Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १२ मार्च, २०२४

आठवी इतिहास 8.सविनय कायदेभंग चळवळ

 8.सविनय कायदेभंग चळवळ


स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :



1. लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी----- चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला.


(1) होमरूल


(2) असहकार


(3) सविनय कायदेभंग


(4) चले जाव


उत्तर-सविनय कायदेभंग

___________________





2. 1929 मध्ये राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात महात्मा गांधींकडे सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले ?


(1) मुंबई


(2) लाहोर


(3) कराची


(4) ढाका


उत्तर-लाहोर

___________




3. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्याचे ठरवले; कारण------


(1) मीठ सर्वत्र उपलब्ध नव्हते.


(2) देशात मिठाची टंचाई झाल्याने मिठाचा काळा बाजार होत होता.


(3) आदिवासींना मीठ उपलब्ध होत नव्हते.


(4) समाजातील प्रत्येकाला जीवनावश्यक असलेल्या मिठासारख्या नैसर्गिक वस्तूवर सरकारने अन्यायकारक जुलमी कर लावला होता.


उत्तर-समाजातील प्रत्येकाला जीवनावश्यक असलेल्या मिठासारख्या नैसर्गिक वस्तूवर सरकारने अन्यायकारक जुलमी कर लावला होता.

______________________





4. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती आश्रम ते दांडी ही------ किलोमीटरची पदयात्रा केली.


(1) 380


(2) 385


(3) 400


(4) 285


उत्तर-385

_________




5. सविनय कायदेभंग चळवळीला केव्हा सुरुवात झाली?


(1) 12 मार्च 1930


(2) 12 एप्रिल 1930


(3) 6 एप्रिल 1930


(4) 6 मार्च 1930


उत्तर-6 एप्रिल 1930

_________________



6. मिठाचा सत्याग्रह करण्याकरिता गांधीजी कोठून कोठे गेले?


(1) साबरमती आश्रम ते दांडी


(2) आगाखान पॅलेस ते दांडी


(3) सेवाग्राम आश्रम ते दांडी


(4) मणिभवन ते दांडी


उत्तर-साबरमती आश्रम ते दांडी

________________________




7.------ यांनी खुदा-इ-खिदमतगार या संघटनेची स्थापना केली.


(1) बॅरिस्टर जीना


(2) खान अब्दुल गफारखान


(3) महात्मा गांधी


(4) कुर्बान हुसेन


उत्तर-खान अब्दुल गफारखान

_______________________



8. 'सरहद्द गांधी' म्हणून---- यांना ओळखले जाते.


(1) बॅरिस्टर जीना


(2) जयप्रकाश नारायण


(3) पंडित जवाहरलाल नेहरू


(4) खान अब्दुल गफारखान


उत्तर-खान अब्दुल गफारखान

______________________





9. चुकीची जोडी निवडा :


(1) पेशावर सत्याग्रह - खान अब्दुल गफारखान


(2) धारासना सत्याग्रह - सरोजिनी नायडू


(3) सोलापूर सत्याग्रह - आदिवासी समाज


(4) मुंबई येथील सत्याग्रह - बाबू गेनू 


उत्तर-सोलापूर सत्याग्रह - आदिवासी समाज

___________________




10. खुदा-इ-खिदमतगार या संघटनेने------ रोजी सत्याग्रह केला.


(1) 23 एप्रिल 1930


(2) 4 मे 1930


(3) 6 मे 1930


(4) 23 मार्च 1930


उत्तर-23 एप्रिल 1930

_________________



11. सोलापूर गिरणी कामगारांनी----- मोर्चा काढला. रोजी हरताळ पाळून


(1) 23 एप्रिल 1930


(2) 4 मे 1930


(3) 6 मे 1930


(4) 23 मार्च 1930


उत्तर-6 मे 1930

______________




12. चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा.


(1) मल्लाप्पा धनशेट्टी


(2) श्रीकृष्ण सारडा


(3) कुर्बान हुसेन


(4) जगन्नाथ शिंदे


उत्तर-कुर्बान हुसेन

_______________



13. चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे?


(1) मुळशी सत्याग्रह


(2) पेशावरचा सत्याग्रह


(3) खेडा सत्याग्रह


(4) सोलापूरचा सत्याग्रह


उत्तर-सोलापूरचा सत्याग्रह

____________________




14. चित्रातील सत्याग्रहीचे नाव ओळखा.


(1) श्रीकृष्ण सारडा


(2) मल्लाप्पा धनशेट्टी


(3) कुर्बान हुसेन


(4) जगन्नाथ शिंदे


उत्तर-मल्लाप्पा धनशेट्टी

___________________




15. पुढील चित्रातील घटना कोणत्या ठिकाणच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे ?


(1) सोलापूर


(2) धारासना


(3) पेशावर


(4) दांडी


उत्तर-दांडी

_________






16.गुजरातमधील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणाकडे होते?


(1) महात्मा गांधी


(2) सरदार वल्लभभाई पटेल


(3) सरोजिनी नायडू


(4) कस्तुरबा गांधी 


उत्तर-सरोजिनी नायडू

_________________




17.महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह झाला नाही असे ठिकाण कोणते?


(1) कळवण


(2) वडाळा


(3) मालवण


(4) शिरोडा


उत्तर-कळवण

___________




18. पुढीलपैकी कोण कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नव्हते, ते लिहा


(1) कमलादेवी चट्टोपाध्याय


(2) अवंतिकाबाई गोखले


(3) हंसाबेन मेहता


(4) अरुणा असफअली


उत्तर-अरुणा असफअली

___________________





19.महाराष्ट्रातील जंगलविषयक कायदे मोडण्याकरिता जंगल सत्याग्रह कोठे केला?


(1) संगमनेर


(2) वडाळा


(3) शिरोडा


(4) मालवण


उत्तर-संगमनेर

___________




20. मुंबई येथे परदेशी मालाचा टूक अडवण्यासाठी ट्रकपुढे आडवे पडून ------ याने आत्मबलिदान केले.


(1) बाबू गेनू


(2) शिरीषकुमार


(3) भाई कोतवाल


(4) हेमू कलानी


उत्तर-बाबू गेनू

_____________




21. सरकारने पेशावर येथील सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश ------पलटणीला दिला.


(1) गढ़वाल


(2) शीख


(3) मराठा


(4) राजपूत


उत्तर-गढ़वाल

___________




22. सोलापूर येथील मोर्चावर झालेल्या गोळीबारात ठार झालेले स्वयंसेवक------


(1) मल्लाप्पा धनशेट्टी


(2) शंकर शिवदारे


(3) जगन्नाथ शिंदे


(4) कुर्बान हुसेन


उत्तर-शंकर शिवदारे

_______________





23. 1930 ते 1932 या काळातील गोलमेज परिषदा------ भरल्या. येथे


(1) लंडन


(2) पॅरिस


(3) बर्लिन


(4) भारत


उत्तर-लंडन

_________





24. ब्रिटिश प्रधानमंत्री ----- यांनी गोलमेज परिषद आयोजित  केली.


(1) विन्स्टन चर्चिल


(2) नेव्हिल चेंबरलेन


(3) रॅम्से मॅक्डोनाल्ड


(4) क्लेमंट अॅटली


उत्तर-रॅम्से मॅक्डोनाल्ड

__________________




25. कोणत्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून { महात्मा गांधी उपस्थित होते ?


(1) पहिल्या


(2) दुसऱ्या


(3) तिसऱ्या


(4) चौथ्या


उत्तर-दुसऱ्या

__________




26. ब्रिटिश प्रधानमंत्री -------यांनी जातीय निवाडा जाहीर केला.


(1) रॅम्से मॅक्डोनाल्ड


(2) नेव्हिल चेंबरलेन


(3) विन्स्टन चर्चिल


(4) अॅन्युरिन बेव्हिन


उत्तर-रॅम्से मॅक्डोनाल्ड

__________________




27. ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी इ. स. 1930 मध्ये लंडन येथे बोलावलेल्या गोलमेज परिषदेचा हेतू काय होता ?


(1) भारताला स्वातंत्र्य देणे.


(2) भारतावर करांचा बोजा टाकणे.


(3) भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करणे.


(4) भारताला दयायच्या राजकीय सुधारणांवर चर्चा करणे.


उत्तर-भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करणे.

_________________________




28. भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी -------दिली.


(1) पहिल्या गोलमेज परिषदेने


(2) गांधी - आयर्विन कराराने


(3) दुसऱ्या गोलमेज परिषदेने


(4) पुणे कराराने


उत्तर-गांधी - आयर्विन कराराने

________________________





29. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर मॅक्डोनाल्ड यांनी जाहीर केलल्या जातीय निवाड्यानुसार ----- स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आला.


(1) हिंदूंसाठी


(2) मुसलमानांसाठी


(3) आदिवासींसाठी


(4) दलितांसाठी


उत्तर-दलितांसाठी

______________





30. गोलमेज परिषदेनंतर

 केलेल्या जातीय निवाड्याच्या विरोधात गांधीजींनी ------आमरण उपोषण सुरू केले.


(1) ऑर्थररोड जेलमध्ये


(2) येरवडा जेलमध्ये


(3) तिहार जेलमध्ये


(4) तळोजा जेलमध्ये


उत्तर-येरवडा जेलमध्ये

__________________




31. 1932 मध्ये महात्मा गांधी व----- झाला. यांच्यात 'पुणे करार'


(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर


(2) महमंदअली जीना


(3) लॉर्ड आयर्विन


(4) रॅम्से मॅक्डोनाल्ड


उत्तर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

_________________________




32. चित्रातील व्यक्तीचे नाव सांगा.


(1) हंसाबेन मेहता


(2) अवंतिकाबाई गोखले


(3) कस्तुरबा गांधी


(4) सरोजिनी नायडू


उत्तर-सरोजिनी नायडू

__________________




33. सविनय कायदेभंग चळवळीच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट नसलेली बाब पुढील पर्यायांतून निवडा:


(1) या चळवळीत खेड्यातील जनतेनेही सहभाग घेतला.


(2) या चळवळीत महिलांचा मोठा सहभाग होता.


(3) दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.


(4) ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली.


उत्तर-दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

_______________________




34. सविनय कायदेभंगाची चळवळ ------- मध्ये गांधीजींनी मागे. घेतली.


(1) एप्रिल 1934


(2) मे 1934


(3) मार्च 1934


(4) फेब्रुवारी 1934


उत्तर-एप्रिल 1934

________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा