८ मार्च
प्रार्थना
सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा....
→ श्लोक
(दोहे) - जो बस राखे इंद्रियां, सुख दुख समझि समान । सोड अमरित पद पाईगो, कहि 'रविदास' बखान- संत रविदास
इंद्रियांना ताब्यात ठेवून त्या अवस्थेला प्राप्त करू शकतात जेथे सुख आणि दुःख समान स्थितीमध्ये असतात. यालाच शून्य अवस्था म्हण स्थितीला गुरू रविदास अमृत पद म्हणतात.
→ चिंतन
- आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरूषांनी साजरा करावा - महिला दिन साजरा करावा अशीच ऐतिहासिक महत्वाची घटना त्यावेळी १२९ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात घडली. याच दिवशी तेथील कपडे तयार करणाऱ्या कारखान्यातील महिलांनी कामाचे तास सोळापेक्षा करावेत आणि मजुरी वाढवावी, अशी मागणी सर्वांनी मिळून केली. जगाच्या इतिहासात स्त्रियांना संघटित होऊन स्वतःचे अधिकार मागण्याम केलेला हा पहिला संघर्ष. त्या स्मृतिप्रीत्यर्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा केला जातो. पुरूषाला श्रेष्ठ आणि स्त्रीला करिए | दर्जाची वागणूक देण्याचेही कारण नाही. दोघांमध्ये काही गुण समान आहेत आणि काही गुण विशेष आहेत. हे गुणविशेष निसर्गाने
कथाकथन
स्त्री-पुरूष समानता माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष हे सारखेच महत्वाचे आहेत. दोघांमध्ये अनेक गुण समान असतात | गुणविशेष. या विशेष गुणांचे कारण निसर्ग असतो आणि संस्कारही असतात. ज्यावेळी विशेष गुणांचे आणि संस्काराचे प्राबल्य वाढते त्यावेळी माणसाच्या या | एक सत्ताधारी बनतो व दुसऱ्या घटकास आपल्या अधिकाराखाली ठेवतो. ज्या समाजात अशा प्रकारे पुरूषांचा अधिकार चालतो तेथे पुरुषप्रधान संस्कृती जपली आणि जेथे स्त्रियांचा अधिकार चालतो तेथे स्त्रीप्रधान संस्कृती अस्तित्वात असते. जगात स्त्रीप्रधानता चालणारे मानवी समाज अपवादात्मक आढळतात, उमे श्रीलंका व आपल्याकडील केरळ व आसाम ही राज्ये आहेत. सर्व मानवजात एक आहे. स्त्री आणि पुरूष हे समान दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ प्र होऊ शकत नाही. जीवनात व्यक्तिगत विकासाकरिता समानसंधी, समान हक्क आणि समान अधिकार प्रत्येक व्यक्तिस मिळाला पाहिजे. स्त्रियांनी अमुक कामे करावी पुरूषांनी अमुक कामे करावी, असा निर्बंध करणे शुध्द अन्याय व क्रूरपणा आहे. ज्याला जे काम साधेल त्याने ते करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाराना करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुध्दिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे. ज्या कामास जे पुरूष बुध्दिसामर्थ्याने योग्य नाहीत त्याच् ती कामे होत असल्यामुळे व स्त्रियांस ती करण्याची परवानगी नसल्यामुळे एकंदरीत ती कामे व्हावी तशी होत नाहीत व तशी न झाल्यामुळे मनुष्यजातीच्या सुखास चट्टा आहे. हरएक शास्त्रात, कलेत व धंद्यात स्त्री-पुरुषांची चढाओढ लागून ज्याच्या-त्याच्या-जिच्या तिच्या योग्यतेनुसार व्यवस्था लागली पाहिजे. शास्त्राभ्याम कि कलाभ्यास करण्यास स्त्रिया असमर्थ असतील, तर त्या तशा ठरतील. पण अनुभवाने तसे ठरतोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करणे हा शुध्द सुलतानी द होय. अमेरिकेत मुलाप्रमाणे मुलींस वरिष्ठ शिक्षण देण्याचा उपक्रम केल्यापासून जे परिणाम घडून आले आहेत, त्यांचे अवलोकन केले असता असे दिसून येईल की की शा व कला केवळ पुरुषासच सुसाध्य आहेत असे आपणास वाटत होते; ती शास्त्रे व त्या कला स्त्रियांना तितक्याच सुसाध्य आहेत. व शास्त्रकलांच्या अभ्यासामुळे स्त्र | नैसर्गिक चारूत्व कमी होऊन अपत्यसंगोपनाचे काम त्यांच्याने बरोबर वठेनासे होईल, अशी जी भीती होती ती केवळ निराधार होती. या दोन गोष्टी उत्तम रीतीने सिध्द आहेत, अमुक कामे स्त्रियांनी करावी आणि अमुक पुरूषांनी करावी असा आपल्या बुध्दीत सध्या जो आग्रह उत्पन्न होतो त्याचे बरेच कारण कामाची वाटणी करण्याचे काम आमच्या हाती आहे हे होय. ती बायकांच्या हाती असती तर त्यांनीही अशीच एकदेशीय वाटणी करून आपणाकडे उंच कामे आणि आम्हांकडे हलकी कामे ठेवली अस ! कोणत्याही विद्वान व विचारी स्त्रीचे मत घ्या ती कधीही असे म्हणणार नाही की, स्त्री-पुरुषांना एकच शिक्षण देण्यात स्त्रियांचे नुकसान आहे. हा स्त्री पुरूषांत चालत आलेल वाद नाहीसा करण्याचा एकच उपाय आहे, तो हा की, मुलांना व मुलींना हव्या त्या शाळेत जाऊन हवे ते ज्ञान पाहिजे तितके संपादू द्यावे. - इंद्रियांना ताब्यात ठेवून त्या अवस्थेला प्राप्त करू शकतात सर्वांना समान संधी हा मूल्यशिक्षणाचा एक भाग आहे. आपल्या शाळेत स्त्री-पुरुष समानतेची भावना रुजविण्यासठी हे बदल घडवूया वर्गाचे प्रतिनिधित्व मुलील द्या, वर्गाचे पटनोंदणी अनुक्रम लिहिताना, वाचताना मुलींचे नाव वर्णाक्षरानुसार वाचा, वर्गात त्यांच्या प्रथम नावाने बोलवा, शाळेत प्रतिज्ञा, प्रार्थना मुलीच सांगतील, हजेरीपट नेण्याचे काम मुलींना करू द्या. शाळेत मुलींना पुढील रांगेमध्ये बसवा, सामुदायिक कवायतीचे नेतृत्व मुलींना करू द्या. मैदानी स्पर्धा, शालेय उपक्रमात मुलीच सहभाग असावा, शाळेतील कार्यक्रमात मुलींना प्राधान्य द्या, मुलींना समान संधी, समान दर्जा, समान वागणूक द्या.
→ सुविचार
• स्त्री मुक्तीचा मार्ग महान, शिक्षणानं मिळेल हक्क समान
• • समान संधी, समान वागणूक, समान न्याय, समान दर्जा आणि समान स्वातंत्र्य म्हणजेच समानता • साथ हवी विचारांची आचारांची, मुलगा-मुलगी दोघे समान जाणण्याची
दिनविशेष -
• आंतरराष्ट्रीय महिला दिन - १९७५ पासून : जर्मनीतील महिला कार्यकर्ता क्लारा झेटकी हिने कोपनहेगन येथे १९१० मध्ये | भरलेल्या महिला प्रतिनिधींच्या परिषदेत ठराव मांडून सर्वांच्या मान्यतेने या जागतिक महिला दिनाची कल्पना प्रत्यक्षात आणली. महात्मा फुले, मह कर्वे यांच्या अक परिश्रमामुळे, स्त्रियांच्या समस्यांविषयीच्या त्यांच्या कळकळीमुळे आणि आयुष्यभर त्यांनी स्त्रियांना सामाजिक बंधनापासून करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे स्त्रियांना शिक्षणाचे व प्रगतीचे मार्ग खुले झाले. महिलांच्या विचारांकडे व कार्याकडे समाज आदरभावाने पाह लागला. स्त्री शिक्षणाविषयी जागृती निर्माण झाली. महिलांच्या विकासाच्या विविध योजना सुरू झाल्या. महिलांसाठी एस.एन.डी.टी. हे स्वतं | विद्यापीठ सुरू झाले. भारतीय प्रशासकीय सेवा, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी सेवा, संरक्षण दले, राजकीय क्षेत्र, सामाजिक सेवा या सर्व क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसू लागल्या. जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रतिवर्षी साजरा केला जाऊ लागला. आज जगामध्ये स्त्रिया राष्ट्राध्यक्ष आहेत. पंतप्रधान आहेत, वैज्ञानिक, संसदपटु, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ अशा सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. भारतात मोठ्या | प्रमाणात हा दिवस १९७५ पासून साजरा केला जातो.
→ मूल्ये
स्त्रीपुरुषसमानता, आदरभाव.
→ अन्य घटना -
• शिवरायांनी पन्हाळागड जिंकला. १६७३
• शाहूमहाराजांच्या आज्ञेनुसार मराठ्यांनी सिद्दीच्या ताब्यात असलेले जंजिऱ्याच्या | मोहिमेतील बाणकोट हे ठिकाण हस्तगत केले १७३४
• हरि नारायण आपटे यांचा जन्मदिन १८६४ मराठी साहित्यिक चिं. त्र्यं. खानोलकर उ कवी आरती प्रभू यांचा जन्मदिन - १९३०
• आरोग्यसंवर्धन सहकारी संघ मर्यादित पूणे स्थापना १९४६ • भारतातील संस्थाने स्वतंत्र भारतात । विलीन झाली - १९४८ • बाळ गंगाधर खेर यांचे निधन - १९५७.
→ उपक्रम -
• महिलांच्या प्रश्नासंबंधी, प्रगतीविषयीची कात्रणे जमवा.
• भारतातील आदर्श स्त्रियांची चरित्रे मुलांना वाचावयास द्या.
→ समूहगान
• हम भारत की नारी हैं, फूल नहीं चिनगारी है जान से बढकर हमें हमारी, भारत जननी प्यारी है...
→ सामान्यज्ञान
•सी-हॉर्स किंवा समुद्रपोडा हा उथळ समुद्रात पाणवनस्पतींमध्ये वाढणारा उष्णकटिबंधातील मासा माशांच्या या जातीत मादी आपली अंडी नराच्या पोटाशी असलेल्या पिशवीत घालते. त्यातच ती वाढून यथावकाश नर मासा ४/५ पिलांना जन्म देतो. सजीव सृष्टीतील एकमेव चमत्कार आहे.
• मार्जार जातीतील सर्व प्राणी त्यांच्या नख्या आत ओढून घेऊ शकतात व फक्त पंज्याचा वापर करायचा असेल तेव्हाच त्या बाहेर निघून भक्ष्याला ओरखडतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा