14 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
- ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो..
→ श्लोक
- निर्गुणेष्वपि सत्वेषु दयां वर्षन्ति साधवः । न हि संहरते ज्योत्स्नां चंद्रः खलनिकेतनात् । वार : गुणहीन (दुर्गुणी) लोकांवरही सज्जन लोक दयेचा वर्षाव करतात. चंद्र दुष्ट माणसाच्या घरावरून आपले चांदणे काढून घेत नाही.
→ चिंतन
- उत्साही माणसाला अशक्य असे काहीच नाही. योग्य मार्ग अवलंबिल्यास सर्व प्रयत्न सफल होतात. १४ एप्रिल कोणतीही गोष्ट ठरवून करणे यासाठी इच्छाशक्ती जबर असावी लागते. ही इच्छाशक्ती ज्या व्यक्तीत जागी होईल, तिला नवनवीन गोष्टी करायला सुचू शकेल. नवनवीन गोष्टी करायला उत्साह वाटेल, कामात आखणीपूर्वी, प्रत्यक्ष काम करताना आणि काम संपेपर्यंत हा उत्साह टिकणे आवश्यक असते. किंबहुना 'धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे' हेच खरे आहे. उत्साह असेल तर कोणत्याही अडीअडचणींतून मार्ग काढता येतात, आणि इच्छित गाठता येते.
कथाकथन
- आरा युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय घटनेचे शिल्पकार, बहुजनांचे कैवारी डॉ. बाबासाहेब यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील मह या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई, आबासाहेब लहानपणापासून अत्यंत हुशार होते. परंतु ते अस्पृश्य जातीत जन्मास आले. त्या काळी अस्पृश्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळत असे वर्ण लोक अस्पृश्यांचे तोंड पाहणे, त्यांना स्पर्श करणे टाळीत. या अस्पृश्यतेची झळ डॉ. आंबेडकरांना विद्यार्थीदशेत फार बसली. केवळ अ म्हणून त्यांना संस्कृत शिकता आले नाही. शाळेत त्यांना पर्शियन भाषा घ्यावी लागली. संस्कृतचा अभ्यास त्यांनी स्वकष्टाने केला. १९०७ साली मॅट्रीक झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला. १९१२ मध्ये ते बी.ए झाले. बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून १९१५ मध्ये एम.ए. ची पदवी घेतली. त्यानंतर पीएच.डी पदवी मिळवली. अमेरिकेतून परत आल्यावर त्यांना बडोदे संस्थानमध्ये नोकरी मिळाली. पण, तेथेही त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले. केवळ अस्पृश्य म्हणून त्यांना राहावयास जागा मिळेना. कार्यालयातील हाताखालचे लोकसुद्धा बाबासाहेबांशी तुच्छतेने वागत. आपल्यासारख्या उच्च विद्याविभूषिताला जर अशी अमानुष वागणूक मिळते तर खेड्यापाड्यात, अज्ञान, दुःख, दारिद्रयात पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्या आपल्या अस्पृश्य समाजाला कोणत्या प्रकारची वागणूक मिळत असेल, त्यांना किती छळ सोसावा लागत असेल या विचाराने बाबासाहेब अतिशय दुःखी झाले. त्यांनी 'मूक नायक' नावाचे पाक्षिक काढून दलितांवरील अन्यायांना वाचा फोडली. खेड्यापाड्यात जाऊन आपल्या दलित बांधवांना जागे करण्याचा, न्याय्य हक्कांसाठी संघर्षास सिद्ध करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. त्यांनी दलित तरुणांना संदेश दिला : 'उठा, जागे व्हा. शिक्षण घ्या, आपला व आपल्या बांधवांचा उद्धार करा. स्वतःचा उद्धार स्वतः करा. कुणाच्या दयेवर जगू नका.' १९२७ साली महाडला अस्पृश्यतेविरोधी परिषद भरली होती. बाबासाहेबांनी अस्पृश्य बांधवांसह चवदार तळ्यातील पाण्याला स्पर्श केला. मनुस्मृतीची होळी केली. लंडनमधील गोलमेज परिषदेत दलितांची बाजू प्रभावीपणे मांडली. भारताची घटना तयार करण्याचे काम करणाऱ्या समितीचे प्रतिनिधित्व बाबासाहेबांनी केले. १९५६ साली दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांनी नागपूर येथे आपल्या हजारो लोकांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.. ६ डिसेंबर १९५६ ला त्यांचे निर्वाण झाले. बाबासाहेबांना 'भारतरत्न' हा बहुमान १९९० साली मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
सुविचार -
• 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' - डॉ. आंबेडकर
• कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे हहोते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
दिनविशेष -
• सर विश्वेश्वरय्या स्मृतिदिन - १९६२ - भारतातील सुप्रसिद्ध स्थापत्यविशारद व मुत्सद्दी भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वर अय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. बंगलोर व पुणे येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना मुंबई विद्यापीठाची एल.सी. इ. ही पदवी मिळाली. त्यांनी मुंबईच्या सार्वजनिक बांधकामात नोकरी केली. खडकवासला येथे जे धरण बांधले गेले त्याच्या स्वयंचलितदारांची कल्पना सर विश्वेश्वरअय्या यांची! १९०८ मध्ये हैदराबाद, म्हैसूर येथे स्थापत्य सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. ते म्हैसूरचे दिवासही होते. या खेरीज अनेक समित्यांवर त्यांनी अध्यक्ष वा सदस्य म्हणून काम केले. लखनौ सायन्स काँग्रेसचे (१९२३) अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. | १९४६-४७ सालात त्यांनी पाश्चात्य राष्ट्रांना भेटी दिल्या. मुंबई, म्हैसूर, बनारस, आंध्र, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद या सात विद्यापीठांनी त्यांना सन्मानदर्शक पदव्या दिल्या. १९५६ साली त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब प्राप्त झाला. मुत्सद्दी लेखक म्हणूनही त्यांनी मोठी कीर्ती मिळविली. पुण्याच्या आधुनिक ड्रेनेजची व्यवस्था त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सिद्ध झाली. १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांचे देहावसान झाले.
→ मूल्ये -
• उद्यमशीलता, ज्ञाननिष्ठा.
→ अन्य घटना
• अब्राहम लिंकनचे निधन - १८६५.
• भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म - १८९१.
• १ रुपयाचा शिक्का प्रसिद्ध - १९१०.० विद्यार्थी दिवस
. • अग्निशामक दलातील मृत जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'अग्निशामक दल दिन' -
→ उपक्रम
• सर विश्वेश्वर अय्या यांच्या कार्याची माहिती देणे. डॉ. बाबासाहेबांचे चरित्र वाचा. तसेच 'भारतीय राज्यघटनेचे' वाचन करा. -
→ समूहगान
• धन्य धन्य ठायी ठायी हा क्रांतीसूर्य जगी नाही घडविले असे कुणी पर्व
→ सामान्यज्ञान
• सर विश्वेश्वर अय्या यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बंगलोर येथे 'सर विश्वेश्वर अय्या सायन्स म्युझिअम' उभारले आहे. हे म्युझियम भारतातील सर्वांत मोठे सायन्स म्युझियम आहे. • केरळमधील त्रिवेंद्रम (तिरूअनंतपूरम्) येथेही उल्लेखनीय सायन्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा