17 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
- राम रहीम को भजनेवाले, तेरे है बंदे ख़ुदा या...
→ श्लोक -
श्लोक - लक्ष्मीवन्तो न जानन्ति प्रायेण परवेदनाम् । शेषे धराभराक्रान्ते शेते नारायणः स्वयम् ॥
बहुधा, श्रीमंत लोकांना दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असत नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या भाराने त्रासलेल्या शेषनागार विष्णू खुशाल पहुडतो ( झोपतो)
→ चिंतन
जी सौंदर्याला सजीव बनविते व भीषणतेला निर्जीव बनविते तीच खरी कला होय. झाशीच्या राणीचा, महात्मा गांधींचा पुतळा इतका सुडौल, भावदर्शी असतो की आपल्या मनात त्यावेळचा इतिहास जसाच्या राहतो आणि आपण त्या ऐतिहासिक वातावरणात हरवून जातो. आपल्यासमोर पुतळा नसून साक्षात ती व्यक्ती आहे असे भासते. हेच सजीव बनविणे होय. तानसेनने मेघमल्हार गावा आणि बरसात व्हावी, वीजांचा कडकडाट होतो आहे असा भास व्हावा, हेच सद करणे होय. अशा वेळी माणसाच्या तोंडून सहजपणे 'वाहवा' असे उद्गार निघावे. तर कित्येकदा नाट्यातील एखादा प्रसंग आपली वा करतो आणि तो अनुभव आपल्या मनात निःशब्द शांतता निर्माण करतो. साहित्यिकांच्या कलाकृतीतून हा परिणाम प्रत्यक्ष घडलेला दि त्या साहित्यिकाचे मोठेपण, त्याच्या कलेची कसोटी होय.
कथाकथन
'अविचारे कार्य नासते' :- अवंतिपुर नगरीत एक गरीब ब्राह्मण राहात होता. गावातील लोकांची धार्मिक देवळातील पूजाअर्चा करून त्याचा संसारखर्च चालत होता. फारशी शिल्लक राहत नव्हती. पण, पोटाला चिमटा बसत नव्हता एवढेच ग्राम होती त्यामुळे संसार टापटिपीचा होता. एक लहानसे गोजिरवाणे बाळ परात आल्यामुळे त्या उभयतांना वाटत नसे. एकदा देवळातील गाभान्यात वावरताना ब्राह्मणाला एक मुंगूस दिसले. एकदा नाही, दोनदा नाही तर लागोपाठ तीन-चार वेळा हे मुंगूस तेथे आढळले आणि त्याने त्याला आपल्या घरात सांभाळले. आता ते मुंगूस त्याच्याच घरातील एक झाले होते. त्या दोघांच होते आणि मुंगसाचेही त्यांच्यावर. एके दिवशी ब्राह्मणीला नदीवरून पाणी आणावयाचे होते. तेव्हा तिने आपल्या पतीला मुलाची काळजी घेण्यास सांगितले आणि ती नदी ब्राह्मणी गेली आणि थोड्याच वेळात ब्राह्मणाला एका यजमानाकडून पूजेसाठी तातडीचे आमंत्रण आले. ब्राह्मणापुढे प्रश्न पडला, जावे की न जायचे म्हटले तर छोट्या बाळाला कोठे ठेवायचे? न जावे तर दक्षिणा बुडेल, शिवाय आज गेलो नाही तर पुन्हा त्या घरचे काम शेवटी त्याला एक मार्ग सुचला. त्याने बाळाला पाळण्यात ठेवले व मुंगसाला त्याच्यासोबत ठेवून निर्धास्तपणे तो घराबाहेर पडला. ब्राह्मण एक साप पळाजवळ जाताना मुंगसाला दिसला. आधीच सापावे आणि मुंगसाचे जन्मजात शत्रुत्व आणि आता तर बाळाची जबाबद होती. साप पाहताच मुंगूस सापावर तुटून पडले आणि त्याने सापाचे तुकडे तुकडे केले. नंतर मोठ्या कृतार्थतेन ते घराच्या दाराशी येऊन बसले. पाण्याची घागर घेऊन ब्राह्मणी घरी आली तेव्हा तिचे स्वागत त्या मुंगसाने केले. त्याला बोलता येत नव्हते. पण, त्याला जणू आप परक्रम मालकिणीला सांगावयाचा होता, ब्राह्मणीने जेव्हा ते रक्ताने तोंड माखलेले मुंगूस पाहिले तेव्हा तिला वाटले की नक्कीच या आपल्या बाळाचा चावा घेतला. क्षणभरच तडफड होऊन ते मुंगूस गतप्राण झाले. मग तिने मागचा पुढचा काहीही विचार न करता आपल्या कमरेवरील कळशी मुंगसावर टाकली. पण त्या मुंगसाकडे पाहण्या त्या मातेला वेळ कोठे होता? ती धावत पाळण्याजवळ गेली. पाळ बाळ हसत होता आणि पाळण्याखाली एक साप मरून पडला होता. क्षणात ब्राह्मणीला सारा प्रकार उलगडला. ती मुंगसाकडे धावली पण आ उशीर झाला होता. तो उपकारकर्ता केव्हाच देवाघरी गेला होता. ब्राह्मणीला आपल्या या अविवेकाचा पश्चात्ताप झाला आणि तेव्हापासून ि अविचाराने कुठलेही कार्य करायचे नाही, असा निश्चय केला.
→ सुविचार
→ दिनविशेष
• कवी सूरदास कमदिन - १४०१ - हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवी, शोर कृष्णभ आचार्य सूरदासजी सर्वपरिचित आहेत. ते आपले होते. मथुरा - आग्रा रस्त्यावरील सनकता या गावी ते जन्मले. त्यांच्या वडीलांचे नाव रामट होते. श्री बलभाचार्याच्या सांगण्यावरून त्यांनी कीर्तनभक्तीचा मार्ग स्वीकारला. श्रीमद्भागवतावर त्यांनी पदे लिहिली आणि भागवताचे सार सर्वोप पोहोचविले. त्यांनी श्रीकृष्णाच्या जीवन प्रसंगावर आपल्या रसपूर्ण वाणीत रचना केली. ती रचना अत्यंत लोकप्रिय ठरली. ते स्वतः कृष्णमन होते. कृष्णसखा उद्धव याचा अवतार म्हणजे सूरदास असे मानले जाते. गोवर्धन पर्वतावरील श्रीनाथ मंदिराचे ते पुजारी व एकनिष्ठ सेवक स त्यांचे संगीतकलेचे ज्ञान फार मोठे होते. सूरसागर हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.त्यात त्यांची पदे संग्रहित करण्यात आली आहेत. यामध्ये 'भ्रमरगो या नावाने प्रसिद्ध असलेले प्रकरण फारच लोकप्रिय आहे. या व्यतिरिक्त सूरसारावली, साहित्यलहरी व नलदमयंती ही त्यांची आख्याने प्रसिद्ध आहेत. साहित्यक्षेत्रात तुलसीदास यांच्या खालोखाल सूरदास यांचे स्थान महत्त्वपूर्ण समजण्यात येते. त्यांना 'सूरदास सूर्याप्रमाणे' असे मानतात. सूरदासांच्या काव्याचे चाहते उत्तर हिंदुस्थानात अनेक आहेत.
मूल्ये
• सर्जनशीलता, भक्तिभाव
→ मूल्ये -
• सर्जनशीलता, भक्तिभाव
→ अन्य घटना -
• बेंजामिन फ्रैंकलिनचे निधन १७९०.
• हेमचंद्र बंदोपाध्याय जन्म -१८३८.
• जगातील सिरिमाओ बंदरनायके यांचा जन्म - १९१६.
उपक्रम -
• सूरदासांच्या ज्ञात अशा दोन-तीन पदांचे वाचन/गायन करणे.
→ समूहगान
हा देश माझा ह्याचे भान, जरासे राहू द्यारे.
सामान्यज्ञान
• काही प्रसिद्ध बंगाली साहित्यिक -
• बंकिमचंद्र चटर्जी
• शरदचंद्र चटोपाध्याय
→ कृषी विद्यापीठे : (१) महात्मा फुले कृषी विद्यापीठ (१९६८) (राहुरी, जि अहमदनगर), (२) पंजाबराव कृषी विद्यापीठ (१९६९) (अकोला, जि. अकोला), (३) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी (१९७२) (दापोली, जि. रत्नागिरी) (४) मराठवाडा कृषी (१९७२) (परभणी, जि. परभणी). महाराष्ट्रात एकूण १५ कृषी महाविद्यालये आहेत. (महाराष्ट्रातील पहिले कृषी महाविद्यालय पुणे येथे १९०८'मध्ये स्थापन झाले.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा