा प्रसार
(3) अस्पृश्यता निवारण
(4) परदेशी वस्तूंचा वापर
उत्तर-परदेशी वस्तूंचा वापर
___________________
24. महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ केव्हा स्थगित केली ?
(1) 12 फेब्रुवारी 1920
(2) 12 फेब्रुवारी 1922
(3) 10 फेब्रुवारी 1923
(4) 12 मार्च 1922
उत्तर-12 फेब्रुवारी 1922
____________________
25. ------मध्ये पंडित मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी 'स्वराज्य पक्षा 'ची स्थापना केली.
(1) 1921
(2) 1920
(3) 1922
(4) 1923
उत्तर-1922
__________
26. 1923 च्या केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळांत नसलेला नेता कोण ?
(1) महात्मा गांधी
(2) न. चिं. केळकर
(3) लाला लजपतराय
(4) मदन मोहन मालवीय
उत्तर-महात्मा गांधी
_______________
27. जनतेतील असंतोष दूर करण्यासाठी सरकारने सर सायमन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती केव्हा नियुक्त केली ?
(1) 1920
(2) 1922
(3) 1925
(4) 1927
उत्तर-1927
__________
28. सायमन कमिशनवर राष्ट्रीय सभेने बहिष्कार घालण्याचे का ठरवले ?
(1) या कमिशनमध्ये सात सदस्य होते
(2) या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने
(3) माँटेग्यू-चेन्सफर्ड सुधारणा कायदा केल्यामुळे
(4) सर सायमन हे या समितीचे अध्यक्ष होते म्हणून
उत्तर-या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने
____________________
29. सायमन कमिशनच्या विरोधातील -----येथील निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय करीत होते.
(1) लाहोर
(2) अमृतसर
(3) कोलकाता
(4) मुंबई
उत्तर-लाहोर
__________
30. सायमन कमिशनविरोधात निदर्शनाचे नेतृत्व करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर -----या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या लाठीहल्ल्यात घायाळ होऊन त्यातच त्यांचे निधन झाले.
(1) ओडवायर
(2) साँडर्स
(3) डायर
(4) हंटर
उत्तर-साँडर्स
_________
31. "लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एकेक खिळा ठोकला जात आहे." हे विधान कोणाचे आहे?
(1) पं. जवाहरलाल नेहरू
(2) रवींद्रनाथ टागोर
(3) महात्मा गांधी
(4) लाला लजपतराय
उत्तर-लाला लजपतराय
__________________
32. भारतीय नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणी केली ?
(1) भारतमंत्री बर्कनहेड
(2) भारतमंत्री माँटेग्यू
(3) गव्हर्नर मायकल ओडवायर
(4) सर जॉन सायमन
उत्तर-भारतमंत्री बर्कनहेड
__________________
33. 1929 च्या लाहोर येथील राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते ?
(1) मोतीलाल नेहरू
(2) महात्मा गांधी
(3) पंडित जवाहरलाल नेहरू (4) सुभाषचंद्र बोस
उत्तर-पंडित जवाहरलाल नेहरू
________________________
34. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते कोण होते?
(1) पंडित मोतीलाल नेहरू
(2) सुभाषचंद्र बोस
(3) महात्मा गांधी
(4) चित्तरंजन दास
उत्तर-सुभाषचंद्र बोस
_______________
35. लाहोर अधिवेशनानंतर----हा दिवस 'स्वातंत्र्यदिन' म्हणून पाळण्यात यावा असे ठरले.
(1) 15 ऑगस्ट
(2) 9 ऑगस्ट
(3) 30 जानेवारी
(4) 26 जानेवारी
उत्तर-26 जानेवारी
_______________
36. रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा तिरंगा ध्वज केव्हा फडकवला ?
(1) 30 डिसेंबर 1929
(2) 31 डिसेंबर 1929
(3) 31 डिसेंबर 1930
(4) 26 जानेवारी 1930
उत्तर-31 डिसेंबर 1929
___________________
37. सेनापती बापट यांनी----- सत्याग्रहाचे नेतृत्व केले.
(1) पेशावर
(2) धारासना
(3) सोलापूर
(4) मुळशी
उत्तर-मुळशी
___________
38. पांडुरंग महादेव बापट यांनी कोणाच्या हक्कासाठी मुळशी सत्याग्रह केला ?
(1) धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या न्याय्य हक्कांसाठी
(2) मळेवाल्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी
(3) कामगारांच्या हक्कांसाठी
(4) शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी
उत्तर-धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या न्याय्य हक्कांसाठी
______________________
39. खालील चित्रातील घटना कोणत्या सालातील आहे?
(1) 1919
(2) 1928
(3) 1927
(4) 1929
उत्तर-1928
___________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा