Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १२ मार्च, २०२४

आठवी इतिहास 9.स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

 9.स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व



स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :




1.------- च्या कायदयानुसार ब्रिटिशशासित प्रांत व संस्थाने यांचे मिळून संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली.


(1) 1935


(2) 1919


(3) 1909


(4) 1892


उत्तर-1935

__________




2. 1937 मध्ये देशातील किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या?


(1) दहा


(2) अकरा


(3) बारा


(4) तेरा


उत्तर-अकरा

__________



3. 1937 साली झालेल्या प्रांतिक कायदेमंडळांच्या निवडणुकींत----- प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले.


(1) पाच


(2) आठ


(3) नऊ


(4) अकरा


उत्तर-आठ

_________




4. प्रांतिक मंत्रिमंडळांनी केलेल्या कामांमध्ये समाविष्ट नसलेली बाब पुढील पर्यायांतून निवडा :


(1) राजबंदयांची तुरुंगातून मुक्तता केली.


(2) दारूबंदी लागू केली.


(3) शेतकऱ्यांसाठी कर्जनिवारण कायदा संमत केला.


(4) सावकारशाहीला विरोध केला.


उत्तर-सावकारशाहीला विरोध केला.

_______________________



5. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी कोणाला भारतात पाठवले ?


(1) लॉर्ड वेव्हेल


(2) लॉर्ड माउंटबॅटन


(3) स्टॅफर्ड क्रिप्स


(4) व्हाइसरॉय लिनलिथगो


उत्तर-व्हाइसरॉय लिनलिथगो

_______________________





6. भारत दुसऱ्या महायुद्धात सामील झाल्याची घोषणा कोणी केली ?


(1) प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल


(2) व्हाइसरॉय लिनलिथगो


(3) स्टॅफर्ड क्रिप्स


(4) लॉर्ड वेव्हेल


उत्तर-व्हाइसरॉय लिनलिथगो

______________________


7. नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले; कारण-----


(1) भारताला ताबडतोब स्वातंत्र्य दयावे, ही राष्ट्रीय सभेची मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिला.


(2) राष्ट्रीय सभा व प्रांतिक मंत्रिमंडळे यांच्यात मतभेद होते.


(3) प्रांतिक मंत्रिमंडळांना मुस्लीम लीगने सहकार्य दिले नाही.


(4) ब्रिटिश विरोधामुळे प्रांतिक मंत्रिमंडळांना काम करणे अशक्य झाले.


उत्तर-भारताला ताबडतोब स्वातंत्र्य दयावे, ही राष्ट्रीय सभेची मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिला.

________________________




8. 14 जुलै 1942 च्या ------येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याविषयीचा ठराव संमत केला.


(1) मुंबई


(2) वर्धा


(3) नागपूर


(4) सातारा


उत्तर-वर्धा

________



9. 1942 च्या राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?


(1) पंडित जवाहरलाल नेहरू


(2) सुभाषचंद्र बोस


(3) मौलाना अबूल कलाम आझाद


(4) सुरेंद्रनाथ बॅनर्जी


उत्तर-मौलाना अबूल कलाम आझाद

_______________________





10. 'छोडो भारत' हा ठराव संमत करणारे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मुंबईतील ------भरले होते.


(1) कामगार मैदानावर


(2) गवालिया टँक मैदानावर


(3) शिवाजी पार्क मैदानावर


(4) आझाद मैदानावर 1234


उत्तर-गवालिया टँक मैदानावर

______________________



11. मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 'छोडो भारत' हा ठराव -----यांनी मांडला.


(1) जवाहरलाल नेहरू


(2) सरदार वल्लभभाई पटेल


(3) डॉ. राजेंद्र प्रसाद


(4) राम मनोहर लोहिया


उत्तर-जवाहरलाल नेहरू

___________________






12. 'छोडो भारत' हा ठराव राष्ट्रीय सभेच्या -----  अधिवेशनात      प्रचंड बहुमताने मंजूर झाला. 


(1) वर्धा


(2) नागपूर


(3) मुंबई


(4) सातारा


उत्तर-मुंबई

__________



13. "या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री-पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत, असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे" हे विधान कोणी केले?


(1) मौलाना आझाद


(2) महात्मा गांधी


(3) पंडित नेहरू


(4) सरदार वल्लभभाई पटेल


उत्तर-महात्मा गांधी

________________



14. 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या मुंबई येथील अधिवेशनात 'छोडो भारत' हा ठराव संमत करण्यात आला; कारण--------


(1) राष्ट्रीय सभेला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून दयायचे होते.


(2) राष्ट्रीय सभेला नव्या राजकीय सुधारणा हव्या होत्या.


(3) राष्ट्रीय सभेला मुस्लीम लीगवर मात करायची होती.


(4) राष्ट्रीय सभेला ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्य मिळवायचे होते.


उत्तर-राष्ट्रीय सभेला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून दयायचे होते.

_____________________




15. सिंध प्रांतात -----यांनी शस्त्रधारी ब्रिटिश सैनिकांना नेणारा रेल्वेमार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना फाशी दिली.


(1) खुदीराम बोस


(2) अशफाक उल्ला खान


(3) प्रफुल्ल चाकी


(4) हेमू कलानी


उत्तर-हेमू कलानी

_____________




16. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांच्या कोणत्या गटाने सरकारला सळो की पळो करून सोडले होते ?


(1) लाल सेना


(2) अभिनव भारत


(3) अनुशीलन समिती


(4) आझाद दस्ता


उत्तर-आझाद दस्ता

_______________





17. 'लाल सेना' या गटाची स्थापना कोणी केली होती?


(1) भाई कोतवाल


(2) जनरल आवारी


(3) शिरुभाऊ लिमये


(4) मगनलाल बागडी


उत्तर-जनरल आवारी

_________________




18. छोडो भारत आंदोलन काळात मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र कोण चालवत असे?


(1) उषा मेहता


(2) अरुणा असफअली


(3) कमला नेहरू


(4) मादाम कामा


उत्तर-उषा मेहता

_____________




19. उषा मेहता व विठ्ठल जव्हेरी हे ------ नावाचे गुप्त प्रक्षेपण. केंद्र चालवत.


(1) फ्री इंडिया सेंटर


(2) आझाद रेडिओ


(3) लाल सेना


(4) आझाद दस्ता


उत्तर-आझाद रेडिओ

________________




20. चुकीची जोडी ओळखा :


(1) आझाद दस्ता - भाई कोतवाल


(2) आझाद रेडिओ - अरुणा असफअली


(3) आझाद हिंद सेना - रासबिहारी बोस


(4) आझाद हिंद सरकार - सुभाषचंद्र बोस


उत्तर-आझाद रेडिओ - अरुणा असफअली

________________________




21. 1942 च्या छोडो भारत आंदोलनकाळात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोठे प्रतिसरकार स्थापन केले होते?


(1) आझमगढ


(2) सातारा


(3) पूर्णिया


(4) मिदनापूर


उत्तर-सातारा

___________



22. प्रतिसरकारे स्थापन झालेले जिल्हे - चुकीची जोडी निवडा :


(1) महाराष्ट्र - सातारा जिल्हा


(2) उत्तर प्रदेश - बालिया


(3) बंगाल - मिदनापूर


(4) बिहार - आझमगढ


उत्तर-बिहार - आझमगढ

____________________





23. प्रतिसरकारचे प्रेरणास्थान कोणास म्हटले जाते ?


(1) क्रांतिसिंह नाना पाटील


(2) भाई कोतवाल


(3) जनरल आवारी


(4) सुभाषचंद्र बोस


उत्तर-क्रांतिसिंह नाना पाटील

_____________________



24. प्रतिसरकार------ च्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करीत.


(1) आझाद दस्ता


(2) लाल सेना


(3) फॉरवर्ड ब्लॉक


(4) तुफान सेना


उत्तर-तुफान सेना

______________



25. प्रतिसरकार यांना मदत करण्याऱ्या 'तुफान सेनेचे' नेतृत्व कोण करीत होते ?


(1) क्रांतिसिंह नाना पाटील


(2) भाई कोतवाल


(3) बापू लाड


(4) जनरल आवारी


उत्तर-बापू लाड

___________



26. प्रतिसरकारे करीत असलेल्या कामांमध्ये समाविष्ट नसलेली बाब कोणती ?


(1) लोकन्यायालये स्थापून न्यायनिवाडा करणे


(2) साक्षरता प्रसार करणे


(3) रेल्वेस्थानकांवर हल्ले करून ती ताब्यात घेणे


(4) दारूबंदी व जातिभेद निर्मूलन करणे


उत्तर-रेल्वेस्थानकांवर हल्ले करून ती ताब्यात घेणे

_____________________





27.------ या राष्ट्रव्यापी आंदोलनाला 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हटले जाते.


(1) सविनय कायदेभंग आंदोलन


(2) असहकार आंदोलन


(3) वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन


(4) 'छोडो भारत' आंदोलन


उत्तर-छोडो भारत' आंदोलन

______________________





28. 1942 च्या राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात----यांच्या राष्ट्रभक्तिपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला.


(1) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


(2) संत गाडगे महाराज


(3) संत तुकाराम


(4) संत एकनाथ


उत्तर-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

_________________________





29. सुभाषचंद्र बोस यांनी आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी कोणत्या पक्षाची स्थापना केली?


(1) फॉरवर्ड ब्लॉक


(2) राष्ट्रीय काँग्रेस


(3) समाजवादी पक्ष


(4) इंडियन इंडिपेंडन्स लीग


उत्तर-फॉरवर्ड ब्लॉक

_______________



30. ब्रिटिशांच्या नजरकैदेतून आपली सुटका करून घेतल्यावर सुभाषचंद्र बोस------ पोहोचले.


(1) जपानला


(2) चीनला


(3) जर्मनीला


(4) फ्रान्सला


उत्तर-जर्मनीला

____________




31. रासबिहारी बोस यांनी----- या नावाची संघटना स्थापन केली.


(1) इंडियन इंडिपेंडन्स लीग


(2) इंडियन इंडिपेंडन्स असोसिएशन


(3) इंडियन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशन


(4) इंडिया लीग


उत्तर-इंडियन इंडिपेंडन्स लीग

_______________________





32. जर्मनीमध्ये 'फ्री इंडिया सेंटर' ची स्थापना कोणी केली ?


(1) रासबिहारी बोस


(2) रासबिहारी घोष


(3) सुभाषचंद्र बोस


(4) अरविंद घोष


उत्तर-सुभाषचंद्र बोस

_________________



33. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय जनतेला कोणते आवाहन केले ?


(1) दुसऱ्या महायुद्धात सहभागी होण्याचे


-(2) भारताच्या स्वातंत्र्यसाठी सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे


(3) अहिंसक मार्गाने सत्याग्रह करण्याचे


(4) जर्मनीविरुद्ध इंग्रजांना सहकार्य करण्याचे


उत्तर-भारताच्या स्वातंत्र्यसाठी सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे

______________________





34 आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे---------


(1) सुभाषचंद्र बोस


(2) रासबिहारी बोस


(3) अरविंद घोष


(4) रासबिहारी घोष


उत्तर-रासबिहारी बोस

_________________




35. 'आझाद हिंद सरकार 'ची स्थापना कोणी केली ?


(1) रासबिहारी बोस


(2) सुभाषचंद्र बोस


(3) अरविंद घोष


(4) सुरेंद्रनाथ बॅनर्जी


उत्तर-सुभाषचंद्र बोस

_________________



36. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूँगा।" हे उद्‌गार कोणी काढले?


(1) रासबिहारी बोस


(2) महात्मा गांधी


(3) सुभाषचंद्र बोस


(4) स्वातंत्र्यवीर सावरकर


उत्तर-सुभाषचंद्र बोस

_________________




37. पुढील पर्यायांमधून 'आझाद हिंद सरकार 'मध्ये नसलेल्या व्यक्तीचे नाव निवडा.


(1) डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन


(2) गुरुबक्षसिंग धिल्लाँ


(3) जगन्नाथ भोसले


(4) राम मनोहर लोहिया


उत्तर-राम मनोहर लोहिया

____________________




38. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने----- व------ जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. ही बेटे


(1) दीव व दमण


(2) अंदमान व निकोबार


(3) लक्षद्वीप व अंदमान


(4) लक्षद्वीप व मालदीव


उत्तर-अंदमान व निकोबार

____________________




39. अंदमान व निकोबार या बेटांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणती नवी नावे दिली?


(1) शहीद व स्वराज्य


(2) स्वराज्य व शहीद


(3) स्वतंत्र व कुर्बान


(4) कुर्बान व स्वतंत्र


उत्तर-शहीद व स्वराज्य

__________________





40. ------रोजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.


(1) 16 ऑगस्ट 1945


(2) 18 ऑगस्ट 1945


(3) 20 ऑगस्ट 1945


(4) 17 ऑगस्ट 1945


उत्तर-18 ऑगस्ट 1945

____________________





41. दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी संप का केला?


(1) 'छोडो भारत' आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता


(2) आझाद हिंद सरकारला पाठिंबा देण्याकरिता


(3) मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्याकरिता


 (4)पगारवाढीकरिता


उत्तर-मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्याकरिता

________________________





42. ------यांच्या मध्यस्थीने नौदलाने आपला उठाव थांबवला.


(1) सरदार वल्लभभाई पटेल


(2) पंडित जवाहरलाल नेहरू


(3) महात्मा गांधी


(4) डॉ. राजेंद्र प्रसाद


उत्तर-सरदार वल्लभभाई पटेल

_______________________




43.------- रोजी मुंबई बंदरातील 'तलवार' या ब्रिटिश नौकेवरील सैनिकांनी तिरंगा फडकवून उठाव केला.


(1) 16 फेब्रुवारी 1946


(2) 17 फेब्रुवारी 1946


(3) 18 फेब्रुवारी 1946


(4) 19 फेब्रुवारी 1946


उत्तर-18 फेब्रुवारी 1946

___________________




44. 'वैयक्तिक सत्याग्रहा 'तील पहिले सत्याग्रही ------हे होते.


(1) साने गुरुजी


(2) जवाहरलाल नेहरू


(3) विनोबा भावे


(4) जयप्रकाश नारायण


उत्तर-विनोबा भावे

_______________




45. नंदुरबार येथे------ याच्या नेतृत्वाखाली शाळकरी विदयार्थ्यांनी इंग्रजांविरुद्ध झेंडा मोर्चा काढला.


(1) धनसुखलाल


(2) शशिधर


(3) लालदास


(4) शिरीषकुमार


उत्तर-शिरीषकुमार

______________




46. चित्रातील व्यक्ती कोणत्या चळवळीशी संबंधित आहे?


(1) असहकार चळवळ


(2) चले जाव चळवळ


(3) भूमिगत चळवळ


(4) क्रांतिकारी चळवळ


उत्तर-भूमिगत चळवळ

__________________



47. चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा.


(1) क्रांतिसिंह नाना पाटील


(2) अच्युतराव पटवर्धन


(3) रासबिहारी बोस


(4) जयप्रकाश नारायण


उत्तर-अच्युतराव पटवर्धन

____________________



48. चित्रातील बालवीराने इंग्रजांविरुद्ध कोठे झेंडा मोर्चाचे नेतृत्व केले ?


(1) नांदेड


(2) मुंबई


(3) पुणे


(4) नंदुरबार 


उत्तर-नंदुरबार 

____________



49. चित्रातील व्यक्तीच्या कार्याचे वैशिष्ट्य कोणते ?


(1) लाल सेना गटाची स्थापना


(2) आझाद दस्ता गटाच्या माध्यमाने ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले


(3) प्रतिसरकारांचे प्रेरणास्थान


(4) वैयक्तिक सत्याग्रह 


उत्तर-प्रतिसरकारांचे प्रेरणास्थान

________________________




50. चित्रातील व्यक्ती कोण ते ओळखा.


(1) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


(2) संत तुकाराम


(3) संत रामदास


(4) संत एकनाथ


उत्तर-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

_________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा