Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

12 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

 

       12 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना 

- या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे... 


→ श्लोक

 - माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पाठितः । न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ॥ ज्यांनी आपल्या मुलाला शिकविले नाही, ते आईवडील त्या मुलाचे वैरी (शत्रू) होत. हंसामध्ये जसा बगळा शोभून दिसत नाही तसा न शिकलेला मुलगा समाजात शोभून दिसत नाही. 

 

→ चिंतन

- पुस्तके मुलांच्या अंतर्जीवनात फार मोठी भूमिका बजावतात. पण केव्हा? तर मुलाला उत्तम वाचायला येईल तेव्हाच. वाचनाच्या प्राथमिक क्रियांवरील प्रभुत्व आल्यानंतर अस्खलितपणे वाचन करण्याची व जे वाचले असेल त्याचे आकलन करण्याची क्षमता मुलात यायला हवीच. परंतु वाचनक्षमता हा वाचनक्रियेचा केवळ आरंभ आहे. उत्तम वाचायला येणे, याचा अर्थ शब्दांचा अर्थ, सौंदर्य आणि सूक्ष्म छटा यांच्या बाबतीत संवेदनाक्षम बनणे, निसर्गाचे पुस्तक वाचणेही तितकेच महत्त्वाचे आहे.


कथाकथन 

- 'निसर्ग मानवाचा मित्र' निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन काळापासूनचा आहे. अगदी अनादिकालापासूनच् निक्षण हा माणसाचा जिवलग सोबती आहे. निसर्गाच्या कुशीत विसावणाऱ्या ऋषीमुनींनाच दिव्य अमर असे काव्य स्फुरले; आकाशातील बदलणारे रंग पाहून कवींच्या प्रतिभेला बहर आला. निसर्गाच्या त्या पवित्र वातावरणात विचारवंतांनी तत्त्वचिंतन केले. या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार हो त्याची भूक भागवितो, तहान शमवितो. मंद, मधुर बायुलींनी त्याचा श्रमपरिहार करतो. सुगंधित फुलांनी त्याचे श्रांतांत जीवन सुगंधित व उल्हासित करतो. थकल्या - भागलेल्याला सावली देतो. उन्हाचा त्रास झाला तर थंड पाण्याचा शिडकावा करतो. निवारा उभारण्यासाठी लाकूड देतो. वस्त्रासाठी कापूस देतो. अन्न शिजविण्यासाठी सरपण देतो. या जिवलग मित्राच्या अशा पदोपदी होणाऱ्या मदतीवाचून मानवाला जीवन। जगताच येणार नाही. स्वत: उन्हात उभे राहून दुसऱ्याला सावली देणारी झाडे माणसाला जणू सांगत असतात, 'अरे, दुसऱ्यासाठी जगणे हेच खरे जगणे.' 'आपल्याजवळ जे काही आहे ते दुसन्याला देत जा.' असे आवाहन करीत सरिता सर्वांचे जीवन फुलबीत मार्गक्रमण करीत असते. सागराच्या आचरणातून सहिष्णुतेचा, क्षमाशीलतेचा व औदार्याचा संदेश मिळतो आणि उत्तुंग पर्वत गगनाला गवसणी घालण्याची आकांक्षा मानवी मनात फुलवितात. आपण किती व्हावे याची शिकवण धरतीमाता आपणाला पावलोपावली देत असते. 'निसर्गाची लेकरे' हे जीवनशिक्षण मानवाला देत असतात. 'अरे मित्रा, अडचणी-अपयश येणारच, त्यावर मात करायची.' हा संदेश जाळे विणण्यासाठी धडपडणारा कोळी आपल्याला देत असतो. 'चिकाटी असली की असाध्य ते साध्य करता येते बधं !' हे आपल्याला झाडावर लागलेले यांचे भलेमोठे पोळे सांगत असते. दहाजणींच्या सांघिक प्रयत्नांतून एवढा मोठा गव्हाचा दाणाही वाहून नेता येतो ही सहकाराची अमूल्य मुंग्या देतात; तर गात्रे थकल्यास मरण स्वीकारावे, पण परावलंबी होऊ नये ही स्वाभिमानाची शिकवण वनराज देतो.



 • सुविचार 

 • निसर्ग शक्ती, निसर्ग पूजा! निसर्ग ईश्वर, निसर्ग राजा 


→ दिनविशेष 

• अर्बेन जॉर्जेस फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जन्मदिन १८७२ हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ पॅरिस येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सॉवॉन येथे रसायनशास्त्राचे अध्यापन करु लागला. मातीवरील याचे संशोधन महत्त्वाचे मानले जाते. १९०७ मध्ये याने earth-lutecia चा शोध लावला. त्यात अनेक शुद्ध समजली जाणारी द्रव्ये मिश्रणाने बनलेली असतात हे त्याने प्रयोगाने दाखवून दिले. क्षार द्रव्यांचाही याचा अभ्यास मोठा होता. ५ रोव्हें., १९३८ ला त्याचे निधन झाले. 


→ मूल्ये - 

• अभ्यासू, संशोधक वृत्ती


अन्य घटना -

• महाराणा संग्रामसिंहाचा जन्म - १३८२.

 • शीखांचे गुरू तेग बहादूर यांचा जन्म - 

 • • पु. भा. भावे यांचा जन्मदिन - १९१०. युरी गागारीनचे अंतराळात उड्डाण - 


 उपक्रम - 

 • देश हमारा, निर्मल सुंदर, उज्वल गगन का तारा... +

 

 सामान्यज्ञान -

  • काळी आई - जमिनीचा वरचा सहा इंचाचा थर हा पृथ्वीवरच्या जीवनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा. असंख्य जीवजंतूंची जन्ती या घरात असते. एक हेक्टर क्षेत्रात सुमारे ३० कोटी जीवजंतू असतात. ज्यात सूक्ष्मजीव, अळ्या, किडे यांचा समावेश असतो. हे प्रचंड संख्येनं जीव जमिनीत आहेत म्हणूनच सर्व प्राण्यांचं जीवन सुरळीत चालू आहे. कारण स्वतःचं अत्र स्वतःच तयार करणारा पृथ्वीवरचा जो एकमेव पटक हिरव्या वनस्पती - त्यांना आवश्यक असणारी सगळी पोषक द्रव्ये हे जीवजंतू पुरवितात. हवेतला नत्रवायू जमिनीत स्थिरावणं, प्राण्यांचे नि वनस्पतीचे मृतदेह कुजवून त्यातली द्रव्य जमिनीत मिसळवणं अशा अनेक मार्गांनी वनस्पतींना हवी असणारी द्रव्यं जमिनीत तयार करण्याचं आणि काम हे जीव करतात. गांडुळांसारखे प्राणी खालची माती वर आणून हे सर्व मिश्रण एकजीव करतात. या प्रक्रियांनाच जमिनीचा कस वाढव नातात. जीवजंतूंच्या सांघिक प्रयत्नांतून ही प्रक्रिया सतत चालू असली तरी तिचा वेग मात्र फार कमी असतो. अगदी मूळच्या खडकांपासू जोगी जमीन तयार व्हायची असेल तर तिला १००० ते १०,००० वर्षे लागतात. अगदी पडीक किंवा हलक्या जमिनीचा कस सुधारायचा म्हट त्याला ४०-५० वर्षे लागतात. बहुतेकशा नैसर्गिक प्रक्रियांप्रमाणेच ही सुद्धा एक सावकाश घडत राहणारी प्रक्रिया आहे. याउलट त्याच जमिनी घर मात्र काही तासांच्या अवधीतही होऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा